सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ४- लेह दर्शन

मार्गी's picture
मार्गी in भटकंती
22 Jun 2015 - 9:39 pm

सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना
सायकलीसंगे जुले लदाख़ भाग १- करगिल- मुलबेक- नमिकेला- बुधखारबू

सायकलीसंगे जुले लदाख़ भाग २- बुधखारबू- फोतुला- लामायुरू- खालत्सी- नुरला
सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ३- नुरला- ससपोल- निम्मू- लेह...

सर्व मिपाकर वाचकांना मन:पूर्वक धन्यवाद...

२ जूनच्या सकाळी जवळजवळ चोवीस तासांनी आराम मिळाला. आज मुख्य आरामच करायचा आहे. सकाळी प्रोद्युतजींकडे पोहचताना उजेड तर झाला आहे; पण ऊन पडलं नाही आहे. हवामान थोडं वेगळं दिसतं आहे. मागच्या वेळेस जेव्हा ऑगस्ट २०११ मध्ये इथे आलो होतो, तेव्हा बर्फ तर होता पण इतका जास्त नव्हता. त्या वेळी हवामान मुख्यत: स्वच्छ होतं. ह्या वेळी वेगळं दिसतं आहे. कदाचित हा ऑगस्ट आणि जूनमधलाही फरक असावा.

दुपारपर्यंत पूर्ण आराम केला. काल नव्वद किलोमीटर सायकल चालवली होती; म्हणजे जवळपास दोन दिवसांचं सायकलिंग एकाच दिवशी. त्यामुळे आज पूर्ण आराम करायचा अधिकार आहे. दुपारनंतरही हवामान बदललं नाही. प्रोद्युतजींनी सांगितलं की, ह्या वर्षी जूनमध्येसुद्धा हवामान काहीसं हिवाळ्यासारखं आहे. आणि अजूनपर्यंत चांगलं ऊनच पडलेलं‌ नाहीय. प्रोद्युतजी‌ इथे एक हेल्थ सेंटर चालवतात. चोगलमसर गांव! आजूबाजूच्या लोकांशीसुद्धा बोलणं झालं; जुले जुले झालं. इथून मस्त नजारा दिसतोय. दूरवर शांती स्तुपाचा ठिपका दिसतोय. ही जागा रस्त्यापासून थोड्या उंचीवर आहे. संध्याकाळीही कुठे जावसं वाटलं नाही; त्यामुळे आज पूर्ण आरामाचा दिवस. संध्याकाळी थंडी परत वाढली.

दुस-या दिवशी सकाळी पाऊस पडला. हवामान ढगाळच आहे. रजईमधून उठावसं वाटत नाहीय. हवामान ठीक होईपर्यंत दूर जाता येणार नाही. त्यामुळे थोडं थांबणंच चांगलं आहे. दुपारपर्यंत आराम झाल्यावर बाहेर जावसं वाटलं. आज पहिले लेहला जायचं आहे. मागच्या वेळेसचे हॉटेलवाले मित्र आहेत. त्यांना भेटेन. त्यानंतर शांती स्तुप येथे जायचं आहे. इथून लेह सहा- सात किलोमीटर दूर आहे. पण खाली मुख्य रस्त्याला लागल्यानंतर जास्त चढच आहे. मिलिटरीची अनेक युनिटस आहेत. भारत तिबेट सीमा पोलिस, बीआरओचं हिमांक युनिट मुख्यालय आणि राष्ट्रीय रक्षा उच्च तुंगता संस्थान आहे!

लेहला पोहचायला जवळपास एक तास लागला. ओल्ड रोडवर पोहचल्यानंतर पुढे पायी पायी‌ जावं लागत आहे. ओल्ड रोडवर मोहम्मद हुसेन ह्यांना भेटलो. ते खूप चांगले मित्र आहेत. खूप आनंद झाला. त्यांनी सांगितलं की, अजून मनाली रोड बंद आहे. तो सुरू होण्यास अजूनही‌वेळ लागेल. इथून शांती स्तुपापर्यंत जास्त चढच आहे. मध्ये एका जागी थोडा उतार मिळाला. पुढे सरळ चढाव. पण शांती स्तुपाच्या थोडं आधी परत सायकल चालवता आली. खरोखर रमणीय स्थान आहे.

तिथून परतताना एक सायकलचं‌ दुकान लागलं. इथे सायकल भाड्याने मिळते. लदाख़मध्ये अनेक ठिकाणी इथून लोक सायकल घेऊन जातात. सायकलचं गेअर सेटिंग थोडं ठीक केलं. बाकी तपासून घेतली. सायकल उत्तम आहे. काही भारतीय आणि विदेशी सायकलिस्टसुद्धा दिसले. संध्याकाळी स्वयंपाकात प्रोद्युतजींना थोडी मदत केली. रजईच्या बाहेर पडायची इच्छाच होत नाहीय. रात्र झाली की परत थंडीचं‌ राज्य सुरू झालं. मागच्या वेळेपेक्षा हवामान अगदी वेगळं आहे.

