विश्वासघात ! : ०१
फोनच्या आवाजाने त्याने डोळे उघडले. केस विंचरणार्या रीमाची पाठमोरी सुडौल आकृती दिसली. हेरखात्यात आणि खाजगी आयुष्यात जोडीदार असण्याचे भाग्य फार कमी जणांना मिळते.
फोनवरचा संदेश डीक्रिप्ट केला आणि त्याचा चेहरा ताठरला. उठून त्याने तिच्या खांद्यावर हात टेकले. लटक्या रागाने त्याला दूर ढकलत ती म्हणाली, "आटप लवकर. मोहिमेच्या शेवटच्या सभेसाठी जायचंय. सर्वतोपरी कर्तव्य!"
"एक महत्त्वाचे काम बाकी आहे." तिला कवेत उचलून त्याने गिरकी घेतली, भिंतीला टेकून उभे करून तिचा चेहरा ओंजळीत घेतला. एक सुखद शिरशिरी तिच्या अंगभर लहरली... डोळे अर्धोन्मीलित... ओठांचा चंबू. दुसर्याच क्षणी त्याच्या हातांनी खाली सरकून तिच्या गळ्याभोवती पोलादी विळखा आवळला. शुद्ध हरपताना तिने ऐकले, "बाय बाय, डबल एजंट !"
========
विश्वासघात ! : ०२
डबल एजंट प्रेयसीला संपवताना त्याच्या डोळ्यासमोर फक्त कर्तव्यपूर्ती होती. तिचे कलेवर बिछान्यावर चादरीखाली झाकून, हाताचे ठसे पुसून तो निघाला. वस्तुस्थितीच्या जाणिवेने त्याच्या काळजात कळ आली. हेरखात्याचे ब्रीदवाक्य त्याने शंभराव्या वेळेला घोकले, "सर्वतोपरी कर्तव्य".
आदेशाप्रमाणे तो निकिताच्या फ्लॅटवर पोचला. "मोहिमेत मला रीमाची जागा दिलीय. पटकन सगळा प्लॅन सांग." निकिता. टेबलावरच्या लॅपटॉपवरचा प्लॅन समजावून देत असताना निकिता त्याच्या खुर्चीमागे उभी होती.
सगळे सांगून झाले आणि त्याचा फोन वाजला. त्याने फोनवरचा संदेश डीक्रिप्ट केला, "खोटे संदेश पाठवून आपल्या हेरांच्या हत्या घडवून आणणारा डबल एजंट सापडला. निकिताला संपव." चमकून त्याने मागे वळून पाहिले... निकिताच्या पिस्तुलातली गोळी विस्फारलेल्या डोळ्यांच्या मधोमध छेद करत त्याच्या कवटीत घुसली.
========
प्रतिक्रिया
23 Aug 2015 - 11:24 pm | रेवती
भारी झालाय उत्तरार्ध!
+१.
23 Aug 2015 - 11:45 pm | संदीप डांगे
+१
23 Aug 2015 - 11:52 pm | स्नेहानिकेत
मस्तच!!!!
24 Aug 2015 - 12:31 am | नितिन५८८
+१
24 Aug 2015 - 1:45 am | द-बाहुबली
रच्याकने, निकिता नाव मला खुप आवडते. याच नावाचा एक फ्रेंच चित्रपटही बघीतला होता तो ही तरुणीवर होता जिला सिक्रेट सर्वीस असासीन बनवते...
24 Aug 2015 - 2:21 am | पिलीयन रायडर
+१
24 Aug 2015 - 2:33 am | राघवेंद्र
+१
24 Aug 2015 - 3:27 am | प्यारे१
मस्त लिहिलाय.
24 Aug 2015 - 3:42 am | जुइ
कथा आवडली.
24 Aug 2015 - 4:02 am | अरवीन्द नरहर जोशि.
फारच भारी.
24 Aug 2015 - 5:30 am | एस
सुपर्ब!
24 Aug 2015 - 6:25 am | जेपी
आवडल.
24 Aug 2015 - 8:53 am | प्रचेतस
जबरीच.
24 Aug 2015 - 8:57 am | खटपट्या
वा !!
24 Aug 2015 - 9:04 am | अजया
मस्तच!
