अफगाणिस्तान-कंदाहार पहाटे २.००-२.३०
भयानक थंडीच्या त्या रात्री सगळं कंदाहार दुलईमधे गुरफटुन झोपलेलं होतं. अपवाद होता तो कंदाहारपासुन जेमतेम ३ कि.मी. अंतरावर असणार्या एका भग्न हवेलीचा. कोणे एके काळी अंगभर वैभव मिरवलेली ती इमारत आज मात्र साध्या चुन्याच्या रंगाला पारखी झालेली होती. बाहेरच्या दिड-दोन पुरुष उंचीच्या भिंती जागोजागी कोसळलेल्या होत्या. कोणे एके काळी जिथल्या खोल्या तेलबत्तीच्या दिव्यांनी उजळलेल्या असायच्या त्यापैकी बहुतांश खोल्या आता मात्र कायमच्या अंधाराच्या मगरमिठीमधे गारद झालेल्या होत्या. रात्रीचचं काय ह्या हवेलीच्या पटांगणामधे दिवसाउजेडीसुद्धा फिरकायची कोणाची छाती झाली नसती असा एकंदर माहोल होता. ह्याचं हवेलीच्या मध्यभागच्या एका खोलीमधे मात्र आज एक ४० वॅटचा दिवा उदास प्रकाश देत जळत होता. ह्या हवेलीच्या एकुणचं गंभीर वातावरणामधे त्या विचित्र प्रकारच्या प्रकाशामुळे भर पडत होती. खोलीच्या एका टोकाला असलेल्या शेकोटीमधे शेवटची धुगधुगी उरलेली लाकडं जळत होती. खोलीमधे मध्यभागी एक भलंमोठं सागवानी टेबल होतं. आणि त्याच्या भोवती ४ लोकं अगदी श्वासाचाही आवाज होउ नं देता शांत बसलेली होती. खोलीच्या दरवाज्याशी पाकिस्तानी सैन्याचा गणवेश घातलेले दोन सेंट्री एके-४७ घेउन उभे होते. सगळ्यांच्या नजरा खोलीमधे अस्वस्थपणे येरझारा घालणार्या आयएसआयच्या शहरयार खानकडे खिळलेल्या होत्या. काही वेळ असाचं गेला आणि खोलीच्या एका कोपर्यामधे असणारा टेलिफोन खणखणला. प्रमुखानी अक्षरशः झडप घालुन रिसिव्हर उचलला आणि अस्खलित उर्दु भाषेमधे बोलायला सुरुवात केली. एक क्षणभर त्याचा चेहेरा आनंदानी फुलला आणि पुढच्याचं क्षणी पुर्वीचाच कोरीव निर्विकार भाव त्याच्या चेहेर्यावर आले. फोन ठेवुन त्यानी काही सेकंदांचा विचार केला आणि तो टेबलाजवळच्या एका रिकाम्या खुर्चीवर बसला. समोरचे चारही जणं कानामधे प्राण एकवटुन तो काय बोलतोय ह्याची वाट पहायला लागले.
"मेजर बक्षी, हिंदुस्थानी काफरांची झोप उडवायची वेळ आलेली आहे. आपल्याकडुन तयारी पुर्ण झालेली आहे?" त्यानी टेबलाभोवतीच्या एका पाकिस्तानी लष्कराच्या गणवेषामधे बसलेल्या व्यक्तीकडे पहात विचारणा केली.
"जनाब, सगळी तयारी पुर्ण झालेली आहे. हिदुस्थानमधे लवकरचं एकही त्योहार होणार, तबाही!!. आज भाईचार्याच्या पोकळ गप्पा मारणारे उद्या आपल्या सख्ख्या बापावर विश्वास ठेवायला तयार होणार नाहीत." मेजर बक्षी आपल्या खुर्चीवर रेलुन बसत म्हणाला.
"हाफिज सहाब!! आजपासुन तीन दिवसांनी सबंध हिंदुस्थानामधे धमाके होणार. त्याचवेळेला तुम्ही इस्लाम खतरेमे है चा नारा देत काश्मिर पेटवायचं. काफरांच्या फौजा दंगल आवरण्यामधे गुंततील त्याचा फायदा घेउन काश्मिरमधे आपले जिहादी भाई काश्मिरमार्गे हिदुस्तानामधे घुसतील आणि पुढचा प्लान अंमलात आणतील. आयएसआयनी मोठा फटाका भारतामधे पाठवायची तयारी पुर्ण केलेली आहे. कोई शक?" शहरयार प्रमुख पुढच्या व्यक्तीकडे वळत म्ह्णाला.
" सबकुछ प्लान के मुताबिक होगा. काश्मिर पाकिस्तानसे मिलके रहेगा इन्शाहः अल्लाह!!" हाफिज आपली बोकडासारखी दाढी कुरवाळत म्हणाला.
"ठिक आहे. तुम्ही गेलात तरी चालेल. वेळच्या वेळी तुम्ही कराचीला पोचायला हवं. सद्यपरिस्थितीमधे तुम्ही पाकिस्तानी आमंत्रणावर आला आहात. त्यामुळे तुमचा पर्दाफाश होणं परवडण्यासारखं नाही त्यामुळे तुम्ही आता निघा. अल्लाह हाफिज. कॅप्टन मन्सुर तुम्ही स्वतः हाफिज साहेबांना कराचीला पोचवायची जिम्मेदारी पार पाडा."
"अल्ला हाफिज", असं म्हणुन हाफिज त्या खोलीमधुन बाहेर पडला. त्याची गाडी हवेलीच्या चार भिंतीमधुन बाहेर पडल्याची खात्री करुन घेउन मग शहरयार अजुनही खोलीत बसलेल्या मेजर बक्षीकडे आला आणि पहिल्यांदाच स्वतःहुन मेजरनी तोंड उघडलं.
