सत्य घटनेवर आधारित

पाटील हो's picture
पाटील हो in जनातलं, मनातलं
20 May 2015 - 4:24 pm

कॉल सेंटर मधून एका मुलीने कॉल केला न झाली चालू बडबडायला .
ती : नमस्कार चमत्कार झाल्यावर, मी श्वेता बोलते .
मी : बोल की श्वेता. ( माजी लई जुनी मैत्रीण असल्यासारख मी पण हाणून दिलो )
ती : सर तुम्ही पाटील बोलत का
मी : होय.
ती : सर तुमचा रेचारज संपून १५ दिवस झाले अजून का रेचार्ज केला नाही अमुक तमुक आता रेचार्ज केला तर हे ऑफर आहे , १ वर्षा चा करा हे ते ……
मी : नाही ग नको कशाला … आजकाल मी tv पाहत नाही .
ती : का हो सर ? घरी दुसरा कोण तरी पाहिलं ना Tv ?
मी : का हो म्हणजे काय, मला वेळ मिळत नाही Tv बगायला ,चुकून मिळालाच तरी आमच्या हिला Tv सिरियल्स बगायचे असतात त्या वेळेत (संद्याकाळी )
ती : हो मग त्यांच्यासाठीतर रेचार्ज करा .
मी : ती गावी गेलेय म्हणूनच मी रेचार्ज केला नाही .
ती : सर मग तर तुमाला Tv बगायला मिळेल, news वैगेरे पाहत असलाच तुम्ही .
मी : पाहतो हो , फार पूर्वी पासून पाहतो पण फक्त ऑफिस मध्ये असतन. त्यामुळे मला रेचार्ज करायचा नाही .
………. परत मला रेचार्ज करायला नवनवीन सल्ले देत होती ……….
मी : (आता थोडा विषय बदलायच्या नादानी) …. काय हो तुमच्याकडे तो २२२ नंबर चन्नेल आहे का ?
ती : ( भलतीच खुश होवून ) आहे न सर …… मग काय २ मिनिट त्या चन्नेल चे गुणगान …
मी : मी ऐकलय एकच चन्नेल Rs ६० द. मा . देवून घेत येतो .
ती : तुम्ही जे ऐकलय ते अगदी बरोबर आहे सर आणि सगळे नवनवीन मुवीज बगायला मिळतील .
मी : मला असाच एक चन्नेल घ्यायचा आहे त्यासोबतच पूर्वीचा प्याक पण चालू करायचा आहे.
ती : धन्यवाद सर , मला समजू शकेल का सर आपल्याला कोणता चन्नेल घ्यायचा आहे.
मी : (मनोमन हसत ) मला ३०० नंबर चा Hatway music पाहिजे आहे हो .
ती : (बहुतेक तिला काय म्हणायचं सुचत नसेल ) सर ३०० नंबर ला Hatway music नाही आहे .
मी : चन्नेल नंबर थोडा मग पुढे झाले तरी चालेल पण मला Hatway music पाहिजे .
ती : (बहुतेक चिडली असेल ) आहो सर तो चन्नेल आमच्या प्याक मध्ये नाही .
मी : म्हणून मी सांगत होतो मला रेचारज करायचा नाही म्हणून , तुम्ही ऐकतच न्हवत .
ती : सर त्या पेक्ष्या तुम्ही हा हा चन्नेल घ्या , खूप चांगली गाणी असतातात .
मी : ( थोडा रागावलेल्या स्वरात ) आता हे पण तुम्हीच सांगणार का आम्ही कोणता चन्नेल बगायचा तो .
ती : नाही म्हणजे सर, त्या वर तीच तीच गाणी आठवडाभर लागतात .
मी : तुमाला कसा माहित हो तुम्हीपण Hatway वापरता काय ?
ती : (बिचारी कावरी बावरी होत ) नाही हो ,
मी : मग तुम्ही कोणता वापरता ?
ती : D२H
मी : कोणता प्याक आहे
ती : अमुक अमुक .
मी : तुमाला फ्री असेल ना
ती : नाही हो
मी : discount असेल मग बहुतेक
ती : नाही हो
मी : किती महिन्याचा एकदाच रेचारज करता तुम्ही ?
ती : सहा महिने ( शब्द नातोडता मेन मुद्यावर आली ) सर तुम्हाला २२२ चा चन्नेल हवा आहे ना ?
मी : कशाला ?
ती : नवनवीन सिनेमा पाहायला. .
मी :नको हो विचार बदलला , मी असापण ऐकलेलो कि महिनाभर ४ सिनेमे अरातून परतून लावून डोक्याचा भुगा करता म्हणे तुम्ही .
रोज सकाळ ,दुपार ,संद्याकाळ , रात्री अपरात्री एकाच सिनेमा लावता …. हे न ते असा करून त्या २२२ चा चन्नेल वरून जी काय तिची
खरडपट्टी / पाणउतारा केलो (बिचारी सुन्न झाली )
मी पण सगळा बॉस वरचा राग तिच्यावर कडाड होतो , चांगला साहेब असल्यासारखा सुनावत होतो तिला,
ती : सर मी आपली काय सेवा करू शकते ( मनोमन म्हन्ठलो , ४ दिवस जेवणाचा डब्बा दिलास तरी खूप उपकार होईल )
मी : काही नको केली तेवढी सेवा पुरे ,
आणि तिची शेवटची वाक्ये ढापून मी लगेच चालू झालो …
आपण आपला अमुल्य वेळ मला दिल्याबद्दल धन्यवाद .
आपला दिवस शुभ जावो.
(बिचारी मनातून म्हंटली असेल काय दिवस शुभ , सकाळी कुणाच तोंड बगून उठले आन ह्याचा नंबर माज्या वाट्याला आला)
ती : आपला अमुल्य वेळ मला दिल्याबद्दल धन्यवाद सर .
आपला दिवस शुभ जावो.
मी : ओके :) ……।

