{खुला"सा! :- (माझी १४ वर्षानंतर सुरु झालेली ही चित्र[कला] अजुन अत्यंत प्राथमिक अवस्थेत आहे. फक्त एक आयड्या लोकांपर्यंत पोहोचवावी..एव्हढ्याच हेतूने हे सादर करत आहे.. :) त्यामुळे चित्राकडे दुर्लक्ष करावे. __/\__ ) }
काय मि.पा.करांनो??? शिर्षक वाचून एकंदर अंदाज आला नसेल ना? किंवा आलाच असेल,तर तो खालिल चित्र-कृती पाहिल्यावर चुकेल! ( कारण ही कोणती विशिष्ट चित्रकृती नसून्,फक्त तेलताटावर चित्र काढण्याची-कृती आहे! ;) ) काय आहे,की चित्रकला हा माझा अवडता विषय.पण प्रसंगचित्र आणि व्यंगचित्र याच्या बाहेर मी फारसा कधिही गेलेलो नाही. (शालेय स्पर्धांमधे वरील दोन्ही विषयात दोनदा ३रा, आणि तिनदा उत्ते-जनार्थ ;) क्रमांक मिळवला आहे मी! ) आणि, ९२ ला दहावी नंतर माझा वेदपाठशाळा..नावाच्या अ'भयारण्यात प्रवेश झाल्यावर पुढे ६ वर्ष ,माझा या सगळ्या (माझ्या ;) ) मूळ जगाशी संबंध तुटलेलाच होता. त्यामुळे ही कला तशी कोपर्यातच पडून होती. पुढेही हे भटजीगिरीचे काम करायल्या लागल्या नंतर वास्तुशांतीचे वेळी दरवाज्यावर कुंकवानी शुभ्/लाभ/स्वस्तिक्/ओंकार या पलिकडे उडी मारायला मिळालेली नव्हती! (हां...पण दरवाज्यावरचा ओंकारातला गंपतीबाप्पा मात्र बेश्ट काढायचो हां मी! )
अश्यातच पहिली ३/४ शिकाऊ वर्ष गेली,आणि मग ही सगळी कला फुलांच्या रांगोळ्यांमधून डोकं वर काढायला लागली. यामुळे मात्र माझा एक फायदा झाला .तो असा,की ..माझ्याकडे,बरेचसे कलाआसक्त यजमान वाढले..(किंवा आले त्यांच्यातली आसक्त-कला वाढली! ;) ) त्यामुळे, अश्या अनेक प्रकारच्या गोष्टी ..या लोकांकडे पहायला मिळू लागल्या. अजुनंही मिळत आहेत. एकदा एका गुज्जु क्लायंट कडे एका महिलेनी आरतीचं ताट सजवून आणलं. मी पहिल्यांदा ते पहातच राहिलो. कारण आतली २ कलात्मक निरांजनं मला नविन नव्हती पण त्याखाली वेलव्हेट्चा नाजुक हात लावावा,असं काहितरी दिसत होतं. मी आरती झाल्यावर त्यात सहज हात लावला ,तर बोट चटकन पुढे घसरलं..आणि ते वेलव्हेट् पुसलं गेलं . मला काहि क्षण काहि कळलं नाही. नंतर मात्र माझा प्रश्नार्थक चेहेरा पाहून ,सदर महिलेनी ते ताट बाजुला ठेवलं आणि मला...
महिला:- ओ पंडित जी.. ये दोखो
मी:- क्या जी?
महिला:- ये थाली को ऐसे तेल लगाके उसपर ये कुंकूम ऐसा डाल के... ( वगैरे वगैरे)
असं करून मला हे पहिलं काम शिकवलं .. मी ही लगेच त्यावर फुलाच्या डेखानी भला मोठा ओंकार काढून त्यांना गुरुदक्षिणा दिली.. आणि तेंव्हापासून मला मूड आला आणि हतात वेळ असला तर आमच्या कामात मी असली काहितरी चित्र (वि)चित्र पद्धतीनी जमतील तशी काढून माझी ही,मागे पडलेली चित्रकलेची हौस भागवून घेतो...