"जनाब, तुम्ही त्या हिदुस्तानी हाफिजला जरुरीपेक्षा जास्तं महत्त्व देत आहात. काही झालं तरी ती काफर त्या देशाची पिल्लावळ आहे. आस्तनीका सांप. उद्या उलटला तर पाकिस्तान जागतिक स्तरावर अडचणीत येणार." मेजर बक्षी चिंताग्रस्त स्वरामधे म्हणाला.
"मेजर, त्याची काळजी घ्यायला आय.एस.आय. समर्थ आहे. त्याला सद्ध्या काश्मिरच्या सत्तेचं गाजर दाखवुन आपल्याला सामिल करुन घेतलेलं आहे. उद्या काश्मिर भारतापासुन तुटलं की त्याचं नखही परत जगाला दिसणार नाही ह्याची खात्री बाळगा. काश्मिरच्या दर्याखोर्यांमधे नेहेमी अपघात होतं असतात", छद्मीपणे हसत तो उत्तरला.
"तसं असेल तर माझी काळजी मिटली, तर आपण आता पुढची आखणी करुयात?" मेजर बक्षी समाधानाच्या स्वरात उत्तरला.
"आपल्या स्फोटकं आणि हत्यारांनी भरलेल्या गाड्या खैबर खिंडीमार्गे पाकिस्तान बॉर्डर पर्यंत जातील. आत्ता पुढच्या वीस मिनिटांच्या आतमधे सगळ्या गाड्या निघायला हव्यात. मेजर रशिद स्वतः कॉन्व्हॉय बरोबर असायला हवे. तुम्ही निघा. उद्या रात्री ह्याच वेळी इथेचं भेटु. आजचा कॉन्व्होयचा प्रवास सुरक्षितपणे झाला की उद्या ऑपरेशनचा दुसरा भाग सुरु होईल." आयएसआय ऑफिसर खुर्चीवरुन उठत म्हणाला. मेजर बक्षी सुद्धा गडबडीनी उठुन फोनकडे गेला. एक नंबर त्यानी फिरवला. पलीकडुन फोन उचलला गेला तेव्हा मेजर फक्त एवढचं म्हणाला, "वक्त बदल रहा है!" एवढं बोलुन त्यानी फोन ठेउन दिला. पलीकडुन मेजर रशिद घाई करत कॉनव्हॉयची तयारी झाली की नाही हे बघायला निघाला.
इकडे मेजर बक्षी त्या विवक्षित हवेलीमधुन बाहेर पडला. त्या दोन एके.४७ धारक सेंट्रीजपैकी एकानी वार्यालाही लाजवेल अश्या चपळाईनी आपल्या खिशामधला ट्रान्समिटर बंद केला. मिटिंग संपलेली असल्यानी आता त्याला मो़कळा वेळ होता. त्या थंडगार वातावरणामुळे त्याला केव्हाचं बाथरुम कडे पळायची घाई लागलेली होती. बाथरुमचा दरवाजा उघडुन तो दोन पावलं आत गेला. त्याच्या तोंडाभोवती एक पोलादी पंजा आवळला गेला आणि त्याच्या डोक्याच्या उजव्या बाजुला थंडगार सायलेंन्सरचा स्पर्ष झाला. काही कळायच्या आतमधे एक दबका 'फुट्ट' असा आवाज झाला. सायलेंन्सर लावलेल्या बेरेटा ९ एम.एम. च्या एकाचं गोळीनी आपलं काम चोख बजावलेलं होतं.
"मुझसे बेईमानी का नतिजा", त्याच्या निश्चेतन मृतदेहाला एक लाथ घालुन शहरयार खान बाहेर आला. त्याच्या प्लान ला आता खर्या अर्थानी गती आलेली होती. ट्रान्स्मिटरवरुन प्रसारित झालेली माहिती हा त्यांच्या प्लानचा एक छोटासा भाग होता. भारतीय स्पेशल ऑप्सच्या त्याच्या मागे हात धुवुन लागलेल्या एका युनिटला गुंतवुन ठेवण्यात आलेला खर्या माहितीचा एक छोटासा हिस्सा.
----
कंदाहार पहाटे २.१० ते २.२५
थंडगार रात्री मस्तं दुलईमधे ताणुन द्यायची सोडुन त्याला कंदाहारबाहेर बाहेर पडायला लागलं होतं. रात्रीच्या अंधाराशी तो संपुर्णपणे एकरुप झालेला होता. अगदी चार फुटावरुन पाहिलं असतं तरी साध्या डोळ्याला तो दिसला नसता. अतिशय सराईतपणे हालचाली करत तो एका निर्मनुष्य हवेलीच्या भिंतीजवळ पोचला होता. आपल्या रकसॅकमधे हात घालुन त्यानी एक चपटी पेटी काढली. त्याच्यावरची काही बटणं दाबताचं एक बारिकसा आवाज करत तो रिसिव्हर चालु झाला. आपल्या एका कानावर त्याचा इअरपीस दाबुन ठेवुन तो आत घडणार्या संभाषणाचा हिस्सा काळजीपुर्वक ऐकायला लागला. आतमधला ट्रान्स्मिटर डिसकनेक्ट होईपर्यंत त्याला तिथे थांबुन राहणं भाग होतं. २.२५ च्या सुमाराला ट्रान्स्मिटर डिसकनेक्ट झाला. आता ऐकलेल्या संभाषणाचं स्वरुप एवढं गंभिर होतं की त्याच्या पायाखालची जमिन सरकल्यासारखी झाली होती. परत सराईतपणे हालचाली करत तो १ आपल्या गाडीपाशी पोचला. गाडी कंदाहारकडे भरधाव वेगानी जायला लागली. वाटेमधे गाडीमधला सॅटफोन काढुन त्यानी आपल्या वरिष्ठाशी बातचित सुरु केली. आतापर्यंत ऐकलेली सगळी माहिती सांगीतल्यावरचं तो शांत झाला. एव्हाना ही माहिती स्पेशल ऑप्स युनिट कमांडर पर्यंत पोचलेली असेल आणि पाकड्यांचे मनसुबे उधळुन लावायची तयारी चालु झालेली असेल ह्या जाणिवेनी त्याच्यावरचा तणाव थोडासा कमी झाला.
