गुजरात....... २ दभोई
हे शिल्प बहुदा चांमुंडाचे किंवा कालिचे असावे. सातव्या शतकात योगिनींच्या पूजेस प्रारंभ झाल्यावर भारतात अनेक ठिकाणी त्यांची देवळे तयार झाली ( वर्तुळाकार असतात) त्यातील काही देवतांच्या मूर्ती स्वतंत्रपणेही आढळतात. मला शंका आहे कदाचित या मूर्ती तत्सम असाव्यात.
या देवतेखाली जे वाहन दाखविले आहे ते नीट दिसत नाही कारण छायाचित्र खालून काढले आहे. पण ही बहुदा सरस्वती किंवा ब्राह्मणी असावी.
एका देवतेचे वाहन उंदरासारखे दिसते तर दुसरीचे मनूष्य. उंदीर हे गणेशाचे वाहन आहे तर मनूष्य हे कुबेराचे. पण यात मला सुसंगती लागली नाही. अर्थात गणेशीचे शिल्प आपल्या येथे आहे पण कुबेरावरुन एखादी देवता असेल असे मला वाटत नाही. वल्लीने किंवा अजून कोणाला माहिती असल्यास यावर प्रकाश टाकावा.
शेजारच्याच देवळाच्या भिंतीत चिणलेला एक दगड. खाली अजून दोन दगडांची छायाचित्रे दिली आहेत.
ही बहुद उमा योगिनीचे शिल्प असावे. सप्त मातृकांनंतर स्त्रिशक्तीच्या विविध रुपांचे प्रतिनिधित्व मूर्तींमधे दिसू लागले त्याचेच हे उदाहरण.
आतल्या खांबांवर प्रकाश इतका मस्त पडला होता की फोटो काढण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
हिंदू देवळात हमखास आढळणारे शिल्प या माणसाचे असते. भारवाहक. अशी कल्पना आहे की हा आपल्या हाताने मंदीराचा भार उचलतो. काही भारवाहकांच्या शिल्पात त्याला तो भार वाहताना होणारे कष्ट स्पष्ट दिसतात. यात एक वेगळी गोष्ट मला आढळली ती म्हणजे त्याचे पाय. ज्या प्रकाराने ते गुडघ्यात वाकविलेले आहेत तसे अंतराळात/अवकाशात उडणार्या यक्षाचे दाखविले जातात. शिवाय याला चार हात आहेत. हा भारवाहक आहे का यक्ष ? का एखाद्या यक्षाला भारवाहकाचे काम दिले आहे ? (शिक्षा म्हणून ?)
थोडे उजवीकडे बघितल्यास एक छोटी कमान दिसते त्यावर ही मुद्रा आढळली. बहुतेक ही नजर लागू नये म्हणून जे कोहळे तामिळनाडूमधे घरावर टांगतात त्याप्रकारचे काहीतरी असावे पण खात्री नाही.
आपल्याकडे जसे गधेगाळ सापडतात त्याप्रमाणे येथे गधेगाळ नव्हता पण भिंतीवर तत्सम शापवाणी कोरली होती. व गधेगाळावर जशी मूर्ती असते तशी अस्पष्ट असे चित्रही कोरले होते. एक माणूस उत्साहाने आम्हाला ते दाखविण्यास घेऊन गेला व त्याने जे सांगितले ते ऐकून मी पडायचाच बाकी होतो. " पूर्वी राजाची राणी गाढवाबरोबर झोपायची त्याचे ते चित्र आहे'' त्याचे ताबडतोब शंका निरसन करण्यात आले व पुढे खरे काय तेच सांगावे असे त्याला बजाविले.
शेजारी जे मंदीर आहे त्याच्या कुंपणामधे जे दगड चिणले आहेत त्यावरील काही कोरीवकाम.
ही कमान बघून आम्ही हिराभागोलची चौकशी केली. त्यावरील नक्षिकाम अप्रतीम आहे त्याचा एक नमूना.....व बाकीची छायाचित्रे पुढच्या भागात.
याच ठिकाणी आम्हाला वढवाणा तलावाबद्दल माहिती कळाली आणि आम्हाला पक्षांचा खजिनाच सापडला तेही पुढच्या भागात.....
क्रमशः
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
14 Apr 2015 - 12:30 pm | मोदक
सुंदर प्रचि - पुढील भागाच्या प्रतिक्षेत!!
14 Apr 2015 - 12:55 pm | एस
+१
14 Apr 2015 - 1:13 pm | कपिलमुनी
सफर छान चालू आहे
14 Apr 2015 - 1:19 pm | पॉइंट ब्लँक
भारी माहिती आणि फोटो!
14 Apr 2015 - 1:39 pm | कंजूस
भारीच आहे.
14 Apr 2015 - 4:07 pm | प्रचेतस
दुसरी देवता कदाचित ब्राह्मणीच असावी. सरस्वतीची शक्यता कमी वाटतेय. कारण वाहन मोर असते तेव्हा त्याचा पिसारा लांबलचक दाखवलेला असतो. तसे येथे दिसत नाही.
तिसरी प्रतिमा गुंतागुंतीची आहे खरी. मूषकवाहिनी खरे तर गणेशिनी किंवा विनायकी असते मात्र तीचे मुख गणपतीसारखेच असते. शेजारची प्रतिमा बहुधा प्रेतवाहिनी चामुंडा असावी.
किंबहुना ह्या दोन्ही प्रतिमा गणेशिनी आणि चामुंडेपैकी नसून त्या योगिनींच्या असाव्यात.
पोपटाचे मुख असलेली योगिनी उमा का योगिनी शुकी?
14 Apr 2015 - 4:20 pm | जगप्रवासी
एकीकडे मोदक यांची इंदोर वारी तर तुमची गुजरात वारी, हे म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे …
14 Apr 2015 - 6:27 pm | स्पंदना
मस्त फोटोज. अगदी मेजवानीच!
14 Apr 2015 - 7:32 pm | अजया
मस्त सफर.पुभाप्र.
15 Apr 2015 - 12:38 pm | मॅक
फोटो आणी माहिती दोन्ही खूप छान.......
20 Apr 2015 - 4:58 pm | पैसा
फोटो पाहून डोळे निवले.
27 Apr 2015 - 5:15 pm | गणेशा
अप्रतिम