[शतशब्दकथा स्पर्धा] पहिल्या फेरीचा निकाल (मतदानानुसार)

आदूबाळ's picture
आदूबाळ in स्पर्धा
18 Aug 2015 - 2:17 am

पहिली शतशब्दकथा स्पर्धा
पहिली फेरी
१५ दिवस
८३ कथा
२४३८ मतं

शतशब्दकथा स्पर्धेला दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल लेखकांचे आणि वाचकांचे अनेक आभार!

आणि....

वाचकांच्या पसंतीनुसार पहिले पाच क्रमांक आहेतः

.tg {border-collapse:collapse;border-spacing:0;border-color:#ccc;}
.tg td{font-family:Arial, sans-serif;font-size:14px;padding:10px 5px;border-style:solid;border-width:0px;overflow:hidden;word-break:normal;border-color:#ccc;color:#333;background-color:#fff;border-top-width:1px;border-bottom-width:1px;}
.tg th{font-family:Arial, sans-serif;font-size:14px;font-weight:normal;padding:10px 5px;border-style:solid;border-width:0px;overflow:hidden;word-break:normal;border-color:#ccc;color:#333;background-color:#f0f0f0;border-top-width:1px;border-bottom-width:1px;}
.tg .tg-s6z2{text-align:center}
.tg .tg-cxkv{background-color:#ffffff}
.tg .tg-zlxb{background-color:#ffffff;text-align:center}

क्रमांक
शीर्षक
लेखक
Wordcount
Revised Votecount

1
लोकमान्य
मृत्युन्जय
100
88

2
निकाल
मधुरा देशपांडे
100
65

3
ईवाईन
नाव आडनाव
100
58

4
वन नाईट इन द ट्रेन
प्राची अश्विनी
99
55.44

5
अंतर
अभ्या..
100
55

नाव आडनाव यांनी ते सीक्वल लिहू इच्छित नसल्यामुळे अंतिम फेरीसाठी विचार केला जाऊ नये अशी विनंती केली आहे. त्यामुळे त्यांच्या शतशब्दकथेचा विचार अंतिम फेरीसाठी केला गेलेला नाही.

शतशब्दकथेच्या नियमानुसार बरोब्बर शंभर शब्दांत कथा बसवणं गरजेचं होतं. स्पर्धेतल्या एकूण ८३ कथांपैकी ४७ कथा बरोब्बर १०० शब्दांच्या होत्या. कथा शंभर शब्दांची नसेल तर स्पर्धेबाहेर ठेवावी असा एक मतप्रवाह होता. परंतु ही पहिल्याच स्पर्धेची पहिलीच फेरी असल्याने १०० शब्दांचा नियम काटेकोरपणे अंमलात न आणण्याचा निर्णय घेण्यात आला. तरी बरोब्बर १०० शब्दांत कथा लिहिणार्‍या लेखकांना न्याय मिळावा म्हणून १०० पेक्षा कमी/जास्त शब्द असलेल्या कथांची मतं त्याप्रमाणात कमी करायचा निर्णय घेण्यात आला.

प्राची अश्विनी यांची कथा ९९ शब्दांची असल्याने १/१०० = १% मतं कमी करण्यात आलेली आहेत.

त्यामुळे... अंतिम फेरीत गेलेले पहिले तीन स्पर्धक आहेतः

  • मृत्युन्जय (कथा: लोकमान्य)
  • मधुरा देशपांडे (कथा: निकाल)
  • प्राची अश्विनी (कथा: वन नाईट इन द ट्रेन)

हार्दिक अभिनंदन!

आता प्रतीक्षा आहे परीक्षकांनी अंतिम फेरीसाठी निवडलेल्या तीन स्पर्धकांची!

प्रतिक्रिया

dadadarekar's picture

18 Aug 2015 - 2:23 am | dadadarekar

छान

श्रीरंग_जोशी's picture

18 Aug 2015 - 2:31 am | श्रीरंग_जोशी

सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

विजेत्यांच्या व इतरांच्या शशकथांच्या सिक्वेल्सच्या प्रतिक्षेत.

नंदन's picture

18 Aug 2015 - 2:31 pm | नंदन

सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
विजेत्यांच्या व इतरांच्या शशकथांच्या सिक्वेल्सच्या प्रतिक्षेत.

असेच म्हणतो, अभिनंदन!

बहुगुणी's picture

18 Aug 2015 - 2:34 am | बहुगुणी

अर्थातच विजेत्यांचेही अभिनंदन!

प्यारे१'s picture

18 Aug 2015 - 2:35 am | प्यारे१

विजेत्यांचे अभिनंदन!

पिलीयन रायडर's picture

18 Aug 2015 - 2:54 am | पिलीयन रायडर

अभिनंदन!!!

पिलीयन रायडर's picture

18 Aug 2015 - 2:55 am | पिलीयन रायडर

आणि हो.. हे ही आवर्जुन सांगु इच्छिते की अनेक कथा उत्तम होत्या. थोड्याफार कमी +१ ने पहिल्या ३ मध्ये नसतील तरी त्यांनी सिक्वल जरुर लिहावा.