(हुश्श्श्श्श्श्श्श्श्!!!!!!!!!!! झाली एकदाची ती प्रस्ताव'ना! ;) ) आता मूळ गोष्टीकडे वळू या... तर आपण ही छोटीशी चित्रकृती टप्प्या ट्प्प्यानी पाहू...
१) हे साहित्य... एक ताट्,तेल,फुल,काडी,हळद/कुंकू (किंवा आपण तसे इतर रंगंही घेऊ शकतो.फक्त ते तेलावर-बसणारे हवे.तेलात--जाऊन बसणारे नको! ;))
२) ताटात २ थेंब गोडेतेल टाकून/फुलानी नीट पसरविणे.
३) आता ,ताटाच्या साइडपट्टीवर हळद पेरुन घ्यायची.पण जास्त मधे अजिबात पडू द्यायची नाही.कारण मग परत ती हळद पुसा..तिथे तेलानी पॅचअप करा..अश्या नसत्या कटकटी होऊन बसतात.
४)मग कणकेला चाळण मारल्यासारखं,ताट हलकं हलकं हलवायचं. आणि नंतर एकदम पलटी मारून खाली(घेतलेल्या) पेपरावर हलकेच अपटायचं.म्हणजे,एक्स्ट्रो लागलेली हळद -पडते.
५) आता..हळद-कृती प्रमाणेच ..मधल्या मोकळ्या ग्राऊंडवर कुंकू-लावणी करायची.
६) मग हळद/कुंकवाच्या मधून बोट मारून... घेतलं..
की ही अशी तयार होते..ती आपली चित्रखरडपाटी!
७) आणि मग काय.. ? जसा आपला हात तसा सापडेल जगन्नाथ.. करायची मग खेळायला सुरवात
८) "आता ह्याचं करायचं काय हो मग???" सांगतो ना..! एकतर त्यात निरांजनं ठेऊन आरतीसाठी वापरा,अथवा अगदी ओवाळणीचं ताट म्हणूनही वापरा... किंवा मग आंम्ही करतो तसलं काहि तरी करा.
"काय करता हो तुम्ही?" :- पहा खाली...
(लघुरुद्र असल्यामुळे शंकराच्या फोटो ऐवजी पुजे मागे ठेवणे )
९)आरती करताना प्रसन्नतेत भर पडायला हे ही एक..उपयोगी!
१०) निसर्गही का नाही बरं प्रसन्नतेत सामिल होणार मग? :)
००००००००००००००००००००००००००००========================००००००००००००००००००००००००००००००
म्हणा बरं मग आता.... हरं हरं महादेव!!!!!!!!!!!!!!!!
प्रतिक्रिया
6 Jan 2015 - 5:59 pm | एस
एकच नंबर हो गुरुजी!
6 Jan 2015 - 6:01 pm | प्रचेतस
क्या बात है आत्मूस..!!!!!
अतिशय सुंदर. हाडाचे कलाकार आहात.
6 Jan 2015 - 11:11 pm | आदूबाळ
जबरी!
7 Jan 2015 - 3:20 pm | पियुशा
मस्त मस्त मस्त !
6 Jan 2015 - 11:47 pm | माम्लेदारचा पन्खा
आधी कवींच्या पोटावर पाय दिलात......
आता गरीब चित्रकारांना तरी सोडा..... छे छे छे.....
7 Jan 2015 - 12:38 am | खटपट्या
कैच्या कै जबराट कलाक्रुती !!
नक्की करुन बघणार !! लाल रंगासाठी कूंकू आणि पिवळ्या रंगासाठी हळद. अजून रंग हवे असल्यास काय वापरायचे ?
म्हणजे कोणते विशीष्ट रंग आहेत का तेलात जाउन न बसणारे ?
7 Jan 2015 - 4:31 am | अत्रुप्त आत्मा
करून पहाणे.
तरीही रांगोळिचे काही रंग चालून जातात ..
7 Jan 2015 - 4:45 am | खटपट्या
ओके
7 Jan 2015 - 8:09 am | स्पंदना
नेहमी सारखेच आकर्षक आणि सुंदर!!
7 Jan 2015 - 9:01 am | चौकटराजा
ब्वा , शेवटचा फटू जह्हाक्क्क्क्कास आलाया !
7 Jan 2015 - 9:03 am | मुक्त विहारि
स्टेप बाय स्टेप, कलाक्रुती दाखवल्या बद्दल धन्यवाद...