----
स्पेशल ऑप्स वॉर रुम, दिल्ली पहाटे ३:००
सॅट फोनवरचं बोलणं संपताच कर्नल त्यागींनी पहिला फोन केला तो स्पेशल ऑप्स युनिटच्या ऑफिशिअली रिटायर्ड पण पडद्यामागुन सुत्र हलवणार्या मेजर जनरल मृत्युंजय परांजपे ह्या त्यांच्या जुन्या मित्राला. एवढ्या पहाटे फोन केल्यावर आपलं स्वागत फोनवर कसं होणार ह्याची त्यांना पुर्ण कल्पना होती. फोनवर घोगर्या आवाजात हासडलेल्या चार शिव्या ऐकुन मग दोस्ती खात्यामधे दोन शिव्या परत देउन त्यांच्या संभाषणाला सुरुवात झाली. परिस्थितीचं गांभिर्य उमगताचं मृत्युंजयाची झोप उडाली. आणि पुढच्या वीस मिनिटांमधे ते वॉररुममधे हजर झाले.
तोपर्यंत डिफेन्स सेक्रेटरी दिक्षित सुद्धा आलेले होते. आणि खलबतांना सुरुवात झाली.
"आपल्याला जेवढ्या लवकर त्या पाकड्या रशिदचा काटा काढता येईल तेवढा बरा. एवीतेवी कॉनव्हॉयबरोबर सापडतोचं आहे तर त्याला जिवंत पकडुन भारतामधे आणता येईल. ह्याच्याकडुन भारताचं खाउन भारतामधे हागणार्या बर्याचं आयएसाआय च्या डुकरांची माहिती मिळु शकेल" मे.ज. मृत्युंजय म्हणाले. हा रशिद म्हणजे त्यांच्या अवघड जागीचं दुखणं झालेलं होतं. १९९९ च्या कारगिल युद्धामधे हा रशिद्या त्यांच्या तावडीमधुन थोडक्यात वाचला होता.
"वेल जंटलमन, वी नीड टु इंटरफिअर धिस ऑपरेशन इन इटस रुट्स. डोन्ट लेट द कॉनवॉय क्रॉस खैबर पास. व्हुम कॅन बी सेंट अॅट धिस अनगॉडली अवर्स" मे.ज. परांजपे चिरुटामधुन धुर सोडत म्हणाले.
"वेल, आपलं हाउंड वन युनिट खैबर खिंडीजवळ रिकॉन ऑपरेशनमधे आहे. लेट द डेव्हिल्स हँडल द वर्क. हाउ सुन कॅन दे प्लान द अँबुश?", दिक्षितांच्या डोक्यामधे पुढच्या हालचाली चालु झालेल्या होत्या.
हाउंड वनचं नाव ऐकताचं मे.ज. मृत्युंजयांच्या डोक्यावरचं निम्मं ओझं हलकं झालेलं होतं. दिक्षित ह्या स्पेशल ऑप्स टिमला डेव्हिल म्हणाले ह्यामधे कुठलीही अतिशयोक्ती नव्हती. अश्या प्रकारच्या कठिण परिस्थिती हाताळणं हा ह्या युनिटच्या डाव्या हाताचा मळ होता. ह्या युनिटनी बॉर्डरपलीकडच्या एक नाही दोन नाही तब्बल १९ कारवाया अत्यंत गुप्तपणे पुर्ण केलेल्या होत्या. मेजर अविनाश, कॅप्टन वीर, ले. फैजल, ले. बलवंतसिंघ आणि ले. चंद्रन ह्या पाचं जणांचं हे युनिट म्हणजे साक्षात यमाचा पाश होता. आजवर ह्या युनिटची एकही कामगिरी फसलेली नव्हती. एका हाताची ही पाच बोटं जेव्हा मुठ बनुन शत्रुवर कोसळत असे त्यावेळी शत्रुचं कंबरडं मोडत असे. ही ही कामगिरी हे युनिट ही कामगिरी फत्ते करणार ह्यात मृत्युंजयांना कुठलीही शंका नव्हती. ह्यावेळी मात्र फक्तं एकचं गोष्ट त्यांना सतावत होती ती म्हणजे मेजर अविनाशची कमतरता. गेल्या मिशनमधे त्याच्या दंडामधे आणि छातीमधे ग्रेनेडमधले शार्पनेल शिरलेले असल्यानी तो मिशन केपेबल नव्हता. त्याला त्या हातानी बंदुक सोडा साधा चमचाही किमान एक महिना उचलणं शक्य नव्हतं.
"व्हॉट आर वी वेटिंग फॉर, गिव्ह हाउंड्स फ्री हँड. लेट देम वाईप आउट द कॉनवॉय", परांजपे खुर्चीमधे रेलुन बसले.
त्यांचं बोलणं संपतय नं संपतय तोपर्यंत दिक्षितांनी पुढच्या ऑर्डर्स द्यायसाठी फोन उचललेला होता.
