अणु-रेणूंपासून ग्रह-ताऱ्यांपर्यंत
मुंगीपासून-देव माश्यापर्यंत
सगळेच बद्ध -
कुणी भौतिक
तर कुणी
निसर्गदत्त सहज-प्रेरणेच्या
आपापल्या कक्षेत.
एकटा माणूसच
या सगळ्याला अपवाद -
आपल्या अंतरीच्या अंधार-उजेडातून
ऊन-सावल्यांतून
भ्रमांच्या, दुविधांच्या, वंचनांच्या, चुकांच्या
नागमोडी वाटांनी भटकायला मोकळा
हेच आहे त्याचं ओझं
हीच आहे त्याची व्यथा
हाच आहे त्याचा गौरव
हीच आहे त्याची महत्ता
प्रतिक्रिया
27 Jul 2015 - 9:42 pm | अत्रुप्त आत्मा
चपखल मांडणि
आशयघन काव्य!
27 Jul 2015 - 11:08 pm | जडभरत
अर्थ खूप गहन आहे. माणसाची मुक्तता ही मजापण आणि सजापण हे खरंच.
27 Jul 2015 - 11:44 pm | एस
सगळेच बद्ध आणि माणूस अपवाद ह्या गृहितकास छेद देणारी संशोधने समोर येत आहेत. तरी एक काव्य म्हणून छान आहे.
29 Jul 2015 - 10:40 am | पथिक
खरंच? तसं असेल तर गुंतागुंत आणखी वाढेल डोक्यात … माझ्यासारख्यांच्या!
28 Jul 2015 - 6:51 am | चुकलामाकला
आवडली!
29 Jul 2015 - 10:36 am | पथिक
सर्वांचे आभार !
29 Jul 2015 - 2:22 pm | तुडतुडी
आवडली . मस्त . गहन अर्थ आहे कवितेला .