सनबर्न फेस्टीवल , गोवा , २७- ३० डिसेंबर २०१५

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
23 Sep 2015 - 6:46 pm

मला पुर्ण कल्पना आहे की मी हा धागा चुकीच्या फोरम वर टाकत आहे .
आमचे येथील कंपुबाज मित्र क्राऊडोफोबियाक , स्वमतांध दांभिक ,टनाटनी, अभ्यासु , मुंबैकर चाकरमाने , आणि प्रापंचिक सांसारिक आहेत , इतर ओळखीचे मिपाकर लोकही ज्येष्ठ नागरिक किंव्वा काथ्याकुटविशारद किंवा अध्यात्मिक तत्वज्ञ किंव्वा डु आयडी किंव्वा फिलॉसोफर्स वगैरे आहेत .... पण तरीही वचने किं दरिद्रता म्हणुन आपले विचारत आहे

यंदा गोव्याला सनबर्न- २०१५ फेस्टीवलला जायचे का ?

सनबर्न हा ख्रिसमस नंतर होणारा एक एलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टीव्हल आहे जो की २००७ साला पासुन होत आहे . ह्या वर्षी २७ डिसेंबर ते ३० डिसेंबर ला गोव्या मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे . ( मलाही ह्या फेस्टीवल चा फर्स्ट हॅन्ड एक्ष्पीरीयन्स नाही ,विकीपीडीयावरही अत्यल्प माहीती उपलब्ध आहे , पण जितके ऐकले आहे त्यावरुन तरी प्रचंड एक्स्यायटींग वाटत आहे.)

sb

ह्या लिन्कवर थोडीफार माहीती मिळाली आहे : http://in.bookmyshow.com/concerts/sunburn/goa/

कोणी इन्टरेस्टेड आहे का जीवाचा गोवा करायला ?

समाजजीवनमानप्रवासमौजमजामत

प्रतिक्रिया

पैसा's picture

23 Sep 2015 - 7:00 pm | पैसा

स्थानिक लोक कोणीही त्या फेस्टिव्हलकडे फिरकत नाहीत. नाच गाणी वैग्रे काय असते माहीत नाही. ड्रग्ज मुबलक मिळतात असे ऐकून आहे. आयोजनात प्रचंड भ्रष्टाचार आहे. काही खून, अनैसर्गिक मृत्यूही झाल्याचे कानावर आहे. पर्रीकरांनी या सगळ्या कारणांमुळे हा फेस्टिव्हल चालू रहावा याच्या विरोधात नोटिंग दिले होते.

तरीही या फेस्टिव्हलमधे जर काही चांगले कोणाला मिळू शकत असेल तर हॉटेल्स वगैरे बुकिंग आधी करून या. कारण त्या दिवसात हॉटेल्सचे दर सर्वात जास्त असतात.

ढिस्क्लेमरः मी या फेस्टिव्हलला कधीही गेलेली नाही. एकूण जे कानावर येते त्याबद्दल लिहिले आहे.

प्रसाद गोडबोले's picture

23 Sep 2015 - 7:23 pm | प्रसाद गोडबोले

मुख्यत्वे बाहेरील राज्यातील आणि देशातील लोकच ह्या फेस्टीवलला जास्त असतात ,मी अमेरिकेत गेलो होतो तेव्हा ...इलेक्ट्रॉनिक म्युझिकचा थोडासा का होईना पण अनुभव घेतला आहे , मस्त आपल्याला तरी आवडली होती ती पार्टी !

बाकी तिथल्या ड्रग्ज ब्रष्टाचार क्राईम्स विषयी बर्‍यापैकी कल्पना आहे पण हे सारे तर सर्वत्रच चालते की ! ह्याला भीतभीत किती दिवस जगणार ? म्हणुनच जे होईल ते होईल असा अ‍ॅटीट्युड ठेवलाय अता ! live everyday as if it was your last !

मिपावरुन किती जण येतील माहीत नाही . ऑफीसातील बरेच जणांनी स्पॉन्टॅनियसली निर्णय घ्यायचा ठरवलाय . इतर कंपुतील लोकांनाही विचारले आहे !

बघुया कसे जमते ते !

द-बाहुबली's picture

23 Sep 2015 - 7:23 pm | द-बाहुबली

ड्रग्ज मुबलक मिळतात असे ऐकून आहे... काही खून, अनैसर्गिक मृत्यूही झाल्याचे कानावर आहे.