अफगाणिस्तान-खैबर पास पहाटे (स्थानिक वेळ) ३:४५
दिक्षितांच्या ऑर्डर्स एव्हाना कॅप्टन वीर पर्यंत पोचलेल्या होत्या. मेजर अविनाशच्या अनुपस्थितीमधे तो युनिट इनचार्ज असणार होता. सगळं युनिट एव्हाना तयार झालेलं होतं. आपापले ऑपरेशन्स गिअर घेउन युनिट जीपमधे चढलं आणि ले. चंद्रनने गाडी भरधाव खैबर खिंडीच्या दिशेने सोडली. त्यांच्या कँप पासुन खैबर खिंड जेमतेम ८ किमी अंतरावर होती. मोजुन १५ व्या मिनिटाला खैबर खिंडीमधल्या एका विवक्षित इंग्रजी यु आकाराच्या वळणावर त्यांची जीप चंद्रनने पोहोचवलेली होती. गेले दोन आठवडे ते खैबर खिंडीमधेचं गुप्तपणे रिकॉनचं काम करत असल्याने संपुर्ण खिंड अगदी डोळे मिटुन पार करण्याएवढी त्यांच्या लक्षात राहिलेली होती. उंचावरच्या त्या वळणामागच्या एका प्रचंड मोठ्या खडकामागे त्यांनी जीप दडवली. जीपच्या मागच्या भागातुन त्यांनी प्रत्येकी एक एक अश्या चार .५० च्या स्नायपर रायफल्स उचलल्या. आणि ते वर्तुळामधे उभे राहिले. त्यांचे कान कॅप्टन वीर आता काय आज्ञा करतो त्याच्याकडे लागलेले होते.
"बॉईज, अवर ऑर्डर्स आर टु स्टॉप धिस कॉन्व्हॉय अॅट एनी कॉस्ट. मी अँड चंद्रन विल बी स्टॉर्मिंग फ्रॉम ट्वेल्व. यु टु विल मेक शुअर नो वन एस्केप्स फ्रॉम सिक्स." वीर नी भराभरा सुचना द्यायला सुरुवात केली.
"अॅफरमेटिव्ह कॅप्टन" बाकीच्यांनी एका सुरामधे उत्तर दिलं.
"चंद्रन यु विल टेक फर्स्ट शॉट अॅट लिडिंग वेहिकल्स ड्रायव्हर, आय विल हिट ऑन सेकंड वेहिकल. फैजल अँड बलवंत इट सीम्स यु वील हॅव ट्रबल टेकिंग शॉट अॅट ड्रायव्हर्स फ्रॉम युअर वांटेज पॉईंट. यु विल क्रिएट डिस्ट्रॅक्शन बाय शुटिंग वेहिकल्स टायर्स. नो वन एस्केप्स माउंटन/ एनी क्वेश्चन हाउंड्स?" वीर
"नो सर. वी फॉलोथ्रु" सगळे एका सुरात ओरडले.
"एस्टिमेटेड हेड काउंट इझ अराउंड २० लाईटली इक्विप्ड इन्फ्रंट्री इन फोर वेहिकल्स टोटल, विथ वन लाईट आर्मर. वी मस्ट नॉट शुट डार्क हॉर्स. वी नीड डार्क हॉर्स अलाईव्ह. अॅज पर अवर इन्फो ही इज इन थर्ड वेहिकल. नाउ मुव्ह युअर बट्स अँड गेट इन पोसिशन" एवढं बोलुन आपल्या रायफलला खांद्यावर टाकुन कॅ.वीर ले.चंद्रन बरोबर आपल्या वांटेज पॉईंट कडे निघाला. ले. फैजल आणि ले. बलवंतसिंघ त्यांच्या बरोबर उलट्या दिशेला निघाले. मोजुन दहाव्या मिनीटाला दोन्ही गट एकमेकांपासुन अर्ध्या कि.मी. अंतरावर एकमेकांकडे तोंड करुन आपापल्या वांटेज पाँईंटमधे पोचलेले होते.
दोन्ही वांटेज पॉईंटच्या बरोबर मधुन अरुंद रस्ता जात होता ज्या रस्त्याच्या दोन्ही बाजुंना बरोबर उंचचं उंच पर्वतांचे सुळके होते. जिथे सुळके संपत होते तिथुन जेमतेम १५० मीटर अंतरावर ते विवक्षित वळण होतं. ड्रायव्हर कितीही तयारीचा असला तरी त्या वळणाला घाबरलाचं पाहिजे एवढं अवघड वळण होतं ते. त्यामुळे नैसर्गिकपणे ताफ्याला वेग कमी करावा लागणारचं होता. ह्या परिस्थितीचं अचुक निरिक्षण नोंदवुन वीरनी ती जागा हल्ला करायसाठी निवडलेली होती.
कॅप्टन वीरच्या वांटेज पॉईंट वरुन खिंडीच्या अगदी खालपासुनचा भाग नीट दिसत होता. त्यांना फार वेळ वाट पहायला लागली नाही. लागोपाठ चालणार्या चार गाड्यांचा ताफा खिंड चढायला लागलेला दिसायला लागला होता. अजुन फार फार तर वीस मिनिटामधे तो ताफा त्यांना अपेक्षित असणार्या जागी पोचल्या असत्या.
"धिस इज विचर टु ओव्हरलॉर्ड, डु यु कॉपी" वीर एका कॉमवर वॉररुमशी संपर्कात होता.
"ओव्हरलॉर्ड टु विचर, व्हॉट्स युअर स्टेटस", मृत्युंजयांनी थंडगार आवाजामधे कॉम वर प्रत्युत्तर दिलं.
"वी आर इन पोसिशन अँड कॉन्व्हॉय इन साईट, रिक्वेस्टिंग परमिशन टु एंगेज सर", कॅप्टन वीर आपल्या नाईट वीजन दुर्बिणीमधुन हळुहळु वर सरकणार्या ताफ्याकडे पाहुन म्हणाला.
"परमिशन ग्रांटेड विचर, नो लुज एंड्स एक्सेप्ट डार्क हॉर्स. अवर एक्स्ट्रॅक्शन टीम इज वेटींग फॉर युअर सिग्नल", मृत्युंजयांनी परवानगी दिली.
