✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गणेश उत्सव २०१४ भाग २

म
मदनबाण यांनी
Sat, 08/30/2014 - 10:23  ·  लेख
लेख
काल जमतील तितकी आमच्या कॉलनी मधील गणेश मंडळे /घरगुती गणपती बाप्पा फिरलो,आणि गणपती बाप्पाचे विविध रुप टिपले. :) 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 गणेश उत्सव २०१४ भाग १ {हौशी फोटुग्राफर} :)

मदनबाण.....

कॅमेरा :- निकॉन डी-५१०० रॉ प्रोसेसिंग करुन फोटो कंप्रेस केले आहेत. *फोटो कंप्रेस केल्यामुळे कलरटोन मधे फरक पडतो.

Book traversal links for गणेश उत्सव २०१४ भाग २

  • ‹ गणेश उत्सव २०१४ भाग १
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14466 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

झक्कास!!!!!!!!!!!!!!!

विलासराव
Sat, 08/30/2014 - 10:25 नवीन
झक्कास!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

पगडी आणी तलवारवाला बाप्पा

विलासराव
Sat, 08/30/2014 - 10:29 नवीन
पगडी आणी तलवारवाला बाप्पा आवडला.
  • Log in or register to post comments

पगडी आणी तलवारवाला बाप्पा

मदनबाण
Sat, 08/30/2014 - 11:15 नवीन
पगडी आणी तलवारवाला बाप्पा आवडला. आधीच्या धाग्यात सांगितल्या प्रमाणे यावेळी खंडेरायांच्या रुपातील गणपतीच्या मूर्तीला प्रचंड मागणी होती. :) जय मल्हार या मालिकेचे टायटल गाणे सुरेख आहेच,पण या मालिकेतील सर्वच आलाप मला फार आवडतात ! :) जय मल्हार या मालिकेचे २ टायटल गाणी इथे देतो, एक मूळ आणि एक शब्द रचने सकट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव

मस्तच आहे. धन्यवाद.

विलासराव
Sat, 08/30/2014 - 13:19 नवीन
मस्तच आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

नीळा घोडा

भिंगरी
Sat, 08/30/2014 - 17:06 नवीन
गाण्यात नीळा घोडा असा उल्लेख आहे,पण खंडेराय बसलेला घोडा नीळा वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

म्हणजे

भिंगरी
Sat, 08/30/2014 - 17:09 नवीन
मला तस वाटत नाही,कदाचित माझी चुक असू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिंगरी

गाण्यात नीळा घोडा असा उल्लेख

मदनबाण
Sat, 08/30/2014 - 21:35 नवीन
गाण्यात नीळा घोडा असा उल्लेख आहे,पण खंडेराय बसलेला घोडा नीळा वाटत नाही. तुमच म्हणण बरोबर आहे, परंतु काही जुन्या रचनांमधे नीळा किंवा नीळ्या घोडा असा उल्लेख आढळतो. उदा. रेणुका मातेच्या एका आरतीच्या रचनेत असाच उल्लेख आहे. कानडी सपन सांगते अहो सांगते | ऐका राजस बाई निळ्या घोड्यावरी स्वार हो अहो स्वार हो | पहिली येते यमाई आणिक दोघिया संगती | माय भैरव बाई आणिक चौसष्ट योगिनी अहो योगिनी | उदो बाले तुकाई अंबा माये तू अंबिके जगदंबिके | महामाये रेणूके भक्तांसी मुक्ती तू देई हो अहो देई हो ||३|| नीळाच घोडा का ? असा प्रश्न मलाही पडलेला आहे. यात नीळा घोडा हा रंग अभिप्रेत आहे की नीळा ही घोड्याची एक विशिष्ठ जात जी वार्‍याच्या वेगाने {अर्थात वेगवान} धावणारी आहे ते माहित नाही. दुसरा संदर्भ महाराष्ट्रीय ज्ञानकोशात चित्रसंग्रहालयें मधे अलमगीर पातशहाचा घोडा नीळा थोरला. असा चित्रांसंदर्भात मिळतो आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टिम टिम टिंबाली... {बाप्पाचे कोळी गीत}
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिंगरी

मुळात ते "हरि मदन मल्हारी"

