सायकलसंगे जुले लदाख़ भाग १- करगिल- मुलबेक- नमिकेला- बुधखारबू

मार्गी's picture
मार्गी in भटकंती
17 Jun 2015 - 5:13 pm

सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना
सर्व मिपाकर वाचकांना मन:पूर्वक धन्यवाद..

३० मेच्या सकाळी करगिलमध्ये लवकर जाग आली. लवकर तयार झालो. आज माझी पहिली परीक्षा आहे! आज लदाख़ प्रदेशात सायकलिंगची सुरुवात होईल. आजच्या दिवशीच्या स्कोअरनुसार पुढचा अंदाज येईल. आज हेही मुळात कळेल की, मी लदाख़मध्ये सायकलिंग करू सुद्धा शकतो का नाही. काल रात्रीच्या तुलनेत आत्ता मन शांत आहे. एक उत्सुकता आहे. कालपर्यंत करगिलवरून बटालिक आणि दाह ह्या रस्त्याने लेहला जाण्याचा विचार करत होतो. मागच्या वेळी बटालिकमधून जाणारा रस्ता बघितला नव्हता. आणि बटालिकच्या रस्त्याने गेल्यास पहिल्याच दिवशी सिंधू नदीचं दर्शन होण्याची शक्यता होती. पूर्वी त्या रस्त्यावर जायला परमिट लागायचं; परंतु आता लदाख़मध्ये भारतीय पर्यटकांना कोणत्याही परमिटची आवश्यकता उरलेली नसल्यामुळे इथेही परमिट लागणार नाही असं वाटलं होतं. पण करगिलमध्ये चौकशी केली तर कळालं की बहुतेक परमिट घ्यावा लागेल. कोणी स्पष्ट सांगू शकत नव्हतं. अगदी ५०- ५० अशी मतं येत होती. काही म्हणत होते की, परमिट घ्यायची काहीच गरज नाही; काही म्हणाले की कमिशनरकडून परमिट घ्या. शेवटी काल संध्याकाळच्या शंकाकुशंकांमध्ये ठरवलं की, बटालिकच्या ऐवजी मुख्य राष्ट्रीय महामार्गाने मुलबेकच्या रोखानेच पुढे जाईन.

सकाळी हॉटेलमधून बाहेर पडल्या पडल्या हलक्या पावसाने स्वागत केलं. लदाख़ प्रदेशात पाऊस? अर्थात् पाऊस अगदी भुरभुर होता. पुढे जाता आलं. काल करगिलला येताना वाटेत द्रासमध्ये ३३०० मीटर उंचीवर काही वेळ थांबलो होतो तेव्हा श्वास घेताना किंचित त्रास झाला होता. काल करगिलमध्ये रस्त्यावर चालताना किंवा चढ चढतानाही किंचित धाप लागत होती. पण सायकलिंग सुरू करताना आता काहीच अडचण येत नाही आहे. नक्कीच करगिलमध्ये रात्री थांबल्याचा फायदा झाला. आज पहिलाच दिवस आहे. आज अगदी थांबत थांबत जायचं आहे. आज मन कालच्यासारखं निराश नाहीय; पण आज चाळीस किलोमीटर दूर मुलबेकला जरी पोहचलो तरी स्वत:ला धन्य समजेन. हळु हळु पुढे गेलो. सुरू नदीने उत्साह वाढवला. पाउण तासात करगिल गावाच्या बाहेर मुख्य रस्त्यापर्यंत पोहचलो. इथे आमलेट- चहा घेतला.

