पहिली शतशब्दकथा स्पर्धा
पहिली फेरी
१५ दिवस
८३ कथा
२४३८ मतं
शतशब्दकथा स्पर्धेला दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल लेखकांचे आणि वाचकांचे अनेक आभार!
आणि....
वाचकांच्या पसंतीनुसार पहिले पाच क्रमांक आहेतः
.tg {border-collapse:collapse;border-spacing:0;border-color:#ccc;}
.tg td{font-family:Arial, sans-serif;font-size:14px;padding:10px 5px;border-style:solid;border-width:0px;overflow:hidden;word-break:normal;border-color:#ccc;color:#333;background-color:#fff;border-top-width:1px;border-bottom-width:1px;}
.tg th{font-family:Arial, sans-serif;font-size:14px;font-weight:normal;padding:10px 5px;border-style:solid;border-width:0px;overflow:hidden;word-break:normal;border-color:#ccc;color:#333;background-color:#f0f0f0;border-top-width:1px;border-bottom-width:1px;}
.tg .tg-s6z2{text-align:center}
.tg .tg-cxkv{background-color:#ffffff}
.tg .tg-zlxb{background-color:#ffffff;text-align:center}
क्रमांक
शीर्षक
लेखक
Wordcount
Revised Votecount
1
लोकमान्य
मृत्युन्जय
100
88
2
निकाल
मधुरा देशपांडे
100
65
3
ईवाईन
नाव आडनाव
100
58
4
वन नाईट इन द ट्रेन
प्राची अश्विनी
99
55.44
5
अंतर
अभ्या..
100
55
नाव आडनाव यांनी ते सीक्वल लिहू इच्छित नसल्यामुळे अंतिम फेरीसाठी विचार केला जाऊ नये अशी विनंती केली आहे. त्यामुळे त्यांच्या शतशब्दकथेचा विचार अंतिम फेरीसाठी केला गेलेला नाही.
शतशब्दकथेच्या नियमानुसार बरोब्बर शंभर शब्दांत कथा बसवणं गरजेचं होतं. स्पर्धेतल्या एकूण ८३ कथांपैकी ४७ कथा बरोब्बर १०० शब्दांच्या होत्या. कथा शंभर शब्दांची नसेल तर स्पर्धेबाहेर ठेवावी असा एक मतप्रवाह होता. परंतु ही पहिल्याच स्पर्धेची पहिलीच फेरी असल्याने १०० शब्दांचा नियम काटेकोरपणे अंमलात न आणण्याचा निर्णय घेण्यात आला. तरी बरोब्बर १०० शब्दांत कथा लिहिणार्या लेखकांना न्याय मिळावा म्हणून १०० पेक्षा कमी/जास्त शब्द असलेल्या कथांची मतं त्याप्रमाणात कमी करायचा निर्णय घेण्यात आला.
प्राची अश्विनी यांची कथा ९९ शब्दांची असल्याने १/१०० = १% मतं कमी करण्यात आलेली आहेत.
त्यामुळे... अंतिम फेरीत गेलेले पहिले तीन स्पर्धक आहेतः
- मृत्युन्जय (कथा: लोकमान्य)
- मधुरा देशपांडे (कथा: निकाल)
- प्राची अश्विनी (कथा: वन नाईट इन द ट्रेन)
हार्दिक अभिनंदन!
आता प्रतीक्षा आहे परीक्षकांनी अंतिम फेरीसाठी निवडलेल्या तीन स्पर्धकांची!
प्रतिक्रिया
18 Aug 2015 - 6:05 pm | अभ्या..
जाऊ द्या ओ पग्बुवा.
चिडायला मी पाहीजे. तुम्ही का चिडताय? ;)
ह. घ्या. हं.
बाकी तुमच्या कथांनी आम्हाला खूप आनंद दिला. तुमच्या शतशब्दकथावर्षावानेच मिपाला स्पर्धा घ्यायची सुबुध्दी झाली त्यामुळे मी पगबुवांना सेपेरेट लाईफ टाईम अचिव्हमेंटचे सर्टिफिकेट द्यायची शिफारस करीत आहे.
18 Aug 2015 - 6:12 pm | आदूबाळ
१०१ शब्द असते तरी १/१०० = १% कमी झाले असते.
