गुजरात.......५...... बडोदा-लोथल-जामनगर

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in भटकंती
20 Apr 2015 - 12:57 pm

बडोद्याला परत आल्यावर प्रथम शोध घेतला मला आवडणार्‍या एका पदार्थाचा. "उंधियो' याचा उच्चार हाच असवा असे वाटते. परंतू बडोद्यातील उंधियो हा पुण्यातील बाकरवडी असावी. बर्‍याच ठिकाणी उंधियो संपला अशा पाट्या लागल्या होत्या. शेवटी अलकापुरीत एका दुकानात आम्हाला तो गवसला. दुकानदाराने तो संपत आल्यामुळे जे काही राहिले होते ते प्रथम दाखविले व मग घेण्याचा विचार करावा असे सुचविले. गुजरातमधे एकंदरीत मला प्रामाणिकपणा आढळला. म्हणजे सुटे पैसे प्रत्येक ठिकाणी परत मिळत होते. सिगरेट योग्य भावात सगळीकडे मिळत होती.

बडोद्याला दोन वस्तूसंग्रहालये आहेत त्यातील एक राजघराण्यातीला कोणाचा तरी मृत्यू झाल्यामुळे बंद होते. दुसरे पाहिले ज्याचे नाव होते बडोदा म्युझियम. त्यातील काही गोष्टी सोडल्यास मला काही ते एवढे खास वाटले नाही. मुख्य म्हणजे प्रकाश योजनेची वाट लावलेली असल्यामुळे वस्तू पाहताना त्रासच होत होता. अजून एक गंमत म्हणजे अलकापूरीत आम्हाला संध्याकाळी चहा मिळाला नाही. आम्हाला कदाचित माहीत नसल्यामुळे असेल कदाचिते. दुसर्‍या दिवशी सकाळी जामनगरला निघायचे असल्यामुळे शहरातील फेरफटका आवरता घेतला.

सकाळी ८ वाजता गाडीला स्टार्टर मारला. आम्हाला महीसागर नदी पार करुन मधे लोथलला जायचे होते. लोथल हरप्पाच्या संस्कृतीचे एक महत्वाचे छोटे शहर होते. या शहरात त्याकाळातील वास्तूशास्त्राचे व आभियांत्रीकीचे विश्वास बसणार नाहीत अशी उदहरणे पहावयास मिळतात. असे म्हणतात ही संस्कृती वसली ७००० बी.सी या काळात, पण याचा सर्वोच्च काळ होता अंदाजे २५०० बी.सी या काळात. तरी २५००+२००० म्हणजे जवळजवळ ४५०० वर्षापूर्वी. त्या काळातील विटांचा एक सारखा आकार पाहून मला वाटले की या विटा हल्लीच्याच आहेत. या वीटा उन्हात वाळवून तयार केल्या गेल्या आहेत. लोथलला मणी तयार करण्याचा कुटीर उद्योग होता. हे मणी जगात दुरदुरवर सापडले आहेत. खड्याएवढ्या मण्यांना ज्या प्रकारे भोके पाडलेली दिसली त्याने खरोखरेच अचंबित झालो. बरेचसे मणी हे अगेटचे आहेत. खंबातमधे अजूनही या प्रकारे मणी तयार करण्याची कला काही जमातीत अस्तित्वात आहे. काही काळापूर्वी सिद्दी जमातीची माणसे अगेट गोळा करण्याचे काम करीत. आता माहीत नाही. फक्त तेथे सापडणार्‍याच खनिजांपासून मणी तयार करण्यात येत असे नव्हते. लोथलचे व्यापारी सार्‍या भारतात हिंडून वेगवेगळे खडे व दगड गोळा करीत. लोथलमधे बंद गटारे, विहिरींचे जाळे ठिकठिकाणी दिसतात. लोथलवरुन आफ्रिकेशी व ग्रीसशे व्यापार चालत असे.
एक विहीर.....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

लोथलवासियांना समुद्राच्या भरती ओहोटीचे संपूर्ण ज्ञान होते असे म्हणावे लागेल तसेच साबरमतीच्या सतत बदलणार्‍या पात्राचा अभ्यास करुन त्यांनी ही वसाहत उभी केली असणार......

