अत्तरायण..! भाग - ३

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
22 Dec 2014 - 2:12 am

अत्तरायण..! भाग - १
अत्तरायण..! भाग - २
आठ वर्षापूर्वीची घटना..
गणपतिचा पहिला दिवस..

नेहमीप्रमाणे मी माझ्या पहिल्या कामाच्या ठिकाणी पोहोचलो. आणि काम अवरल्यावर आलेला चहा पीत असताना,त्या यजमानानी मला "गुरुजी हात पुढे करा!" असं फर्मावलं. मी आपला मनात,'आज यांना काहि खटकलय कि काय?' 'अथर्वशीर्ष तर सावकाशच म्हटलं होतं' वगैरे बाळबोध आत्मशंका घ्यायला लागलो. पण नंतर त्यानी माझ्या हतावर जे लेपन केलं.त्यानंतर मी चहा विसरलो,पुढचं काम्,त्यादिवशीचा डोक्यात मॅच करत ठेवलेला आकडा(अर्थातच दक्षिणेचा ;) )..इत्यादी सगळं विसरलो.आणि त्या वासातच गूं.....................ग झालो. अंतरमनाला असा काहि तरल पण तितकाच सलग करंट बसत गेला,की वाटायला लागलं,ह्या पहाटेच्या शांत वेळी एखाद्या पुराणोक्त कादंबरी मधे वर्णन केल्याप्रमाणे निसर्गानी वेढलेल्या शां...........त तळयाकाठी एखाद्या देवालयात ह्या गणपतिचे मुदाकरात्त मोदकं..सारखं स्तोत्र मन भरेपर्यंत म्हणत बसावं.आजचा दिवस हेच कमवावं. आह्हाह्हाह्हा...काय अजब मोहिनी त्या वासाची! शेवटी कडेनी त्या काकूंनी मला, "गुरुजी.........अहो तुंम्ही ह्यांच्या ह्या अत्तरांच्या नादात नका र्‍हाऊ,अख्खा दिवस इथेच र्‍हाल नायतर!" असं मला वास्तवात-आणणारं वाक्य टाकलं.आणि मला (तात्पुरत) भानावर आणलं. डोळे उघडले,तसे आमचे हे (आमच्या इतकेच :D ) अट्टल यजमान्,गड जिंकल्याच्या आविर्भावात फक्त कस्तुरीहीना असं म्हणाले. मी त्या शब्दानीही त्या वसा इतकाच किंबहुना काहिसा अधिक मोहित झालो.

मग त्या दिवशीचे सगळे गणपती त्याच करंट मधे बसविले. एक दोन यजमानांनी "गुरुजी..काय लगिन वगैरे ठरलं काय???" असंही विचारलं. इतका त्याचा असर,त्या दिवशी जास्ती होता माझ्यावर. मला हीना माहित होतं. किंबहुना पूर्वी म्हटल्याप्रमाणे वो मेरा पेहेला प्यार है। पण आज त्याला पेहेला प्यार म्हणत असेन्,तर याला पेहेला नशा म्हणावस वाटतं! आणि नशेची सुरवात नावापासून आहे..कस्तुरीहीना!!!
तसं ह्या अत्तराचं बाजारातलं नाव मुश्कहीना
http://i.ebayimg.com/00/s/MTYwMFgxMDY2/z/0V4AAOxyhodRrRDE/$(KGrHqQOKosFGWQZgCyPBRrRDDc3-!~~60_57.JPG.
फोटो:-अं.जा.साभार.
कदाचित मी पूर्वी कधी त्याचा वास घेतलाही असेल. पण आमच्या ह्या यजमानानी ते ज्या व्यक्ति कडून घेतलं होतं त्या व्यक्तिनी त्याच्या काँबिनेशन मधे काहितरी स्पेशल जादू तरी केलेली आहे.किंवा खास अपना टच तरी निर्माण केलेला आहे.असं मी खात्री पूर्वक म्हणू शकतो. ( मी ज्यांना आधीच्या लेखात,माझे अत्तरगुरु म्हणालो तीच ही व्यक्ति!) आमच्या एका अगदी अट्टल हीनाप्रेमी मित्रालाही मी जेंव्हा हे अत्तर लावलं.तेंव्हा तो ही असाच वेडा झाला होता.