गणिती फॉर्म्युलाच मांडायचा असेल तरः
अंतिम मतसंख्या = मूळ मतसंख्या * (१ - (| कथेतले शब्द - १०० | / १००))
खरं आहे तुमचं. वर म्हटल्याप्रमाणे असा एक मतप्रवाह होतादेखील. पण पहिलीच स्पर्धा, पहिलीच फेरी आहे म्हणून ही सवलत देण्यात आली.
अर्थात, ही सवलत देण्या-न-देण्यामुळे निकालात फरक पडला नसता हे वरच्या टेबलवरून स्पष्ट आहे.
18 Aug 2015 - 6:20 pm | पगला गजोधर
No.४ would have been disqualified, otherwise.
18 Aug 2015 - 6:30 pm | पगला गजोधर
What is being indirectly said by you, its okay to give story with
Ten, twenty, fifty words, as long as one is okay to sacrifice appropriated percentages of votes, (even though, their chances of winning is bleak) but such story is not अ फोउल.
19 Aug 2015 - 11:35 am | मी-सौरभ
सर,
आपण सगळे मिपाकर आहोत ना, मग सोडून द्या वाद. संपादक मंडळाला सर्वांना सोबत घेऊन जायचय ना. :)
लोकल मधे चवथी सीट शोधणाशो,
मी-सौरभ
20 Aug 2015 - 2:23 pm | कोमल
स्पर्धेचे नियम जर रिजिड ठेवायचे नसतील तर अजून बर्याच शक्यता पडताळून पाहिल्या पाहिजेत.
कथा किती तारखेला टाकली, शुद्धलेखनाच्या चुका किती प्रमाणात ग्राह्य धरायच्या, वाचतांना कथा एकाच परिच्छेदात उरकली आहे की मांडणी पण व्यवस्थित आहे वगैरे वगैरे.
आणि जर नियमा प्रमाणे निकाल लावायचा असेल तर ४. वन नाईट इन द ट्रेन ही कथा रद्द करायला पाहिजे होती.
निकाल पटला नाही..
20 Aug 2015 - 3:26 pm | कहर
सहमत … ती पूर्ण कथा वाटत नाही
20 Aug 2015 - 3:47 pm | अभ्या..
मी या स्पर्धेतला एक स्पर्धक आहे तरीही मंडळाची माफी मागून ह्या अपेक्षा व्यक्त करीत आहे.
सुरुवातीला ठरवलेले निकष, वाचकांची मतसंख्या अन परिक्षकांचे निकष निसंदिग्ध असावेत. तिथे कुणाला, कशी अन का सूट दिली हे कळावे म्हणजे अशा शंका उद्भवणार नाहीत. जवळपास सगळ्या कथा दोन भागाचा प्रथम भाग अशा होत्या. एक स्वतंत्र कथेला जास्त खुलाशांची गरज नसावी. कथावस्तू स्पष्ट असावी असा आग्रह वाचकांनी धरला नव्हताच. किंबहुना कथा म्हणजे काय हे लक्षात न घेता एखाद्या छान पॅरॅग्राफ, छान किस्सा, रंजक संवाद असेच स्वरुप बहुतांशी प्रवेशिकांचे होते. आता परिक्षकांचे निकाल येतील तेंव्हा निदान निकष स्पष्ट करावेत ही आग्रहाची विनंती. ह्या निकषांवरच पुढे येणार्या शतशब्दकथांचा दर्जा मोजता येणार आहे.
20 Aug 2015 - 4:20 pm | प्यारे१
आमच्या अभ्याचा नंबर अगदी थोडक्यात हुकला याचं दु:ख वाटतंय.
हत्तीनं माकडाला धु धु धुवून सुद्धा माकडाचा नंबर पहिला येतो कारण माकडाला जास्त एसेमेस येतात हा एक विनोद आठवला आणि स्वतःचं समाधान करुन घेतलं.
(खुलासा: नंबरात आलेल्या आणि न आलेल्या बर्याच कथा आवडलेल्या आहेत. न आवडलेल्यांना -१ आणि काहींना मत नाही वगैरे ..... कुणालाही कु ठल्याही प्राण्याची उपमा दिलेली नाही वगैरे.... जौ दे. श्या देणारे श्या देणार, समजून घेणारे समजून घेणार.)