किसन शिंदे
Sat, 08/30/2014 - 21:36 नवीन
मुळात ते "हरि मदन मल्हारी" नसून "मणि मर्दन मल्हारी" असं आहे/असं असावं. मणि नावाच्या दैत्याचे मल्हारीने(खंडोबाने) मर्दन केले, त्याचे पारिपात्य केले असा त्याचा अर्थ होतो. विडिओत दाखवलेल्या हरि मदन मल्हारी या वाक्याचा काहीच अर्थ निघत नाही, ते पुर्णतः चुकीचे आहे. कदाचित वाद्यांच्या ठणठणामुळे आदर्श शिंदेचे शब्द नीटशे ऐकायला आले नसावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

मणि नावाच्या दैत्याचे

मदनबाण
Sat, 08/30/2014 - 22:04 नवीन
मणि नावाच्या दैत्याचे मल्हारीने(खंडोबाने) मर्दन केले स्कंद पर्वतावर शंकराने मणि आणि मल्ल या राक्षसांचा वध खंडा अर्थात तलवारीने केला त्याच खंडामुळे खंडोबा हे नामकरण झाले. त्यामुळे तू म्हणते योग्य असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

मस्त रे बाणा.

प्रचेतस
Sat, 08/30/2014 - 10:29 नवीन
मस्त रे बाणा. फोटो तसे लांबून काढल्याचे जाणवतंय.
  • Log in or register to post comments

सर्व फोटो छान !!

खटपट्या
Sat, 08/30/2014 - 11:23 नवीन
सर्व फोटो छान !!
  • Log in or register to post comments

मस्त रे बाणा

सुहास झेले
Sat, 08/30/2014 - 12:06 नवीन
मस्त रे बाणा :)
  • Log in or register to post comments

मबा.. मस्त रे.

गवि
Sat, 08/30/2014 - 12:19 नवीन
मबा.. मस्त रे. आता देवासोबतच भक्त , जल्लोष, ढमरक टमरक तडम तडम ढोलताशांचा नाद आणि लेझीमची लय , झगमगते मंडप असा आजुबाजूचा माहोलही छायाचित्रात टिपलेला पाहायला आवडेल. कठीण आहे.. मान्य.. पण..
  • Log in or register to post comments

वा मस्त वाटले विविध रुपातले

दिपक.कुवेत
Sat, 08/30/2014 - 14:28 नवीन
बाप्पा पाहुन. अजुन फिरा आणि बाप्पाचे फोटो अ‍ॅड करा.
  • Log in or register to post comments

धन्स रे बाणा, तुझ्यामुळे

गणपा
Sat, 08/30/2014 - 15:18 नवीन
धन्स रे बाणा, तुझ्यामुळे घरबसल्या देवाचं दर्शन होतं.
  • Log in or register to post comments

बादवे...

मुक्त विहारि
Sat, 08/30/2014 - 22:11 नवीन
आजकाल बाप्पाचे पोट बारीक का होत चालले आहे? पुर्वी बाप्पाचे पोट बर्‍यापैकी लंबोदर असायचे. प्लॅस्टर ऑफ पॅरीसचा भाव बराच वाढलेला दिसत आहे.
  • Log in or register to post comments

बाप्पांनी वर्क आऊट सुरु केले

अन्या दातार
Sun, 08/31/2014 - 22:59 नवीन
बाप्पांनी वर्क आऊट सुरु केले असेल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

तर काय !! लोकं क्यालरी कॉन्शस

सूड
Mon, 09/01/2014 - 16:42 नवीन
तर काय !! लोकं क्यालरी कॉन्शस झाली, बाप्पानं होऊ नये?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

छान आहेत सर्व बाप्पा!

अनन्न्या
Sun, 08/31/2014 - 14:49 नवीन
अजून फोटो येऊदेत.
  • Log in or register to post comments

@वल्लीफोटो तसे लांबून

मदनबाण
Mon, 09/01/2014 - 09:08 नवीन
@वल्ली फोटो तसे लांबून काढल्याचे जाणवतंय. हो, काही लांबून तर काही जवळुन काढले आहेत. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- चर्चेसाठी मोदी-अ‍ॅबे आतूर
  • Log in or register to post comments

झक्कास!

पैसा
Mon, 09/01/2014 - 16:27 नवीन
सगळे फटु मस्त!
  • Log in or register to post comments

सुन्दर

स्पा
Mon, 09/01/2014 - 16:39 नवीन
सुन्दर :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा