ठिकऱ्या

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जे न देखे रवी...
13 Oct 2015 - 8:18 pm

रात्री रस्त्यावर चालताना
समुद्र माझ्या ओंजळीत लपला.
उथळ पाण्यात चंद्र ढगाआडून खोल हसला.
काळवंडलेली विवरं अनंतात रुतत गेली.
आकर्षकणाची साखळी सहस्त्रकांत गोल फिरली.

हलकेच तरंग उठले आणि चांदण्या बेभान झाल्या.
ऊधानलेल्या समुद्रात सहर्ष हेलकावत खिदळत राहिल्या.
कुठुनसा एक किरण लाजत लाजत चालुन आला
अविरक्त अवकाशात फाटत फरफटत पुढे गेला

नकळत माझ्या मुठीतून,
विश्वातला एक थेंब रस्ताभर पाझरु लागला
काळोखातला सुर्य अंधार चिरडत पेटत गेला
कित्येक चकोर चांदण्या ऊधानून चमकत निसटुन गेल्या
अवकाशाच्या निर्वातात एका ठिणगीच्या ठिकऱ्या झाल्या.

मुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

13 Oct 2015 - 8:23 pm | चतुरंग

पण नानू सरंजामेची 'झोपतो करुन हिमालयाची उशी' आठवले! :)

(साधी उशीवाला)रंगा

जव्हेरगंज's picture

13 Oct 2015 - 9:17 pm | जव्हेरगंज

:)

चांदणे संदीप's picture

13 Oct 2015 - 9:51 pm | चांदणे संदीप

जरी दिले मज वैभव तीनलोकींचे
दास मी खरा त्या आकांक्षेचा नव्हे
रजअणू मी असेन कोठल्या धुळीचा
मी नच पक्वान्न परि खचित ते वांगं
जरा बुद्धीभ्रम होईल हे नीट पहा!
द्या न आकले त्या काळी मज हाका
यद्यपि न शाश्वती मज येथल्या वासाची
मजलाही नसे ठाऊक बरळणे कसले हे!!

____/\____
Sandy

जव्हेरगंज's picture

13 Oct 2015 - 10:07 pm | जव्हेरगंज

हीहीही...
खपेश!

चांदणे संदीप's picture

14 Oct 2015 - 8:34 am | चांदणे संदीप

रात्री एकदाच फास्ट मोडमध्ये वाचून दिलेली ही शीघ्रप्रतिक्रिया...

'ज'री दिले मज वैभव तीनलोकींचे
दास मी खरा त्या आकांक्षेचा न'व्हे'
'र'जअणू मी असेन कोठल्या धुळीचा
मी नच पक्वान्न परि खचित ते वां'गं'
'ज'रा बुद्धीभ्रम होईल हे नीट पहा!
द्या न आकले त्या काळी मज हा'का'
'य'द्यपि न शाश्वती मज येथल्या वासाची
मजलाही नसे ठाऊक बरळणे कसले 'हे'!!

आता सकाळी उठून नीट वाचून हा प्रतिसाद...

"वाह! कुछ तो बात है तुममे, की मै हैरान रह जाता हू,
समझमे ना आनेकी अदा बहोत खूब पायी है तुमने!"

मस्त! आवडेश!
Sandy