गुजरात..........६.........द्वारका-कुसडी-पोरबंदर...

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in भटकंती
21 Apr 2015 - 8:09 pm

गुजरात-१
गुजरात-२
गुजरात-३
गुजरात-४
गुजरात-५

नॅशनल मरीन पार्कला अदल्या दिवशी भेट देऊन आल्यावर दुसर्‍या दिवशी आम्ही सकाळची न्याहरी करून द्वारकेला जाण्यासाठी जामनगर सोडले. खंबालिया-भाटिया-कुरुंगा-द्वारका असा मार्ग होता. द्वारकेला पोहोचल्या पोहोचल्या रसभंग झाला. तेथे इतका कचरा होता की माझा फोटो काढायचा मुडच खलास झाला. जसे जसे आत जाऊ तसा कचरा वाढतच होता. मुख्य म्हणजे दुपारी देव झोपल्यामुळे मुख्य देऊळ बंद होते....असो. त्या कचर्‍याचा मोबाईलने फोटो काढले व पंतप्रधानांच्या वेबसाईटवर पाठवून दिले. एकंदरीत द्वारका बघून भ्रमनिरास झाला. म्हणजे देऊळ चांगले आहे पण सभोवतालचा परिसर एकदम भिकार होता. आता माहीत नाही. पण एक फायदा येथे झाला तो म्हणजे एका माणसाने नुकतेच समुद्रातून दोन शंख काढले होते त्याचा सौदा केला. अगोदर १८०० म्हणत होता...पण शेवटी ५०० ला दोन शंख घेतले. घेण्याआधी त्याच्याकडून वाजवून घेतले व सांभाळून पुण्याला आणले. पुण्याला आल्यावर ते स्वच्छ धुतले व वाजवायचा प्रयत्न केला पण शक्य झाले नाही. शेवटी मुलाने संध्याकाळी घरी आल्यावर वाजवून दाखविला. मग मात्र थोडा सराव केल्यावर वाजवता येऊ लागला पण फार मोठा आवाज काढता आला नाही.....
मधे एकदा घरी टेबलटॉपचे प्रयोग केले त्यात त्याचाही एक फोटो काढला....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

द्वारकेहून अत्यंत निराश होउन आम्ही पोरबंदरला निघालो. पोरबंदरच्या आधी सूर्य मावळतीला चालला होता हवा मस्त सुटली होती. आरामात बेगम अख्तरच्या गझला ऐकत चाललो होतो तेवढ्यात बहीण मागच्या खिडकीतून ओरडली. "काय मस्त कमळे फुलली आहेत बघ !'' थांबूया जरा. मलाही गुलाबी रंग लांबून दिसला होता पण थांबायचा काही माझा विचार नव्ह्ता. गाडी बाजूला घेऊन उतरलो तर त्या पाण्यात असंख्य लेसर फ्लेमिंगो अगदी स्तब्ध उभे होते. त्यांनी तिरक्या तिरक्या रांगा लावल्या होत्या. आमची चाहूल लागताच त्यांनी आत पाण्यात सरकण्यास सुरवात केली...तेवढ्यात एक छायाचित्र टिपले...

लेसर फ्लेमिंगो.....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

अंधारात उडणारे करकोचे..
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

इथे इतके पक्षी होते की आमची द्वरकेची व खिजाडियाची निराशा कुठल्याकुठे पळून गेली... दुसर्‍यादिवशी पोरबंदर सोडून उलट्या दिशेला यायला लागले तरी चालेल पण येथे येऊन फोटो काढायचे हे निश्चित केले. आदल्या दिवशी संध्याकाळी व दुसर्‍यादिवशी दुपारपर्यंत काढलेले फोटो.... या जागेचे नाव आहे कुसडी...

अबोला......शेकाट्या किंवा ब्लॅक विंग्ड स्टिल्ट...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

प्लवर...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

उचाट्या किंवा पाईड अ‍ॅव्होसेट.....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

मासा मिळाल्यामुळे खुष झालेला बगळा....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

बकध्यान.....काळा बगळा....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

पेलिकन...एक रुबाबदार व्यक्तिमत्व....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

उडताना....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

हजारोंच्या संख्येने असलेले करडे करकोचे.....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

स्नाईपची जोडी...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

उडताना एक करकोचा.....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

जरा जवळून...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

गुरे घरी परत जाताना...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

पेलिकन्स....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

फ्लेमिंगोची नाचणारी पोरे.....अगदी धीटपणे आमच्या जवळ घिरट्या घालत होती...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

आता कॅमेर्‍याच्या समोर सूर्य आल्यामुळे मला माझे आवडते शॉटस् मिळाले....
फ्लेमिंगोची रांग....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

गुजरातमधे मला सगळ्यात आवडलेले शहर म्हणजे उत्तम समुद्र किनारा लाभलेले पोरबंदर.... समुद्राच्या काठाने एक मस्त रस्ता बांधलेला आहे...ज्यावर एकही अतिक्रमण नाही...कचरा नाही...मस्तच ! हवा मस्त, खाणेपिणे (सगळ्यात चांगला उंधियो पोरबंदरला खाल्ला) मस्त, शहराचा वेग माणसाला सहन होणारा....
उद्या सोमनाथला जायचे आहे....सोमनाथचा इतिहास आठवून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल.....