7 Jan 2015 - 9:30 am | नाखु
मान गये आपकी पारखी नजर
ऑर ये कलाकुसर दोनोको...
अब मिपा के बच्चेभी जाणते है आत्मुदाके हातगुण.
7 Jan 2015 - 9:35 am | अजया
सुरेख कलाकृती अाणि सोपीही!
7 Jan 2015 - 9:37 am | बोका-ए-आझम
मस्त!
7 Jan 2015 - 11:08 am | असंका
फारच कलात्मक!
7 Jan 2015 - 11:14 am | टवाळ कार्टा
चित्रकलेचा फंडा ब्येश्टच...
अवांतर - ह्याचा वेगळा "चार्ज" लावत असणार गुर्जी ;)
7 Jan 2015 - 11:27 am | प्रसाद गोडबोले
कविमनाचा चित्रकार सुगंधी पंडीत माणुस आत्मा म्हणजे बुवा :)
मी आता "बुवा आणि वल्ली" नावाचे व्यक्तीचित्रण लिहायला घेणार आहे :D
7 Jan 2015 - 4:39 pm | नाखु
*stop* *STOP* हक्क राखून ठेवलेत, लिखाण बॅट्या-सगा (सलीम्-जावेद धर्तीवर) करणार आहेत शीर्षक "बुवा का वल्ली? ".
निव्वळ लेखद्वयींचा मान राखण्यासाठी मी प्रस्तावना लिहायच कबूल केलं आहे. *YES*
7 Jan 2015 - 4:43 pm | सूड
ह्यातला 'का' हिंदी का मराठी?
7 Jan 2015 - 4:51 pm | सौंदाळा
हुच्च कोटी
लै भारी
7 Jan 2015 - 4:54 pm | नाखु
हिंदी पुस्तकाचं कव्हर एकच ठेवायचंय म्हणून..
स्वगतः हिंदीची प्रस्तावना सूड्पंताना लिहायला देऊ यात का म्हणजे पुस्तकाचे "चिरफाड" समीक्षण लिहिणार नाही
7 Jan 2015 - 4:57 pm | बॅटमॅन
ठ्ठो =)) =)) =))
7 Jan 2015 - 4:53 pm | टवाळ कार्टा
"का बुवा वल्ली" असे पण ल्ह्या कोणीतरी
7 Jan 2015 - 11:55 am | प्रमोद देर्देकर
खुप
छान
आवडल्या
गेलं
आहे.
तुमच्या
अंगात
अजुन किती
कला आहेत
हो गुर्जी?
7 Jan 2015 - 11:58 am | विशाल कुलकर्णी
लै भारी ...
7 Jan 2015 - 11:58 am | मदनबाण
छानच... चला यावर एखाद्द फोटु माझ्याकडं हाय का ते शोधाया हवं !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,करंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)
7 Jan 2015 - 10:24 pm | मदनबाण
२००९ साली आमच्या गुरुजींनी केलेली कलाकॄती ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,फरंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)
7 Jan 2015 - 11:34 pm | अत्रुप्त आत्मा
व्वाह! ये भी झ्याक है।
7 Jan 2015 - 12:56 pm | बॅटमॅन
एकच नंबर!!!!
7 Jan 2015 - 1:10 pm | सुबोध खरे
उत्कृष्ट कलाकृती __/\__
7 Jan 2015 - 2:56 pm | सौंदाळा
गुरुजी, नेहमी करत असलेल्या कामात कंटाळुन न जाता त्यात नाविन्य, कलात्मकता आणुन स्वतः आनंदी राहुन यजमानांनादेखिल आनंदी करण्याचा तुमचा स्वभाव आवडतो.
7 Jan 2015 - 3:14 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१
26 Aug 2015 - 4:22 pm | चाणक्य
अगदी हेच लिहायचं होतं. जियो बुवा.
7 Jan 2015 - 3:23 pm | सविता००१
छान कल्पना आहे हो. आता उद्या चतुर्थीचा मुहूर्त साधून मी पण करते एका ताटावर आणि सोमवारी परत दुसरं करून रुद्र करणार. मस्त.आत्ताच मूड आला हे पाहून.