काय आहे की आधी कस्तुरी ही वासांची राणी म्हटली पाहिजे. (लैच्च गोग्गोड वास हो तिचा...हाsssय! ) मी कस्तुरीचा वास पहिल्यांदा घेतला(खरं तर आला म्हणायला पाहिजे.) तो त्या नगरच्या पाठशाळेत असतानाच. तिथे दत्त पादुकांवर जो नित्य अभिषेक व्हायचा त्यात केशर आणि कस्तुरीचं मिश्रण असायचं. एकदा आंम्ही सकाळच्या पाठाला बसलेले असताना. अचानक हा वास अक्षरशः वार्‍यावर यायला लागला.आणि आमच्यातल्या एक जुन्या विद्यार्थ्यानी,त्या कस्तुरी विकणार्‍या माणसाचं नाव एकदम मोठ्ठ्यांदी घेतलं. बाहेर जाऊन त्याला 'वरती ये' असंही म्हणाला. एका चामड्याच्या बॅग मधून त्यानी १०/१२ कस्तुरी बाहेर काढल्या.
https://encrypted-tbn2.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcTX6ZcHApExpiHJxrmtFyz_y3rzZ9l-5DS7ZYHjmhFFBLJTc6HL
फोटो:-अं.जा.साभार.
तोपर्यंत आमचा अख्खा हॉल दरवळायला लागला होता. तो वास माझ्या अजुनंही स्मरणात आहे. पुढे मी जेंव्हा कस्तुरी, अत्तरं स्वरुपात पाहिली,तेंव्हा मला त्या सुगंधाशी याची तूलना नाही करता आली. पण नंतर मी जेंव्हा औषधी स्वरुपातला कस्तुरीचा अर्क पाहिला ,तब बात कुछ अलग बनी। गुर्‍हाळात जसा त्या कढणार्‍या रसाचा एक मंद गो..ड वास येतो. तसं ह्या कस्तुरी अर्काचं आहे.अतिशय गो...........ड सात्विक जादूई सुवास. त्या अर्काचं आणी हीनाचं संमिश्रण म्हणजे कस्तुरीहीना.

अता मूळात हीना हा मोह्,आणि कस्तुरी ही जादू! मग मोह आणि जादू एकत्र झालं तर काय होतं???? नशा!!!
कोणाला खरं वाटो न वाटो..पण माझ्यासाठी ह्याचा सुगंध म्हणजे एक नशाच आहे. वेड लावणारी नशा!
खुषरंगहीना.... कस्तुरीहीना!
https://lh3.googleusercontent.com/XgrH_I92C3dmpps8yX9ycIeE1NZd4pBYhV8lI5tIB3Y=w384-h581-no
======================
क्रमशः

संस्कृतीविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

22 Dec 2014 - 2:46 am | मुक्त विहारि

आता तुमच्या लग्नात, तुम्हाल भेट काय द्यायची, हा प्रश्र्न मिटला...

बोका-ए-आझम's picture

22 Dec 2014 - 9:33 am | बोका-ए-आझम

ऐसी अत्तरे रसिके मेळवीन!आज उत्तरायण सुरु होताना अत्तरायण वाचायचा सुगंधी योग आहे!

सतिश गावडे's picture

22 Dec 2014 - 9:34 am | सतिश गावडे

छान लिहिलं आहे बुवा.

प्रचेतस's picture

22 Dec 2014 - 9:38 am | प्रचेतस

छान लिहिलंय.
कस्तुरी हीना हे बुवांकडून घेतलेलं पहिलं अत्तर.
प्रथमदर्शनी आवडलं होतं. वासही चांगला आहे.
पण ते उग्र असल्याने नंतर नंतर आवडेनासे झाले.

आनन्दिता's picture

22 Dec 2014 - 9:45 am | आनन्दिता

वल्ली जी पैसे घेतले का हो गुरुजींनी त्याचे? 8P

प्रचेतस's picture

22 Dec 2014 - 9:46 am | प्रचेतस

हो ना.
पक्के पुणेकर आहेत ते.

