फोनच्या आवाजाने त्याने डोळे उघडले. केस विंचरणार्या रीमाची पाठमोरी सुडौल आकृती दिसली. हेरखात्यात आणि खाजगी आयुष्यात जोडीदार असण्याचे भाग्य फार कमी जणांना मिळते.
फोनवरचा संदेश डीक्रिप्ट केला आणि त्याचा चेहरा ताठरला. उठून त्याने तिच्या खांद्यावर हात टेकले. लटक्या रागाने त्याला दूर ढकलत ती म्हणाली, "आटप लवकर. मोहिमेच्या शेवटच्या सभेसाठी जायचंय. सर्वतोपरी कर्तव्य !"
"एक महत्त्वाचे काम बाकी आहे." तिला कवेत उचलून त्याने गिरकी घेतली, भिंतीला टेकून उभे करून तिचा चेहरा ओंजळीत घेतला. एक सुखद शिरशिरी तिच्या अंगभर लहरली... डोळे अर्धोन्मीलित... ओठांचा चंबू. दुसर्याच क्षणी त्याच्या हातांनी खाली सरकून तिच्या गळ्याभोवती पोलादी विळखा आवळला. शुद्ध हरपताना तिने ऐकले, "बाय बाय, डबल एजंट !"
प्रतिक्रिया
8 Aug 2015 - 2:58 pm | जेपी
+1
8 Aug 2015 - 3:06 pm | तुमचा अभिषेक
+१
8 Aug 2015 - 3:07 pm | नाखु
सगळे का (अंत) खंत वादी शशक लिहू लागलेत अपवाद अगदी दोन चारच!!!
अभामिपासमीक्षाभिक्षानिरूपण्संघ सभासद
8 Aug 2015 - 3:29 pm | प्यारे१
+१
डॉ.म्हात्रे.... डॉ.सुहास म्हात्रे ;)
8 Aug 2015 - 6:03 pm | खटपट्या
एक्का......इस्पिकचा एक्का.
8 Aug 2015 - 3:45 pm | योगी९००
+१ आवडली...!! थोडा अंदाज वाचताना आला की शेवट काय असणार पण कथा आवडली.
8 Aug 2015 - 11:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
सहमत !
"त्याचा चेहरा ताठरला" ऐवजी "त्याचा आळस उडाला" असं लिहायला पाहिजे होतं... पण हे कथा टाकल्यावर सुचलेलं शहाणपण होतं :( अब नाविलाज को क्या विलाज ? कथालेखन मे नयेसे भी नया हू मय :)
8 Aug 2015 - 4:10 pm | मी-सौरभ
सीक्वेलच्या प्रतीक्षेत
8 Aug 2015 - 4:26 pm | जडभरत
+१
8 Aug 2015 - 4:56 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
+१ आवडली.
8 Aug 2015 - 5:01 pm | मुक्त विहारि
+१
8 Aug 2015 - 5:10 pm | dadadarekar
.
8 Aug 2015 - 6:01 pm | खटपट्या
+१
8 Aug 2015 - 6:06 pm | रेवती
+१.
8 Aug 2015 - 6:17 pm | टवाळ कार्टा
+११११११
8 Aug 2015 - 6:31 pm | राघवेंद्र
+१
8 Aug 2015 - 7:02 pm | पद्मावति
+१
8 Aug 2015 - 7:14 pm | पैसा
+१
वा! एवढ्या थोडक्यात गुप्तहेरकथा! मस्त!!
8 Aug 2015 - 7:29 pm | प्रचेतस
+१
8 Aug 2015 - 7:34 pm | उगा काहितरीच
कुठला तरी इंग्रजी चित्रपट असाच आहे ना ? (नाव विसरलो, बहुतेक मिस्टर अँड मिस स्मिथ )
8 Aug 2015 - 9:47 pm | डॉ सुहास म्हात्रे
मी तरी अश्या कोणत्याही चित्रपटाबद्दल ऐकलेले नाही...
8 Aug 2015 - 10:04 pm | एस
मिस्टर अँड मिसेस स्मिथ हा अँजेलिना जोली व ब्रॅड पिट ह्यांचा चित्रपट आहे. ह्या चित्रपटात काम करताना दोघे प्रेमबंधनात अडकले.
8 Aug 2015 - 10:42 pm | डॉ सुहास म्हात्रे
मला वाटतं हा चित्रपट मी फार पूर्वी बघितला आहे. आणि माझी आठवण दगा देत नसेल त्या चित्रपटात ते दोघे एकमेकाची हत्या करण्याचा प्रयत्न आणि / किंवा प्रत्येकाला दुसरा आपली हत्या करणार आहे असा संशय/खात्री असते... आणि (बहुतेक) दोघांपेक्षा कोणीच हत्या करण्यात यशस्वी होत नाही.
असो. कथालेखन हा माझा प्रांत नाही. केवळ गम्मत म्हणून प्रथम दोन्ही कथा लिहून काढल्या. मग दोन-तीन दिवस कथा टाकू की नाही असा विचार करत करत, पहिली कथा टाकून दिली आहे. इथे उत्तमोत्तम कथा येत आहेत. "मेरा नंबर आयेगा" ही शक्यता दिसत नाही. तरीही नंतर सर्वसाधारण ललितलेखन म्हणून या भागाबरोबरच लिहिलेला दुसरा भाग टाकेन. नाहीतर, घेतलेले इतके श्रम वाया गेले याचे वाईट वाटेल (cost without benefit = waste)! त्या दुसर्या भागाचाही मी "पूर्वी"* पाहिलेल्या सिनेमाशी अथवा वाचलेल्या/ऐकलेल्या कथेशी काहीही संबंध नाही हे अगोदरच जाहीर करत आहे ! ;) :)
======
* : "पूर्वी" हा शब्द मुद्दाम लिहिला आहे. कोण जाणे माझ्या कथा आवडून भविष्यात कोणी त्यांच्यावर चित्रपट काढला आणि / किंवा कादंबरी लिहिली तर माझे वरचे वाक्य खोटे ठरू नये म्हणून. =)) =)) =))
8 Aug 2015 - 11:11 pm | जडभरत
जगात करोडो कथा, लघुकथा, कविता, भयकथा लिहिल्या गेल्या आहेत. त्यापैकी अनेक तरी इतरांशी जुळणार! म्हणून काय कुणी लिहायचेच नाही का? हां, सादरीकरण हा महत्वाचा मुद्दा असू शकतो. आणि माझ्या मते तुमच्या कथेचं सादरीकरण युनिक आहे. मग त्यात मला तरी काही चूक दिसत नाही.
नाच रे मोरा कविता कुणीतरी लिहिलेय म्हणून बाकिच्यांनी पावसात नाचणार्या मोराचे कौतुक करायचेच नाही का?
मला तरी तुमची कथा कुणावर बेतलेली आढळत नाही. लिखते रहो डाॅक!!!
8 Aug 2015 - 11:55 pm | एस
मी फक्त चित्रपट कोणता ते सांगितलं. कथा आवडली आहेच. वर जडभरत म्हणताहेत त्याच्याशी सहमत.
9 Aug 2015 - 12:16 am | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद जडभर आणि स्वॅप्स !
मी फक्त पार्श्वभूमी स्पष्ट केली. माझा कोणावर कसलाच आक्षेप नाही.
असो. मस्त स्पर्धा चालली आहे. काही काळापूर्वीच मी मोजले तेव्हा ही नाविन्यपूर्ण शतशब्दकथा स्पर्धा अर्धशतकी सहभाग ओलांडून ५२ वर पोहोचली होती ! ही स्पर्धा अनेक परीने मराठी संस्थळावरचे विक्रम प्रस्थापित करेल असेच दिसते आहे. अनेक प्रकारचे विषय अनेक प्रकारच्या शैलींमध्ये हाताळलेले आहेत. वाचायला बक्कळ मजा येत आहे. मुख्य म्हणजे पहिला भाग संपायला अजून सहा दिवस (पहिल्या सहभागासाठीचा ४०% टक्के वेळ) बाकी आहेत... म्हणजे अजून बरीच मेजवानी बाकी आहे !
9 Aug 2015 - 12:18 am | डॉ सुहास म्हात्रे
कृपया, "दोघांपेक्षा" ऐवजी "दोघांपैकी" वाचावे.
8 Aug 2015 - 7:40 pm | नाव आडनाव
+१
8 Aug 2015 - 10:02 pm | एस
+१
9 Aug 2015 - 3:38 pm | बोका-ए-आझम
+१
10 Aug 2015 - 5:07 pm | पगला गजोधर
10 Aug 2015 - 5:12 pm | पगला गजोधर
पण जेम्स बॉन्डचा कुठलासा सिनेमा डोळ्यापुढे आला …
10 Aug 2015 - 5:23 pm | जडभरत
तिचा चेहरा ओंजळीत घेतला. एक सुखद शिरशिरी तिच्या अंगभर लहरली... डोळे अर्धोन्मीलित... ओठांचा चंबू. हे वाचून का? ;)
10 Aug 2015 - 6:09 pm | पगला गजोधर
...
हे वाचून
10 Aug 2015 - 6:32 pm | डॉ सुहास म्हात्रे
बॉडपटातील केस विंचरणारी हिरविण डोळ्यासमोर येऊन माझे ड्वाळे पाणाव्ले... काहींचे पांढरे होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही ;)
10 Aug 2015 - 5:14 pm | gogglya
+१
10 Aug 2015 - 5:25 pm | असा मी असामी
+१
10 Aug 2015 - 5:26 pm | आदूबाळ
+१
थोडा अंदाज आला आहे सीक्वलचा...
10 Aug 2015 - 5:27 pm | यमन
+१
10 Aug 2015 - 6:37 pm | सूड
+१
14 Aug 2015 - 12:13 pm | विवेक्पूजा
+१ आवडली कथा.
14 Aug 2015 - 1:57 pm | निमिष सोनार
मिस्टर एंड मिसेस स्मिथ पेक्षाही डबल धमाका!
14 Aug 2015 - 2:28 pm | नूतन सावंत
+१
14 Aug 2015 - 2:29 pm | नूतन सावंत
+१
14 Aug 2015 - 2:35 pm | इशा१२३
+१
14 Aug 2015 - 4:21 pm | अनन्न्या
+१
14 Aug 2015 - 4:31 pm | द-बाहुबली
पण तद्दन सुमार कथानकाने या कथेची वाट लागली. आपण याहुन दर्जेदार लिहु शकला असता.
-१