गावात आमच्या घराच्या समोर एक वाडा होता.त्याला अम्ही चांभारवाडा म्हणायचो.प्राथमीक शाळेत शिकण्याची त्यावेळी पण सक्ति असल्याने ह्या वाड्यातली बरीच मुलं आम्ही ज्या शाळेत जात असू त्या शाळेत शिकायला यायची.मी जवळ जवळ सातवी पर्यंत ह्या शाळेत शिकलो.आणि नंतर मुंबईला पुढच्या शिक्षणासाठी आलो.माझ्या शाळेत त्यावेळेला ह्या चांभारवाड्यातल्या मुलां पैकी पांडूरंग मोची नावाचा मुलगा होता.तो खेळायला हुषार असल्याने शाळेत तसा प्रसिद्ध होता.त्याची माझी शाळेतली ही ओळख त्यादिवशी खूप वर्षानी परत उजळणीला आली.
मी चर्चगेट स्टेशनवर पाचपस्तिसच्या विरार डबलफास्ट गाडीची वाट पहात उभा होतो. गाडी प्लॅटफॉर्मवर येऊन थांबण्यापुर्वीच खिडकी मिळण्यासाठी चढणार्यापैकी मी एक होतो.मला खिडकी मिळाली नाही.पण जो खिडकी पकडून माझ्या समोर बसला होता तो पांडूरंग असावा हा अगदीच योगायोग होता."तुम्हाला खिडकीकडे बसायचं आहे कां?" असं दिलखूष होऊन त्याने मला विचारलं.पण मी "नो थॅन्कस" असं सांगितलं.पण तो आग्रहच करू लागला त्यावेळा त्याला बरं वाटावं म्हणून मी त्याच्या बरोबर सीट बदलली.
गाडी चालू झाल्यावर एक वर्तमानपत्र उघडून तो वाचू लागला."वैनतेय वेंगुर्ले" ह्या नावाचा तो पेपर पाहून हा आपल्या गावातलाच आहे असं समजून त्याच्याशी अधीक विचारणा केली.वेंगुर्ल्याला तो कुठे राहत होता याचा त्याने पत्ता दिल्यावर आणि त्याचं नांव पांडूरंग मोची असं सांगितल्यावर माझी ट्युब-लाईट पेटायला जास्त वेळ लागला नाही.
पांडूरंग मला म्हणाला,
"मी शाळा सोडली,माझं अभ्यासात लक्ष लागेना."
मी त्याल म्हणालो,
"अरे पण तू शाळेत सर्व खेळाच्या कार्यक्रमात भाग घेऊन बक्षीसं मिळवायचास ते मला चांगलं आठवतं."
त्यावर पांडूरंग मला म्हणाला,
"मलाच कळत नाही की मी अपयशी व्हायचं कां ठरवलं.पण एव्हडं खरं की मी अगदीच त्यावेळी लहान होतो.साधारण चवथीत असताना मी प्रयत्नच सोडून दिले.सातवीत जाईपर्यंत मी अगदी बिघडलेला होतो.आळशी,बंडखोर,निरादारपूर्ण होतो.सामाजिक आकर्षण गमावून बसलो होतो.
त्यानंतर काही दिवसनी मी शाळा सोडली.आणि माझी घसरंड चालू झाली.किशोर वयात आल्यावर मला आंगमेहनीतीची कामं करावी लागली.एकविसाव्या वर्षी मी माझ्या मलाच निराशापूर्ण होऊन गमावून बसलो.
परंतु,माझा फिरून- डोकं- वर काढणार्यांवर विश्वास होता.आणि तसं करणं जीवनात कधी ही शक्य आहे.
जर का तुम्हाला योग्य प्रेरणा मिळाली तरच शक्य आहे.मला तशी प्रेरणा एका आश्चर्यजनक सूत्रातून मिळाली.
मी एका मुलाचा बाप झालो.गमंत म्हणजे जीवनात बेजबाबदार राहणार्या माझ्या अंगावर एका कमजोर जीवाची जबाबदारी आली.पुढे काही वर्ष "बाबा" चा किताब मिळालेला मी मला स्वतःलाच शोधू शकलो.मी आणि माझा मुलगा दोघंही चालायला,बोलायला,काम करायला आणि खेळायला प्रथमच शिकलो.डोकं वर काढायला मी प्रथमच शिकलो.
त्यानंतर वाचायचं कसं हे शिकायला मला तीन वर्ष लागली.मी माझ्या मुलाच्या पुस्तकांचा वापर केला.परत परत वाचून वाचून आणि माझ्या मुलाला शिकवता शिकवता मी त्याला शिकवलेले सर्व शब्द लक्षात ठेवू शकलो.नंतर माझ्या डोक्यात एक कल्पना आली.मी परत शाळेत जाऊ शकतो का?