झक्कास.
7 Jan 2015 - 3:25 pm | सूड
शेवटचा फोटो जास्त उजवा वाटला.
7 Jan 2015 - 3:50 pm | भाग्यश्री कुलकर्णी
छान समजावून सांगीतलेत.करून बघीन ऐखाद्या सणाला..
7 Jan 2015 - 5:51 pm | अत्रुप्त आत्मा
माम्लेदारचा पन्खा
@आता गरीब चित्रकारांना तरी सोडा..... छे छे छे.....>> =))
टवाळ कार्टा
@ह्याचा वेगळा "चार्ज" लावत असणार गुर्जी>>
ते माणूस साधा आहे,की ट्वाळ? यावर अवलंबून असतं.
प्रगो
@मी आता "बुवा आणि वल्ली" नावाचे व्यक्तीचित्रण लिहायला घेणार आहे.>> बाप रे!!!!!!!!!!!!!
प्रमोद देर्देकर
@तुमच्या अंगात अजुन किती कला आहेत हो गुर्जी?>> ख्याक! जेवढ्या नकला,तेवढ्या कला! ;)
सौंदाळा
@गुरुजी, नेहमी करत असलेल्या कामात कंटाळुन न जाता त्यात नाविन्य, कलात्मकता आणुन स्वतः आनंदी राहुन यजमानांनादेखिल आनंदी करण्याचा तुमचा स्वभाव आवडतो.>> येकदम सही पैचान्या! आणि यामागे असलेलं माझं वैगुण्य असं,की कामाच्या जागी नुस्तं टेपरेकॉर्डर सारखं मंत्र म्हणत बसायला मला प्रचंड कंटाळा येतो. (आणि याउलट,आमच्यात काहि जणांना हेच हवं असतं! ) त्यापेक्षा हे असं काहि केलं तर ते खरं काम होतं. नायतर म्हैशीसारखं नुस्तच (मंत्र) डुरकण्यात काय मजा?
सविता००१,भाग्यश्री कुलकर्णी
छान कल्पना आहे हो. आता उद्या चतुर्थीचा मुहूर्त साधून मी पण करते एका ताटावर आणि सोमवारी परत दुसरं करून रुद्र करणार. मस्त.आत्ताच मूड आला हे पाहून.
झक्कास.>>> चला...धागा सार्थकी लागला. :) फोटो इथेही डकवा. :)
स्वॅप्स,वल्ली,आदूबाळ,पियुशा,प्रगो, aparna akshay,चौकटराजा,मुक्त विहारि,नाद खुळा,अजया,बोका-ए-आझम,कंफ्युज्ड अकौंटं,प्रमोद देर्देकर,विशाल कुलकर्णी,मदनबाण,बॅटमॅन,सुबोध खरे,सौंदाळा,इस्पीकचा एक्का,सविता००१,सूड,भाग्यश्री कुलकर्णी,दिपक.कुवेत >> सर्वांना धन्यवाद!
7 Jan 2015 - 7:23 pm | टवाळ कार्टा
मला अनुल्लेखाने मारलेले लक्षात ठेवण्यात आलेले आहे...दू...दू...दू
7 Jan 2015 - 7:30 pm | सूड
हे बघ की राव!!
7 Jan 2015 - 7:50 pm | टवाळ कार्टा
तुका तस्ले धन्यवाद मिळत अस्तले...माका नुको तस्ले :P
8 Jan 2015 - 11:39 am | सूड
तसले नाका? मागीर कित्यां जाय ?? अनाहिता सळो की पळो करतायेत ते चांगलं का?
चल दोन ओळी तुझ्यासाठी:
कुरुकटकासि पाहता तो उत्तर बाळ फार गडबडला, स्वपरबळाबळ नेणूनि बालिश बहु बायकांत बडबडला!!
8 Jan 2015 - 2:00 pm | अत्रुप्त आत्मा
@कुरुकटकासि पाहता तो उत्तर बाळ फार गडबडला, स्वपरबळाबळ नेणूनि बालिश बहु बायकांत बडबडला!! >>> =)))))) मार्केट्यार्ड रे! =))
7 Jan 2015 - 8:27 pm | अत्रुप्त आत्मा
@हे बघ की राव!! >> +++१११ =))
7 Jan 2015 - 5:31 pm | दिपक.कुवेत
सहिच जमलय.