करगिल युद्धाच्या वेळेस हानी झालेला पेट्रोलपंप दिसला. रस्ता इथून थोडा वर जातो. सायकल चालवताना काहीच अडचण आली नाही. एक अडचण नक्की आली- सामान योग्य प्रकारे बांधण्यामध्ये. जर ह्यापूर्वी सायकलवर मोठा प्रवास केला असता तर सामान बांधण्याची सवय झाली असती. असो. थकव्याऐवजी सामान नीट लावण्यासाठी मध्ये मध्ये थांबावं लागत आहे. पण अहाहा! काय नजारा आहे! खरोखर विश्वास बसत नाहीय की, मी "इथे" सायकल चालवतो आहे... पहिल्या दोन तासांमध्येच बारा किलोमीटर झाले! आता पहिला चढसुद्धा संपला. आता इथून मुलबेकपर्यंत शक्यतो समतल रस्ताच आहे. एकापाठोपाठ एक वळणं येत आहेत. छोटे छोटे डोंगर येऊन मागे जात आहेत. मध्ये मध्ये थोडी वस्तीसुद्धा आहे.

आता खरोखर मी दुपारपर्यंत मुलबेकला पोहचू शकतो. क्या बात है! मध्ये एका पॅचमध्ये रस्ता थोडा कच्चा आहे. पण एकंदरित रस्ता उत्तमच आहे. सुरुवातीला लागलेल्या पावसानंतर पाऊस नाही लागला. पण पुढे परत एका ठिकाणी पाऊस लागला. योगायोगाने तिथे एक टी स्टॉलसुद्धा होता. सायकलसाठी शेल्टरसुद्धा मिळालं. पाऊस, थंडी, लदाख़ आणि त्यात चहाचा आस्वाद! लवकरच पाऊस थांबला. पुढे निघालो. रस्त्यामधून जाणारे बाईकर्स बेस्ट लक देत आहेत तर कधी हाताने सॅल्युटसुद्धा करत आहेत!

मुलबेक! ह्या ठिकाणापासून पुढे बौद्ध प्रभाव अगदी स्पष्ट दिसत जातो. इथूनच जुले जुले म्हणजेच हॅलो / नमस्ते सुरू झालं! लदाख़ी माने दिसत आहेत. भगवान बुद्धांनी म्हंटलं होतं की, भविष्यात एक बुद्ध असा येईल जो मैत्रेय म्हणजे मित्र स्वरूपातला असेल. ही विशाल मूर्ती त्याच मैत्रेय बुद्धाचं प्रतिक आहे. इथे बाईकर्सनी खूप कौतुक केलं; फोटोसुद्धा घेतले. काहींनी सायकल चालवून बघितली. तिथून कशी तरी सुटका करून पुढे निघालो. हॉटेल अजून दिसत नाही आहे. मुलबेक गावामधल्या मुलांनीही थांबवण्याचा प्रयत्न केला. ते काही अंतर मागेही आले. मागच्या वेळेस मी जेव्हा आलो होतो, तेव्हा मुलबेकनंतर एका ठिकाणी नेपाळी हॉटेलमध्ये जेवण केलं होतं. पुढे वाखा गावात तेच हॉटेल दिसलं. इथे भरपेट जेवलो. आलू पराठे आणि भाजी- वरण. करगिलपासून ४४ किलोमीटर झाले आहेत आणि अजून दुपारचे दोनही वाजलेले नाहीत! एकदम ऊर्जा आली! एकदा वाटलं की, आता इथेच थांबूया. पण विचार केला की, अजूनही खूप वेळ आहे आणि फार थकवा आलेला नाहीय. म्हणून पुढे निघायचं ठरवलं. पुढे लगेच नमिकेलाचा घाट सुरू होणार आहे. पुढचं गाव त्यानंतरच येईल आणि मुक्काम करण्याची जागासुद्धा त्याच्या पुढेच मिळेल. पण अजून खूप वेळ हातात आहे. नमिकेला जरी पायी पायी चढावा लागलं तरीसुद्धा सहज पार होईल. आणि संध्याकाळी आठ वाजेपर्यंत प्रकाश असेल.

