शेअरबाजार- बस्स 02 मिनिट्स...आपण काय करावे??

प्रसाद भागवत's picture
प्रसाद भागवत in जनातलं, मनातलं
3 Jun 2015 - 1:13 pm

सध्या गाजत असलेल्या 'मॅगी' प्रकरणामुळे आज नेस्ले ईडिया कंपनीच्या शेअरने जवळजवळ 10% ची गटांगळी खाल्ली. हे प्रकरण मिडियात आल्यापासुन म्हणजेच गेल्या पंधराएक् दिवसांत हा शेअर सधारण 1000 रुपयांनी (म्हणजे जवळजवळ 14% घसरला) आपण, एका सामान्य गुंतवणुकदाराने या बाबत काय करावयास हवे असे आपणास वाटते??..

कर्मधर्मसंयोगाने मी याच विषयावर् अर्थपुर्णच्या येत्या मासिकात एक लेख लिहिला आहे. जरुर वाचावा. आपल्या प्रतिक्रिया, सुचनांचे स्वागत आहे. - प्रसाद भागवत

अर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकमाहिती

प्रतिक्रिया

सुधीर's picture

9 Jun 2015 - 4:04 pm | सुधीर

मॅगीची सिंगापूरची टेस्टींग पास झाली. स्टॉक एका दिवसात ९% वर गेला. गुरुंजींना लॉटरी लागली. :)
http://www.livemint.com/Money/Pqw3XTnsJq9LUjdOrhA6UI/Nestle-India-shares...

आपल्या (FSSAI) टेस्टींग आणि सिंगापूर टेस्टीग मध्ये फरक का? कुछ तो गडबड है|

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jun 2015 - 6:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारतात स्थानिक बाजारात विकण्याच्या वस्तू आणि निर्यातिसाठीच्या वस्तू असा भेदभाव आणि त्यांतील फरक नविन नाही. सिंगापूरमध्ये अन्नपदार्थांत भेसळ सापडली तर सीईओ सरळ आत जाईल. नेसलेच्या सीईओने भारतात केले तसे त्या देशात जाऊन त्यानाच उपदेशामृत पाजणे तो स्वप्नातही पाहणार नाही. शिवाय, तेथे त्याच्या वचनांची भलावण करणारी विकाऊ फौजही मिळणे कठीण आहे... कारण त्यांच्यावरही कायद्याचा बडगा पडेल.

श्रीगुरुजी's picture

9 Jun 2015 - 8:38 pm | श्रीगुरुजी

पूर्वी कॅडबरी, शीतपेये इ. वर असाच आरडाओरडा झाला होता. त्यांनी सर्व मॅनेज करून आपल्यावरील किटाळ दूर केले. नेस्ले मॅगीच्या बाबतीत तसेच करणार याची खात्री बाळगा.

सुधीर's picture

9 Jun 2015 - 9:56 pm | सुधीर

गुरुजी, भाजपाच्या राज्यात असं होणार नाही असं वाटलं होतं. ;) ह.घ्या.

श्रीगुरुजी's picture

9 Jun 2015 - 8:39 pm | श्रीगुरुजी

नेस्ले पुन्हा वर जाणार याची खात्री होतीच.

hitesh's picture

10 Jun 2015 - 6:49 am | hitesh

म्यागीमधले शिसे कुठे गेले ?

आधी सापडले... लगेच गेलेही.... मोदी झटपट काम

सुबोध खरे's picture

10 Jun 2015 - 11:44 am | सुबोध खरे

हितेश भाऊ
तुम्ही तुमचा काळा चष्मा काढा. शिशाचे मोदी साहेबांशी काय घेणे देणे आहे? तुमचा मोदी द्वेष समजू शकतो पण तो येथे अनाठायी आहे. उद्या तुम्ही असेही म्हणाल कि पप्पू म्यागी खातो म्हणून मोदी साहेबांनी त्याच्या वर बंदी आणली.
जाता जाता- केजरीवाल साहेबांच्या दिल्लीत किंवा अखिलेश रावांच्या उत्तर प्रदेशात पण म्यागीवर बंदी आणली यालाही मोदी साहेबच जबाबदार आहेत का?