अगेट तापविण्याची, शिक्के भाजण्याची भट्टी
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

मण्याचा कारखाना
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

छोटी गोदी जी खालील कल्पनाचित्रातही दिसत आहे....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

खंबातच्या आखातात समुद्रात असणार्‍या मोठ्या जहाजातून माल गुजरातमधे आणण्यासाठी व जहाजावर माल चढविण्यासाठी त्यांनी मोठी नामी कल्पना लढविली होती जी आपल्याला खालील चित्रावरुन दिसते.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire
काही तज्ञांच्या मते हे असे काही नसून तो आपला एक पाणी साठविण्याचा तलाव आहे....

ज्यांना भुतकाळात रमायला आवडते व ज्यांची कल्पना शक्ती तीव्र आहे अशांना ही जागा आवडेल. म्हणजे आपल्याला मनाने त्या काळात जावे लागते. हे शक्य नसेल तर मात्र ही जागा अत्यंत कंटाळवाणी होऊ शकते.... अर्थात तेथील वस्तूसंग्रहालयही उत्तम आहे. उत्तम माहीती पुरवते. दुर्दैवाने आसपास बराच कचरा आहे बहुतेक महिन्यातून एकदाच साफ करत असावेत. असो लोथलची पूर्ण माहिती इंटरनेटवर उपलब्ध असल्यामुळे जास्त लिहित नाही.

तीन वाजून पन्नास मिनिटांनी राजकोटमधून चाललो असताना डॅशबोर्डकडे लक्ष गेले. बरोबर १००० किमीचा आकडा दिसत होता. उरलेल्या तिघांनी टाळ्यावाजवून त्या आकड्याचे स्वागत केले. बरोबर ६.२० ला जामनगरला राहण्याच्या ठिकाणी पोहोचलो. त्या दिवशी मात्र संध्याकाळी माफक मद्यपान करुन आराम केला. दुसर्‍या दिवशी लखोटा तलाव व त्यातील वस्तूसंग्रहालय पाहिले. ठीक होते. पण तलावात असंख्य सीगल उडत होते व येणारे जाणारे त्यांना खाद्य पुरवीत होते. ते दृष्य मात्र मला बिलकूल आवडले नाही. मी पक्षांना अशा प्रकारे खायला घालण्याच्या अत्यंत विरुद्ध असल्यामुळे असेल कदाचित.

दुसर्‍या दिवशी खिजाडीया बर्ड सँक्चुअरीला जायचे होते. तेथे मात्र आमची घोर निराशा झाली. एक तर तेथे फारच थोडे पक्षी होते कारण कमी पाऊस झाला होता व जे थोडे फार होते ते इतके दूर होते की आम्हाला दुर्बीणीतून पहावे लागत होते. तेथे एक पक्षांची माहिती देणारे म्युझियम आहे ते मात्र चांगले आहे. आता तेथे काहीच बघण्यासारखे नसल्यामुळे परत मुक्कामास परत आलो. दुसर्‍या दिवशी नॅशनल मरीन पार्कला भेट द्यायचा विचार होता. ते मात्र फारच भारी होते.