"ओव्हरलॉर्ड, वी आर गोईंग इन रेडिओ सायलस्न विथ हेडक्वार्टर्स. वी विल ओपन कॉम वन्स वी सिक्युअर द डार्क हॉर्स", इति कॅ.वीर.
"ओव्हरलॉर्ड आउट. ऑल द बेस्ट बॉईज", मृत्युंजयांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. शेजारी बसलेल्या कर्नल त्यांगींकडे बघुन त्यांनी स्मितहास्य केलं. त्यांगींच्या कपाळावर जमा झालेला घाम बघुन मात्र त्यांना आपलं गडगडाटी हास्य आवरता आलं नाही. "काही होतं नाही ***, हाउंड्सनी पुढच्या अर्ध्या तासात पाकड्यांच्या चिंध्या केलेल्या असतील". त्यागींनी दिक्षितांकडे बघुन खांदे उडवले. हा म्हातारा किती सैतान आहे आणि त्याची हि चांडाळ चौकडी पाकड्यांना पाणी पाजणार ह्याविषयी त्यांच्या मनामधे कुठलीही शंका नव्हती.
इकडे हा ताफा हळु हळु ठरवलेल्या ठिकाणाच्या जवळ पोहचत होता. सगळ्या गाड्या दोन्ही बाजुला उंच सुळका असणार्या भागात शिरल्या आणि मार्गक्रमण करु लागल्या.
सगळं हाउंड वन युनिट आपापल्या .५० च्या नाईट व्हिजन स्कोप्समधुन आपापल्या ठरवलेल्या लक्षांवर नेम धरुन बसलेल्या होत्या. वेळ जणु काही हळुवारपणे चाललेला होता. आता फक्त वाट पहायची होती ती कॅप्टन वीरच्या आज्ञेची.
तो ताफा पुर्णपणे आवाक्यात आल्याची खात्री करुन कॅ.वीरनी रेडिओवर एकच वाक्य उच्चारलं.
"सेट द बुलेट्स फ्री. एव्हरी बुलेट काउंट्स"
त्याच्या एका सेकंदांमधे वातावरणामधे .५० चा धडाका उडालेला होता. वीर आणि चंद्रनच्या रायफलींमधल्या आर्मर पिअर्सिंग राउंड्स्नी आपलं काम चोख बजावलेलं होतं. दोन्ही ड्रायव्हर्स्च्या डोक्यांमधुन गोळ्या आरपार गेलेल्या होत्या. आणि ह्यापुढे ते कुठल्याही भारतविरोधी कारवाईमधे भाग घेउ शकणार नव्हते. पुढच्या दोन गाड्या थांबताहेत तोपर्यंत मागुन बलवंत आणि फैजलच्या गोळ्यांनी मागच्या दोन गाड्यांच्या टायर्सचा वेध घेतलेला होता. काही सेकंदांच्या अवधीमधे त्या आख्ख्या ताफ्याची मोबिलिटी ह्यांनी नष्ट करुन टाकलेली होती.
इकडे ताफ्यामधल्या इन्फ्रंट्रीच्या सैनिकांमधे गोंधळाचं वातावरणं उडालं. सगळ्यांनी आपापल्या रायफल्स सावरत गाड्यांमधुन उड्या मारायला सुरुवात केली. नेमक्या कुठुन गोळ्या झाडल्या गेल्या हे अंधारामधे त्यांना समजत नसल्यानं एखाद्या आंधळ्या माणसाची भर ट्रॅफिकमधे जशी अवस्था होते तशी त्यांची अवस्था झालेली होती. त्यांनी रशिद बसलेल्या गाडिभोवती डिफेन्सिव्ह पोसिशन्स घेतल्या. इकडे रशिदमियांची अवस्था काय वर्णन करावी. आधी झालेल्या हल्ल्यानी त्याला त त प प सुरु झालेलं होतं. हा रशिदमिया लष्करामधे वरच्या हुद्द्यावर जायचं एकमेवं कारण म्हणजे त्याचा लष्करामधे असणारा उच्चपदस्थ सासरा एवढं एकचं कारण होतं. बाकी हा भित्री भागु ह्या एकमेवं पदवीला लायक माणुस होता. त्याच्यामधे ठासुन भरलेला कावेबाजपणा आणि भारतद्वेष ह्या भांडवलावर त्याने आपला एक दबावगट निर्माण केलेला होता.
स्कोपमधुन दिसणार्या सैनिकांच्या गोंधळलेल्या हालचाली बघुन वीरला हसायला येत होतं. त्यानी नेम धरुन अजुन एकदा ट्रिगरवरचं बोट आवळलं. .५० ची ती गोळी एकाच्या बरगड्यांचा चुरा करत दुसर्याच्या पोटातुन आरपार गेलेली होती. दोघांना किंचाळायचीही संधी मिळालेली नव्हती. बाकीच्यांनीही वीरचचं अनुकरणं करत गोळ्यांच्या दोन फैरी झाडलेल्या होत्या. .५० च्या गोळ्यांमधे ट्रकचा इंजिन ब्लॉक तोडायची ताकद असते. हाडामासांनी बनलेल्या देहांचा त्यापुढे काय टिकाव लागणार? अजुन सैनिक मारले गेले.
एव्हाना मात्र उरलेले सैनिक सावरलेले होते. आणि त्यांनी व्यवस्थितपणे आसरा घेउन स्वत:ला लपवलेलं होतं.