आनन्दिता's picture

22 Dec 2014 - 9:52 am | आनन्दिता

छ्या बाबा !! मित्र नसावे तर अशे!! =))

अत्रुप्त आत्मा's picture

22 Dec 2014 - 10:08 am | अत्रुप्त आत्मा

@मित्र नसावे तर अशे!! >>> :-D अस्सं क्काsssय! =))
दुत्त दुत्त आ..नंदिता.तू ये. तुला फुकट देइन! =))

मस्क हीना उग्र नाहीये. अहाहा आहे! :)

यशोधरा's picture

22 Dec 2014 - 10:10 am | यशोधरा

मस्त!

अनुप ढेरे's picture

22 Dec 2014 - 10:18 am | अनुप ढेरे

छान लिहिलय. आवडलं!

मदनबाण's picture

22 Dec 2014 - 10:46 am | मदनबाण

माझ्यासाठी ह्याचा सुगंध म्हणजे एक नशाच आहे. वेड लावणारी नशा!
अगदी !
हीना आणि कस्तुरी यांचे परफेक्ट प्रमाण असलेले अत्तर हे अशीच नशा देते...
असं ऐकुन आहे की कस्तुरी प्राशन केली असता शरीराला येणार्‍या घामालाही कस्तुरीचा गंध येतो इतकी ती प्रभावी आहे.
पुढचा भाग कोणत्या अत्तरावर ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops?
Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…

अत्रुप्त आत्मा's picture

22 Dec 2014 - 10:56 am | अत्रुप्त आत्मा

@पुढचा भाग कोणत्या अत्तरावर ? >>> मनात येइल त्या. :)

अत्रुप्त आत्मा's picture

22 Dec 2014 - 12:29 pm | अत्रुप्त आत्मा

@असं ऐकुन आहे की कस्तुरी प्राशन केली असता शरीराला येणार्‍या घामालाही कस्तुरीचा गंध येतो इतकी ती प्रभावी आहे.>>> येस्स्स्स्स्स्स्स्स! नक्कीच असं असू शकतं. मलाही हे खरं वाटतं. कारण मी वर म्हटल्याप्रमाणे पहिल्यांदाच कस्तुरी पाहिली.ती एकदम अस्सल. अगदी फर्लांगभर अंतरावरून तिचा वार्‍यावर सुगंध येत होता. आणि तो ही,त्या माणसाकडे ती कस्तुरी चामड्याच्या सॅकमधे असतांना! नंतर मठामधे सकाळ्/संध्याकाळ दररोज आंम्ही हे केशर कस्तूरी तीर्थ लोकांना द्यायचो. केशरंही तितकच अस्सल असल्यामुळे,जर का ते कपड्यावर सांडलं,तर डाग पडण्यापेक्षा आता ५/६ धुलाया होइपर्यंत ह्याचा मस्त सुगंध सुटणार याची खात्री असायची.(म्हणूनच..) हे तीर्थ आंम्ही वाटताना "अज्जिबात सांडायचं नाही!" अशी तिथे सक्त ताकिद होती.(तसं ते महागडं होतं,म्हणूनंही असेल!) जर कुणी मुद्दाम काहि केलं,तर त्याला तशीच शिक्षा मिळायची. एकदा मला ह्या कस्तुरीचा तो काळा,कडक लाखेसारखा भाग हताळायला मिळाला. तेंव्हा त्याचा सुगंध फार काहि वाटला नाही. पण अभिषेकाच्या (गरम)पाण्यात केशरा बरोबर जसा त्याचा मेथी एव्हढा १ तुकडा हिंग चुरडतात,तसा चुरडून टाकला त्यानंतर........... ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआ........ तो माझा चेहेरा पाहुन आमच्या तिथल्या सकाळच्या पुजार्‍यानी ओळखलं ,की ह्या पोराला,हे काम नेहमी दिले,तर हा कस्तुरी चोरणार! ;) (मी आणि दाम्या..आंम्ही दोघे असल्या बाबतीत अट्टल! त्यामुळे आंम्हाला पाठशाळेतून बाहेर पडे पर्यंत गंध घासायची ड्युटी आली..पण आत गाभार्‍यात???????? :D प्रवेश बं.........द! :D )
नगरच्या पाठशाळेतल्या माझ्या इतर अनेक..छान अठवणींप्रमाणे,ही पण एक छान आठवण आहे.
गेले ते दिवस. :)

मुक्त विहारि's picture

22 Dec 2014 - 12:35 pm | मुक्त विहारि

अस्सल कस्तूरीचा साधारण भाव काय?

