“मिपा वाचकांनो थोडीतरी खाज बाळगा!

नाखु's picture
नाखु in जनातलं, मनातलं
30 Jun 2015 - 10:37 am

नेतागिरी नेते मा. यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदारचा उदय होण्यापूर्वी म्हणजे १८ जुलै १९७६ पूर्वी नेता पित्त्यांची संघटनाच अस्तित्वात नव्हती. "कुत्र्याची शेपटी सरळ होईल पण नेता पित्त्यांची संघटना होणार नाही" असे त्या काळी म्हटले जायचे. पण या राष्ट्रीय धुरंधर नेत्याने गाव-गुंड पुंडांच्या पाठीवर हात ठेवला आणि चमत्कार झाला. हजारो वर्षापासूनचा कायद्याला घाबरणारा नेता समाज गावात सोडलेल्या बेफाम वळूसारखा उधळू लागला. नुसताच उधळू लागला नाही तर साध्या पोलिसाला भिणारा नेता चक्क मूठ आवळून त्यालाच दिमतीला बोलावू लागला. विधायक विचारवंतांशी दोन हात करायला सज्ज झाला. जाणत्या राजाने, गल्ली नेत्याला त्याच्या गरिबीचे आणि दारिद्र्याचे मूळ कारण सांगितले. नेतागिरीत गरिबी आहे याचे कारण नेतागिरीत राजकारण हे लोकांची सेवा करण्यासाठी आहे, हेही शिकविले जाते त्यामुळे.

जोपर्यंत पुढारीपण उत्पादन खर्चावर किमान दहापट जास्त भाव मिळत नाही तोपर्यंत पुढारीपण व्यवसायाला बरकत येऊच शकत नाही. मग तुम्ही उपजत नेता असा, जातीय नेता असा, कमी खर्चाची नेतागिरी करा, जास्त खर्चाची नेतागिरी करा, पारंपरिक नेतागिरी करा किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून नेतागिरी करा. नेतागिरी कशीही करा; जोपर्यंत शासनाचे नेतागिरीविरोधी धोरण बदलत नाही तो पर्यंत नेता बगल बच्च्यांचे मरण अटळ आहे. काळजीवाहू नेतागिरी केली तर बिनपाण्याने हजामत होते आणि प्रेषीतांची नेतागिरी केली तर पाणी लावून हजामत होते, या पलीकडे फारसा काहीही फरक पडत नाही.

नेतागिरीचा उत्पादन खर्च भरून पुढील ४-५ पिढ्यांची सोय होईल एवढे मिळायला पाहिजे, हे सर्वांनाच मान्य आहे. तसे कोणीच नाकारतही नाही पण; कृती मात्र हमखास उलटी करतात. कुणी अज्ञानापोटी करतो तर कुणी जाणूनबुजून करतो. कुणी स्वत:ला सुधारणावादी म्हणवून घेत असले तरी नेतागिरीच्या अर्थशास्त्राच्या बाबतीत बहुतांशी तज्ज्ञ निव्वळ अज्ञानीच असतात, असे थेट विधान केले तरी ते फारसे चुकीचे ठरणार नाही.

शिवाय या समाजातल्या सुधारणा करणार्या तज्ज्ञामध्ये आपसात एकजिनसीपणा नाही. प्रत्येकाचे तोंड वेगळ्या दिशेला आहे. उठसूठ ज्याला जसे वाटते तसे सांगत सुटतो. कुणालाच खोलवर जाऊन विषयाचा पडताळा घ्यावासा वाटत नाही. कुणी म्हणतो विधायक राजकारण करा, कुणी म्हणतो झिरो बजेट नेतागिरी करा, कुणी म्हणतो सुसंवाद करायला शिका तर कुणी म्हणतो कार्यकर्ता प्रशिक्षण केंद्र उभारा. आता तर काही लोकं मानवी मूल्य आचरण्याचा सल्ला द्यायला लागलेत. ज्याला जसे वाटते तसेतसे बोलत राहतात. बोलायला माझी हरकत नाही. तोंड त्यांचे आहे व जीभही त्यांचीच आहे पण बोलघेवड्या नेतागिरीला भाव द्या म्हटलं तर यांची दातखिळी का बसते? हा प्रश्न शिल्लक राहतोच आणि इथेच खरी ग्यानबाची मेख आहे.
विधायक राजकारण म्हणजे काय? आमचे बाप-आजे विधायक राजकारणच तर करत होते. जाती जमातीचे द्वेषमूलक बगल बच्च्यांचे ब्रिगेडी हत्यार वापरत नव्हते, फ्लेक्स बाजी फवारत नव्हते, संधीसाधू निर्ल्लज तडजोडी करत नव्हते आणि घरी संस्कार शिक्षण असल्याने संस्कार शिक्षण आचरणातून आणि अनुभवातून होत होते आणि तरीही देशाची लोकसंख्या कमी असूनही नेत्याच्या पुढच्या पिढीला जावू द्या; त्या नेत्यालाच पोटभर खायला मिळत नव्हते. मतदारसंघांच्या वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या, वर्णी महामंडळांची व्यवस्था निर्माण झाली, वाटणीसाठी सरकारी विभागीय सोयीनुरूप उपद्रव केंद्रे निर्माण झाली आणि चमत्कार झाला. भ्रष्टाचाराच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण झाला. नेतागिरीचे उत्पन्न व संपत्ती वाढण्यात परमीट राज व अनियंत्रीत अधिकार यांनी मोलाची भूमिका बजावली. आजही जर परमीट राज व अनियंत्रीत अधिकार+ कोते राजकारण याचा सढळ वापर थांबवला तर देशाचे नेत्यांचे उत्पादन ७० ते ८० टक्क्यांनी घटेल, अशी परिस्थिती आहे. विधायक राजकारणचा सल्ला देणार्यांनो, मुंह खोलनेसे पहले कुछ तो शर्म करो!

अनेकदा नेत्यांनी विधायक भरीव काम करायला शिकावे, असा सल्ला घाऊकपणे दिला जातो. आता या उपटसुंभांना कोणी सांगावे की, कोणत्याही व्यवसायाचे उत्पादन आणि संवर्धन हे दोन स्वतंत्र भाग असतात. नेतागिरीमध्ये सुद्धा जो नेता बसून बढाया मारतो तोच पुढारी असतो असतो. पुढारीपण+नेतागिरी हा पूर्णपणे पूर्णवेळ करायचा व्यवसाय आहे. नेतागिरी करताना वेळेची इतकी बचत होत नाही की त्याने जोडीला समाजसुधारणेचा किंवा समाजसेवे सदृश अन्य आतबट्ट्याचा व्यवसाय करावा. आजवर अनेकांनी असे चिक्कार प्रयोग केले आहे पण “तेलही गेले, तूपही गेले; हाती धुपाटणे आले” अशीच त्यांची गत झाली, असे इतिहासच सांगतो. याउलट जो नेतागिरी सोडून केवळ समाजसेवेमध्ये गेला त्याने चांगल्यापैकी बस्तान बसवले, असेही इतिहासच सांगतो. जो नेता सहकार क्षेत्र सुधारणा,समाजसेवा जातीनिर्मूलन करायला लागतो तो अल्पावधीतच समाजसुधारक्,सहकार महर्षी किंवा परीवर्तन्वादी होतो; नेता म्हणून त्याचे अस्तित्व संपुष्टात येते. तरीही नेतागिरीकामातून अतिरिक्त वेळ मिळाला तर किरकोळ समाजसेवा करणे, पुढार्‍याला वावगे नाही. गेल्या २-३ दशकांपासून नेता शक्य होईल तसे अति किरकोळ विधायक काम करतच आला आहे. पूर्वी दहा-वीस गावाच्या परिघात एका मुख्य गावी बसथांबा असायचा. तिथे नेता आप्लया आज्या पणज्याचे नावे पानपोई टाकायचा, एखादा बसथांब्याला शेड उभारून द्यायचा . ही नेता पुढार्याची सेवाच होती ना? आप्लयाला मिळालेला अतिरिक्त पैसा अन्य गरजेच्या बाबी (रस्ता सोडून) खर्च करणे, पुढार्‍याच्या अंगवळणीच पडले आहे. अगदी पौराणिक काळातला जरी विचार केला तरी गौळणी मथुरेच्या बाजारी दही-दूध-लोणी विकायला घेऊन जायच्याच ना? तेव्हाही कृष्णाला त्याचा वाटा हिस्सा द्यायच्याच ना ? मग नेत्याचा मलिदा म्हणजे यापेक्षा वेगळं काय असते? आणि तरीही बरेचशे उपटसुंभ तज्ज्ञ नेत्यांनी जणू काही फार मोलाचा आणि क्रांतीकारी मूलमंत्र सांगतो आहोत, अशा थाटामाटात विधायक काम सारखा बोजड शब्द वापरून शेती-पुढार्‍याला सल्ले द्यायला उतावीळ असतात.
आमचे मिपावरचे विचार तज्ज्ञ वैचारिक पातळीवर खुजे असल्याने त्यांना हे कळत नाही. त्यामुळे ते नेत्यांना,पुढार्यांना दोष देत फ़िरत असतात. नवनवीन संकल्पना तंत्रज्ञान याचा लाभ खर्या गरजवंताला दिला जात नाही नाही असा “वड्याचे तेल वांग्यावर काढणारा” राग आळवत बसतात. धोरणे आखताना चक्क नेतागिरी विरोधी आखायची आणि वरून पुन्हा लाभार्थींनी आत्मपरीक्षण,स्वावलंबन केले पाहिजे असे सल्ले देत फिरायचे हा चक्क वाह्यातपणा आहे.