20 Aug 2015 - 4:28 pm | अभ्या..
कडू इसम
20 Aug 2015 - 5:12 pm | अस्वस्थामा
:))))
20 Aug 2015 - 5:23 pm | प्यारे१
अजि ये तो प्यार है अभ्या का .... ;)
काय रे भातखाऊ?
20 Aug 2015 - 5:25 pm | अभ्या..
बोल बे मटनचोख. ;)
20 Aug 2015 - 5:28 pm | प्यारे१
शिवीसंग्रहात भर टाकल्याबद्दल आभारी आहे.
खात नाही. लागली नाही. ;)
-निरागस
18 Aug 2015 - 6:09 pm | नाव आडनाव
धन्यावाद मित्रांनो. परिक्षक, प्रतिसाद देणारे, वाचणारे, आदूबाळ आणि आतीवास ताई यांना धन्यवाद.
18 Aug 2015 - 7:24 pm | रातराणी
अरे वा सर्वांचे अभिनंदन!
किती दिवसांमध्ये किती मत मिळाली हा देखील एक वेरिएबल असायला हवा होता असे वाटले. काही कथा उशीरा आल्यामुळे मतांच्या रेसमधे मागे पडल्या असतील तर त्यांना न्याय मिळाला असता. पोय्ये, डिझाइन, अंगार या कथादेखील उत्तम होत्या. अर्थात या कथांमधे परीक्षक निवडून देण्याचे पोटेन्शियल आहेच.पण ती सब्जेक्टिव मेथड वाटते.
(आता परीक्षक मला मारतील काय?)
18 Aug 2015 - 7:24 pm | विवेकपटाईत
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
मला वाटले १०० शब्दांच्या आत कथा लिहायची. (कदाचित नियम व्यवस्थित वाचले नव्हते. चक्क १४ शब्द कमी पडले). बाकी कुठली कथा अधिक सरस होती, हे सांगणे अत्यंत दुष्कर कार्य होते. परीक्षकांनी हे कार्य पार पडले, त्यांचे हि अभिनंदन.
18 Aug 2015 - 7:27 pm | श्रीगुरुजी
तिन्ही विजेत्यांचे अभिनंदन! आता सिक्वेलची प्रतीक्षा आहे.
18 Aug 2015 - 8:13 pm | आनंद
छान झाली स्पर्धा!
एक नियम थोडा सैल केला आहे तर आणखी एक नियम थोडा सैल करुन अंतिम फेरीत ३ एव़जी ४ स्पर्धक घ्यावेत असे वाटते.
18 Aug 2015 - 8:37 pm | मधुरा देशपांडे
स्पर्धेचे आयोजक आदूबाळ आणि सर्व प्रतिसादकांचे मनःपुर्वक आभार!! आतिवासताईंना या अनोख्या संकल्पनेसाठी धन्यवाद, बरोब्बर १०० शब्दात कथा लिहिताना सतत जे शब्दांचे खेळ करावे लागले, त्यात मजा आली.
एकाहुन एक उत्तम शशक लिहिणार्या सर्व शशक लेखकांचेही अभिनंदन!! सगळ्यांनीच सिक्वेल लिहावा याबद्दल सहमत.
18 Aug 2015 - 8:47 pm | डॉ सुहास म्हात्रे
.
सर्व विजेत्यांचे आणि संयोजकांचे हार्दिक अभिनंदन !!!
पहिली शतशब्दकथा स्पर्धा
पहिली फेरी
१५ दिवस
८३ कथा
२४३८ मतं
असा विक्रम... नव्हे नव्हे... असे अनेक विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल मिपाकरांचे आणि संयोजकांचेही हार्दिक अभिनंदन !
.
18 Aug 2015 - 8:52 pm | त्रिवेणी
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
18 Aug 2015 - 9:10 pm | तीरूपुत्र
मनापासून अभिनंदन.माझा मिपा वरील पहिलाच प्रयत्न होता आणि खूप सारे प्रतिसाद पण मिळाले.त्या बद्दल सर्वांचे मनापासून आभार.सिक्वल पण जमल्यास लिहतो.
