मंडळी गणपती उत्सव आता काही दिवसांवरच येउन पोहचला आहे. :) मूर्तीकार मूर्त्यांचे काम करण्यात मग्न आहेत, आणि विविध गणपती घरी पोहचण्याच्या आधी बाप्पाची काही विविध रुपे मी टिपली आहेत. :) वेळ मिळाल्यास उत्सवातील बाप्पा टिपायची इच्छा आहे,तसे झाल्यास भाग २ सुद्धा येइल.
रंगकामात मग्न मूर्तीकार
या वेळी झी मराठीच्या जय मल्हार या मालिकेतील खंडेरायांच्या रुपातील गणेश मूर्तीला विशेष मागणी आहे.
रंगकाम होण्याच्या आधी खंडेरायाच्या रुपातील गणपती बाप्पा. :)
यळकोट यळकोट जय मल्हार ! :) रंगकाम पूर्ण झाले आहे,फक्त रंगीबेरंगी खडे लावायचे काम तेव्हढे बाकी आहे. :)
{हौशी फोटुग्राफर} :)
मदनबाण.....
कॅमेरा :- निकॉन डी-५१००
* रॉ-प्रोसेसिंग करुन फोटो कंप्रेस केले आहेत,कंप्रेस केल्यामुळे कलरटोन मधे फरक पडतो.
प्रतिक्रिया
23 Aug 2014 - 2:30 pm | इरसाल
छान, अप्रतिम काही उतरवुन घ्यावे म्हणतो.
23 Aug 2014 - 2:53 pm | सस्नेह
सर्वच बापा कसे सुंदर आहेत ! त्यातल्यात्यात पहिले पाच तर अप्रतिम !
पण सगळ्या मूर्ती जरा लंबुळक्या का दिसताहेत बरं ?
23 Aug 2014 - 7:50 pm | मदनबाण
पण सगळ्या मूर्ती जरा लंबुळक्या का दिसताहेत बरं ?
ह्म्म...मला तर तसं नाही वाटत की फोटोच्या लांबी-रुंदीची थोडी इकडे-तिकडे केली तर अजुन नीट दिसेल बहुधा.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aisa Pehli Baar Hua Hai... ;) :- Har Dil Jo Pyaar Karega
23 Aug 2014 - 3:13 pm | कवितानागेश
सुंदर आहेत सगळ्या मूर्ती. आता कसं खरंच गणपती येतायत असं वाटतय... :)
23 Aug 2014 - 3:33 pm | अत्रुप्त आत्मा
येकच णंबर !
23 Aug 2014 - 5:17 pm | ज्ञानोबाचे पैजार
जबरदस्त मस्त फोटु आहेत.
पैजारबुवा
23 Aug 2014 - 8:30 pm | किसन शिंदे
कलाकार आहेत ही मुर्तीकार मंडळी. फोटो आवडले नेहमीप्रमाणेच.!
23 Aug 2014 - 8:45 pm | प्रभाकर पेठकर
दागदागिन्यांनी जखडलेल्या मूर्तींपेक्षा ६ क्रमांकाची साधी आणि सोज्वळ मूर्ती जास्त आवडली.
बिन रंगविलेला खंडेराय आणि रंगविलेला खंडेराय ह्या दोन वेगवेगळ्या मूर्ती आहेत, असं दिसतंय.
23 Aug 2014 - 9:17 pm | मदनबाण
अगदी खरं आहे काकाश्री... :)
रंगीत फोटोतल्या मूर्तीवर चंद्र नाही, तसेच तलवारी बद्धल सुद्धा फरक आहे.
मूर्तीच्या सांच्यां मधला फरक असावा... रंग नसलेली एका जागची तर रंगवलेली मूर्ती दुसर्या ठिकाणची आहे. बाप्पा कुठल्या पोझ मधे दिसेल ते सांगता येत नाही.... सुपारीच्या गणपती पासुन ते चक्क स्पायडर मॅन गणपती. ;)
{चित्र जालावरचे आहे.}
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aisa Pehli Baar Hua Hai... Wink :- Har Dil Jo Pyaar Karega
23 Aug 2014 - 9:19 pm | मदनबाण
तलवारी :- याच्या जागी खड्ग अर्थात खंडा असे हवे आहे.
23 Aug 2014 - 10:30 pm | प्यारे१
मस्त रे मदनबाणा!
बाकी हे गणपतीचे चि वि आकार लई डोक्यात जातात राव.
गणपती न हुआ कोई फिल्म्स्टार हुआ.
अगदी शिवाजीमहाराज, साईबाबा, कृष्ण ह्या रुपातला गणपती सुद्धा बघायला नको वाटतो.
गणपती... गणपती. सिम्पल आहे. कशाला गोंधळ?
24 Aug 2014 - 6:08 am | खटपट्या
हो बरोबर, तो स्पायडर मैन च्या रूपातला गणपती पाहून कसतरीच होतंय !!
24 Aug 2014 - 9:06 am | मदनबाण
गणपती न हुआ कोई फिल्म्स्टार हुआ.
अजुन रजनीकांत गणपती पाहिला नाहीये मी... तो सुद्धा दिसेल काही सांगता येत नाही. उत्सवाचे बाजारीकरण झाल्यावर या गोष्टी त्यात येणार. तसेही हल्ली कोणी कशाला आणि कसे आवरायचे हेच समजत नाही,न्यायालयाचे आदेश असुन सुद्धा दहीहंडीच्या वेळी त्याचे पालन झाले ?
अगदी शिवाजीमहाराज, साईबाबा, कृष्ण ह्या रुपातला गणपती सुद्धा बघायला नको वाटतो.
ह्म्म... मला स्वतःला यात शाडु मातीचे साधे गणपतीच जास्त भावतात, पण काही वेगळ्या स्वरुपात सुद्धा बाप्पाला बघायला आवडते...पण स्पायडर मॅन गणपती नक्कीच नको ! { एक उदा. द्यायचे म्हणुन मी तो फोटो इथे दिला आहे.} अती उंच मूर्ती सुद्धा नकोश्या वाटतात,विसर्जनाच्या वेळी त्यांना नेताना पहाताना जरा भितीच वाटते.नवसाला पावणारा म्हणुन बाजार भरतो हे काही वेगळेपणे सांगायला हवे ? हल्ली गल्लोगल्ली "अमुक राजा " तमुक राजा" पहायला मिळतोच ना ?
गणपती... गणपती. सिम्पल आहे. कशाला गोंधळ?
खरयं... बाप्पा शूर्पकर्ण आहे, पण या बाजारातील :- उत्सव, शांतता आणि पावित्र्य शोधताना त्याचाही गोंधळ होत असावा !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेराही जलवा... :- Wanted
1 Sep 2014 - 4:33 pm | पैसा
सगळे फटु झक्कास! तुम्ही स्पायडीच्या गणपतीला हसताय, पण कोकणात असे वेगवेगळ्या रूपातले गणपती लै फ्येमस. गणपतीबरोबर बरोबर बाई असेल तर त्या चित्राला बावली गणपती (बाहुली-गणपती) म्हणतात. मी लहान असताना एकाकडे पाहिलेला राजेश खन्नाच्या रूपात गुरुशर्ट बेलबॉटम प्यांट घातलेला आणि स्कूटरला टेकून उभा असलेला गणपती आणि त्याला टेकून उभी बेलबॉटमवाली साक्षात हेमामालिनी अगदी चांगली आठवते आहे!
1 Sep 2014 - 4:48 pm | सूड
खड्यांचा अतिरेक वाटतोय. म्हणजे मसाल्याने मसालितावर मात केल्यासारखी वाटली.