ग्रुप सोबत असेल तर खुन व्हायचा नक्किच प्रॉब्लेम येणार नाही ९८.९९%. पण ड्रग अ‍ॅब्युसमुळे अनैसर्गीक मृत्यु घडायचा धोका नक्किच आहे. बट रिस्क तो स्पायडरमॅन भी लेता है...!

तरीही या फेस्टिव्हलमधे जर काही चांगले कोणाला मिळू शकत असेल तर

काय चांगले हे ज्याच्या त्याच्या पर्सेप्शनवर अवलंबुन असते... माझ्या सोबत असताना कोणाचा तोल कधी मी जाउ दिला नाही हाच काय तो दिलासा थोडाफार आत्मविश्वास देतो की... हो.. अश्याठीकाणी आपणही जाउन एंजॉय नक्किच करु शकतो. असे लाजुन बसायला नको. कारण जर वाईट होणारच असेल तर ते कोणासोबत... कुठेही होइल... नाही का ?

ते तुमचे क्राऊडोफोबियाक मित्र कोण हो? ;)

बाकी आम्हालाही गर्दी आवडत नसल्याने आम्ही सनबर्न फेस्टिव्हलला येऊ शकणार नाही. अर्थात डिसेंबर सोडून गोव्याला कधीही जायला आम्ही तयार आहोत.

द-बाहुबली's picture

23 Sep 2015 - 7:14 pm | द-बाहुबली

मला पुर्ण कल्पना आहे की मी हा धागा चुकीच्या फोरम वर टाकत आहे .

१००% योग्य निरीक्षण. तरीपण टाकलाच आहे धागा तो कोइ बात नै... मग असाच विचार केला तर मिपावर किती लोक रायडींग गिअर्स वापरतात ? पण मोदकरावांनी मिपावर धागा टाकलाच ना..? त्यातुन आले तर सकारात्मकच बाहेर येणार हा जसा विचार त्यामागे आहे. तसेच आपण्ही धागा टाकलात हे अतिशय योग्यच झाले... तसेच इथेही अपेक्षा पोसीटीव धरा.

आमचे येथील कंपुबाज मित्र क्राऊडोफोबियाक , स्वमतांध दांभिक ,टनाटनी, अभ्यासु , मुंबैकर चाकरमाने , आणि प्रापंचिक सांसारिक आहेत , इतर ओळखीचे मिपाकर लोकही ज्येष्ठ नागरिक किंव्वा काथ्याकुटविशारद किंवा अध्यात्मिक तत्वज्ञ किंव्वा डु आयडी किंव्वा फिलॉसोफर्स वगैरे आहेत....

हम्म..! अशि प्रवृत्ती राखणारे लाइफ वेंजाय करत नाहीत असा समज आहे का ? मग आपण एकदा भेटुन असे गैरसमज दुर केलेच पाहिजे.

अतिशय रोचक इंव्हेंट आहे. दुर्दैवाने नेमक्या याच कालावधीत मी बाहेर गेलेलो असेन त्यामुळे यावेळी सोबत येता येणे शक्य नाहीये. पन म्होर्ल्या वर्साला नक्कि. अगदी कोणी मिपाकर आला नाही तरी मी हा इवेंट अटेंड नक्कि करणार... सो माझ्या शुभेछ्चा... फक्त काहीतरी उपद्व्याप करुन गो गोआ गॉन स्टाइल झोंबी बनु नकोस रे भावा. ;)

हेमन्त वाघे's picture

23 Sep 2015 - 7:54 pm | हेमन्त वाघे

प्रगो, आपले वय काय ? आपण आईकाय काय ???

नाही मज केली , मला हा धागा बघून आनंद झाला..
मला EDM आजिबात आवडत आणि समजत नसल्याने { आणि सध्या पैसे हि कमी असल्याने} जाण्याचा काही प्लान नाही.
पण आवडत असेल तर अवश्य जा , मी रॉक आईक्तो आणि काही रॉक concerts या अविस्मरणीय होत्या. रॉजर वातर्स { पिंक फ्लोयद } च्या कॉन्सिर्त ला मी ऎक्त गेले होतो ,शरीरात २ quarters वोडका होती .... तो अनुभव मी विसरू शकणार नाही .

कपिलमुनी's picture

24 Sep 2015 - 11:52 pm | कपिलमुनी

दारू मोजुन पिणाऱ्यांची आणि नंतर ते सांगणाऱ्यांची मजा वाटते