"हाउंड्स मुव्ह आउट. वी हॅव डार्क हॉर्स टु कव्हर" वीर आपल्या रेडिओवरुन आज्ञा देत उठला. खांद्यावरच्या अॅसॉल्ट रायफलला हात घालत तो पुढे सरकला. हेल्मेटला असणारी नाईट व्हिजन गॉगल त्यानी डोळ्यावर ओढला. चंद्रननेही त्याचं अनुकरण केलं उजव्या बाजुच्या डोंगराच्या सुळक्यांवरुन हळु हळु त्यांनी कॉन्व्हॉयच्या दिशेनी काळजीपुर्वक सरकायला सुरुवात केली. ले. बलवंत अजुनही स्नायपर रायफलनी कव्हर फायर देत होता. फैजल चित्त्याच्या चपळाईनी एव्हाना तिसर्या गाडीच्या बरोब्बर शेजारच्या सुळक्यावर पोचलेला होता. त्याच्या बरोबर उलट्या बाजुला वीर आणि चंद्रन पोचले. त्यांनी डोळ्याची पापणी लवतिये नं लवतिये तोपर्यंत तिथल्या सुळक्यांना रॅपलिंग चे दोर बांधले.
"रॅपल डाउन टु अॅसॉल्ट बॉईज" असं म्हणत स्वत:ला खालच्या अंधारामधे लोटुन दिलं. रस्त्यावर उतरल्या उतरल्या मांजरीला लाजवेल अश्या हालचाली करत त्यांनी खडकांच्या आड कव्हर घेतलं.
फैजलच्या दुर्दैवानी तो खाली उतरला तिथला एक धोंडा त्याच्या पायाचा धक्का लागुन खाली रस्त्यावर पडला. खाली गाडीपाशी दबा धरुन बसलेल्या सैनिकांनी आवाज झाल्याझाल्या तिकडच्या दिशेनी अंदाधुंद गोळ्या झाडायला सुरुवात केली. सगळ्या वातावरणांमधे एके-४७ चे आवाज घुमायला लागले. फैजलनी मात्र त्याचं क्षणी स्वतःला रस्त्याशेजारच्या एका खडड्यामधे लोटुन दिलं. एवढी चपळाई दाखवुनही एक गोळी त्याच्या खांदयामधे घुसलीचं. त्याच्या हातामधली अॅसॉल्ट रायफल प्रचंड वेदनांनी गळुन पडली. तिथुन जवळ असणार्या दोन सैनिकांना त्यानी खड्ड्यामधे उडी मारलेली दिसली. आणि ते त्याला संपवण्यासाठी खड्ड्याच्या दिशेनी निघाले. फैजल झालेल्या जखमेवर आपला हात दाबुन असहाय्यपणे समोर येणार्या प्रसंगाला तोंड द्यायला तयार झाला होता. ते दोन सैनिक खड्ड्याजवळ पोचले. आपल्या हातामधल्या रायफलींचं तोंड त्यांनी फैजलकडे वळवलं. ट्रिगर दाबणार इतक्यातचं कुठुनतरी सणसणत आलेली एक गोळी दोघांच्याही डोक्यातुन आरपार गेली.
"आय ओव यु वन बलवंत" फैजल तश्याही परिस्थितीमधे बलवंतचे आभार मानायला विसरला नाही.
"ऑफकोर्स यु डु लाईक पास्ट १०० टाईम्स", बलवंतनीही एका सेकंदाचाही विलंब न लावता त्याला उत्तल दिलं.
ह्याही परिस्थितीमधे ह्या लोकांना हास्यविनोद कसे सुचु शकतात असा प्रश्ण वीरला पडलेला होता.
"बलवंत, वी हॅव सिचुएशन अंडर कंट्रोल, लिव्ह द नेस्ट अँड जॉईन द अॅसॉल्ट" असं रेडिओवरुन म्हणत वीरनी आडोश्यामधुन बाहेर पाउल टाकलं.
एव्हाना शत्रुपक्षाचे जेमतेम १०-१२ सैनिक शिल्लक राहिलेले होते. ते आता आडोश्याला लपुन बसल्यानी त्यांना घुसुन मारण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता. त्याची नजर आता त्या अंधाराला सरावलेली होती. अगदी बारिकशी हालचालही त्याच्या नजरेमधुन सुटणं आता शक्य नव्हतं. गाड्यांचे दिवे अजुनही चालु असल्यानी आता अंधाराचा जेवढा म्हणावा तेवढा फायदा त्याला होणार नव्हता. त्याला कव्हरमधुन बाहेर आलेला बघुन दोघा पाकड्यांनी त्याच्या दिशेनी गोळ्या झाडल्या. वीरनी मात्र ती हालचाल अचुक ओळखुन स्वत:ला सगळ्यात शेवटच्या गाडीखाली झोकुन दिलं. समोरच्या गन मझल फ्लॅशला बघुन चंद्रननी तिकडे नेम धरुन आपल्या अॅसॉल्ट रायफलचा ट्रिगर दाबलेला होता. त्यातुन निघालेल्या गोळ्यां त्त्या दोन सैनिकांच्या गळ्यामधे शिरलेल्या होत्या. हातामधल्या रायफल्स टाकुन देत आपल्या गळ्यावर हात नेत ते दोघही दगडांसारखे खाली कोसळले. एक आचका देउन त्यांच्या हालचाली शांत झाल्या.
चार जण दोन क्रमांकाच्या ट्रकच्या आडोश्याला लपलेले होत. वीरला ते ट्रकखालु स्पष्ट दिसत होते. पण तो अवघड जागी सापडलेला असल्यानी त्याला रायफलमधुन गोळ्या झाडता येत नव्हत्या.
"फ्रॅग आउट" रेडिओमधे एक अस्प्ष्ट आवाज खरखरला.
बलवंतनी रॅपलिंग रोपवरुन खाली येता येताचं एका ग्रेनेडची पिन काढुन तो ग्रेनेड त्या ट्रकवर भिरकावला. त्या ग्रेनेडच्या स्फोटानी त्या ट्रकच्या चिंधड्या उडवल्या. त्याचा आडोसा घेउन लपलेलेल्यांच्या त्या स्फोटामधे चिंधड्या झाला. मागे रशिद बसलेल्या गाडीच्या काचांचा चकणाचुर उडालेला होता. रशिद घाबरुन सीटखाली डोकं घालुन बसलेला होता. आता रशिदचे दोन अंगरक्षक आणि बाहेर असणारे दोन सैनिक एवढे पाचचं जण तेवढे काय जिवंत राहिलेले होते.