आपला ऐक फंडा आहे … समोरचा काही केल्या तुमचा ऐकत नसेल आणि आपलाच खर करत असेल तर त्याला सरळ कन्फ्युज करून तकने… :)

जसा मोबाईल बाजूला ठेवलो तसा Tv चा रिमोट दिसला , रिमोट घेतलो आणि कॉल येण्यापूर्वी mute केलेला बटन परत दाबून मज आवडता ३०० नंबर Hatway music वाजू लागला :) आणि त्याच्या बाजूला box मध्ये प्याक असलेल्या D२H कडे लक्ष गेल्यावर आठवण जाली कि दि (बहिण) अमेरिकेला जाण्या पूर्वी सगळा साहित्य हिकडे शिफ्ट करून D२H चा RTN जो कि तिचा होता, तो बदलून मजा फोन नंबर अपडेट केलेली .

विनोदअनुभव

प्रतिक्रिया

जेपी's picture

20 May 2015 - 4:48 pm | जेपी

चांगलय...

जरा वैताग येतो,पण काय आहे, तो त्यांचा कामाचा भाग आहे किंवा तेच त्यांच काम आहे. मध्यंतरी कॉल सेंटरवर दृष्टी मधले लोक काम करतात हे ऐकल्यापासून निदान मी तरी असल्या कॉल्सवर माफ करा. मला इंटरेस्ट नाही अस सरळ सांगते. त्यांच्या आर्जवांना "सॉरी" म्हणुन सांअग्ते, पण वाईट भाषा वापरत नाही.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 May 2015 - 7:27 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

दृष्टीमधली म्हणजे? अंध लोकं कॉल सेंटरला नोकरी करतात का? इथुन पुढे जपुन बोलत जाईन. :/

पाटील हो's picture

21 May 2015 - 8:44 am | पाटील हो

अस असेल तर एकदम सहमत आहे , पण काही वेळा खूप राग येतो हो .

