मिसळपावच्या वाचकांसाठी काही "दारोळ्या ..............."
प्रत्येक तळीराम पिताना सांगतॊ
मी दारू सॊडणार आहे
दारू म्हणते़ तुझा संकल्प
मीच ऊद्या मॊडणार आहे
***************************************
दारूडे बेहॊष हॊईन कॊसळतात
तेव्हा कींकाळी फॊडत नाहीत
याचा अर्थ असा नाही की
त्यांची हाडे मॊडत नाहीत
***************************************
माझ्या हसण्यावर जाऊ नका
माझ्या रूसण्यावर जाऊ नका
एकदा प्यायला बसलॊ की
माझ्या असण्यावर जाऊ नका
***************************************
मी आहेच जरा असा
एकटा एकटा राहणारा
कुणीही पिताना दिसला॰॰॰
की आशेने पहाणारा
***************************************
घराभॊवती कुंपण नकॊ
म्हणजे नीट आत जाता येत
बायकॊने नाही ऊघडल दार
तर पायरीवरच झॊपता येत
***************************************
सगळीच वादळ मी
खिडकीत बसुन सॊसली
अन् ही बाटलीसुद्धा
खिडकीत बसुनच ढॊसली
***************************************
पाजणार कॊणी असेल तर
प्यायला तरूण तुर्क आहॊत
स्वतःच्या पैशानी प्यायला
आम्ही काय मुर्ख आहॊत?????
***************************************
नेहमीच काव्याने नशा करू नये
कधी मद्यालाही वाव द्यावा
तहानलेल्या बेवड्या रसिकांना
पाजुन थॊडा भाव द्यावा
***************************************
दारूचा गुत्ता कसा
कुठेही ऊगवतॊ
कुठेही ऊगवतॊ म्हणून
पिणार् यांना जगवतॊ........
***************************************
सण असतील हाज़ार एक
पण गटारी लाखात एक
आनंदाचे डोही आनंद तरंग
गटारी च्या तयारीत आम्ही झालो दंग
***************************************
आयुष्यात कधी ना कधी
आपण स्वत:ला
काही महत्त्वाचे प्रश्न
विचारलेच पाहिजेत...
आपण कोण आहोत?...
कोठून आलो आहोत?...
कोठे निघालो आहोत?...
आणि जेव्हा तिथे पोहोचू
तेव्हा
तिथले
बार उघडे असतील का?!!!
***************************************
रिकामी बाटली अलगद
माझ्या हातामधून पडली
तेव्हाच मला कळलं
आता खूप आहे चढली...
***************************************
इथं बेवडं असण्याचे
खूप फायदे आहेत
घरमालकापासून वाण्याला
रोज नवे वायदे आहेत ...
***************************************
तुला वजा केल्यावर
साकी काहीच उरत नाही
तुझ्याशिवाय मी चषक
हातातच धरत नाही...
***************************************
ग्लासात पुन्हा ओतताना
तुला कुंपणाबाहेर मी पहिलं
मी येऊ शकलो नाही. कारण
शरीर उभंच नाही राहिलं...
****************************************
तू नशेत असणं
किती छान असतं
कारण त्याच वेळी तुला
स्वतःचं भान असतं...
****************************************
ठाउक असतं आता पिणं अशक्य आहे
तरी मी हातातला चषक सोडत नाही
कुठं तरी मिळालीच जर बाटली
तर ग्लासाशिवाय अडत नाही...
****************************************
चढणं आणि पडणं
यात बरंच अंतर आहे
पाचव्या पेगपर्यंत चढणं
पडणं त्यानंतर आहे...
****************************************
तू माझ्यावर रागावणं
ही रोजचीच कहाणी आहे
तू दिसलीस की ती उतरते
तशी माझी नशा शहाणी आहे...
****************************************
तेव्हा मी माझ्यापेक्षा
तुलाच आवरायला हवं होतं
कारण मी बहकल्यानंतर
तूच सावरायला हवं होतं...
****************************************
मला वाटलं होतं मी पडल्यावर
तू मागे वळून पाहशील
वळून पाहण्याइतका तरी
तू नक्कीच शुद्धीवर राहशील....
