पहिली शतशब्दकथा स्पर्धा
पहिली फेरी
१५ दिवस
८३ कथा
२४३८ मतं
शतशब्दकथा स्पर्धेला दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल लेखकांचे आणि वाचकांचे अनेक आभार!
आणि....
वाचकांच्या पसंतीनुसार पहिले पाच क्रमांक आहेतः
.tg {border-collapse:collapse;border-spacing:0;border-color:#ccc;}
.tg td{font-family:Arial, sans-serif;font-size:14px;padding:10px 5px;border-style:solid;border-width:0px;overflow:hidden;word-break:normal;border-color:#ccc;color:#333;background-color:#fff;border-top-width:1px;border-bottom-width:1px;}
.tg th{font-family:Arial, sans-serif;font-size:14px;font-weight:normal;padding:10px 5px;border-style:solid;border-width:0px;overflow:hidden;word-break:normal;border-color:#ccc;color:#333;background-color:#f0f0f0;border-top-width:1px;border-bottom-width:1px;}
.tg .tg-s6z2{text-align:center}
.tg .tg-cxkv{background-color:#ffffff}
.tg .tg-zlxb{background-color:#ffffff;text-align:center}
क्रमांक
शीर्षक
लेखक
Wordcount
Revised Votecount
1
लोकमान्य
मृत्युन्जय
100
88
2
निकाल
मधुरा देशपांडे
100
65
3
ईवाईन
नाव आडनाव
100
58
4
वन नाईट इन द ट्रेन
प्राची अश्विनी
99
55.44
5
अंतर
अभ्या..
100
55
नाव आडनाव यांनी ते सीक्वल लिहू इच्छित नसल्यामुळे अंतिम फेरीसाठी विचार केला जाऊ नये अशी विनंती केली आहे. त्यामुळे त्यांच्या शतशब्दकथेचा विचार अंतिम फेरीसाठी केला गेलेला नाही.
शतशब्दकथेच्या नियमानुसार बरोब्बर शंभर शब्दांत कथा बसवणं गरजेचं होतं. स्पर्धेतल्या एकूण ८३ कथांपैकी ४७ कथा बरोब्बर १०० शब्दांच्या होत्या. कथा शंभर शब्दांची नसेल तर स्पर्धेबाहेर ठेवावी असा एक मतप्रवाह होता. परंतु ही पहिल्याच स्पर्धेची पहिलीच फेरी असल्याने १०० शब्दांचा नियम काटेकोरपणे अंमलात न आणण्याचा निर्णय घेण्यात आला. तरी बरोब्बर १०० शब्दांत कथा लिहिणार्या लेखकांना न्याय मिळावा म्हणून १०० पेक्षा कमी/जास्त शब्द असलेल्या कथांची मतं त्याप्रमाणात कमी करायचा निर्णय घेण्यात आला.
प्राची अश्विनी यांची कथा ९९ शब्दांची असल्याने १/१०० = १% मतं कमी करण्यात आलेली आहेत.
त्यामुळे... अंतिम फेरीत गेलेले पहिले तीन स्पर्धक आहेतः
- मृत्युन्जय (कथा: लोकमान्य)
- मधुरा देशपांडे (कथा: निकाल)
- प्राची अश्विनी (कथा: वन नाईट इन द ट्रेन)
हार्दिक अभिनंदन!
आता प्रतीक्षा आहे परीक्षकांनी अंतिम फेरीसाठी निवडलेल्या तीन स्पर्धकांची!
प्रतिक्रिया
20 Aug 2015 - 4:04 pm | मीता
विजेत्यांचे अभिनंदन आणी मान्यवरांचे आभार.
20 Aug 2015 - 5:33 pm | जेपी
स्पर्धेची प्रथम फेरी यशस्वी रितीने पार पाडल्या बद्दल आणी शेंच्युरी निमीत्त श्री.आदुबाळ यांचा सत्कार शाल,श्रीफळ आणी पुष्पगुच्छ देऊन करण्यात येत आहे.
-आता तरी उरलेला निकाल लावा संघटना.
21 Aug 2015 - 8:57 am | तुषार काळभोर
सर्वच स्पर्धकांनी आता त्यांच्या सिक्वेल्स टाकाव्यात ही विनंती...
(त्या स्पर्धेसाठी नसल्याने १०० ची अट सैलावली तरी चालावी)
21 Aug 2015 - 12:21 pm | पैसा
सर्वांचे अभिनंदन! अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला! एवढी अपेक्षाच नव्हती. मग आता फायनलला रंगत वाढवायला पहिल्या ५ जणांना परीक्षकांच्या ३ निवडीसकट फायनलला पाठवावे काय? म्हणजे पहिले ३ निवडताना अजून जरा स्पर्धा राहील! शेवाय अभ्याचा नंबर अर्ध्या मार्कानेच मागे राहिला आहे! :)