नगरीनिरंजन's picture

20 May 2015 - 7:39 pm | नगरीनिरंजन

सहमत आहे. त्यांचे ते कामच आहे आणि कंपन्या चालू राहण्यासाठी नवीन-नवीन गिर्‍हाईके मिळवणेही भाग आहे. कंपनी चालू राहिली पाहिजे असे वाटते, च्यानेलही बघायचा आहे पण त्या कंपनीत काम करणार्‍यांची चेष्टा करायची असं करुन कसं चालेल?
ठामपणे पण नम्रपणे नकार द्यावा.

एक फोन सोडल्यास बाकी सगळे कल्पनिक काय हो?

पाटील हो's picture

21 May 2015 - 8:52 am | पाटील हो

थोड काल्पनिक असलातरी भावना पोचावायाच्या होत्या .
बाकी वाचन चालू आहे . कसा लेख लिहितात शिकतोय .

श्रीरंग_जोशी's picture

21 May 2015 - 8:54 am | श्रीरंग_जोशी

लेखनशैली आवडली. हे आगंतूक कॉल्स खूप त्रासदायक वाटत असले तरी त्या लोकांचे त्यामागचे मजबूरी का नाम अटल बिहारी असते त्याची जाणिव असली की त्यांना दुखवावेसे वाटत नाही. अशी धोरणे राबवणार्‍या कंपन्यांवर मात्र कठोर कारवाई व्हायला हवी.

भारतात असताना बरेचदा मी असे सांगून कटवायचो की पर्सनल लोन का, गेल्याच महिन्यात घेतले आहे, तुम्ही जेवढा रेट ऑफर करताय त्यापेक्षा थोडा अधिक पडला, तुमचा कॉल आधी यायला हवा होता.

हापिसात माझ्या शेजारी बसणारी माझी ज्युनिअर टिममेट कधी कधी चिडवायची पण, "आप इन टेलिमार्केटिंग वालों से जितने प्यार से बात करते हो उतने प्यार तो मै अपनी माँ से भी बात नही करती ;-) ".

पाटील हो's picture

21 May 2015 - 9:06 am | पाटील हो

धन्यवाद साहेब .
हा माजा असाच एक प्रयत्न करून पहिला लिहिण्याचा . बाकी मिसळपाव वर पडीक असतो पण कधी लिहिण्याचा कष्ट घेत नाही, नुसता वाचन मत्र.
बाकी मराठी तेवढा शुद्ध लिहिता येत नाही समजून घेणे . ( कर्नाटकात राहून मराठी मेडियम मधून शिकलेला )

मोहनराव's picture

21 May 2015 - 4:51 pm | मोहनराव

चांगला आहे पहिला प्रयत्न. लिहित रहा.

श्रीरंग_जोशी's picture

21 May 2015 - 5:21 pm | श्रीरंग_जोशी

लेखनशैली पहिल्या वाचनातच आवडली. पुलेशु.

खंडेराव's picture

21 May 2015 - 9:20 am | खंडेराव

मी हे काम केले आहे एकेकाळी, फोन लाउन सेवा विकणे. आजचा हा सगळयात कमी पैसे देणारा रोजगार असेल. कवडीचेही समाधान न देणारा. एक स्क्रिप्ट दिवसभर वेगवेगळ्या लो़कांना वाचुन दाखवावे लागते. कसे कसे नमुने भेटतील सांगता येत नाही.
नौकरीची शास्वती नाही, कॉस्ट कटिंग मधे सगळ्यात आधी यांची सुरुवात होते. मराठी भाषिक कॉल सेंटर मधे बहुतांशी ग्रामिण महाराष्ट्रातली मुले मुली असतात.
आणि, अवांतर मुद्दा म्हणजे, मराठी लोक त्यातल्या त्यात निट करतात, दिल्ली किवा इतर ठिकाणचे कॉल बर्याच वेळी उद्ध्ट असतात. मी निट थँक यु म्हणुन कोल संपवतो आता जेव्हाही येतात तेव्हा.

शैलेन्द्र's picture

21 May 2015 - 9:44 am | शैलेन्द्र

जरी कितीही त्रास होत असला तरी त्या बिचऱ्यांशी वाइट बोलून तो अजुन का वाढवावा.

पैसा's picture

21 May 2015 - 9:54 am | पैसा

अजून लिहा. तुमची बेळगावी वळणाची मराठी वाचायला छान वाटतेय एकदम!

