पापड कर वा पोळ्या लाट (विडंबन)

दमामि's picture
दमामि in जे न देखे रवी...
22 Sep 2015 - 6:50 pm

आमची पेर्ना

रस्सा तिखट पुरी सपाट
तरी न माझे भरले ताट...

जिलबीमागून भजी वाढली
बासुंदीचा भलता थाट..

वरणभाताच्या शिखरांमध्ये
तुपाचा हा अवघड घाट..

जरा किनारा दिसला पानी
मठ्ठ्याची मग आली लाट...

आयुष्याच्या पंगतीस मी ..
पापड कर वा पोळ्या लाट.. !!!!!

आरोग्यदायी पाककृतीकविता

प्रतिक्रिया

एस's picture

22 Sep 2015 - 6:54 pm | एस

चांगलंय!

चांदणे संदीप's picture

22 Sep 2015 - 7:10 pm | चांदणे संदीप

मस्त विडंबन!

मांत्रिक's picture

22 Sep 2015 - 7:13 pm | मांत्रिक

नमस्कार हो राजे! आयुष्यात इतकं चविष्ट विडंबन पहिल्यांदाच वाचतोय. वाचनानंदात खाद्यानंद हे नवीन डायमेन्शन जोडण्याचा अभिनव प्रयोग!

कानडाऊ योगेशु's picture

22 Sep 2015 - 7:15 pm | कानडाऊ योगेशु

हा हा हा ! मस्तच.
आमच्या कवितेच्या तेराव्याचे घातलेले जेवण आवडले!
(तशीही मिपाकरांची ही ख्यातीच आहे कि त्यांना बारश्यापेक्षा तेराव्याचेच जेवण अधिक आवडते. ;) ).

बाबा योगिराज's picture

22 Sep 2015 - 7:17 pm | बाबा योगिराज

हा हा हा

निनाव's picture

22 Sep 2015 - 7:24 pm | निनाव

Sundar...n chavishta :))

मित्रहो's picture

22 Sep 2015 - 7:27 pm | मित्रहो

चविष्ट विडंबन

आले अच्र्त शिरोमणी विडंबन घेऊन! जमलंय मस्त! पेर्ना वाचली तेव्हाच कच्चा माल आहे जाणवलं होतं=))

मुक्त विहारि's picture

22 Sep 2015 - 10:31 pm | मुक्त विहारि

एक कट्टा करू या का?

एस's picture

22 Sep 2015 - 10:49 pm | एस

तुम्ही त्यांना काय विचारताय? तुम्ही गेला नाहीत ना त्यांच्या कुर्डूवाडीच्या कट्ट्याला! मग आता ते कसे येतील तुमच्या कट्ट्याला? नाही का हो दमामि?

मुक्त विहारि's picture

23 Sep 2015 - 12:46 am | मुक्त विहारि

फूल्ल बॉटल लिंबू सरबत रिचवणार्‍या, गहन विचार्‍यांना आणि त्यांच्या सगे-सोयर्‍यांना होते, असा आमचा कयास आहे.

एक तर आम्ही बियर पितो, दुसरी गोष्ट आम्ही गहन विचार करत नाही आणि तिसरी गोष्ट आमचे कुणीही सगे-सोयरे इथे मिपावर नाहीत.

त्यामुळे आम्ही गेलो नाहीत.

बाद्वे,

"दमामि" ह्यांचे इथे कुणी सगे-सोयरे नसावेत, असा अंदाज आहे.

दुखर्या नसेवर बोट ठेवलेत हो,अकेला हूँ मैं यारों

पैसा's picture

22 Sep 2015 - 11:20 pm | पैसा

मस्तंय!

अत्रुप्त आत्मा's picture

23 Sep 2015 - 12:25 am | अत्रुप्त आत्मा

चान चान

रातराणी's picture

23 Sep 2015 - 12:43 am | रातराणी

भूक लागली वाचून :(

दमामि's picture

23 Sep 2015 - 5:22 am | दमामि

धन्स हो मंडळी! पुढल्या कट्ट्याला हाच मेन्यू बरका!

खटपट्या's picture

23 Sep 2015 - 9:17 am | खटपट्या

बरीय !!