ते बाहेर असणारे दोन सैनिक भितीनी गर्भगळित झालेले होते. आपल्या रायफल्स वर उचलायचंही भान त्यांना राहिलं नव्हतं. चंद्रनच्या रायफलींच्या गोळ्यांनी त्यांचा बळी घेतलेला होता.
एव्हाना बलवंतच्या मदतीने फैजल खड्ड्यामधुन बाहेर आलेला होता. एक हात आपल्या जखमेवर ठेउन त्या जखमी हातानी त्यानी आपल्या कंबरेचं १९११ ही आपली आवडती हँडगन बाहेर काढली होती. त्यानी आणि बलवंतनी दोन बाजुंनी रशिदच्या गाडीचे दरवाजे कव्हर केलेले होते. रशिदच्या अंगरक्षकांनी शेवटच्या क्षणी आपल्या एस.एम.जी. रोखायचा अयशस्वी प्रयत्न केला. फैजलच्या हँडगनमधुन निघालेल्या गोळ्यांनी दोघांचाही तो प्रयत्न फोल ठरला.
"एरिआ क्लिअर, सिक्युअर डार्क हॉर्स. चंद्रन कीप अॅन आय ऑन दिज टु" वीर ओरडला आणि त्यानी पहिल्यांदा फैजलकडे धाव घेतली. कळवळलेल्या फैजलला मॉर्फिनचा एक डोस दिला. फैजलच्या अंगामधे भिनणारी वेदना हळुहळु कमी होतं गेली. गेली काही मिनिटं गोळ्यांच्या आवाजांनी दणदणुन गेलेला तो भाग आता परत शांत झालेला होता. रातकिड्यांचे आवाज परत एकदा घुमायला लागलेले होते.
वीरनी गाडीचा दरवाजा उघडला. आणि रशिदला खेचुन बाहेर काढलं. आणि पुढचा मागचा काहीएक विचार नं करता त्याच्या सणसणुन कानाखाली भडकवली. रशिदच्या डोळ्यासमोर तारे चमकले. त्याचे ओठ फाटुन रक्तं यायला सुरुवात झाली. तो काही बोलणार एवढ्यात त्याच्या मानेवर बंदुकिचा दस्ता बसला आणि तो बेशुद्ध झाला. त्याचे हात मागे पिरगाळुन त्याच्या हातामधे बेड्या अडकवल्या गेल्या. त्याचे खिसे तपासुन त्यामधुन भारतामधे पाठवण्यात येणार्या गोष्टींची यादी तो पहायला लागला. तो सगळ्यात शेवटचा ट्रक मृत्युने ठासुन भरलेला होता. तो भारतामधे पोचला असता तर किती निरपराध लोकं त्याला बळी पडली असती ह्याची फक्त कल्पनाचं तो करु शकत होता.
"विचर टु ओव्हरलॉर्ड, पॅकेज सिक्युअर्ड. वी आर रेडि टु एक्स्ट्रॅक्ट. वी नीड मेडिक्स फॉर द वुंडेड सोल्जर", वीरनी हेडक्वार्टर्सशी परत संपर्क प्रस्थापित केला.
हेडक्वार्टर्समधे बसलेल्या सगळ्यांचे चेहेरे आनंदानी उजळले.
मृत्युंजयांनी रेडिओकडे झेप घेतली आणि ते म्हणाले,
"यु.एस. एडिंग अस विथ एक्स्ट्रॅक्शन ब्लॅक हॉक्स. स्टँड बाय फॉर कपल ऑफ मिनीट्स अँड सिक्युअर द कार्गो ट्र्क. रिमेंबर नो लुज एंड्स कॅप्टन"
त्याबरोबर बांधलेल्या रशिदला घेउन त्यांनी सगळ्यात मागच्या ट्रकचा कार्गो होल्ड उघडला. आतल्या विध्वंसक सामानाची तपासणी सुरु केली. आतल्या वस्तु बघुन ते साक्षात हादरलेले होते. काही क्षण गेले असतील नसतील तोपर्यंत यु.एस.एम.सी. ची दोन ब्लॅक हॉक्स त्यांच्या डोक्यावर घरघरायला लागली.
चंद्रन नी फ्लेअरगन झाडली आणि हेलिकॉप्टर्स त्यांच्या दिशेनी याय्ला सुरुवात झाली.
"ओव्हरलॉर्ड, वी आर लिफ्टिंग द डार्क हॉर्स अँड रिटर्निंग टु द बेस" वीर रेडिओवरुन उद्गारला. आणि ट्रकमधुन बाहेर यायसाठी तो उलटा वळाला. ट्रकला लागुनचं जखमी ले.फैजलला बसवण्यात आलेलं होतं. वीर जेमतेम दोन पावलं चालला नसेल तोपर्यंत त्याच्या कानाला अस्पष्ट असा बीपचा आवाज आला.
आवाजाच्या दिशेनी असलेल्या एका खोक्यावरती त्याला काही आकडे बदलताना दिसले. ते आकडे कसले आहेत हे त्याच्या ताबडतोब लक्षात आलं.
"ओव्हरलॉर्ड द कार्गो इझ डर्टी. वी आर रिलोकेटिंग असं म्हणुन त्यानी ट्रकमधुन बाहेर उडी मारायसाठी पवित्रा घेतला. एवढ्यामधे त्या घड्याळामधला शेवटचा आकडा बदलला गेला. ट्रकमधे असणारा तो शक्तीशाली बाँब एखाद्या ज्वालामुखीप्रमाणे फुटला. एका क्षणामधे हाउंडस युनिटच्या चिंध्या झालेल्या होत्या. काही मिनिटांपुर्वीचे ते विजयी योद्धे परदेशामधल्या मातीमधे मिळालेले होते.