18 Aug 2015 - 9:53 pm | अर्धवटराव
आम्ची कथा कोणि कन्सीडर केलीच नाहि ;)
19 Aug 2015 - 8:29 am | यशोधरा
लै लै अन्यावच झाला की वो!
18 Aug 2015 - 9:54 pm | अर्धवटराव
सर्व सहभाग घेणार्यांचे डबल अभिनंदन आणि धन्यवाद.
ऑर्गनाझर टीमचे मनापासुन आभार.
18 Aug 2015 - 9:57 pm | बोका-ए-आझम
आता सीक्वेलची प्रतीक्षा आहे.
18 Aug 2015 - 10:24 pm | नूतन सावंत
विजेत्यांचै अभिनंदन
18 Aug 2015 - 11:08 pm | तुमचा अभिषेक
तरी बरोब्बर १०० शब्दांत कथा लिहिणार्या लेखकांना न्याय मिळावा म्हणून १०० पेक्षा कमी/जास्त शब्द असलेल्या कथांची मतं त्याप्रमाणात कमी करायचा निर्णय घेण्यात आला.
>>
हे सही :)
18 Aug 2015 - 11:20 pm | किसन शिंदे
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
19 Aug 2015 - 12:02 am | अत्रुप्त आत्मा
19 Aug 2015 - 8:16 am | शब्दबम्बाळ
माझा नंबर थोडक्यात मिसला वाटत!! :D
19 Aug 2015 - 8:29 am | यशोधरा
विजेत्यांचे अभिनंदन!!
19 Aug 2015 - 8:59 am | इशा१२३
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!!
बाकिच्या कथाहि सुरेख होत्या.सिक्वेल जरुर लिहावा.
19 Aug 2015 - 9:45 am | नीलमोहर
मिसळपाव आणि स्पर्धा आयोजकांचे अनेक आभार..
स्पर्धेच्या निमित्ताने लोकांना वेगळे काहीतरी आणि तेही कमी शब्दांत लिहिण्याची प्रेरणा मिळाली, शिवाय वाचकांसाठी सुध्दा ही पर्वणीच होती.
शंभर शब्दांत सगळं बसवायला किती ते शब्दांचे खेळ करावे लागले... ;)
19 Aug 2015 - 10:10 am | समीरसूर
पहिल्या पाचही कथा जबरदस्त होत्या. 'लोकमान्य'चा आवाका खूप मोठा होता आणि लेखकाने तो १०० शब्दात अगदी अचूक पकडला. 'निकाल'मध्ये एका व्यथित झालेल्या मनाचे अश्रू समर्थपणे चितारले होते. 'ईवाईन' मध्ये इतक्या कमी शब्दात इतका सुन्न करणारा अनुभव लेखकाने इतक्या प्रभावीपणे मांडला होता की क्षणभर प्रत्यक्ष त्या जागी असल्याचा भास झाला. 'वन नाईट इन द ट्रेन' ही कथा मानसिक आंदोलनांचे मन मुग्ध करणारे चित्रण करते. 'अंतर' एकंदरीत आयटीवर आणि खाजगी नोकरीमधील भवितव्यावर स्वच्छ प्रकाश अगदी मोजक्या शब्दात टाकते.
मला बाकीच्या बऱ्याच कथादेखील मनापासून आवडल्या. खूपच जबरदस्त पंच होता जवळपास सगळ्या कथांमध्ये. शतशब्दकथेत अवाक करणारा पंच हवा. तो या कथांमध्ये नक्कीच होता.
काहीतरी धक्कादायक पण नकारात्मक शेवटच कथेला नाट्यमयता प्रदान करतो असा काहीसा सूर सुरुवातीच्या बऱ्याच कथांमध्ये दिसला. काही अंशी तो खरा देखील आहे. वर्तमानपत्रात मोठ्या नकारात्मक बातम्यांना मोठे स्थान मिळते आणि सकारात्मक बातम्यांना बहुतेक वेळा छोट्या जागेत समाधान मानावं लागतं.
