गणेश उत्सव २०१४ भाग २

मदनबाण's picture
मदनबाण in मिपा कलादालन
30 Aug 2014 - 10:23 am

काल जमतील तितकी आमच्या कॉलनी मधील गणेश मंडळे /घरगुती गणपती बाप्पा फिरलो,आणि गणपती बाप्पाचे विविध रुप टिपले. :)

1

2

3

4

5

6

7

8

9

10

11

गणेश उत्सव २०१४ भाग १
{हौशी फोटुग्राफर} :)
मदनबाण.....

कॅमेरा :- निकॉन डी-५१००
रॉ प्रोसेसिंग करुन फोटो कंप्रेस केले आहेत.
*फोटो कंप्रेस केल्यामुळे कलरटोन मधे फरक पडतो.

प्रतिक्रिया

विलासराव's picture

30 Aug 2014 - 10:25 am | विलासराव

झक्कास!!!!!!!!!!!!!!!

विलासराव's picture

30 Aug 2014 - 10:29 am | विलासराव

पगडी आणी तलवारवाला बाप्पा आवडला.

मदनबाण's picture

30 Aug 2014 - 11:15 am | मदनबाण

पगडी आणी तलवारवाला बाप्पा आवडला.
आधीच्या धाग्यात सांगितल्या प्रमाणे यावेळी खंडेरायांच्या रुपातील गणपतीच्या मूर्तीला प्रचंड मागणी होती. :)
जय मल्हार या मालिकेचे टायटल गाणे सुरेख आहेच,पण या मालिकेतील सर्वच आलाप मला फार आवडतात ! :)
जय मल्हार या मालिकेचे २ टायटल गाणी इथे देतो, एक मूळ आणि एक शब्द रचने सकट.

विलासराव's picture

30 Aug 2014 - 1:19 pm | विलासराव

मस्तच आहे.
धन्यवाद.

भिंगरी's picture

30 Aug 2014 - 5:06 pm | भिंगरी

गाण्यात नीळा घोडा असा उल्लेख आहे,पण खंडेराय बसलेला घोडा नीळा वाटत नाही.

भिंगरी's picture

30 Aug 2014 - 5:09 pm | भिंगरी

मला तस वाटत नाही,कदाचित माझी चुक असू शकेल.

गाण्यात नीळा घोडा असा उल्लेख आहे,पण खंडेराय बसलेला घोडा नीळा वाटत नाही.
तुमच म्हणण बरोबर आहे, परंतु काही जुन्या रचनांमधे नीळा किंवा नीळ्या घोडा असा उल्लेख आढळतो. उदा. रेणुका मातेच्या एका आरतीच्या रचनेत असाच उल्लेख आहे.
कानडी सपन सांगते अहो सांगते |
ऐका राजस बाई निळ्या घोड्यावरी स्वार हो अहो स्वार हो |
पहिली येते यमाई आणिक दोघिया संगती |
माय भैरव बाई आणिक चौसष्ट योगिनी अहो योगिनी |
उदो बाले तुकाई अंबा माये तू अंबिके जगदंबिके |
महामाये रेणूके भक्तांसी मुक्ती तू देई हो अहो देई हो ||३||

नीळाच घोडा का ? असा प्रश्न मलाही पडलेला आहे.
यात नीळा घोडा हा रंग अभिप्रेत आहे की नीळा ही घोड्याची एक विशिष्ठ जात जी वार्‍याच्या वेगाने {अर्थात वेगवान} धावणारी आहे ते माहित नाही.
दुसरा संदर्भ महाराष्ट्रीय ज्ञानकोशात चित्रसंग्रहालयें मधे अलमगीर पातशहाचा घोडा नीळा थोरला. असा चित्रांसंदर्भात मिळतो आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टिम टिम टिंबाली... {बाप्पाचे कोळी गीत}

किसन शिंदे's picture

30 Aug 2014 - 9:36 pm | किसन शिंदे

मुळात ते "हरि मदन मल्हारी" नसून "मणि मर्दन मल्हारी" असं आहे/असं असावं. मणि नावाच्या दैत्याचे मल्हारीने(खंडोबाने) मर्दन केले, त्याचे पारिपात्य केले असा त्याचा अर्थ होतो. विडिओत दाखवलेल्या हरि मदन मल्हारी या वाक्याचा काहीच अर्थ निघत नाही, ते पुर्णतः चुकीचे आहे. कदाचित वाद्यांच्या ठणठणामुळे आदर्श शिंदेचे शब्द नीटशे ऐकायला आले नसावेत.

मदनबाण's picture

30 Aug 2014 - 10:04 pm | मदनबाण

मणि नावाच्या दैत्याचे मल्हारीने(खंडोबाने) मर्दन केले
स्कंद पर्वतावर शंकराने मणि आणि मल्ल या राक्षसांचा वध खंडा अर्थात तलवारीने केला त्याच खंडामुळे खंडोबा हे नामकरण झाले.
त्यामुळे तू म्हणते योग्य असावे.

प्रचेतस's picture

30 Aug 2014 - 10:29 am | प्रचेतस

मस्त रे बाणा.
फोटो तसे लांबून काढल्याचे जाणवतंय.

खटपट्या's picture

30 Aug 2014 - 11:23 am | खटपट्या

सर्व फोटो छान !!

सुहास झेले's picture

30 Aug 2014 - 12:06 pm | सुहास झेले

मस्त रे बाणा :)

गवि's picture

30 Aug 2014 - 12:19 pm | गवि

मबा.. मस्त रे.

आता देवासोबतच भक्त , जल्लोष, ढमरक टमरक तडम तडम ढोलताशांचा नाद आणि लेझीमची लय , झगमगते मंडप असा आजुबाजूचा माहोलही छायाचित्रात टिपलेला पाहायला आवडेल. कठीण आहे.. मान्य.. पण..

दिपक.कुवेत's picture

30 Aug 2014 - 2:28 pm | दिपक.कुवेत

बाप्पा पाहुन. अजुन फिरा आणि बाप्पाचे फोटो अ‍ॅड करा.

धन्स रे बाणा, तुझ्यामुळे घरबसल्या देवाचं दर्शन होतं.

मुक्त विहारि's picture

30 Aug 2014 - 10:11 pm | मुक्त विहारि

आजकाल बाप्पाचे पोट बारीक का होत चालले आहे?

पुर्वी बाप्पाचे पोट बर्‍यापैकी लंबोदर असायचे.

प्लॅस्टर ऑफ पॅरीसचा भाव बराच वाढलेला दिसत आहे.

अन्या दातार's picture

31 Aug 2014 - 10:59 pm | अन्या दातार

बाप्पांनी वर्क आऊट सुरु केले असेल ;)

तर काय !! लोकं क्यालरी कॉन्शस झाली, बाप्पानं होऊ नये?

अनन्न्या's picture

31 Aug 2014 - 2:49 pm | अनन्न्या

अजून फोटो येऊदेत.

मदनबाण's picture

1 Sep 2014 - 9:08 am | मदनबाण

@वल्ली
फोटो तसे लांबून काढल्याचे जाणवतंय.
हो, काही लांबून तर काही जवळुन काढले आहेत. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- चर्चेसाठी मोदी-अ‍ॅबे आतूर

पैसा's picture

1 Sep 2014 - 4:27 pm | पैसा

सगळे फटु मस्त!

स्पा's picture

1 Sep 2014 - 4:39 pm | स्पा

सुन्दर :)