प्रसाद भागवत's picture

10 Jun 2015 - 11:47 am | प्रसाद भागवत

अनुल्लेख डॉक्टर अनुल्लेख...हेच कदाचित जास्त प्रभावी उत्तर आहे.

काळा पहाड's picture

10 Jun 2015 - 12:46 pm | काळा पहाड

ते यडंय. लक्ष देउ नका.

चिनार's picture

10 Jun 2015 - 11:56 am | चिनार

हितेशच बरोबर आहे...राहुल गांधीला पंतप्रधान करा!

नाखु's picture

12 Jun 2015 - 11:02 am | नाखु

भाउंना त्यांचे तहहयात सल्ला गार !!!!

सुबोध खरे's picture

9 Jun 2015 - 9:08 pm | सुबोध खरे

गुरुजी
५६७० ला घेतलेला एक समभाग त्यात ०. ८% कमिशन आणि समभाग विनिमय कर(STT) धरून आपल्याला प्रत्यक्षात ५७१५ ला पडतो आणी जेन्व्हा आपण विकत तेंव्हा परत हे ०.८ % लागतात तेंव्हा हा समभाग जेंव्हा ५७६० रुपयाला पोहोचतो. तेंव्हा आपला नक्त नफा शून्य असतो. यावर जितका वर चढेल तो किती दिवसात चढेल त्याप्रमाणे त्यावर मिळालेला नफा टक्केवारीत काढायला लागेल. हे गणित आपण केलेले असेलच पण सर्व सामान्य जनांसाठी म्हणून हा हिशेब लिहित आहे

प्रसाद भागवत's picture

10 Jun 2015 - 11:20 am | प्रसाद भागवत

डॉक्टरसाहेब, माझ्या एका क्लायंटची कॉन्ट्रॅक्ट नोट आत्ताच पाहिली, मुळ खरेदी 5820 दराने आणि आपण म्हणता ते सर्व एतर खर्च मिळुन नक्त खरेदी 5843.28 ला झालेली दिसली. म्हणजेच मुळ खरेदीपेक्षा साधारणतः २३ रुपये अधिक...आपल्या उदाहरणांत कर व अतिरिक्त भार हा 45 रुपयांचा दिसतो. मला वाटते आपण थोडे (की जवळजवळ दुप्पट??) अधिक ब्रोकरेज देत आहात.

सुबोध खरे's picture

10 Jun 2015 - 1:16 pm | सुबोध खरे

माझा ब्रोकर ०.७ % घेतो अधिक इतर कर. एखादा ब्रोकर कमी घेत असेलही. जास्तीत जास्त ब्रोकरेज १. ५% लावता येते(BSE च्या नियमानुसार) पण कमीत कमी किती हे सांगितलेले नाही. बाकी नेसले हि कंपनी (ब्लू चीप) उत्तम आहे हे मी वर म्हटलेले आहेच. फक्त समभाग फार महाग आहे.

श्रीगुरुजी's picture

10 Jun 2015 - 3:21 pm | श्रीगुरुजी

डॉक्टसाहेब,

तुमचा हिशेब बरोबर आहे. मला शेअर्स घेताना अंदाजे ०.७% व विकताना तेवढेच अतिरिक्त पैसे द्यावे लागतात. यात ब्रोकरेज व इतर करांचा समावेश असतो.

मी घेतलेल्या शेअर्सची नोंद एका एक्सेल शीट मध्ये ठेवतो. घेताना द्यावी लागलेली एकूण किंमत व त्यात विक्रीच्या वेळचे ब्रोकरेज वगैरे धरून ब्रेक इव्हन साठी तो शेअर कमीत कमी किती किंमतीला विकायला हवा याचीही नोंद ठेवतो. त्यामुळे विक्री करताना कमीतकमी कितीला विकायचा याचा अंदाज येतो.

