आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही 'पहिले क्षण' येतात जे आपल्या कायमचे लक्षात राहतात.पहिला पऊस प्रेयसीसोबतचा...तो प्रेमाचा 'ओलावा'...गारठलेले दोघे आणि गरम-गरम भजी,पहिला दिवस कॉलेजचा...तिला पहिल्यांदाच पाहण्याचा तो क्षण...काय 'सॉलीड' दिसत होती, शाळा-कॉलेजमधले पहिले स्नेह संमेलन...स्टेजवर जायचा तो पहिलाच क्षण आणि नेमके संवाद विसरलेले तुम्ही,पहिला प्रयत्न तिला 'प्रपोज करण्याचा'...घाबरलेले तुम्ही आणि बिथरलेली 'ति',पहिलीच ओली 'पार्टी'...मित्रांचा आग्रह आणि नुसत्या वासानेच झिंगलेले तुम्ही.तुमच्या बाबतीत घडलेय का असे काही?असेल तर आम्हालाही सांगा.
प्रतिक्रिया
6 Jan 2008 - 12:47 pm | विकि
प्रेयसी असावी असे मला मनोमन वाटते. पण त्या सुंदर तरूणीला विचारण्याची हिंम्मतच कधी झाली नाही व होणार नाही असे का ते कळत नाही. आज चार वर्ष झाली ती मला दररोज दिसते पण मी तीला विचारण्याचे धाडस करू शकत नाही . त्या साठी मी तीची तुलना एखाधा परीशी करतो कारण यावर्षातील साधना दिवाळी अंकातील मला भावलेले एक वाक्य ते असे- खरं म्हणजे परीवर सगळेच प्रेम करतात.पण आपल दुर्भाग्य असं, की परीला याचा आभास देखील होत नाही .तीला याची जाणिवच नसते.
तेव्हा मिसळपाववरील असंख्य जाणकारांनी एखाधा सुंदर तरुणिसमोर प्रेम कसे व्यक्त करावे व होकार कसा मिळवावा याबाबत मार्गदर्शन करावे अशी नम्र विनंती.
आपला(तिच्या प्रतिक्षेत असणारा )
कॉ.विकि
6 Jan 2008 - 10:22 pm | प्राजु
तसं पाहिलं तर मुली या वडिलांच्या लाडक्या असतात. तशी मीही आहे माझ्या बाबांची लाडकी. आणि त्यातून अख्या गोखले घराण्यातलं पहिलं मूल.. त्यामुळे जरा अतीच लाडावलेली. मी नि माझा धाकटा भाऊ आम्ही दोघेच भावंडं.
मी दहावीत असताना, बाबांना हट्ट केला की मला गाडी शिकायची आहे. तेव्हा आमच्याकडे मारूती ८०० होती. बाबा म्हणाले "ठिक आहे". आईचा सॉलिड विरोध. तरीही बाबा तयार झाले. मला म्हणाले "आधी तू, क्लच दाबून गिअर चेंज करायला शिक मग कार आपण विद्यापीठाच्या मैदानात नेऊ आणि तिथे चालव." मी आमच्या गॅरेजमध्ये गेले बंद कारचा क्ल्च दाबून गिअर बदलायचा सराव सुरू केला. इतका सराव केला की क्लच प्लेट तुटली. बाबांनी ती बदलून आणली. मग आम्ही त्या मैदानात गेलो. तिथे मी गाडी घेतली चालवायला. जरा बरी चालवू लागले. बाबा एकदम खुश झाले. पण...
पण तो आनंद त्यांचा फार काळ नाही टिकला. त्या मैदानात खुणेचे मोठे दगड होते रोवलेले पिवळ्या रंगाचे. अगदी छान मोठे होते. मी बाबांच्या बाजूचं चाक अगदी नेम धरून त्या दगडावरून घालवलं. बाबा २ फूट हवेत उडाले आणि त्यांचं डो़कं टपाला बडवलं. झालं...........! माझं तेव्हा गाडी चालवायला शिकण्याचं स्वप्न पार धुळीला मिळालं त्यानंतर जवळ जवळ ३ महिने बाबा मला कारपाशी फिरकूही देत नव्हते. पण काय करणार ते माझे बाबा आहेत ना.. ३ महिन्यानी स्वतःच घेऊन गेले मैदानावर आणि माझं शिक्षण पुन्हा सुरू झालं.
म्हणून जेव्हा मी बाबांना सांगितलं की, मला अमेरिकेतलं ड्रायव्हिंग लायसन्स मिळालं म्हणून तेव्हा त्याना आनंदही झाला आणि टेन्शनही आलं.
- प्राजु.