मी पाहिलेल्या मोजक्या तेलुगु चित्रपटांपैकी हा एक चित्रपट – ओय!
वरवर पाहता एक तरल प्रेमकथा. टॉलिवूडी हाणामारी, भडक विनोदाचे केविलवाणे प्रयत्न तुलनेने कमी. ही ठळक वैशिष्ट्ये चित्रपटाला इतर टिपिकल सौदिंडियन चित्रपटांपासून वेगळे बनवतात.
कथेचा नायक उदय (सिद्धार्थ) हा अतिश्रीमंत घरातला, तर नायिका संध्या (शमिली) आई-वडिल गमावलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील. दोघांच्या विचारसरणीत जमीन-अस्मानाचा फरक. ती अतिशय टापटिपीची, तर हा पसारा करणारा. ती पै न पै वाचवणारी, तर हा उधळ्या. ती अतिशय देवभोळी, हा देवावर फारसा विश्वास नसणारा. याची रात्र पब नि डिस्कशिवाय जाणार नाही, तर तिला पब-डिस्कबद्दल काडीचेही आकर्षण नाही. तिच्या लेखी आयुष्य खूप आहे, चिरंतनतेवर तिचा विश्वास आहे. त्याच्या लेखी आयुष्य छोटे आहे आणि सर्वच अशाश्वत आहे.
या दोन ध्रुव असलेल्या जीवांची भेट घडते ती ३१ डिसेंबरच्या पार्टीत, एका पबमध्ये! पबसारख्या ठिकाणी शांतपणे दुस-या दिवशीची कामे डायरीत टिपून घेणा-या मुलगी बघून याला फार कुतुहल वाटते. फ़्लर्ट करण्याचा एक अयशस्वी प्रयत्नही तो करतो, पण कुतुहल काही शमत नाही. अखेर आपल्या मित्राच्या सहाय्याने तो तिचे घर शोधून काढतो.
आपल्या वडिलांच्या मृत्युपश्चात उदय कंपनीची सूत्रे आपल्या हातात घेतो. उदयचे कुतुहल आता प्रेमात बदलत जात असते. तिच्यासाठी म्हणून तो हैदराबादच्या ऐवजी विझागला येतो आणि अनेक खटपटी करुन तिच्या घरी भाडेकरु म्हणून राहतो.
तिच्या जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षांमध्ये उदय कुठेच बसत नाही हे जाणून असतो, पण तरीही तो तिला इंप्रेस करायचे प्रयत्न चालूच ठेवतो. तिच्या वाढदिवसाच्या रात्री तिला शुभेच्छा देऊन आश्चर्याचकित करतो. १२ महिन्यांचे प्रतिक म्हणून १२ भेटवस्तू देतो. ११ भेटवस्तू या अत्यंत क्षणभर टिकणा-या, पण तरीही आनंददायक आहेत. तिची शाश्वततेची आवड लक्षात घेऊन शाश्वत भेट म्हणून स्वत:च्या प्रेमाची कबुली देतो.
तिचा होकार तिच्याकडून थेट न कळता इन्शुरन्स पॉलिसीचा वारस असल्याच्या पत्राने कळतो. पण हा आनंद फ़ार काळ टिकत नाही. मेडिकल चेक अपमध्ये तिला कॅंसर असल्याचे कळते. क्षणिक गोष्टींची त्याची आवड उदयसमोर एक भयाण रुप घेऊन येते. ही गोष्ट अर्थातच उदय तिला सांगत नाही.
आयुष्यात एकदातरी करायच्या गोष्टी गप्पांमधून उदय तिच्याकडून वदवून घेतो आणि त्या सर्व इच्छा पूर्ण करतो. पण अखेर तिचे शेवटचे क्षण जवळ येतातच. तिच्या आजवरच्या सर्व कल्पनांना, विचारांना धक्का बसतोच. आपण समजत होतो तितकेही आयुष्य मोठे नव्हते हे भयाण सत्य अखेर समोर येतेच.उदयच्या वाढदिवसाला आपल्याजवळच्या जपून ठेवलेल्या आठवणी व इतर काही गोष्टी भेट देते. क्षणिक टिकणारी भेट म्हणून तिचे प्रेम कबूल करते.
दोन अतिशय भिन्न विचारसरणी असणा-या व्यक्ति अपघाताने जवळ येतात, पण नियती दोघांना त्यांच्या विचारांचे भयाण रुप दाखवते याशिवाय वेगळा दैवदुर्विलास तो काय असावा?
वेगळ्या वाटेवरची कथा म्हणून चित्रपट मला भावलाच. त्याहीपेक्षा, दिग्दर्शकाचा संयतपणा जास्त आवडला. दोघांच्या आवडी-निवडी, आचार-विचार यातला फ़रक दाखवण्यासाठी घेतलेली पहिली काही मिनिटे अगदी बोलकी आहेत. सहाय्यक कलाकारांचा उत्तम अभिनय. ’ए’ सर्टिफ़िकेटसाठी आवश्यक तो मसाला वापरण्याच्या अनेक संधी असूनही तो दिग्दर्शकाने कटाक्षाने टाळला आहे. यासाठी आनंद रंगा यांना १० पैकी १० गुण. श्रवणीय गाणी व उत्तम लोकेशन्स यामुळे चित्रपट अतिशय उठावदार झाला आहे.
प्रतिक्रिया
9 Mar 2015 - 4:41 am | श्रीरंग_जोशी
फारच हॄदयस्पर्शी दिसत आहे कथानक. या चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. सिद्धार्थचा अभिनय आवडतो.
हा चित्रपट नक्की पाहीन.
9 Mar 2015 - 5:38 am | स्पंदना
कॉलेजीयन्सना आवडेल असा चित्रपट दिसतोय.
लेखन आवडले.
पुलेशु.
9 Mar 2015 - 7:32 am | अत्रुप्त आत्मा
हम्म्म ! बगाया पायजेन. पण तेलगु हाय, मग कळन काय??? असा इचार मनात येतुया.
9 Mar 2015 - 5:37 pm | बॅटमॅन
सबटायटल्स घ्या की डौन्लोडवून. कळेल मग.
9 Mar 2015 - 7:35 am | रेवती
हम्म.....हिरवीन मरते म्हंजे शिनेमा बघण्यातली मजा जाणार.
तो बुवा कोणत्यातरी हिंदी शिनेमात बघितल्यासारखा वाटतोय, पण त्यालाही बरीच वर्षे झालीयेत. आतापावेतो हा आजोबाचे रोल्स करायला लागायला हवा होता.
9 Mar 2015 - 7:44 am | श्रीरंग_जोशी
तो रंग दे बसंतीमधला एक नायक आहे.
मला टॉलिवूडी चित्रपटांचा तिटकारा असला तरी याचे चित्रपट आवडतात. मागे लव्ह फेल्युअर (त्यांच्या उच्चारानुसार लऊ फेल्युअर ;-)) थेटरात जाऊन पाहिला होता. याचाच कोंचम इष्टम कोंचम कष्टम पण चांगला चित्रपट आहे.
अवांतर - असे चित्रपट आवडणार्यांना कियानू रिव्ह्जचा स्वीट नोव्हेंबर नक्कीच आवडेल.
9 Mar 2015 - 6:46 pm | रेवती
धन्यवाद पंत!
9 Mar 2015 - 7:54 pm | यशोधरा
असं काय म्हंते गं त्या सिद्धार्थला! >:-|
9 Mar 2015 - 7:54 am | सिरुसेरि
सिद्धार्थचे तेलुगुमध्ये 'नुवस्तानन्दे निनेन्दोताना' व 'बोम्मिरुलु' हे चित्रपटही खुप गाजले आहेत . बाकी , इतर थोड्या वेगळ्या विषयांवरच्या तामिळ , तेलुगु चित्रपटांमध्ये ऑटोग्राफ , अंजली , इरुवर , इंदीरा हे चित्रपट चांगले वाटले .
9 Mar 2015 - 8:35 am | नाखु
परिक्षण कम गोषवारा.
काही कन्न्ड्-तेलगू सिनेमे पहाताना भाषेचा अडथळा रहात नाही .मी बेंगलूरात पाहिलेला एकमेव तेलगू की तमीळ चित्रपट "कादलन" (तोच नंतर हिंदीत डब करून हम से है मुकाबला या नावाने आला)
आणि गाण्यांसाठी २-३ वेळा पाहिला.
दुर्दैवाने असे चित्रपट हिंदीत डब न होता "ताबडतोड हाण्णामारीचे" हिंदीत पहाण्याचे भाग्य (?) आहे.