मी विधायक राजकारण, कमी खर्चा चे राजकारण, पारंपरिक राजकारण, केंद्रीय राजकारण वगैरे कोणत्याही राजकारणपद्धतीच्या विरोधात अजिबात नाही, याउलट नेत्यांसमोर राजकारण पद्धतीचे अनेक पर्याय उपलब्ध असले पाहिजे, या मताचा आहे. नेत्याला जे सोयीचे वाटेल, त्याच्या स्वगंडाला कुरवाळणारे असेल तसे तो स्वीकारेल. हा त्याच्या व्यवसाय स्वातंत्र्याचा भाग म्हणून मान्य केले पाहिजे. पण होते असे काही मंडळी स्वत:ला ब्रम्हदेवाचा अवतार समजून किंवा ऋषी-महाऋषी भासवून आम्ही सांगतो तसे केले तर तुझ्या राजकारणत समाजसेवेचे आणि साधन शुचीतेचे उत्पन्न येईल आणि तू हजारो पिडीतांच्या आशीर्वादाचा धनी होशील, अशी बतावणी करून सगळ्या माध्यमातून पुन्हा नेता पित्त्यांची चंपीच करून जातात. नेता आहे तिथेच राहतो आणि यांची दुकानदारी मात्र “दिवसा दुप्पट आणि रात्रीची तिप्पट” या वेगाने बहरत जाते. त्यालाही माझा आक्षेप नाही मात्र सहकार क्षेत्रातील राजकारण्यांची घूसखोरी आणि बाजार समीतीतील राजकीय गुंडाची कीड याबद्दल हे जाब विचारतात , यावर माझा आक्षेप आहे.

नेता हा मुळातच उत्पादक आहे. अनुयायी वाढीसाठी प्रयत्न करणे त्याच्या रक्तामांसातच भिनले आहे. सोबत पिढोनपिढ्यांकडून चालत आलेला वारसा आहे आणि बालपणापासूनच राजकारण कसे करायचे याचा त्याला अनुभव आहे. तरीही त्याला पावलोपावली सल्ले देण्याची आवश्यकता आहे का, हेही तपासणे आवश्यक आहे. माहीती अधिकार कायदा आला तेव्हा विचार तज्ज्ञ यांचे म्हणणे असे होते की, देशभरात भ्रष्टाचार संपुष्टात येईल वीस-पंचेविस वर्षे लागतील. प्रत्यक्षात दोन ते तीन वर्षातच देशभर माहीती अधिकार कायदा आणि इतर सेवा हमी काय्द्याचा प्रसार झाला. त्यासाठी आम्ही काहीच प्रयत्न करायची गरज पडली नाही. चांगलं विधायक असेल ते ते अंगिकारण्याची क्षमता जनतेला निसर्गानेच दिलेली आहे.

राजकारण कसे करावे , हे नेत्यांना पुढार्यांना सांगायची गरजच नाही. फक्त पीडीतांच्या जीवनाचे भाव ठरवणे त्याच्या हातात नाही म्हणून राजकारण तोट्यात जात आहे. राजकारणत सुबत्ता येऊन "भुजबळ संस्थाने" निर्माण करायची असेल तर सर्व नेतागिरी हितचिंतकांनी “नेतागिरीचा उत्पादन खर्च भरून पुढील ४-५ पिढ्यांची सोय होईल इतकेतरी” मिळण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत वारंवार मिपा वाचन पातळीवरून जो अडथळा निर्माण करण्यात येतो त्याला थोपवून धरणे गरजेचे आहे. राजकारणसाठी अनुकूल आणि पूरक धोरणे जर मिपाकर+सरकार राबवू शकत नसेल तर राजकारणमध्ये निष्कारण होणारी जनतेची लुडबुड थांबविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

ताणुंधर सुटे.

बालकथासमाजप्रतिक्रियासमीक्षाविरंगुळा

प्रतिक्रिया

कुठल्या वर्तमानपत्रात छापलात हा लेख?