वाखापासून पुढे लगेचच नमिकेला घाट सुरू झाला. लदाख़ी भाषेमध्ये "ला" म्हणजे घाट. नमिकेला, झोजिला, फोतुला हे सर्व "ला" म्हणजे घाट आहेत. लदाख शब्द सुद्धा ला- दाख म्हणजे घाटांचा प्रदेश अशा अर्थाचा आहे. पहिले पाच किलोमीटर सायकल चालवली पण जेव्हा नमिकेला नऊ किलोमीटर होता; तिथून पुढे पायी पायी जावं लागलं. आणि तेच योग्य होतं कारण चढाच्या रस्त्यावर जास्त ऊर्जा खर्च करण्यापेक्षा ऊर्जा राखून ठेवलेली चांगली. इथे सहज पार झालो तर हीच ऊर्जा दिवस संपताना वापरता येईल. रस्त्यावरून जाणारे लोक हात दाखवून प्रोत्साहन देत आहेत. मोबाईलमध्ये गाणी सुरू केली. मी आता चक्क ३५०० मीटरहून अधिक उंचीवर जातो आहे! आनंद मनात मावत नाहीय! चढत असल्यामुळे थोड्या थोड्या वेळाने थांबावं लागत आहे. सुरुवातीला सावली बघून थांबत होतो. पण जशी उंची वाढत गेली, तसं वातावरण थंड होत गेलं. आता तर सावलीत थांबायच्या ऐवजी उन्हात थांबावं लागत आहे! जेव्हा नमिकेला तीन किलोमीटर होता, तेव्हा रस्ता समतल झाला. खालच्या ग्राफमध्ये बघता येईल. तिथून वरून येणार्‍या हवेनेसुद्धा साथ दिली आणि मग पुढे सायकलवर बसूनच निघालो. काही वेळातच नमिकेला टॉपवर पोहचलो. तिथे थोडा वेळ थांबून पुढे निघालो.

आता उतरताना आणखी मजा आहे! उतरणंही सोपं नाही. पेडल मारावे लागणार नाहीत; पण ब्रेक्स खूप काळजीपूर्वक वापरावे लागतील. मध्ये मध्ये ब्रेक्सना ब्रेकसुद्धा द्यावा लागेल नाही तर ते गरम होतील आणि नाराज होतील. तरीही सहजपणे उतरत गेलो. कुठेही इतका तीव्र उतार नव्हता की, पायी पायी उतरावं लागेल. मध्ये मध्ये थांबत उतार पार केला. आता संध्याकाळचे सहा वाजत आहेत. आता मुक्कामाच्या जागेचा शोध. पहिलं लागलेलं गाव अगदी छोटं होतं. पुढे बटालिकच्या रस्त्याकडून येणारा एक रस्ताही लागला. पण अजून हॉटेल किंवा गाव आलं नाही आहे. आता थकवा जाणवतो आहे. भूक फारशी लागलेली नाही पण आता सामान्य चढसुद्धा अवघड वाटतोय. पुढे तर अशा चढावरसुद्धा पायी पायी चालावं लागलं. एनर्जी बार/ चॉकलेट व ओआरएस जवळ असूनही मी घेतले नाहीत. कदाचित त्यामुळेच आता सामान्य चढसुद्धा कठिण जातोय. पण आता बुधखारबू जवळच आहे. सात वाजले आहेत, पण अंधार होण्यापूर्वी तिथे पोहचेन.