24 Aug 2015 - 9:41 am | नाव आडनाव
+१
24 Aug 2015 - 9:47 am | पगला गजोधर
एक मस्त स्पाय थ्रिलर लिहून काढान तुम्ही…. अशी १००, २०० शब्दात बोळवण करू नका ब्वा आमची
:)
24 Aug 2015 - 10:21 am | gogglya
+१
24 Aug 2015 - 11:25 am | सिध्दार्थ
+१
एक नंबर
24 Aug 2015 - 11:44 am | उगा काहितरीच
एकच नंबर ! क्या बात है !
24 Aug 2015 - 12:20 pm | पद्मावति
जबरदस्त.
24 Aug 2015 - 2:53 pm | मास्टरमाईन्ड
तुम्ही खरंच एक थ्रिलर लिहा राव.
24 Aug 2015 - 3:05 pm | चिगो
जबराट. डॉक्टरसाहेब.. 'थ्रिलर' लिखाणाची विनंती मनावर घ्याच..
24 Aug 2015 - 4:30 pm | मांत्रिक
सहमत डाॅकसाहेब राॅक्स!!!
+१
26 Aug 2015 - 4:58 pm | प्यारे१
एखादी थ्रिलर सीरीज येऊ च दे सर!
24 Aug 2015 - 5:10 pm | मित्रहो
+१
मस्त कथा
24 Aug 2015 - 5:22 pm | जगप्रवासी
वाह मस्तच
24 Aug 2015 - 5:35 pm | प्रशांत
जबराट
24 Aug 2015 - 6:29 pm | मी-सौरभ
आवडेश
24 Aug 2015 - 6:30 pm | बबन ताम्बे
+१
24 Aug 2015 - 6:37 pm | बोका-ए-आझम
+१
24 Aug 2015 - 8:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
सर्व प्रतिसादकांना मनःपूर्वक धन्यवाद !
24 Aug 2015 - 8:21 pm | पैसा
उत्तरार्ध आवडला, पण अजून यापुढचा भाग लिहा ही विनंती! जो कोण पाकिस्तानी एजंट असेल तो/ती मेली पाहिजे! :D आणि काही तरी होऊन भारतीय एजंट जिवंत राहिले पाहिजेत!!
24 Aug 2015 - 8:47 pm | डॉ सुहास म्हात्रे
:)
रीमा आणि निकिता ही टोपणनावे असू शकतात आणि 'तो' चे तर अजून नावच माहीत झालेले नाही (असते तर तेही टोपण नाव असू शकले असते म्हणा) ! "सर्वतोपरी कर्तव्य" हे "Duty first" चे सुगम भाषांतर आहे. म्हणजे अजून भारत आणि पाकिस्तान या दोन बाजू नक्की कोणत्या हे (किंवा त्या बाजू भारत आणि पाकिस्तान आहेत हे पण) अजून कुठेच स्पष्ट झालेले नाही. ;) :)
24 Aug 2015 - 8:50 pm | पैसा
ते लिहिता लिहिता लक्षात आलं म्हणून मी पाकिस्तान्याला मारा हे लिहून टाकलं. =)) आता लोक म्हणतायत तशी एक मस्त दीर्घकथाच लिहून पाकड्यांचा खात्मा करा!
24 Aug 2015 - 9:01 pm | मांत्रिक
सहमत पैसाताई. डाॅक येऊ दे एक भन्नाट सस्पेन्स थ्रिलर!
24 Aug 2015 - 10:25 pm | एक एकटा एकटाच
झक्कास
25 Aug 2015 - 10:51 am | नाखु
पण किमान शब्दात बोळवण करण्यापेक्षा एक दीर्घमाला लिहाच !!!
अभामिपारुचेल्तेखाआणिपचेलतेआस्वादक्वाचक्पडीकमिपाकर संघातर्फे विनंती निवेदन.
25 Aug 2015 - 4:26 pm | मृत्युन्जय
+१
25 Aug 2015 - 5:16 pm | बहिरुपी
+१
26 Aug 2015 - 4:32 pm | माधुरी विनायक
बापरे... अगदीच अनपेक्षित... मस्त...
26 Aug 2015 - 4:40 pm | जिन्गल बेल
बापरे.....!!!!
26 Aug 2015 - 5:59 pm | बाबा योगिराज
१+ मस्तच.......