४ जूनलासुद्धा हाच क्रम सुरू राहिला. फक्त आज शांती स्तुपाच्या ऐवजी लेह पॅलेसला गेलो. गाडीतून जाताना रस्त्याचा अजिबात अंदाज येत नाही. पण सायकल चालवताना अगदी छोटे छोटे बारकावे कळतात. आज मी लेहपर्यंत थेट सायकलीवरच जाऊ शकतोय. पायी पायी नाही. आणि लेह पॅलेसचा चढही सायकलीवरच पार करता आला. खरोखर इथे थांबल्यामुळे फायदा होतोय. शरीराला वेळ मिळाल्यामुळे अनुकूलन चांगलं झालं‌ असणार. मनाली रस्ता लवकर उघडण्याची लक्षणं नाही आहेत. कदाचित मला माझा कार्यक्रम बदलावा लागू शकेल. बघूया. परत जाताना खर्दुंगलाला जाणारा रस्ता दिसला... लेहच्या जवळ एका पेट्रोल पंपावर लिहिलं आहे- "I often relax the most in my first home i.e. the road.." किती खरं आहे हे! परत जाताना लवकर पोहचलो.

संध्याकाळी चोगलमसरला जाण्याआधी सिंधू घाटावर जायची इच्छा होती. पण नंतर थंडीमुळे आराम करावासा वाटला. इथे प्रोद्युतजींकडे अनेक जण भेटायला येतात. शेजा-यांशीही ओळख झाली. काल ज्यांच्या दुकानात सायकल सेटिंग केलं होतं, ते इथेच राहतात! सगळे म्हणत आहेत की, ह्या वर्षी हवामान विपरित आहे. जूनमध्ये इथे उन्हाळा असतो आणि पंखा लावावा लागतो. पण ह्या वेळी तसं हवामान नाहीय. त्याही दिवशी नंतर आरामच केला.

काल आणि आज मिळून सुमारे चाळीस किलोमीटर सायकल चालवली. काल आणि आजचा चढही सुमारे तीनशे मीटर असेल. पण जसा ह्या वातावरणाला सरावतो आहे, तशी थंडीही कमी वाजते आहे आणि सायकलिंगचा स्टॅमिनाही सुधारतोय. बघूया पुढे कसं जमतं..


शांती स्तुपाकडे जाताना


शांती स्तुपावरून दिसणारं लेह


लेह पॅलेसवरून दिसणारं लेह व शांती स्तुप

पुढचा भाग: सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ५- सिंधू दर्शन स्थल आणि गोंपा

मूळ हिंदीमधील ब्लॉग:
साईकिल पर जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना

साईकिल पर जुले लदाख़ भाग १- करगिल- मुलबेक- नमिकेला- बुधखारबू
साईकिल पर जुले लदाख़ भाग २- बुधखारबू- फोतुला- लामायुरू- खालत्सी- नुरला


साईकिल पर जुले लदाख़ भाग ३- नुरला- ससपोल- निम्मू- लेह...

साईकिल पर जुले लदाख़ भाग ४- लेह दर्शन

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

22 Jun 2015 - 9:42 pm | यशोधरा

इतके किमी सायकल चालवल्यावर स्टॅमिना वाढला नाही तरच नवल!
हा भागही आवडला.
जमत असेल तर अजून थोडे मोठे भाग टाकाल का?

मार्गी's picture

23 Jun 2015 - 10:49 am | मार्गी

पण ह्या वेळी स्टॅमिनापेक्षा ऊर्जा पातळी हा मुद्दा होता. स्टॅमिना तसा बरा होताच; त्यामुळेच इतकं सायकलिंग करू शकलो. स्टॅमिना दीर्घ काळाच्या नियमिततेमुळे मिळतो व टिकतो; पण ऊर्जा पातळी कमी- जास्त होऊ शकते. पुढे ऊर्जा पातळी घटली. तसं डाएट घेतलं‌ नाही बहुतेक त्यामुळे. आणि शिवाय शारीरिक मानसिक थकवाही येतो. उर्जा पातळी व शारीरिक- मानसिक ऊर्जा ह्यांचा ग्राफ साईन वेव्हप्रमाणे असावा बहुतेक; त्यामुळे त्या वेळी ऊर्जा पातळी लो होती. हा भाग लहान होता कारण सायकलिंग थोडं केलं होतं ना. मला मोठेच भाग लिहायला आवडतात. पुनश्च धन्यवाद.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jun 2015 - 11:25 pm | अत्रुप्त आत्मा

व्वा...... मजा आया.

वा! जमणार की! का नाही जमणार? :-)

पुभाप्र. लवकर टाका.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Jun 2015 - 2:15 am | डॉ सुहास म्हात्रे

मस्त चालली आहे सायकल स्वारी ! पुभाप्र.

उगा काहितरीच's picture

23 Jun 2015 - 9:02 am | उगा काहितरीच

वा ! हा पण भाग मस्तच, मालक जरा खरडवहीत पण डोकावत जा.

पाटील हो's picture

23 Jun 2015 - 10:21 am | पाटील हो

क्या बात ,क्या बात

लेह एकदम टुमदार गाव दिसतंय!