बुधखारबूमध्ये घरं तर दिसली पण हॉटेल नाही दिसलं. गोंपा आणि गेस्ट हाउससुद्धा आहेत पण बंद आहेत. लोकांनी सांगितलं की, अजून पुढे हॉटेल मिळेल. पायांना ओढत ओढत पुढे नेलं. आत्तापर्यंत नक्कीच सत्तर किलोमीटर तरी झाले असले पाहिजेत! पहिल्याच दिवशी सत्तर किलोमीटर!! सकाळी तर मुलबेकला पोहचलो तरी मला लॉटरी मिळाल्यासारखं वाटत होतं. आता तर त्याच्या बरंच पुढे आलो आहे. हा उत्साह मनात असूनही दिवसाचे शेवटचे किलोमीटर सोपे गेले नाहीत. बुधखारबू गावसुद्धा हळु हळु मागे पडत जातं आहे. आता कुठे हॉटेल मिळणार? इथे तर सगळा मिलिटरी टीसीपी- ट्रान्झिट कँप परिसर आहे. इथे हॉटेल मिळणं कठिणच आहे.. पुढे एक मिलिटरी कॅफे दिसला. तिथे लिहिलं आहे- सिव्हिलिएन्स आर वेलकम! तिथे जाऊन चौकशी केली. आधी त्यांनी माझी चौकशी केली की मी कोण, कुठून, कुठे जातोय. सायकलवर? करगिलपासून? ओह हो! ते खूप चकीत झाले. योगायोगाने तो कॅफेटेरिया मराठी जवान चालवत होते. त्यांनी लगेच सांगितलं, काळजी करू नकोस. आम्ही तुझी व्यवस्था करतो. मी म्हणालो की, माझ्याकडे स्लीपिंग बॅग आहे; मला फक्त एखाद्या हॉटेलात थोडी जागा मिळेल का. त्यावर ते म्हणाले, तू आमच्यासोबतच थांब. आज आमचाच गेस्ट बन. त्या जवानांचे वरिष्ठ अधिकारीसुद्धा तिथेच होते. त्यांनी लगेच बोलणं केलं. “करगिल से साईकिल पर" शब्द प्रभावी ठरले आणि लवकरच मला सेनेच्या जवानांसोबत थांबण्याची संधी मिळाली...

खरोखर आजचा दिवस आश्चर्याचे असंख्य धक्के देतोय! नशीब कोणाला कुठे घेऊन जाईल सांगता येत नाही! सेनेच्या जवानांसोबत पूर्वी अनेकदा भेटीगाठी झाल्या होत्या; रिलिफ कामाच्या वेळी सोबत कामही केलं होतं. पण आज त्यांच्याच टीसीपीमध्ये; त्यांच्याच बराकीमध्ये थांबण्याची संधी! सोन्याहून पिवळं! लवकरच जवान मला त्यांच्या बराकीमध्ये घेऊन गेले. त्यांनी म्हंटलं की, आम्ही कँपच्या एका बाजूला जातानासुद्धा कधीच एकटे जात नाही; कमीत कमी दोघं तरी जातो आणि तू एकटाच कसा आलास! मला महाराष्ट्रातल्या मेजर, लेफ्टनंट अशा अधिका-यांच्या बराकीत जागा दिली. माझं गाव परभणी. एक मेजर त्याच जिल्ह्यातला होता. मग तर काय! तेसुद्धा खुश आणि मी आधीच आनंदाने बेभान! खरोखर जीवन कोणाला कुठे नेईल सांगता येत नाही! पहिल्यांदाच आतून मिलिटरी कँप बघतोय. त्यांची राहणी; त्यांची जीवनशैली जवळून बघता येते आहे.

अशा प्रवासामध्ये फिरण्याबरोबरच अशी संधीही मिळते जेव्हा आपण लोकांना आणि निसर्गाला एका वेगळ्याच प्रकारे भेटू शकतो. अशी परिस्थिती तयार होते ज्यामध्ये सामान्यत: न होणा-या गोष्टी घडतात. वेगळ्या भेटी होतात. ही संध्याकाळही अशीच विलक्षण आहे. खरोखर पहिला दिवस स्वप्नवत् आहे. मी खरोखर लदाख़मध्ये सत्तर किलोमीटर सायकल चालवली आहे...? ..आणि काय खरोखर मी मिलिटरीच्या सैनिकांसोबत आहे? “कन्धों से मिलते है कन्धे कदमों से कदम मिलते हैं.." पहिल्याच दिवशी खरं झालं आहे, खरोखर?