9 Mar 2015 - 11:04 am | जेम्स बॉन्ड ००७
http://en.m.wikipedia.org/wiki/A_Walk_to_Remember
9 Mar 2015 - 11:23 am | पिशी अबोली
मलाही वॉक टू रिमेंबर आठवला.. पण सिद्धार्थ आवडतो.. त्यामुळे हा सिनेमा मिळाला तरी बघणार..
9 Mar 2015 - 11:24 am | अन्या दातार
@श्रीरंग्_जोशी - कोंचम इष्टम कोंचम कष्टम नाकु चाला इष्टम :D
@स्पंदना - सहमत
@सिरुसेरि - तुम्ही सांगितलेले चित्रपट बघितले नाहीत. मिळाल्यास नक्की बघेन. बोम्मरिलू बघितलाय. पण त्यात प्रकाश राज जास्त भाव खाऊन जातो. तसा तो कोंचम... मधेही खातोच.
@अत्रुप्त - सबटायटल्स कृपेने कळेल :)
@नादखुळा - या चित्रपटाबद्दल लिहायचे होतेच. परीक्षण हा शब्द खुप मोठा वाटतो या लेखासाठी. गोषवारा मान्य, कारण फार काही लिहायची गरज नाही. का आवडला हे थोडक्यात सांगायचे होते.
9 Mar 2015 - 11:47 am | असंका
कोंच्म तर लयच भारी!! शिवाय आदवरी माटलकू अर्थाले वेरुले, १००% लव, हॅपी डेज, मगधीरा...एकदम चकाचक असतात !
9 Mar 2015 - 2:24 pm | सूड
बघायला पाह्यजे!!
9 Mar 2015 - 4:32 pm | मुक्त विहारि
धन्यवाद...
9 Mar 2015 - 6:00 pm | अनय सोलापूरकर
सिनेमा आहे
9 Mar 2015 - 7:47 pm | बोका-ए-आझम
जर पहायला मिळाला तर सिद्धार्थचा ' स्ट्रायकर ' नावाचा एक चित्रपट जरुर पाहा. 'मै माधुरी दीक्षित बनना चाहती हूं ' बनवणा-या चंदन अरोराचा आहे. झोपडपट्टी, तिथलं वास्तव, राजकारण्यांकडून होणारा त्यांचा वापर आणि सर्व झोपडपट्ट्यांमध्ये रंगणारा कॅरम हे प्रतीक. सुंदर आहे पण फार चालला नाही. मिळाला तर जरुर पाहा. सिद्धार्थचा अभिनय अप्रतिम आहे त्यात.
9 Mar 2015 - 7:56 pm | यशोधरा
चित्रपट परी़क्षण आवडले.तू नळीवर असल्यास पाहिला जाईल.
10 Mar 2015 - 4:20 pm | रेवती
आहे तूनळीवर. चित्रपट चांगला असेलही पण मी १५ मिनिटात संपवला. ५ मिनिते सुरुवातीला, ५ मि. मध्येच कुठेतरी आणि ५ मिंटे शेवटास. झाला बघून!
10 Mar 2015 - 5:48 pm | श्रीरंग_जोशी
हे वाचून
हे आठवले :-) .
10 Mar 2015 - 5:58 pm | रेवती
शिनेमा बघण्याचा पेशन्स नसल्याने बरेच शिनेमे अशाच प्रकारे बघते. अनेकदा चांगली गाणी कधी येतात, जातात कळत नाही. मग अनेक महिन्यांनी, वर्षांनी दुसर्या मनुष्यामुळे शोध लागतो. मला माहित असलेल्या अनेक चांगल्या गाण्यांचे श्रेय मिपा व आजूबाजूच्या मित्रमंडळींना आहे.
10 Mar 2015 - 6:09 pm | श्रीरंग_जोशी
अतिशय रटाळ चित्रपट जे बहुतांश लोक निम्म्यातून सोडून देतात ते मी (एकदाच बरं का) व्यवस्थितपणे पूर्ण पाहतो.
आता काहीतरी विशेष घडेल मग काहीतरी विशेष घडेल हा माझा आशावाद कधीच संपत नाही :-) .
10 Mar 2015 - 6:16 pm | रेवती
ही ही ही.
11 Mar 2015 - 12:18 am | स्रुजा
हाहा ! मला आशा नसते पण अजून किती रटाळ माणूस सिनेमा बनवू शकतो याचं मात्र तुफान कुतुहल ! मी मितवा, बाजी असाच शिव्या घालत घालत ३ चे ४ तास करून पाहिले. लय मोठी यादी आहे अशा सिनेमांची. काही नाही हो रिकामटेकडे पणा आहे (मीच म्हणून घेते) ;)
10 Mar 2015 - 7:40 am | स्रुजा
छान परिचय ! आणि लिंक दिल्याबद्दल आभार. या वीकांताला पाहेन आता आणि माझा फीड्बॅक देईन.