अत्रुप्त आत्मा's picture

21 May 2015 - 11:06 am | अत्रुप्त आत्मा

+++१११

मी पण हाणून दिलो )

>> ह्ये असं वाचाया ,लै ग्वाड ग्वाड वाटायलय. अज्जुन लिवा,पन असच लिवा.

पाटील हो's picture

21 May 2015 - 5:20 pm | पाटील हो

नक्की प्रयत्न करत राहीन.

मराठी_माणूस's picture

21 May 2015 - 11:28 am | मराठी_माणूस

अमेरिकेला जाण्या पूर्वी सगळा साहित्य हिकडे शिफ्ट करून D२H चा RTN जो कि तिचा होता, तो बदलून मजा फोन नंबर अपडेट केलेली

हे सर्व काय आहे ?

पाटील हो's picture

21 May 2015 - 5:24 pm | पाटील हो

सगळा घोळ हितूनच झाला. अगोदरचा mob नंबर चेंज करून माजा mob नंबर दिल्यामुळे मला फोन आला.

दृष्टी काय आहे? अंध लोक असतात का अशा काॅलसेंटरना? यापुढे मीही जपून बोलत जाईन.कामात असताना फोन करतात म्हणून वैतागुन कधीकधी युपी अॅक्सेंटवाल्यांची उडवते मी :(

माझ्या महिती नुसार अंधांना रोजगार मिळावा म्हणून चालू केलेले हे कॉल सेंटर आहे. हि आणि अशी बरीच कॉल सेंटर मुंबईत कार्यरत आहेत. दृष्टी हे एक मासिक असून अंध व्यक्तीसाठी ब्रेल लिपी मध्ये असते ज्यात सगळ्या घडामोडी बरोबरच रोजगार समाचार देखील असतात. आता त्यांनी असे कॉल सेंटर पण सुरु केले आहे.

नगरीनिरंजन's picture

21 May 2015 - 5:14 pm | नगरीनिरंजन

अंधांना टीव्हीचे चॅनल्स विकायला लागावेत हा नियतीचा क्रूरपणाच आहे पण रोजगाराशिवाय कोणी जगू शकेल अशी आपल्या समाजाची ऐपत नसल्याने काम मिळतेय हेही नसे थोडके. अशा संस्थांचे खरंच कौतुक वाटते.

सतिश गावडे's picture

21 May 2015 - 9:16 pm | सतिश गावडे

गंमतीशीर लेखन आवडले.

मात्र योगायोगाने एकदा या क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तीने या क्षेत्रातील काम करणार्‍यांच्या समस्या सांगितल्या तेव्हा अगदि नम्रपणे "Thanks for calling me but I am not interested." असं म्हणून विषय संपवतो.

या लोकांना दिवसात किती फोन करायचे हे ठरवून दिलेले असते. ज्याला फोन लावायचा आहे तो कुठल्या मुडमध्ये असेल, तो काय बोलेल याची काहीच पूर्वकल्पना नसते. ज्या व्यक्तीला कॉल केला आहे ती व्यक्ती संभाषण कसेही भरकटवू शकते. अशा वेळी संभाषण रुळांवर ठेवताना या टेलेकॉलर्सचा कस लागतो. शिवाय गुणवत्तेच्या कारणस्तव हे कॉल रेकॉर्ड होत असतात. त्यामुळे डोक्यावर सतत "बिग बॉस इज लिसनिंग"चे दडपण कायम असते.

महत्वाची गोष्ट म्हणजे हे टेलेकॉलर्स टाईमपास म्हणून कॉल करत नसतात. तो त्यांचा पोटापाण्यासाठी बहुतेक वेळा नाईलाजाने निवडलेला व्यवसाय असतो.

आपण सुरुवातीलाच "I am not intereted." असं सांगितलं की विषय संपून जातो असा आजवरचा अनुभव आहे. मात्र एखादा टेलेकॉलर फारच गळी पडत असेल तर मात्र आवाज चढवायला नक्कीच हरकत नाही.