मी २ दिवसांपूर्वी नेस्लेचे शेअर्स ५६७० ला घेतले. खरेदी व विक्रीचे ब्रोकरेज धरून हा शेअर मला कमीतकमी ५७५० ला विकला तरच फायदा होईल. त्या किंमतीची मी नोंद करून ठेवली आहे.

सुबोध खरे's picture

12 Jun 2015 - 10:11 am | सुबोध खरे

गुरुजी
मनी कंट्रोल वर( किंवा अशा कोणत्याही अर्थ विषयक साईट वर) आपला पोर्ट फ़ोलिओ बनवून ठेवला तर तेथे आपल्या समभागाचे व्यवस्थित विवरण करता येते आणि त्याचा हिशेब अत्यंत सोपा आहे. नुसतेच तसे नव्हे तर ह्रस्व मुदतीचा आणि दीर्घ मुदतीचा फायदा त्यात आपो आप हिशेब करता येतो. वर्षाच्या शेवटी अल्पमुदतीचा भांडवली नफा मोजण्यासाठी आणि कर भरण्याच्या दृष्टीने ते अत्यंत सोयीचे जाते. हि गोष्ट मी २००७ पासून करीत आलो आहे. आणि तेंव्हा पासून मी विकत घेतलेल्या आणि विकलेल्या प्रत्येक समभागाचा लेख जोखा तेथे उपलब्ध आहे. आपली चूक कुठे झाली आणि कुटेह आपल्याला फायदा झाला याचा हिशेब लावण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. आपला असा पोर्ट फ़ोलिओसुद्धा असेलच पण या क्षेत्रात नवीन असलेल्या लोकांसाठी हि एक उपयुक्त माहिती ठरावी.

श्रीगुरुजी's picture

12 Jun 2015 - 2:16 pm | श्रीगुरुजी

डॉक्टरसाहेब,

मनीकंट्रोलवर माझा पोर्टफिलिओ आहेच. मी मनीकंट्रोलच्या माध्यमातूनच समभागांच्या भावावर नजर ठेवतो. मनीकंट्रोलमधील आपला पोर्टफोलिओ सर्व्हर साईडला स्टोअर होत असल्याने दुसर्‍या कोणत्याही संगणकावरून अथवा भ्रमणध्वनीच्या माध्यमातून पोर्टफोलिओ बघता येतो.

पूर्वी मी इक्विटीमास्टरवर पोर्टफोलिओ बनविला होता. परंतु तो पोर्टफोलिओ क्लायंट साईडला कुकीजमध्ये साठविला जात असल्याने इतर संगणकावरून तो वापरता येत नाही.

सुधीर's picture

12 Jun 2015 - 5:00 pm | सुधीर

मी सुद्धा मनीकंट्रोल २००७ पासून वापरतोय. सध्य उपलब्ध वेबबेस्ड संगणक प्रणालीं मध्ये मनीकंट्रोल चांगलं वाटतं. मनीकंट्रोल स्वतंत्ररित्या समभागाचा नफा-तोटा, परतावा आणि वर्षभराचा नफा-तोटा चांगलं दाखवते. पण त्यात काही त्रुटी अलिकडे जाणवत होत्या. उदा. फंड मॅनेज करताना कॅश इनफ्लो-आउटफ्लो ची क्ल्पना मिसींग वाटत होती. कॅश-इन्फ्लो-आउटफ्लो लक्षात घेऊन संपूर्ण पोर्टफोलिओचे रिटर्न्स मोजता येत नव्हते. पोर्टफोलिओची बेंचमार्क बरोबर तुलना करता येत नव्हती. अ‍ॅसेट क्लासवाईज (कॅश, डेट फंड्ज, इक्विटी लार्ज कॅप, मिड कॅप वगैरे), इंडस्ट्रीवाईज डिस्ट्रीब्युशन्स हवे तसे बघता येते नव्हते. मी स्वत:पुरता बनवलेल्या एक्सेल मध्ये ते अ‍ॅड केलयं. शॉर्ट टर्म (१ वर्षाच्या आतला) -लाँग टर्म रिअलाइज्ड गेन फिन-इअर वाईज बघता येऊ शकतो. सध्या तरी एक्सेल जनरेट (अगदी पिव्होट टेबलसहीत) करण्यासाठी छोटे खानी अ‍ॅप्लिकेशन बनवलं आहे. पण त्यासाठी दररोजचा प्राईज डेटा मला माझ्या सिस्टीममध्ये अपलोड करून प्रोसेस कारावा लागतो. बघु भविष्यात वेब अ‍ॅप डेव्हलप करून घेणे किती फायद्याचे ठरते. ;)