सुरू नदीच्या सोबतीने सायकलिंग सुरू


करगिलमधील गुरुद्वाराचा बोर्ड


करगिल युद्धाची खूण


नदी आणि वर येणारा रस्ता


शौर्याची अशी अगणित स्मृतीचिन्हं जम्मू - काश्मीर - लदाख़मध्ये आहेत..


मैत्रेय बुद्ध


नमिकेला घाटाचा चढ


नमिकेला घाट सुमारे ३८०० मी.


आजच्या सायकलिंगचा लेखाजोखा - करगिल - बुधखारबू सुमारे ७१ किमी आणि सुमारे १९०० मी. चढ व १००० मी. उतार

पुढील भाग: सायकलवर जुले लदाख़ भाग २- बुधखारबू - फोतुला - लामायुरु - खालत्सी - नुरला

मूळ हिंदीमधील ब्लॉग:
साईकिल पर जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना

साईकिल पर जुले लदाख़ भाग १- करगिल- मुलबेक- नमिकेला- बुधखारबू

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

17 Jun 2015 - 5:29 pm | मुक्त विहारि

पुभाप्र.

प्रतिसाद काय देणार?

आम्ही फक्त डोंबोली ते खिडकाळी मंदिर, इथ पर्यंतच सायकल चालवायचो.

टीपीके's picture

17 Jun 2015 - 6:11 pm | टीपीके

आम्ही शिळफटा पर्यंत

मार्गी
सुंदर प्रवास आणि फोटो, पुलेशु

पद्मावति's picture

17 Jun 2015 - 5:34 pm | पद्मावति

“कन्धों से मिलते है कन्धे कदमों से कदम मिलते हैं.." ..क्या बात है! अनोखा अनुभव.

वाचतोय... पुढील भागाच्या प्रतिक्षेत..

सायकल चालवताना ती सॅक नेहमी पाठीवर वागवलीत का..?
ग्लोव्हस वापरले का?
शुज कोणते वापरले..?

मार्गी's picture

18 Jun 2015 - 11:04 am | मार्गी

सॅक समोर बांधून बघितली‌ आणि मग पाठीवर घेतली.
ग्लोव्हज पुढे वापरले. शूज सामान्य स्पोर्टस शूज.

मोदक's picture

18 Jun 2015 - 1:08 pm | मोदक

दंडवत स्वीकारा..!!!!

आम्ही इथल्या इथे ३०० / ४०० किमी च्या राईडला सुद्धा यापेक्षा जास्त तयारी करतो. सॅडल बॅग, हँडल बॅग, फ्रेम बॅग्स अशा ढीगभर कस्टमाईझ्ड बॅगा आणि पॅनीअर्स - निव्वळ पाठीवर वजन असू नये म्हणून.

तुम्ही तर पराकोटीच्या प्रतिकूल परिस्थीतीमध्ये सहज फेरफटका मारायला गेल्यासारखे लिहित आहात.

सौंदाळा's picture

17 Jun 2015 - 5:41 pm | सौंदाळा

लेखनशैली जबरा.
पुणे - मुंबई सायकल सफर या स्टाईलने लिहिली तरी मजा येईल, ही तर लडाखची सफर. आनंद शतगुणित झाला आहे. फोटोपण सहीच
जवानांबरोबर राहिलात, पहिल्या दिवसाचा थकवा कुठल्या कुठे पळाला असेल.
पुभाप्र.

कपिलमुनी's picture

17 Jun 2015 - 5:59 pm | कपिलमुनी

फोटो आणि वर्णन एकत्र आला तर जास्त रीलेट करता येइल.

वेल्लाभट's picture

17 Jun 2015 - 6:09 pm | वेल्लाभट

वाचतोय
अचंबित होतोय
कंधोसे मिलते है कंधे ! हॅट्स ऑप्फ

टवाळ कार्टा's picture

17 Jun 2015 - 6:16 pm | टवाळ कार्टा

अफाट

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jun 2015 - 6:17 pm | अत्रुप्त आत्मा

जोरदार मोहिम. उत्साहवर्धक लेखनशैली.