मुक्त विहारि's picture

30 Jun 2015 - 11:06 am | मुक्त विहारि

"मिपा"च्या व्यासपीठा सारखे उत्तम व्यास-पीठ नाही.

यशोधरा's picture

30 Jun 2015 - 11:14 am | यशोधरा

ते झालेच हो मुविकाका, पण शेम टू शेम नको का व्हायला?

पैसा's picture

30 Jun 2015 - 10:54 am | पैसा

:)

जय आर्म स्ट्राँग जय पॉवरमती !

जाता जाता :- शेतकर्‍यांनी शेती बरोबर फुले विकण्याचा जोड धंदा सुरु करावा. फुले विकता विकता... असो... ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chittiyaan Kalaiyaan... :- Roy

टवाळ कार्टा's picture

30 Jun 2015 - 11:22 am | टवाळ कार्टा

:)

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jun 2015 - 11:22 am | डॉ सुहास म्हात्रे

=))

))))राजकारणसाठी अनुकूल आणि पूरक धोरणे जर मिपाकर सरकार राबवू शकत नसेल तर राजकारणमध्ये निष्कारण होणारी जनतेची लुडबुड थांबविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.)))
-???

प्रचेतस's picture

1 Jul 2015 - 8:54 am | प्रचेतस

खी खी खी. =))

श्रीरंग_जोशी's picture

1 Jul 2015 - 9:15 am | श्रीरंग_जोशी

क विडंबन, क विडंबन.

बादवे ट्याहाराष्ट्र टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या या लेखाचा दुवा द्यायला विसरलात का?

अत्रुप्त आत्मा's picture

1 Jul 2015 - 9:29 am | अत्रुप्त आत्मा

खच्चून भरला तांब्या आणि दणकुन पडली जिलबी!
खच्चून भरला तांब्या आणि दणकुन पडली जिलबी!
खेळायला जाल पुढे तर व्हाल नक्की एल्बी! ;-)

वयजूवयनींनी उखाणा घेतल्यागत वाटलं.

अत्रुप्त आत्मा's picture

1 Jul 2015 - 3:31 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/bad/cowboy-shooting-gun-smiley-emoticon.gif

बॅटमॅन's picture

1 Jul 2015 - 4:11 pm | बॅटमॅन

अगागागा =)) =)) =))

टवाळ कार्टा's picture

1 Jul 2015 - 4:54 pm | टवाळ कार्टा

आण्भव नस्ताना पॅड गुढग्याला बांधून डायरेक्ट बॅटिंग करायला गेल्यावर एब्लीडब्लू नै होणार तर काय होणार...आधी नीट नेटप्रॅक्टिस करावी की ;)

बासुंदी आणि एलबीडब्ल्यू ची आठवण झाली.

बासुंदी = बायको (म्हणून) सुंदर दिसेल.

एलबीडब्ल्यू = लांबूनच बरी वाटते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Jul 2015 - 5:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ठ्ठो!!!

जब्राट षटकार.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jul 2015 - 8:30 am | अत्रुप्त आत्मा

ठ्ठो!!! ठ्ठो!!! ठ्ठो!!!

ट्रिपल षटकार.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Jul 2015 - 7:33 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ठो ठो करण्याएवढी त्याची प्रतिक्रिया वैट्ट नाही. ;)!!!

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jul 2015 - 12:20 am | अत्रुप्त आत्मा

दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू दू :-\

आनंदी गोपाळ's picture

1 Jul 2015 - 9:39 am | आनंदी गोपाळ

प्रूफरीडिंगमधे, गौळणींच्या मलिद्याखाली जुन्याच लेखातला शब्द राहिलाय.

माहिती अधिकाराचा परिच्छेद थोडा सेल्फ काँट्राडिक्टरी वाटला.

बाकी ठीक. दहापैकी ६ मारकं द्यायला हरकत नाही.

बॅटमॅन's picture

1 Jul 2015 - 12:20 pm | बॅटमॅन

हाण्ण तेज्यायला. =))

ताणुंधर सुटे>> =)) =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Jul 2015 - 6:55 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

अगगगगग!!! _/\_

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Jul 2015 - 6:56 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

असा लेख मिपावर आला. एक मिपाकर म्हणुन "शरम" वगैरे वाटली थोडीशी. =))

बेकार तरुण's picture

2 Jul 2015 - 4:12 pm | बेकार तरुण

आवडेश
पण एवढी प्रतिभा आणी वेळ असल्या कामांसाठी वाया घालवु नका असेहि वाटुन गेले