मदनबाण's picture

22 Dec 2014 - 12:52 pm | मदनबाण

नक्की माहित नाही... US $ 45,000 or 3-4 times its weight in gold.
ज्या हरिणाच्या नाभीत ही कस्तुरी असते त्याला मारण्यावर बंदी आहे, हरिणाच्या नाभीत तयार होणारा पदार्थ म्हणजेच कस्तुरी. ही इतकी तीव्र असते की हे हरिण हा गंध कुठुन येतो त्याचा शोध घेत बसते आणि याचा त्याच्या खाण्या-पिण्यावर सुद्धा परिणाम होतो असे म्हणतात... आजच्या काळात खर्‍या कस्तुरीचे अत्तर मिळणे दुर्लभ गोष्ट आहे. कस्तुरी ही सुगंध निर्मीती मधली सगळ्यात महाग गोष्ट आहे, त्यानंतर बहुधा चंदनाच्या तेलाचा नंबर लागतो.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops?
Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Dec 2014 - 6:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे हरिण हा गंध कुठुन येतो त्याचा शोध घेत बसते आणि याचा त्याच्या खाण्या-पिण्यावर सुद्धा परिणाम होतो असे म्हणतात... या गंधाचा उपयोग त्या हरिणाला त्याच्या मालकी हक्काच्या जागेची आखणी करण्यासाठी आणि माद्यांना आकृष्ट करण्यासाठी होतो.

अनंत छंदी's picture

27 Dec 2014 - 6:05 pm | अनंत छंदी

गतवर्षी अस्सल कस्तुरीचा पुण्यातील भाव ३५००/- रुपये प्रतिग्रॅम होता. :)

प्रसाद गोडबोले's picture

22 Dec 2014 - 11:50 am | प्रसाद गोडबोले

सुंदर :)

पारु's picture

22 Dec 2014 - 11:56 am | पारु

सुन्दर.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Dec 2014 - 12:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

हा भाग खासच रंगलाय... नाही दरवळलाय ;) 'मिट्टी'का नंबर कब आयेगा ?

अत्रुप्त आत्मा's picture

22 Dec 2014 - 12:30 pm | अत्रुप्त आत्मा

@ 'मिट्टी'का नंबर कब आयेगा ? >> =)) ..
आएगा.....आएगा....आएगा...आने-वाला.........आएगा! ;) =))

कस्तुरी हीना....आहाहा!! दिवसभर घुटमळणारा दरवळ !! [:-} [:} [:-}

पैसा's picture

22 Dec 2014 - 7:34 pm | पैसा

काय योगायोग आहे माहित नाही, पण पौरोहित्य शिकताना असा बर्‍याच सुगंधांशी संबंध येतो का बुवा? कारण आमच्या ओळखीचे एक वे.शा.सं. बोरकर गुरुजी आहेत, त्यांचा मुलगाही पौरोहित्य करतो. त्याने पूजेसाठी लागणारे सामान विकायचे एक लहान दुकान काढले आहे. तो परवाच अशी बरीच अत्तरे दाखवत होता. दुकानाचे नावच "शारंग सुगंधी!"

अत्रुप्त आत्मा's picture

22 Dec 2014 - 11:19 pm | अत्रुप्त आत्मा

मदनबाण,इस्पीकचा एक्का
@हे हरिण हा गंध कुठुन येतो त्याचा शोध घेत बसते आणि याचा त्याच्या खाण्या-पिण्यावर सुद्धा परिणाम होतो असे म्हणतात... @या गंधाचा उपयोग त्या हरिणाला त्याच्या मालकी हक्काच्या जागेची आखणी करण्यासाठी आणि माद्यांना आकृष्ट करण्यासाठी होतो. >>> छान माहितीपूर्ण सहभागाबद्दल अतिशय धन्यवाद. :)
=========================================
पारु
@सुन्दर. >> धन्यवाद वहिनी...(आणि मिपावर स्वागत! :) )
=========================================
सूड
@कस्तुरी हीना....आहाहा!! दिवसभर घुटमळणारा दरवळ !!>> कस्तुरी हीना'तला हा एक दर्दी माणूस. :)
=========================================
पैसा
@काय योगायोग आहे माहित नाही, पण पौरोहित्य शिकताना असा बर्‍याच सुगंधांशी संबंध येतो का बुवा? >>> छे हो! असं काहिही नाही.

