गर्दी दाटून आली नव्याने काळ्या मेघांची अंबरात,,
व्हावी धरणीवरी सुखाने ओल्या थेंबाची बरसात..
आतुरली ही घरणी, आतुरले सारे पक्षी
आस लावी मनाला निळ्या आभाळाची नक्षी,
भरलेले आकाश दवाने पुन्हा बसरु दे निमिषात ,
व्हावी धरणीवरी सुखाने ओल्या थेंबांची ब़रसात..
पंख पसरुनी मयुर हा जणु गातो मनी गाणे
गंध दाटला मातीचा सुर छेडीले चातकाने
ओढे,नाले,सरिता,डबके पुन्हा भरावी क्षणात
व्हावी धरणी वरी सुखाने ओल्या थेंबाची बरसात..
प्रतिक्रिया
10 Oct 2015 - 5:48 pm | _मनश्री_
छान आहे कविता .........
10 Oct 2015 - 6:33 pm | अभ्या..
बरं आसतय ह्या असल्या कवितांचं.
चातक, मयूर, दवबिंदू, अंबर, धरणी, आस, प्यास अस्ले नेहमीचे यशवंत गुणवंत कलाकार भरले की फक्त क्रियापदे जोडायची.
कविता तयार.
मस्त मस्त
10 Oct 2015 - 7:37 pm | प्रचेतस
आमच्या ओळखीचे एक कवी वेगळंच काही काही भरत असतात.