****************************************
इथं प्रत्येकजण आपापल्या घरात
अन प्रत्येकाचा हातात ग्लास आहे
तरी निर्व्यसनीपणावर बोलणं
हा प्रत्येकाचा ध्यास आहे...
****************************************
मी पडताना माझा गाव
ओझरता पाहिला होता
मला पहायला सगळा गाव
गुत्त्यात जमून राहिला होता...
****************************************
गुलमोहर घोरताना
आधी उशीआडून पहावं
क्वार्टर खिशात टाकून
मग खिडकीमधून निघावं....
****************************************
गुत्त्यामध्ये प्रत्येकाला
खूपसं सांगायचं असतं
येताना चालायचं' तर
जाताना रांगायच असतं...
****************************************
तू भिजत असताना तुझ्यासमोर
मी रमची बाटली धरली
तू पीत राहिलास एकटाच
नि मला हुडहुडी भरली
****************************************
आता मलाही लागलंय जमायला
तुझ्यासारखं वागणं
चार मित्र जमले की
ग्लास शोधायला लागणं
****************************************
सगळीच माणसं वरुन
निर्व्यसनी दिसतात
वासावरुन कळतं
काही तळीराम असतात
****************************************
मद्याचा एक घोट चुकून
माझ्या घशात येऊन पडला
माझ्या साकीच्या बंगल्यावर
आणखी एक मजला चढला
****************************************
नुसतंच बरोबर बसलं तर
ती मैफल होत नाही
आणि चषक हातात नसला तर
ती सफल होत नाही
****************************************
मद्य असं
ओतल्यासारखं वाहिलं
ओंजळीनंच प्यायलो
पाणी घालायचं राहीलं
****************************************
भट्टीकाठचा पोलीस
दादाशी सलगीनं वागायचा
कारण त्याला जगायला
दादाचा हप्ता लागायचा
****************************************
.
.
.
अर्थातच "नेटवरून" साभार ..................
अजून बर्याच आहेत..... पाहू ................
पक्का निर्व्यसनी [ छोटा डॉन]
प्रतिक्रिया
26 Dec 2007 - 9:41 pm | धनंजय
पहिल्या काही चारोळ्या नीट वाचल्या त्या गमतीदर आहेत. गुत्त्यावर परत येऊन बाकी माल चाखून बघीन म्हणतो. कडक देशीसारखे या प्रकाराचे एका वेळी काहीच घुटके रिचतात.
(देशीसाठी नेहमी नाक बंद करावा लागणारा [मग "येड्या तुला त्या वाटेला कोणी जायला सांगितले" असे निमूट ऐकणारा])
धनंजय
26 Dec 2007 - 10:08 pm | सुनील
व्वा!! ३१ डिसेंबर हाकेच्या अंतरावर आलेला असताना तुमच्या "दारोळ्या" देखील आल्या.
काय टायमिंग आहे!!!!
(नववर्षसंध्येची आतुरतेने वाट पाहणारा) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
27 Dec 2007 - 11:49 am | शरुबाबा
दारूडे बेहॊष हॊईन कॊसळतात
तेव्हा कींकाळी फॊडत नाहीत
याचा अर्थ असा नाही की
त्यांची हाडे मॊडत नाहीत
काय बात आहे
27 Dec 2007 - 6:38 pm | सुधीर कांदळकर
सत्य हा एक भ्रम आहे जो दारूच्या अभावाने निर्माण होतो. मिसळपावच्या सर्व लेखकांस तसेच वाचकांस ३१ डि. च्या शुभेच्छा.
28 Dec 2007 - 12:29 pm | विसोबा खेचर
म्हणतो!
दारोळ्या सुंदर आहेत! सर्वांनी ३१ डिसेंबरला आपापल्या वकुबाप्रमाणे आपापल्या आवडीचं मद्य पिऊन २००७ ला निरोप देऊया!
आपला,
(सिंगल माल्ट प्रेमी) तात्या.
26 Mar 2008 - 8:55 am | सृष्टीलावण्या
सगळीच वादळ मी
खिडकीत बसुन सॊसली
अन् ही बाटलीसुद्धा
खिडकीत बसुनच ढॊसली
>
>
मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला ।
सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।