7 Jan 2015 - 10:30 pm | पैसा
खूप छान! पण बुवा तुम्ही डावरे अहात का?
7 Jan 2015 - 11:09 pm | अत्रुप्त आत्मा
व्हय जी! जन्मजात डावरे.
अति समांतर:-
आय एम ए बॉर्न कम्युनिस्ट ;-)
8 Jan 2015 - 6:30 am | अन्या दातार
मी वाममार्गी म्हणणार होतो ;)
8 Jan 2015 - 7:12 am | अत्रुप्त आत्मा
8 Jan 2015 - 9:01 am | नाखु
कुठल्याही कामात "डाव-उजव" करीत नाहीत असा रोचक प्रवाद आहे..
संदर्भ :रामदेव ढाबाज कट्टा!
8 Jan 2015 - 1:17 pm | अनिता ठाकूर
खूपच सुंदर!!
8 Jan 2015 - 2:04 pm | आतिवास
कल्पक!
9 Jan 2015 - 10:28 am | अत्रुप्त आत्मा
काल संकष्टीला एके ठिकाणी सहस्रावर्तने करत असता,केलेल्या चित्रकृती
=======================================
संपादकः- मुख्य धाग्यात लाउन द्या ना, प्लीईईईईज! :)
9 Jan 2015 - 11:02 am | सविता००१
गुरुजी, खरच फार सुरेख आहेत दोन्ही चित्रकृती.
9 Jan 2015 - 11:42 am | अत्रुप्त आत्मा
थांकू...संपादक.
24 Aug 2015 - 10:58 pm | अत्रुप्त आत्मा
ये आज सुबहे का खेला.. संपादक लोक..इसकू मूळ धागे मे अॅडवा दिजीए ना जरा..
24 Aug 2015 - 11:47 pm | बोका-ए-आझम
हे असले गुण इतके दिवस लपवून ठेवून आत्ता असे दाखवल्याबद्दल णिशेध! म्हणजे अत्तर, खादाडी, पौरोहित्य आणि आता अशी रंगावलीकला पण! मस्तच!
25 Aug 2015 - 12:59 am | उगा काहितरीच
छानेकी !
25 Aug 2015 - 1:56 am | पद्मावति
ही ताटावरच्या रांगोळीची आयडिया खूपच आवडली. आणि तांदळाच्या ढिगावर हळदीने काढलेला ओम पण मस्तं.
25 Aug 2015 - 2:56 am | रेवती
हा धागा आत्ता पाह्यला. आयडीया भारी आहे. चित्रेही आवडली. मदनबाणाच्या गुर्जींनी त्या कुंकवावर जे गोल काढलेत ते कशिदाकामात जसे आरसेकाम असते तसे वाटतेय. गुर्जी, तुम्हीही ती कल्पना कुठेतरी वापरा की!
25 Aug 2015 - 9:28 am | यशोधरा
वा, सुरेख हो गुर्जी!
25 Aug 2015 - 10:01 am | चैतन्यमय
अरे वा.. मस्तच चित्रे काढता की हो तुम्ही
25 Aug 2015 - 10:07 am | श्रीरंग_जोशी
आजवर ही कला कधी पाहिली नव्हती. तुमच्या या तपशीलवार लेखामुळे प्रथमच ठाऊक झाली.
तपशीलवार माहिती अन त्या जोडीला एकाहून एक फोटोज खूप आवडले.
25 Aug 2015 - 1:51 pm | अत्रुप्त आत्मा
धन्यवाद. :)
25 Aug 2015 - 2:00 pm | प्यारे१
मस्त गुरूजी. छान चित्रकला.
25 Aug 2015 - 2:20 pm | इशा१२३
मस्त आयडिया आहे.सोपी आणि छान!
25 Aug 2015 - 5:59 pm | चौथा कोनाडा
गुर्जी, भारी कलाकृती आहेत !
नेहमीचेच रीसोर्सेस अन रंगपुर्ण आनंद !
_/\_
क्लास घेत असाल तर येइन म्हणतो तुमच्याकडे !
31 Jan 2017 - 2:41 pm | अत्रुप्त आत्मा