ही बातमी पुढच्या काही तासांमधे मेजर अविनाशला कळवली गेली होती. रागानी पेटुन उठलेला अविनाश बघुन मृत्युंजय शहारले होते. आता शत्रुंचा वेदनामयी मृत्यु अटळ होता. त्याचा संताप किती जणांची राखरांगोळी करणार होता हे येणारा काळ ठरवणार होता. अविनाशमधल्या विध्वंसाला जागं करुन शत्रुनी वाईट चुक केलेली होती.
(क्रमशः)
(कॉपीराईटेड-लेखकाच्या पुर्वपरवानगीशिवाय इतरत्र छापु नये)
प्रतिक्रिया
6 Jul 2015 - 12:52 am | एक एकटा एकटाच
जबरदस्त सुरुवात
6 Jul 2015 - 1:22 am | विनोद१८
असेच लिहा.
धन्यवाद.
6 Jul 2015 - 1:39 am | वॉल्टर व्हाईट
आम्हा वाचकांना मेजवानी आहे.
6 Jul 2015 - 3:52 am | अरवीन्द नरहर जोशि.
ठरविक साच्याबाहेर नाहि.
6 Jul 2015 - 4:35 am | यशोधरा
उगाच मारुन टाकलंत हाऊंड्स युनिटला..
6 Jul 2015 - 7:03 am | डॉन व्हिटो कॉर्लिऑन
सर्वांचे आभार. विनोदजींचे १८ वेळा आभार. :)!!
6 Jul 2015 - 8:32 am | फोटोग्राफर243
उत्तम, स्पार्टाक स परत आले आहेत की काय असे वाटले क्षणभर
6 Jul 2015 - 8:56 am | उगा काहितरीच
झकास... (शहरयार खान, त्यागी ही नावं कुठेतरी वाचाल्यासारखी वाटत आहेत, पण कथानक नवीन आणि छान वाटत आहे ,सो पुभाप्र )
6 Jul 2015 - 4:25 pm | कपिलमुनी
पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड चे अध्यक्ष होते
6 Jul 2015 - 10:10 am | विशाल कुलकर्णी
शॉल्लेट ! जबरा सुरुवात झाली आहे. पुभाप्र !
6 Jul 2015 - 12:09 pm | झकासराव
जबरी डिटेलिन्ग :)
6 Jul 2015 - 12:49 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं सुरुवात. पुभाप्र.
6 Jul 2015 - 12:54 pm | नन्दादीप
अविनाश हे पात्र कुठे तरी वाचल्यासारखे वाटते आहे.....
असो...पु.भा.प्र...
6 Jul 2015 - 1:01 pm | महासंग्राम
मिपा वर असलेल्या युद्धकथाचे अजून धागे मिळू शकतील का
6 Jul 2015 - 1:29 pm | मीचतो
हे सगऴ मायबोली वर २-३ वर्षा पुर्वी येउन गेले आहे.
6 Jul 2015 - 3:54 pm | डॉन व्हिटो कॉर्लिऑन
मी हि कथा लिहाय्ला २ आठवड्यापुर्वी सुरुवात केलेली आहे. त्यामुळे हे लेखन मायबोलीवर असणं शक्य नाही. मी मायबोलीवर लिहित नाही.
6 Jul 2015 - 2:37 pm | नाखु
जुने असेलही पण मिपाकरांसाठी नवीन आहे (आणि वेगळे आहे)
पुलेप्र.
होचहो
नाखु
6 Jul 2015 - 2:52 pm | टवाळ कार्टा
:)
6 Jul 2015 - 3:43 pm | मृत्युन्जय
वाचतोय. येउ द्यात अजुन. पुभाप्र
6 Jul 2015 - 7:21 pm | कैलासवासी सोन्याबापु
अतिशय उत्तम वर्णन! अतिशय चांगले एफर्ट!! खुप खुप शुभेच्छा!! खुप खुप लिहिते व्हा
6 Jul 2015 - 7:24 pm | टवाळ कार्टा
बेबीची आठवण आली
26 Oct 2015 - 11:33 am | फोटोग्राफर243
पुढे काय झाले?
26 Oct 2015 - 12:23 pm | तुषार काळभोर
ओ डॉन्राव.. कुटं गायबलं म्हाणायचं?
26 Oct 2015 - 2:10 pm | नया है वह
आवडले.
पुलेप्र
26 Oct 2015 - 6:54 pm | आरोह
खुदा हाफिज बरोबर कि अल्लाह हाफिज बरोबर कि फक्त पाकिस्तानी मुसलमान अल्लाह हाफिज म्हणतात?
26 Oct 2015 - 6:54 pm | आरोह
खुदा हाफिज बरोबर कि अल्लाह हाफिज बरोबर कि फक्त पाकिस्तानी मुसलमान अल्लाह हाफिज म्हणतात?
26 Oct 2015 - 6:54 pm | आरोह
खुदा हाफिज बरोबर कि अल्लाह हाफिज बरोबर कि फक्त पाकिस्तानी मुसलमान अल्लाह हाफिज म्हणतात?
26 Oct 2015 - 6:54 pm | आरोह
खुदा हाफिज बरोबर कि अल्लाह हाफिज बरोबर कि फक्त पाकिस्तानी मुसलमान अल्लाह हाफिज म्हणतात?
26 Oct 2015 - 6:55 pm | आरोह
खुदा हाफिज बरोबर कि अल्लाह हाफिज बरोबर कि फक्त पाकिस्तानी मुसलमान अल्लाह हाफिज म्हणतात?
1 Mar 2016 - 5:03 pm | अत्रन्गि पाउस
पुढे काय झाले याचे?