शलभ's picture

18 Aug 2015 - 2:26 pm | शलभ

सहमत

एक एकटा एकटाच's picture

18 Aug 2015 - 2:54 pm | एक एकटा एकटाच

अगदी अगदी

अभिनंदन आणि शुभेच्छा!!

रेवती's picture

18 Aug 2015 - 3:05 am | रेवती

विजेत्यांचे अभिनंदन!

मुक्त विहारि's picture

18 Aug 2015 - 2:27 pm | मुक्त विहारि

त्याचबरोबर "आदूबाळ" ह्यांनी मनापासून घेतलेल्या परीश्रमाबद्दल त्यांचे पण मनापासून अभिनंदन....

सस्नेह's picture

18 Aug 2015 - 3:57 pm | सस्नेह

असेच म्हणते.
आदूबाळ आणि इतर सासंमं सदस्यांनी धडाडीने स्पर्धा पार लावली आहे !

धन्यवाद!

बबन ताम्बे's picture

18 Aug 2015 - 2:27 pm | बबन ताम्बे

सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

माझिया मना's picture

18 Aug 2015 - 2:28 pm | माझिया मना

सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!

विजेत्यांचे अभिनंदन आणी मान्यवरांचे आभार.

सूड's picture

18 Aug 2015 - 2:35 pm | सूड

अभिनंदन!!

एक एकटा एकटाच's picture

18 Aug 2015 - 2:52 pm | एक एकटा एकटाच

अभिनंदन

एक एकटा एकटाच's picture

18 Aug 2015 - 2:54 pm | एक एकटा एकटाच

आणि संपादक मंडळाचे आभार
फार मस्त उपक्रम होता हा

प्रीत-मोहर's picture

18 Aug 2015 - 2:58 pm | प्रीत-मोहर

अभिनण्दन!!!!

अजया's picture

18 Aug 2015 - 2:59 pm | अजया

अभिनंदन!सिक्वेलच्या प्रतीक्षेत!

पद्मावति's picture

18 Aug 2015 - 3:01 pm | पद्मावति

मनापासून अभिनंदन.

विजेत्यांचे अभिनंदन
उप विजेते
६. सृजनचौर्य
७. डिझाईन / एक रुपया / शिवी
१०. Appraisal

निमिष सोनार's picture

18 Aug 2015 - 8:33 pm | निमिष सोनार

स्पर्धा आयोजित केल्याबद्दल धन्यवाद!

आदिजोशी's picture

18 Aug 2015 - 3:10 pm | आदिजोशी

आणि सर्व लेखकांचे अभिनंदन. स्पर्धेच्या निमित्ताने अनेक उत्तम कथा वाचायला मिळाल्या आणि अनेक लेखक पुन्हा लिहिते झाले हे स्पर्धेचे महत्वाचे आणि मोठेच यश आहे.
आता पहिल्या ३ स्पर्धकांनी पुढचा भाग लिहून झाल्यावर अंतीम निकाल जाहीर होईल. ही स्पर्धा संपली की बाकी सगळ्यांनी आपआपल्या कथेचा उत्तरार्ध लिहावा ही विनंती.

सुहास झेले's picture

18 Aug 2015 - 3:34 pm | सुहास झेले

सहमत ... सर्वांचे अभिनंदन :)

अभ्या..'s picture

18 Aug 2015 - 3:44 pm | अभ्या..

+१
सर्वांचे अभिनंदन.
आता मिपा बंद न पडता परिक्षकांचे निकाल आणि सिक्वल पटपट येवोत म्हणजे झाले. ;)

चिगो's picture

18 Aug 2015 - 4:03 pm | चिगो

सर्व विजेत्यांचे अभिनंदन.. आदूबाळ तसेच संपुर्ण संपादक मंडळाचे त्यांच्या चिकाटी आणि मेहनतीसाठी आभार..

जडभरत's picture

18 Aug 2015 - 9:20 pm | जडभरत

सहमत! अभिनंदन!!!!

कैलासवासी सोन्याबापु's picture

18 Aug 2015 - 4:05 pm | कैलासवासी सोन्याबापु

सर्व विजेत्या बंधुभागिनी चे मनःपूर्वक अभिनंदन! पुढील मेजवानी च्या तयारी ला लागा कसे

कथेच्या मनोरंजनमुल्यापेक्षा विटा किती लावल्या-----

प्राची अश्विनी यांची कथा ९९ शब्दांची असल्याने १/१०० = १% मतं कमी करण्यात आलेली आहेत.

त्यामुळे... अंतिम फेरीत गेलेले पहिले तीन स्पर्धक आहेतः

मृत्युन्जय (कथा: लोकमान्य)
मधुरा देशपांडे (कथा: निकाल)
प्राची अश्विनी (कथा: वन नाईट इन द ट्रेन)

आँ ? मतं कमी केली आहेत तरी त्या नंबरात कशा ?

