भारतीय संस्कृतीची नात्यांची शिकवण विरोधाभासी आणि नात्यापरत्वे, कालपरत्वे बदलत जाणारी आहे असे मला ठामपणे वाटते. खाली दिलेली सूत्रे (फौर्मुले) वाचा - टेबल स्वरूपात !!
आई वडीलांसाठी-त्यांच्या-मुलगा-पेक्षा-त्यांची-मुलगी-श्रेष्ठ-(हक्क मागतांना)
आई वडीलांसाठी-त्यांच्या-मुलगी-पेक्षा-त्यांचा-मुलगा-श्रेष्ठ-(कर्तव्य बजावतांना)
आई वडीलांसाठी-त्यांच्या-मुलगा-पेक्षा-त्यांचा-जावई-श्रेष्ठ-(हक्क मागतांना)
आई वडीलांसाठी-त्यांच्या-जावई-पेक्षा-त्यांचा-मुलगा-श्रेष्ठ-(कर्तव्य बजावतांना)
आई वडीलांसाठी-त्यांच्या-पहिल्या अपत्या-पेक्षा-त्यांचे-दुसरे अपत्य-श्रेष्ठ-(हक्क मागतांना)
आई वडीलांसाठी-त्यांच्या-दुसऱ्या अपत्या-पेक्षा-त्यांचे-पहिले अपत्य-श्रेष्ठ-(कर्तव्य बजावतांना)
जावयासाठी-त्यांच्या-आई वडील-पेक्षा-त्यांची-पत्नी-श्रेष्ठ-
जावयासाठी-त्यांच्या-बहिण-पेक्षा-त्याची-पत्नी-श्रेष्ठ-
बहिणीसाठी-तिच्या-पती-पेक्षा-तिचा-भाऊ-श्रेष्ठ-
भावासाठी-त्याच्या -पत्नी-पेक्षा-त्याची-बहिण-श्रेष्ठ-
मुलासाठी -त्याच्या -सासू - सासरे -पेक्षा-त्याचे -आई वडील-श्रेष्ठ-
मुलासाठी -त्याच्या -पत्नी-पेक्षा-त्याचे -आई वडील-श्रेष्ठ-
मुलासाठी -त्याच्या -पत्नी-पेक्षा-त्याची-बहिण-श्रेष्ठ-
मुलीसाठी-तिच्या-सासू सासरे -पेक्षा-तिचे-आई वडील-श्रेष्ठ-
मुलीसाठी-तिच्या-नणंद-पेक्षा-तिची-बहिण/भाऊ-श्रेष्ठ-
मुलीसाठी-तिच्या-सासू सासरे -पेक्षा-तिचा-पती-श्रेष्ठ-
सुनेसाठी-तिच्या-आईवडील-पेक्षा-तिचे-सासू सासरे -श्रेष्ठ-
सुनेसाठी-तिच्या-पती-पेक्षा-तिचे-सासू सासरे -श्रेष्ठ-
सुनेसाठी-तिच्या-बहिण/भाऊ-पेक्षा-तिची-नणंद-श्रेष्ठ-
आला का लक्षात विरोधाभास ?
प्रतिक्रिया
1 Oct 2014 - 6:34 pm | विजुभाऊ
भारतीय संस्कृती फारच सोयीस्कर आणि भोंगळ आहे.
सर्व नाती ही फायद्याच्या दृष्टीनेच पाहिली जातात. त्यामुळे ज्येष्ठ / कनिष्ठ मानले जाते.
1 Oct 2014 - 6:37 pm | निमिष सोनार
खूपच सोयीस्कर आहे ही नात्यांची शिकवण !!!!
1 Oct 2014 - 6:39 pm | धन्या
तुम्ही "टनाटन चरभाट" मध्ये लिहिता काय हो?
2 Oct 2014 - 5:34 pm | असंका
काय अस्ते ते?
1 Oct 2014 - 6:44 pm | कवितानागेश
मीच श्रेष्ठ
1 Oct 2014 - 6:46 pm | धन्या
आमची बेशर्त स्विकृती !!!
1 Oct 2014 - 7:07 pm | जेपी
एक डायरी द्या मज आणुन,देईन मी ती निमीष भाऊला..................................
1 Oct 2014 - 9:14 pm | अनिवासि
आज कितीतरी दिवसानी मनमोकळेपणने, खदखदुन आणि मोठ्याने हसलो !! आधिच लठठ --------
निमिष् राव -- असेच धागे येउद्यात. तेवढाच विरगुळा.
2 Oct 2014 - 10:58 pm | मुक्त विहारि
.
2 Oct 2014 - 11:02 pm | नानासाहेब नेफळे
आध्यात्मिक पातळी वाढवा, तमोलहरींचा प्रभाव आहे तुमच्यावर!
2 Oct 2014 - 11:51 pm | विनोद१८
माझे दोन प्रश्ण :-
'आध्यात्मिक पातळी' म्हणजे काय असते ते ???
'तमोलहरींचा प्रभाव' म्हणजे काय असते ?? तो प्रभाव कशाने व कसा मोजतात ???
मला अज्ञाला समजावुन देशील का ??