कविता, लेख, कथा कितीही उत्कृष्ट असोत, जीवनाला हुबेहूब कोणीच रेखाटू शकत नाही. अगदी सिद्धहस्त लेखक देखील.
बुरबुराते शरारती झरनों की मासुमियत
या खिलखीलाती हरीयाली की तबस्सुम
समिंदर तरन्नुम गाता, फिरभी गुमसुम
बदसुरत न बना फिजूल, गझलोमें ढाल इन्हे |
झुर्रीयोमें दबी सुष्क आंखें, खोजती शबाब
शगाफोंसे लदा चरगाह, ताकते फ़व्वार--------------------*शगाफे-cracks *चरगाह-field
दर्यामे आवाराह कश्ती, तलाश साहिल की
बदसुरत न बना फिजूल, गझलोमें ढाल इन्हे |
संकल्पना कहो, या नजारे तखय्युल---------------------*नजारे तखय्युल-views of imagination
नझम शेरोशायरी निरे लब्ज है कोरे
कबसे अलफाज खुद बन गये इतीहास?
शायर क्या पहनायेंगा जिंदगी को लिबास |
जिंदगी गर हकीकत है, नझमे खयाली पुलाव
जिंदगी गोश्त, कंकाल, शायरी दिखाऊ खाल
दर्द, ख़ुशी, जुनून, आरजु, मोहब्बती मिठास
शायर क्या पहनायेंगा जिंदगी को लिबास |
*****************
या माझ्या रचनेचा मराठी अनुवाद, मीच केलेला.
*****************
खळखळते ओहोळ, हास्य निरागस
हिरवीकंच कुरणे, निर्व्याज, लोभस
समुद्र गंभीर गाज, कधी मुकेपणाने
हे जीवन नक्कीच करपणार, गजलेने!
सुरकुत्यांत गडले डोळे, तारुण्याचा शोध
तडकलेले माळरान, ओलाव्याचा अनुरोध
समुद्रांत बारकी होडी, किनारा दिसेना
हे जीवन नक्कीच करपणार, गजलेने!
काव्य- संकल्पना असो वा कल्पना मस्त
काव्य, शायरी, सारे कोरे शब्दच फक्त!
अक्षरे स्वत:ला मानू लागली इतीहास?
कवडे काय चढवणार जीवनाला पोशाख!
जीवन हकीगत आहे, काव्य मनाचे मांडे
जीवन अस्थी मांस, कविता दिखाऊ झेंडे
सुख दु:ख, आकांक्षा, शुद्धप्रेमाची मिठास,
कवडे काय चढवणार जीवनाला पोशाख!
प्रतिक्रिया
16 Jul 2015 - 9:30 am | खेडूत
मस्त!
शाहीर ऐवजी शायर असं वाचतोय..
शाहीर म्हट्लं की वेगळं चित्र येतं डोळ्यासमोर !
16 Jul 2015 - 11:21 am | वेल्लाभट
छान आहे.....
16 Jul 2015 - 2:37 pm | एक एकटा एकटाच
सुरेख
मस्तय
मुळ रचना आणि अनुवाद दोन्ही मस्त
16 Jul 2015 - 2:43 pm | एस
छान आहे.