अन्या दातार's picture

18 Aug 2015 - 6:32 pm | अन्या दातार

टोटल मतसंख्या प्रथम विचारात घेतली. त्यातून जास्तीत जास्त मते मिळवणारे ५ कथांच्या शब्द संख्या विचारात घेतल्या. बरोबर १०० शब्द असल्यास गुण कमी केले नाहीत. १०० ला जेवढे शब्द कमी असतील तेवढ्या % ने गुण कमी केले.
आता पुन्हा हिशेब करा बघू. ;)

द-बाहुबली's picture

18 Aug 2015 - 7:39 pm | द-बाहुबली

अजुनही प्राची अश्विनी अंतीम ३ मधे कशा पोचल्या कोणी स्पष्ट करेल का ?

बबन ताम्बे's picture

18 Aug 2015 - 7:59 pm | बबन ताम्बे

५६ वजा १ टक्का (०.५६) = ५५.५४

द-बाहुबली's picture

18 Aug 2015 - 8:08 pm | द-बाहुबली

फार साधा प्रश्न मला पडलाय ज्याचे उत्तर अजुनही कोणी देत नाहीये. नक्किच मला काहीतरी समजले नाहीये फक्त ते काय इतकेच जाणून घ्यायचे आहे. बाकी माझा प्रश्न फार सोपा व समजण्यास सुलभाजे असा अजुनही आशावाद आहे. प्रश्न असा आहे की...

प्राची अश्विनी अंतीम ३ स्पर्धकांमधे कशा पोचल्या कोणी स्पष्ट करेल का ?

प्रचेतस's picture

18 Aug 2015 - 8:11 pm | प्रचेतस

वाच की दाद्या हे

नाव आडनाव यांनी ते सीक्वल लिहू इच्छित नसल्यामुळे अंतिम फेरीसाठी विचार केला जाऊ नये अशी विनंती केली आहे. त्यामुळे त्यांच्या शतशब्दकथेचा विचार अंतिम फेरीसाठी केला गेलेला नाही.

द-बाहुबली's picture

18 Aug 2015 - 8:13 pm | द-बाहुबली

समस्त मिपाकरहो स्वारी बरकां. चुकी झाली माफी असा :)

आदूबाळ's picture

18 Aug 2015 - 8:13 pm | आदूबाळ

नाव आडनाव यांनी ते सीक्वल लिहू इच्छित नसल्यामुळे अंतिम फेरीसाठी विचार केला जाऊ नये अशी विनंती केली आहे. त्यामुळे त्यांच्या शतशब्दकथेचा विचार अंतिम फेरीसाठी केला गेलेला नाही.

हे वाचायचं राह्यलं का?

द-बाहुबली's picture

18 Aug 2015 - 8:14 pm | द-बाहुबली

होय ते वाचलं न्हवतं म्हणून माझा गोंधळ झाला. स्वारी.

समीरसूर's picture

18 Aug 2015 - 4:14 pm | समीरसूर

सगळ्या लेखकांचे मनापासून अभिनंदन! विजेत्यांचे विशेष अभिनंदन! या पाच कथा खरोखर सकस होत्या. आणि बाकी बहुतांश कथा चांगल्याच होत्या.

अतिवास यांचे खूप आभार. त्यांनी शोधलेला हा साहित्यप्रकार लेखकाच्या लेखनक्षमतेचा कस पाहणारा आहे.

आदूबाळ यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. त्यांना धन्यवाद. सं मं चे देखील आभार मानायलाच हवे.

सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!

चांदणे संदीप's picture

18 Aug 2015 - 4:30 pm | चांदणे संदीप

सर्व विजेत्यांचे अभिनंदन!

१०० शब्दांत लिहिताना खरेच कस लागतो. नवीन अनुभव मिळवून दिल्याबद्दल मिपाचेही आभार!

सिक्वलच्या तयारीत असलेला..
Sandy

ब़जरबट्टू's picture

19 Aug 2015 - 9:15 am | ब़जरबट्टू

सर्व विजेत्यांचे आभार..

लय कसा लागतो राव.. आता जबरा सिक्वल येऊ द्या ..

ब़जरबट्टू's picture

19 Aug 2015 - 9:15 am | ब़जरबट्टू

आभार आणि अभिनंदन सुद्धा .. :)

माम्लेदारचा पन्खा's picture

18 Aug 2015 - 4:46 pm | माम्लेदारचा पन्खा

खूब भालो.....!!

माम्लेदारचा पन्खा's picture

18 Aug 2015 - 7:41 pm | माम्लेदारचा पन्खा

हे नमूद करायचे राहिले !

अरुण मनोहर's picture

18 Aug 2015 - 5:16 pm | अरुण मनोहर

स्पर्धेची कल्पना खूप छान होती. आदुबाळ ह्यांचे अभिनंदन
सर्व विजेत्यांचे देखील अभ्नंदन आणि पुढील लेखनाला शुभेच्छा !

प्राची अश्विनी यांची कथा ९९ शब्दांची असल्याने १/१०० = १% मतं कमी करण्यात आलेली आहेत.

१. समजा त्यांची कथा १०१ शब्दांची असती तर तुम्ही त्यांना १ % जास्त गुण दिले असते का ?

२. माझा असा समाज होता की ९९ पैशे हे ९९ पैशेच असतात, बंदा रुपया नव्हे. पण शेवटी तुमचंच राज्य आहे, हे जाणून गप्प राहतो .