कन्धों से मिलते है कन्धे कदमों से कदम मिलते हैं.

जबरदस्त .. पुढे वाचत आहे.. लिहा लवकर...
आणि बरेचसे लिखान हे वर्तमानकाळात लिहिल्याने जास्तच मजा आली.. जणु लाईव्ह काँमेंट्री चालु आहे

चिगो's picture

17 Jun 2015 - 9:03 pm | चिगो

वाचतोय..

क्या बात हैं! देशाच्या दूर कोण्या कोपर्‍यात मराठी सेनाधिकारी आणि सैनिक ह्यांना भेटणे हा एक अतिशय सुरेख अनुभव असतो!

श्रीरंग_जोशी's picture

18 Jun 2015 - 6:04 am | श्रीरंग_जोशी

खूपच खास उपक्रम अन तेवढेच खास अनुभवकथन.

घरापासून एवढे लांब आपली भाषा बोलणारं किंवा आपल्या भागातलं कुणी भेटलं की मनापासून आनंद होतो. ती माणसं जर सैन्यात असतील तर आनंदासोबत अभिमानही वाटतो.

त्या प्रदेशात एकाच दिवसात ७० किमी सायकलप्रवास. मानलं तुम्हाला.

पुभाप्र.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Jun 2015 - 6:55 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

_/\_ एकदा कट्ट्याला भेटुयात. _/\_

मदनबाण's picture

18 Jun 2015 - 7:15 am | मदनबाण

लोटांगण !!! _/\__/\__/\_
कारगिल म्हणता क्षणीच अंगावर काटा येतो...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जिंदगी आ रहा हुं में...

एस's picture

18 Jun 2015 - 7:57 am | एस

वाह!!!

बेकार तरुण's picture

18 Jun 2015 - 8:01 am | बेकार तरुण

साष्टांग नमस्कार !!!!
कधी भेट झाली तर आपली चरणधूळ घेउन जतन करुन ठेवीन

क्रेझी's picture

18 Jun 2015 - 9:47 am | क्रेझी

भारीच!! तुमचा स्टॅमिना, उत्साह सगळंच एकदम जबरदस्त आहे! फोटो आणि वर्णन एकदम लाईव्ह आहे :) पुढचे भाग लवकर टाका :)

पैसा's picture

18 Jun 2015 - 10:03 am | पैसा

अचाट! अफाट!!

मार्गी's picture

18 Jun 2015 - 11:02 am | मार्गी

प्रतिक्रियांबद्दल सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!! पण हे सायकलिंग काही अशक्य, अचाट वगैरे नव्हतं. साधी सोपी गोष्ट होती. पण एखाद्या नवीन किंवा अनोळखी गोष्टीला आपलं मन 'अशक्य'; 'प्रचंड कठिण' वगैरे मानत असावं. :) बाकी काहीही नाहीय. प्रत्येक जण त्याला/ तिला इतक्या इंटरेस्टिंग वाटणा-या कोणत्याही गोष्टीत सहज पुढे जातच असतो/ असते.

मृत्युन्जय's picture

18 Jun 2015 - 11:41 am | मृत्युन्जय

भले शाब्बास. आपल्या सादर प्रणाम :). पुभाप्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Jun 2015 - 12:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

अफाट सफर आणि तिचे भन्नाट वर्णन !

एखाद्या कट्ट्याला भेटायलाच हवे !

मित्रहो's picture

18 Jun 2015 - 12:22 pm | मित्रहो

आपल्या धाडसाला सादर प्रणाम
आपले अनुभव इथे लिहीत असल्याबद्दल धन्यवाद!