@कारण आमच्या ओळखीचे एक वे.शा.सं. बोरकर गुरुजी आहेत, त्यांचा मुलगाही पौरोहित्य करतो. त्याने पूजेसाठी लागणारे सामान विकायचे एक लहान दुकान काढले आहे. तो परवाच अशी बरीच अत्तरे दाखवत होता. दुकानाचे नावच "शारंग सुगंधी!" >> साइडबिझनेस.बाकि काहि नाही. (या बोरकरांपैकी एक मिलिंदा बोरकर [मी त्याला मिरिंडा म्हन्तो! :D ] माझा मित्र आहे.इकडे पुण्यात असतो. आणि एक अच्युत बोरकर होते.महामिश्किल. दोघांची आठवण आली आज.या निमित्ताने. :) )
=========================================

पैसा's picture

23 Dec 2014 - 9:35 am | पैसा

आणखी एक बोरकर विसरलात काय? :D कदाचित त्यांना मित्र म्हणावे का मानगुटीवर बसलेला अग्यावेताळ अशा संभ्रमात असाल!

अत्रुप्त आत्मा's picture

23 Dec 2014 - 10:37 am | अत्रुप्त आत्मा

@कदाचित त्यांना मित्र म्हणावे का मानगुटीवर बसलेला अग्यावेताळ( =))))) )अशा संभ्रमात असाल!>> =)) मूलतः तो एक हत्ती आहे. =))

मदनबाण's picture

23 Dec 2014 - 11:14 am | मदनबाण

मुश्क हीना प्रमाणेच मुश्क अंबर देखील अप्रतिम गंधाचे असते...
आता अंबर म्हंटले की पटकन नजरे समोर दॄष्य येते ते म्हणजे ज्युरॅसिक पार्कचे ! अंबर त्या चित्रपटातल्या वॄद्ध गृहस्थाच्या हाततल्या काठीत बसवलेले असते.
Amber
तर हे एक खनिज आहे, परंतु हे खनिज निर्माण होण्यासाठी लाखो वर्षाचा काळ जावा लागतो आणि याचा प्रमुख घटक म्हणजे वेगवेगळ्या झाडा पासुन निघणारा द्रव पदार्थ {Wood resin}
Wood resin
आणि या पासुन देखील अत्तर बनवले जाते, यात कस्तुरी मिसळली की मुश्क अंबर या अत्तराचे सुगंधी मिश्रण तयार होते. :) मुश्क हीना प्रमाणेच मुश्क अंबर वापरले असल्याने आज हे आठवले. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Russia to bail out Trust Bank with up to $530 million
Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender
Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year
China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015

अत्रुप्त आत्मा's picture

23 Dec 2014 - 12:47 pm | अत्रुप्त आत्मा

@मुश्क हीना प्रमाणेच मुश्क अंबर देखील अप्रतिम गंधाचे असते...>>> मस्स्स्स्त माहिती हो बाणोबा. आजच टेस्ट करून बघतो! http://www.sherv.net/cm/emoticons/flower/flowers-9-smiley-emoticon-emoji.png

मुक्त विहारि's picture

23 Dec 2014 - 11:25 am | मुक्त विहारि

इथे यानबुला पण अत्तरे मिळतात.

पण मला खात्री नाही, की कशी असतील ह्याची.

अत्तर कसे ओळखायचे?

इथे यानबुला पण अत्तरे मिळतात.
इस्लाम मधे अल्कोहल "हराम" आहे, त्यामुळे तुम्हाला तिकडे घेतलेली अत्तर अल्कोहल फ्री मिळतील ! { इथे सुद्धा मिळतात} उत्तम सुगंधा वरुनच आणि इतर माहिती वरुन आणि अर्थात व्यक्तिगत पसंती आणि अनुभव यावरुन अत्तर निवडता येते... अगदी पहिलीच अत्तर खरेदी करायची असेल तर उत्तम दर्जाच्या "खस" पासुन करावी. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Russia to bail out Trust Bank with up to $530 million
Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender
Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year
China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015

स्पंदना's picture

27 Dec 2014 - 4:02 pm | स्पंदना

चक्क रसिक माणसाला चोर ठरवल गुर्जी? हाय रे किस्मत!!
मस्ताड लेखन गुर्जी.