शब्दांची संख्या शिथिल करण्याने फारसा फरक पडायला नको. अगदी कमी शब्द हा खरं तर निकष असायला हवा. दोन-पाच शब्द इकडे-तिकडे हा वादाचा विषय असायला नको असे वाटते. शेवटी प्रतिभा, क्षमता, कौशल्य महत्वाचे.
असो. पुनश्च सगळ्यांचे अभिनंदन आणि आयोजकांचे मन:पूर्वक आभार! स्पर्धेने खूप मजा आणली. कंटाळवाण्या माहौलमध्ये खूप रंगत आणली. :-)
19 Aug 2015 - 11:11 am | संजय पाटिल
अभिनंदन!!!!
19 Aug 2015 - 11:50 am | तुडतुडी
सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन .
19 Aug 2015 - 11:52 am | तुडतुडी
शतशब्दकथेत अवाक करणारा पंच हवा. तो या कथांमध्ये नक्कीच होता.>>+१११११
कुणीतरी अश्विनी नावाच्या आयडीने बहुतेक . 'आणि तो पादला ' हि सुधा कथा होऊ शकते असा भयाण प्रतिसाद दिला होता . त्यांचा निषेध
19 Aug 2015 - 1:09 pm | मृत्युन्जय
सर्व प्रतिसादकांना अनेक धन्यवाद,
आदूबाळ यांना त्यांनी घेतलेल्या परिश्रमांबद्दल डब्बल धन्यवाद.
कथेचा सिक्वल प्रकाशित करु का?
19 Aug 2015 - 1:10 pm | मृत्युन्जय
आणि सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
19 Aug 2015 - 1:19 pm | पैसा
तो मागे पडेल. अजून बाकी तीन स्पर्धक कळायचे आहेत. मग सगळ्यांनी ठरवून एक्/दोन दिवसांत टाका उत्तरार्ध.
19 Aug 2015 - 1:20 pm | खेडूत
सिक्वल शंभर शब्दांचाच असावा आणि मूळ कथेच्या प्रतिसादामध्ये द्यावा असे वाटते. म्हण्जे एकत्र वाचता येतील.
संंंमं काय म्हणते पहायला हवे!
19 Aug 2015 - 1:35 pm | अभ्या..
खेडूतराव सिक्वलचा धाग्यात मूळ कथा वर पेस्टवली आणि खाली सिक्वल लिहिला तर वाचायला जास्त सोपे पडेल. अशा फायनलिस्टचे डुएलचे सहा धागे दिसतील.
बादवे ह्या सहा जणांचे स्कोर पण परत मोजणार का? का फक्त परिक्षक निवडणार विजेते?
आता परत परत ते वाट पाहाणे नको. ;)
19 Aug 2015 - 1:43 pm | खेडूत
खरंय!
सहाच असतील तर ठीक- पण सर्वांना सिक्वल लिहीता येणार असं कुठं तरी वाचलं असल्याने अजून ८४ धागे निघू नयेत हे अपेक्षा !
19 Aug 2015 - 2:20 pm | माधुरी विनायक
बहुतांश शतशब्दकथा आवडल्या. एकत्र वाचायलाही आवडतील. हा नवा प्रकार खूपच भावला...
ता.क.-अशाच प्रकारे आंजी'च्या कथा वाचायलाही खूप खूप आवडेल.
19 Aug 2015 - 2:55 pm | प्राची अश्विनी
सर्वाना धन्यवाद!
आदूबाळ तसेच सं मं नी घेतलेल्या परिश्रमाबद्दल आणि वाचकांनी वेळ काढून वाचून प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचेही विशेष आभार.
या स्पर्धेनिमित्त अनेक सुंदर कथा वाचायला मिळाल्या. त्यामध्ये नंबर काढणं खरेच कठीण आहे. आताचे क्रमांक मतदानावर अवलंबून आहेत पण खरे नंबर काढताना परीक्षकांचा चांगलाच कस लागणार आहे. त्यांना शुभेच्छा!!!!
19 Aug 2015 - 5:11 pm | अनन्न्या
अभिनंदन!
20 Aug 2015 - 12:48 am | chetanlakhs
लेखकांचे अभिनंदन आणि संपादक मंडळाचे आभार...
20 Aug 2015 - 3:58 pm | बबन ताम्बे
लय उत्सुकता लागून -हायलीया :-)