लॉरी टांगटूंगकर's picture

10 Jun 2015 - 6:55 pm | लॉरी टांगटूंगकर

आणि हे शतक!

आज नेस्ले इंडियाने चांगलाच टेकऑफ घेतला आहे. ६००० ते ६३००

जवळजवळ ३०० वाढ तीन तासांत. काय चालू आहे नेमकं ?

कितीपर्यंत वाढ ही समाधानकारक समजायची ?

ता. क.

ओह.. गॉट इट..

Mumbai HC allows export of Maggi noodles

प्रसाद भागवत's picture

15 Jul 2015 - 9:40 am | प्रसाद भागवत

सुप्रभात. आज सर्वोच्च न्यायलयात बजाज ऑटो कंपनीसंदर्भात एक महत्वाचा खट्ला निकली निघण्याची शक्यता आहे.
Quadricycle – RE 60 या कंपनीच्या महत्वाकांक्षी प्रॉडक्ट बद्द्लचा निर्णय आज बहुधा लागेल.
Bajaj has high expectations that the product would soon hit the Indian roads giving the commuters a long overdue alternate to auto rickshaws. A favourable verdict would provide a very big boost to Bajaj Auto’s stock price in the short term and its financials in the long term.
आज बजाजच्या शेअरवर नजर ठेवणे आपल्या हिताचे आहे.......मुळ विषयाला सोडुन लिहिलेल्या प्रतिक्रियेबद्दल क्षमस्व.. - प्रसाद भागवत.

प्रसाद भागवत's picture

5 Aug 2015 - 9:17 am | प्रसाद भागवत

महिना दीडमहिन्यापुर्वी सुरु झालेल्या मॅगी पुराणाची इतिश्री होण्याच्ये रंग दिसत आहेत. अर्थातच मॅगीची 'घरवापसी' होवुनच.

सुरवातीस ह्या प्रकरणाचा परिणाम म्हणुन मॅगी बनविणारी कंपनी 'नेस्ले ईंडिया'चा शेअर गडगडला तेंव्हाच हे,(आता घडते आहे ते) असेच होणार हे भाकित करुन मी सर्वांना ही नेस्लेसारख्या उत्त्म कंपनीच्या शेअरच्या खरेदीची सुवर्णसंधी आहे असे आग्रहपुर्वक सांगितले होते, .

आता ह्या प्रकरणांतील 'Fizz' संपणार असेल तर संभाव्य उसळी लक्षात घेवुन तेथे फायदा 'बुक' केलेलाच बरा. मला खरेदी करतेवेळीच अल्प काळात 6700 ची पातळी अपेक्षित होती.

अशा व्यवहारांतुन आर्थिक फायदा मिळतो हे कमी महत्वाचे नाही, प्रंतु त्यापेक्षाही आपला तर्क योग्य ठर्ला याचा आनंद अधिक असतो. आज हा निर्भेळ आणंद पुभा एकद उपभोगतो. धन्यवाद.

प्रसाद भागवत's picture

5 Aug 2015 - 9:19 am | प्रसाद भागवत

प्रतिक्रिया बाजार उघडलेला असतानाच लिहिल्याने जरा घाईत प्रकशित झाली आहे. शुद्ध्लेखनाच्या चुकांबद्दल माफी असावी.