10 Mar 2015 - 12:35 pm | इनिगोय
लेख आवडला.
शेवट वाचून सिटी आॅफ एंजल्स आठवला. अर्थात बाकी काही साम्य नाही.
10 Mar 2015 - 1:09 pm | कुसुमावती
परीक्षण जमलयं. चित्रपट बघितला पाहिजे.
11 Mar 2015 - 12:27 am | आनन्दिता
मला वाटायचं असले पिक्चर बघणारी मीच एकटी का काय? पण इतकी जनता बघुन हायसं वाटलं. मला पण टॉलिवुड मुव्हीज खुप आवडतात. त्यातल्या त्यात तेलुगु. मी बरेच तेलुगु पिक्चर पाहिलेत, अन या सवयीमुळे मित्र परिवारात चेष्टेची धनी ठरली आहे.
नानी नावाचा हिरो मला जाम आवडतो. अलु अर्जुन चा डान्स तोबा तोबा ! ती आर्या मधली हिरवीन कुठे गायब झाली देव जाणे.
सध्या समांथा रुथ प्रभु, निथ्या मेनन माझ्या आवडत्या अभिनेत्री आहेत.
निथ्या आणि नानी चा " आला मोदिलाईंदी" माझा ऑल टाईम फेवरेट आहे. धम्माल चित्रपट आहे.
http://www.youtube.com/watch?v=48sbb_iWfZs
जिनिलिया बाई देशमुख आणि सिद्धार्थ चा बोमरिल्लु पण भारी आहे. पण त्याही पेक्षा भारी आहे तो अलु अर्जुन बरोबरचा तिचा " हॅपी" धमाल कॉमेडी आहे. मनोज वाजपेयी सारखा हाडाचा नट पिक्चर मधे असुनही, अलु अर्जुन आणि जेनिलिया लक्षात राहतात.
http://www.youtube.com/watch?v=8ZU7JtcWwPs
समांथा आणि नागर्जुनच्या मुलग्याचा मुव्हि, नाव नीटसं आठवत नाहीय ये माये चेसवे की कायसं आहे. चांगला आहे
11 Mar 2015 - 12:30 am | स्रुजा
घ्या आता हे सगळं बघणं आलं ! किती वेळ काढायचा मी सिनेमे बघायला.
11 Mar 2015 - 3:35 am | यशोधरा
बोमारिल्लु पाहिलाय मी, मस्तच आहे तो सिनेमा.
11 Mar 2015 - 5:07 am | अन्या दातार
ये माया चेसावे!! तोच तो! अफलातून पिक्चर. कितीही वेळा बघितला तरी पुनःपुन्हा बघावा वाटतो. ए.आर. रेहमान ही काय चीज आहे हे त्याने दाखवून दिलंय यात.
11 Mar 2015 - 8:19 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
परिक्षण आवडलं रे अन्या.
11 Mar 2015 - 10:02 am | सिरुसेरि
ये माया चेसावे हा गौतम मेनन या दिग्दर्शकाचा सिनेमा आहे . गौतम मेननच्या बरयाच चित्रपटांचे हिंदीमध्ये रीमेक झाले आहेत ( मिन्नाले - RHTDM , काखा काखा - फोर्स ,ये माया चेसावे - एक दिवाना था ). पण हिंदीमध्ये ते एवढे चालले नाहित . जिनिलिया आणि सिद्धार्थ यांचा BOYS हा सिनेमा ए. आर. रहमानच्या संगीतामुळे माहीत आहे . राजीव मेनन या दिग्दर्शकाचा 'कुन्डिकोंडन कुन्डिकोंडन' हा तामिळ सिनेमा कथा , सादरिकरण , ऐश्वर्या राय - मामुटि - अजित - तब्बु असे कलाकार आणि ए. आर. रहमानच्या संगीतामुळे खुप गाजला .
11 Mar 2015 - 10:05 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
RHTDM चालला नाही? :O...
11 Mar 2015 - 11:14 am | सिरुसेरि
मिन्नाले जेवढा दक्षिणेत चालला त्यामानाने RHTDM इतर / बिगर दक्षिण भागांत चालला नाही .