हे भारताचे पहिले मरीन पार्क आहे व आवर्जून पहावे असे आहे. आम्ही पिरोटानचा भाग पाहिला.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

याला भेट देताना प्रथम ओहोटी भरतीच्या वेळा माहिती करुन घ्याव्या लागतात. ओहोटीच्या वेळी या पार्कमधे घोट्याएवढेच पाणी असते तर भरती मधे ते छातीपर्यंत येते. वनखात्याचा गाईड घेऊन जाणे अनिवार्य आहे. या पार्कमधे चालण्यासाठी आपण नेहमी जे स्पोर्ट शू वापरतो ते घालावेत कारण खालची जमीन ओबढधोबढ आहे. अर्थात याने फक्त पायाचे संरक्षण होते. तेथे मात्र जर धारधार रुतलेल्या शिंपल्यावर पाय पडला तार बुट चिरलाच समजा. यासाठी तेथे उपलब्द्ध असलेले गमबुट घालण्यासाठी भाड्याने घ्या असे तुम्हाला सांगण्यात येइल पण अशी चूक चुकुनही करु नका कारण ते गमबूट आपल्या मापाचे नसतात व त्याची वरची कड आपल्या पोटर्‍यांना घासून हमखास जखम होते. हे आपल्या मापाचे आहेत की नाही हे ४/५ मैल चालल्याशिवाय कळत नाही आणि तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. आपले बूट समजा चिरले तर फेकून द्यायचे व बडोद्याला नवीन घ्यायचे. अशी सोय तळपायासाठी नसल्यामुळे आपले नेहमीचे बुट घालवेत हे बरे... बूट ओले होतात तेव्हा दिसरा जोड बरोबर अवश्य घेऊन जावा. डोक्यावर टोपी आवश्यक व पिण्याचे पाणी....ते बहुदा कोणी विसरत नाही म्हणा..... कॅमेरा जर बरोबर नेलात तर लेन्स पुसायचे कापड हाताशी ठेवा....

या पार्कमधे समुद्रजिवनाचा एक नमुनाच नजरेस पडतो. गाईड अत्यंत अनुभवी असल्यामुळे त्याला साधारणतः कुठल्या दगडाखाली काय सापडेल याचा अंदाज असतो. आपल्या नशिबात असेल तर आपल्याल बरेच समुद्री जीव दिसतात. आम्हाला दिसलेले काही.....

सी-अ‍ॅनिमल. हा स्पर्ष झाल्यावर खाली जमिनीत एका सेंकदात नाहीसा होतो व वरती फक्त एक छोटेसे टोक राहते. वर जी भोके दिसतात त्यातून हा आपले खाद्य गिळतो...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

आम्हाला नशिबाने दिसलेला ऑक्टोपस.....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

कोरल...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

सागरी वन्स्पती....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

कोरल क्रॅब
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

अजून एका प्रकारचा क्रॅब...याचे नाव विसरलो....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

समुद्री काकडी.....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

हे सगळे सागरी प्राणी हाताळायला मिळत होते. ते अदभूत सागरी विश्र्व बघून, खोल समुद्रात काय भयंकर मायावी दुनिया असेल याचा विचार करुन आम्ही गप्प झालो. प्राणी बघून झाल्यावर आमचा गाईड ज्या ममतेने एखाद्या बाळाला पाण्यात सोडावे तसे त्या प्राण्यांना परत पाण्यात सोडत होता ते पाहून या असल्या माणसांच्या ताब्यात ते मरीन पार्क सुरक्षित आहे याची खात्री वाटली.......

हा अनुभव एकंदरीत लक्षात राहण्यासारखा व एकदा तरी घेतलाच पाहिजे......असा विचार करत आम्ही परतीच्या रस्त्याला लागलो....उद्या द्वारकेला जायला निघायचे होते....

क्रमशः
जयंत कुलकर्णी.
स्केचेस व विहिरीचे चित्र जालावरुन साभार....

प्रतिक्रिया

शैलेन्द्र's picture

20 Apr 2015 - 2:27 pm | शैलेन्द्र

मस्त..

हा भाग मात्र जास्त आवडला कारण नेहमीच्या पर्यटनापेक्षा वेगळे दाखवलेत.

रुपी's picture

22 Apr 2015 - 5:28 am | रुपी

लोथल आणि मरीन पार्क दोन्हीचीही माहीती आवडली. खरंच एकदा घेण्यासारखा अनुभव आहे.