अगं, कसली तुझी ती स्वप्नांची गाठोडी,
कसल्या तुझ्या त्या शब्दबंबाळ राती,
कसली तुझी ती आठवणींची नाती,
मी कधीच पाचोळ्यात भिरकावली होती.
नुकत्याच वाहुन गेलेल्या तपाला,
ही एक माजुरडी सलामी होती.
मी उदास होतो, हताश होतो,
निष्प्रभ प्रांगणात ,
माझे दु:ख उगाळून घेतो.
तुझ्या डोळ्यांतील चांदणे,
मी टिपांत गाळून टाकतो.
चाललेल्या या विषण्ण तपाला,
ही एक टोचरी सलामी देतो.
तुझ्या स्वप्नांचे शिंतोडे,
घरादारात हुंदडत राहो.
तुझ्या अल्लड रातींची पाखरे,
आभाळभर उडत राहो.
तुझ्या वैराग्याच्या खपल्या,
रानोमाळी झरून जावो.
येणाऱ्या आव्हानी तपांना,
ही सलामी जिव्हारी जावो.
प्रतिक्रिया
31 Aug 2015 - 10:30 pm | एस
वेल, वेल, वेल! भारी आहे ही सलामी. आवडेश.
31 Aug 2015 - 10:47 pm | जव्हेरगंज
धन्यवाद स्वॅप्स...!! :)
31 Aug 2015 - 10:51 pm | एक एकटा एकटाच
मस्तच
तुमच्या सलामी ला आमचा "सलाम" .....
31 Aug 2015 - 11:02 pm | जव्हेरगंज
थैक्स...!
आमच्या 'सलामीला' तुमच्या 'सलामाने' अश्या अनेक 'सलाम्या' टाकण्याचा हुरुप येतो..!
1 Sep 2015 - 10:59 am | रातराणी
आवडली कविता. :)
जिव्हारी लागणे असा प्रयोग माहिती होता. जिव्हारी जावो ऑफ बीट वाटतंय. ( राहावल नाही म्हणून सांगितलं, राग मानू नका. )
1 Sep 2015 - 11:18 am | जव्हेरगंज
नोप्स, राग कशाला मानू हो..!
जसं आपण एखाद्दाल्या म्हणतो, दिवस आनंदात जावो,(किंवा दु:खात जावो),
तसचं जिव्हारी जावो.
1 Sep 2015 - 9:41 pm | प्रसाद गोडबोले
वाह !
छान !
ही घ्या आमच्या तर्फे तुम्हाला एक सलामी
=))
3 Sep 2015 - 3:26 pm | नाखु
जाव कुठ खफवर "दमामी" इकडं सलामी.
कवीता बेष्ट !!!