एका वर्षा नंतर आणि खूप मेहनती नंतर मी परत चवथी पास झालो.आणि तो माझ्या मुलाचा जन्मदिवस होता.हे काही मोठं कर्तुत्व नव्हतं.खरं म्हणजे हे मला यापूर्वीच करायला हवं होतं.पण सर्व विचार केल्यावर मला दिसून आलं की माझ्या आयुष्यातले ते सर्वात आनंदाचे दिवस होते.आज मी पूर्ण वेळाच्या कॉलेज मधे शिकवत आहे.
खरंच ही एक गमंत आहे.वयाने मोठा होत असताना मी नेहमीच ऐकत आलो होतो ती गोष्टी म्हणजे सफलता कधी ना कधी आपल्या कमकुवतपणा वर मात करून वर येते ते.परंतु हे माझ्या बाबतीत लागू पडेल हे माहित नव्हतं.मुंबईत आल्यानंतर माझी मी खूपच प्रगती करून घेतली.विरारला जागा घेतली.मी,माझी पत्नी आणि दोन मुलं असा माझा संसार आहे.मुलंपण चांगल्या तर्हेने शिकत आहेत.आता मला पटलं की प्रत्येकाच्या जीवनात अशी संधी आल्यावर कुणीही त्याला पसंती द्दावी. परतून पुन्हा करायला सुद्धा."
पांडूरंगाची ही कथा ऐकून मला खूपच बरं वाटलं.हे असं ऐकण्यासाठी तरी मला गाडीत खिडकी न मिळाल्याचा आनंद झाला.
ते वैनतेय वर्तमानपत्र आणि आमची भेटाभेट ,आमच्या जुन्या ओळखिला उजाळ देऊन गेली.
अंधेरी केव्हा आली ते कळलंच नाही.घाई घाईत बाय करून पुन्हा भेटण्याचा निर्धार करून मी पांडूरंगाचा निरोप घेतला.
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
9 Nov 2008 - 10:40 pm | कपिल काळे
नेहमीप्रमाणेच सुंदर लेखन... तुमचा अश्याच स्वरुपाचा अजून एक लेख वाचल्याचे स्मरते. त्यात एका यशस्वी "धोंड्या महाराची" गोष्ट आली आहे. प्रसंगही असाच ट्रेनमधला असावा. एवढीच पुनरावृत्ती वाटली.
अवांतर : वैनतेय हे वेंगुर्लेच्या मराठयांचे ? की "किरात" मराठयांचा?
अति अवांतर : मी पण लहानपणी गावाकडे किरात , वैनतेय, देवदुर्ग, अणूरेणू ( हे दोन आमच्या देवगडचे!!) ह्यांचे दिवाळी अंक वाचायचो. आता गेल्या कित्येक वर्षात नाही वाचायला मिळाले. हे सगळे अंक अजूनही पाक्षिक स्वरुपात प्रकाशित होतात का?
http://kalekapil.blogspot.com/
9 Nov 2008 - 11:52 pm | श्रीकृष्ण सामंत
कपिल काळे,
आपल्याला लेखन आवडलं हे वाचून बरं वाटलं.हो तो पण माझ्या शाळेतला "सोन्या महार" होता.(धोंड्या महार नाही.तरीपण आपली आठवण वाखाणणी करण्यासारखी आहे.) "सोन्याचं परिवर्तन"आणि तो असाच व्हि.टी.स्टेशनवर भेटला होता.प्लॅटफॉर्मवर.
हा पांडूरंग गाडीत माझ्याशी बोलत होता.
काळे,
ह्या जमातीतल्या लोकांची अशीच कहाणी असते.बिचार्याना शिक्षणाचं महत्व लहानपणी कळत नाही.सोन्या आणि हा पांडूरंग शिकून असेच खूप वर आले आणि त्यांना आपल्या समवयस्क पांढरपेशा मित्राना आपला इतिहास सांगायला अभिमान वाटतो आणि मला ऐकायला पण.
हो! वैनतेय हे सावंतवाडीचं आणि किरात वेंगुर्ल्याचं मराठ्यांच.ह्यात माझी गफलत झाली हे खरं आहे.
"हे सगळे अंक अजूनही पाक्षिक स्वरुपात प्रकाशित होतात का?"
माझाही अलिकडे दुवा तुटल्यामुळे मी आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही.क्षमस्व.
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
10 Nov 2008 - 10:17 am | llपुण्याचे पेशवेll
इतक्यातच किराताच एक अंक पाहीला कोकणात.
पुण्याचे पेशवे
10 Nov 2008 - 11:39 am | श्रीकृष्ण सामंत
पुण्याचे पेशवे,
किरात चालू आहे हे वाचून बरं वाटलं
खूपच जून वर्तमानपत्र आहे.
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
10 Nov 2008 - 3:01 pm | चिंगी
किरात , देवदुर्ग, अणूरेणू चालू आहेत.
मी पन देवगड ची.
छान लेख..