चिमी's picture

18 Jun 2015 - 12:32 pm | चिमी

सायकलवर लडाख ही कल्पनासुद्धा करु शकत नाही मी.
तुमची इच्छाशक्ती जबरदस्त आहे. __/\__
इथे ऑफिसमधे फोटो दिसत नाहीयेत. :(
घरी जाउन फोटो पाहुन परत प्रतिक्रिया देते.
पुभाप्र.

नाखु's picture

18 Jun 2015 - 4:08 pm | नाखु

त्रिवार दंडवत
नुस्त्या बॅग्या घेऊन प्रवासात फेफे उडते. इथे सायकलींग
आणि जवानांची भेट हा प्रसंग कष्ट सार्थ ठरविणारा ( जवानांनी काही सुरक्षा-ओळख चौकशी केली नाही का? का बरोबर काही आय्डी प्रूफ आणि परमिट ठेवले होते?)

पुलेप्र
आनंदी नाखु

झकासराव's picture

18 Jun 2015 - 4:25 pm | झकासराव

अफाट आहात राव. :)

जगप्रवासी's picture

18 Jun 2015 - 5:13 pm | जगप्रवासी

साष्टांग दंडवत स्वीकारा. अप्रतिम भाग झालाय .

स्वाती दिनेश's picture

18 Jun 2015 - 6:17 pm | स्वाती दिनेश

कल्पनेच्या पलिकडचा प्रवास आहे हा.. फार सुंदर आणि थरारक!
पुभाप्र
स्वाती

मोहनराव's picture

18 Jun 2015 - 6:27 pm | मोहनराव

_/\_ वाचतोय

बोका-ए-आझम's picture

19 Jun 2015 - 12:15 am | बोका-ए-आझम

मार्गी, तुमचं नाव खरंतर चुकीचं आहे. ते आडमार्गी पाहिजे. तुमची जम्मू-काश्मीर महापुरानंतरच्या मदतकार्यावरची मालिका अफलातून होती. ह्या लडाखवरच्या मालिकेने तुम्ही बहु्तेक स्वत:चा रेकाॅर्ड मोडणार! पुभाप्र!

जुइ's picture

19 Jun 2015 - 5:04 am | जुइ

दंडवत तुम्हाला. लदाख मध्ये एवढ्या उंचीवर जाऊन तुम्ही सायकल चालवली मानलं तुम्हाला. आमच्या सहलीच्या वेळेस कमी हवेच्या कमतरतेमुळे डोके गरगरत होते. ते थांबले जेव्हा तेथील जवानांनी चहा पाजला तेव्हा. बाकी तेथे जाऊन जवानांबरोबर थोडा वेळ घालवता येणेही भाग्याची गोष्ट आहे.

कंजूस's picture

19 Jun 2015 - 6:30 am | कंजूस

"तुम्ही तर पराकोटीच्या प्रतिकूल परिस्थीतीमध्ये सहज फेरफटका मारायला गेल्यासारखे लिहित आहात."--मोदक
मीपण हेच म्हणतो.
आणि यांच्याबरोबर कट्टा करायला सर्वांनी साइकल चालवत येण्याची अट ठेवा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jun 2015 - 7:07 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इच्छाशक्तीला सलाम. लगे रहो.
वाचतोय.

-दिलीप बिरुटे

प्रभो's picture

19 Jun 2015 - 10:15 am | प्रभो

खतर्नाक!!!

अजया's picture

19 Jun 2015 - 12:10 pm | अजया

ज ब र द स्त

मॅक's picture

19 Jun 2015 - 5:32 pm | मॅक

सलाम............ मस्तच....

एक एकटा एकटाच's picture

20 Jun 2015 - 9:01 am | एक एकटा एकटाच

एव्हढ सामान???????????
घेउन डोगंरावर सायकलींग???????????

वरच्या सगळ्यांशी सहमत...सादर प्रणाम

हे सगळं लिहिल्याबद्दल- धन्यवाद!!