क्रमशः
जयंत कुलकर्णी...

प्रतिक्रिया

कंजूस's picture

21 Apr 2015 - 9:11 pm | कंजूस

आवडले फोटो.

प्रचेतस's picture

21 Apr 2015 - 10:15 pm | प्रचेतस

सुरेख फोटो.
सोमनाथच्या प्रतिक्षेत.

जुइ's picture

22 Apr 2015 - 2:27 am | जुइ

आवडले!

रुपी's picture

22 Apr 2015 - 6:29 am | रुपी

सगळेच भाग छान! फोटो तर अप्रतिम.

ही सफर साधारण कुठल्या महिन्यात केली होती? हवामान वगैरेचीही थोडी माहीती द्या. आणि जमल्यास मागच्या भागांच्या लिंकही द्या.

खाद्यपदार्थांच्या माहितीच्या प्रतिक्षेत! सहा भागांत अजून फक्त उंधियोचाच उल्लेख आलाय.

खाद्यपदार्थांच्या माहितीच्या प्रतिक्षेत! सहा भागांत अजून फक्त उंधियोचाच उल्लेख आलाय.

+११११११

एस's picture

22 Apr 2015 - 2:04 pm | एस

हे मिपाकर म्हणजे ना, आधी हादडायला काय आहे ते पाहतात. :-D

आता गुजरात म्हटल्यावर ते ओघाने आलंच! प्रत्यक्ष गुजरात सफर जेव्हा होईल तेव्हा होईल. निदान तोपर्यंत फोटो आणि वर्णन यावर तर समाधान!

उमा @ मिपा's picture

22 Apr 2015 - 9:12 am | उमा @ मिपा

सुंदर फोटो

पॉइंट ब्लँक's picture

22 Apr 2015 - 10:41 am | पॉइंट ब्लँक

फोटो मस्त आले आहेत. शेवटचा फोटो एकदम भारी!

अनुप कुलकर्णी's picture

22 Apr 2015 - 10:46 am | अनुप कुलकर्णी

फोटो मस्त आले आहेत. silhouettes तर कमालच. या जागेबद्दल अजून माहिती मिळेल का? राहण्याची सोय आहे का? पोरबंदर पासून किती लांब आहे? पक्षीनिरीक्षणासाठी काही सोयी(बोट, watch tower ) आहेत का?

बाकी तो प्लवर मला spot billed duck वाटत आहे.

जयंत कुलकर्णी's picture

22 Apr 2015 - 10:55 am | जयंत कुलकर्णी

पोरबंदरपासून द्वारकेच्या बाजूला १० किमी असेल. राहण्याची सोय नाही. एक दोन मचाणे आहेत पण त्याची आवश्यकता नाही. बोटीची सोय नाही. याला कुचडी असेही म्हणतात.

नेत्रेश's picture

22 Apr 2015 - 11:18 am | नेत्रेश

उडत्या पक्षांचे फोटो तर लाजवाब. कॅमेरा आणी लेन्स कुठली आहे?

जयंत कुलकर्णी's picture

22 Apr 2015 - 11:42 am | जयंत कुलकर्णी

कॅनन ५० डी व ३०० मिमि कॅनन लेन्स.....

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Apr 2015 - 8:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

गेला आठवडाभर जरा व्यस्त असल्याने मिपावर फारसा वावर नव्हता. आज ही मालिका पाहिली.

सुंदर ओघवते प्रवासवर्णन आणि त्याला कोरीवकामांच्या व पक्षांच्या अप्रतिम फोटोंची नक्षी !! आतापर्यंतचे सगळे सहा भाग एका दमात वाचून काढले. गुजरात इतक्या दमाने पहावा लागेल असे वाटले नव्हते पण आता ते नक्की झाले !

पुभाप्र.

जयंत कुलकर्णी's picture

23 Apr 2015 - 8:28 am | जयंत कुलकर्णी

सगळ्यांना धन्यवाद !

गणेशा's picture

28 Apr 2015 - 1:23 pm | गणेशा

अप्रतिम ...

सर्व भाग एका दमात वाचून काढले .
छान लेखमाला …. !

पण आपण पुढील भाग टाकणार होतात विसरलात की काय ?

सोमनाथ चा भाग वाचण्यास उत्सुक ....