<बुकी स्टॉल >

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
7 Jul 2014 - 12:26 pm

आमची संप्रेरणा
http://misalpav.com/node/28254

समोर चौकतल्या त्या चिठ्ठीवाल्या बाबूकडे पाहत होतो,काय करावे काय नको वाटत होते? किरकोळ असली चिठ्ठी ही त्याची रोजी रोटी होती. अगदी चार आण्यातसुद्धा कल्याण शुभ राशी ठाणे ओपन, कराची क्लोज, सिक्कीम ऑन लाईन वगैरे सगळेच तिथे मिळायचे. संध्याकाळी तो रस्त्याच्या कडेला कधी टेबल टाकून किंवा नुसताच स्टूल टाकून मेणबत्ती घेवून बसत असे
दोन दिवसानी आम्ही तो चौक घर सोडला ,बाबाची आर्थर रोडला सेंट्रलला बदली झाली तेथे आम्ही गेलो.खुपच आठवणी घेऊन गेलो,शिला जीचे मी नेहमी नाव घेवून आकडा लावायचो तीची चिठ्ठी जिच्यावर तीने मी लिहलेल्या सत्त्याच्या आकड्या च्या पुढे 'टु' लिहले होते.त्यामुळे ती चिठ्ठी आज ही माझ्याजवळ ठेवली आहे. ओपन ला सत्त्या आणि क्लोज ला दुर्री येणार ही तिची टीप कधीच वाया जात नसे.
आज त्या चौकात मी बर्याच वर्षानी आलो, नवे पंटर शोधायच्या निमित्तने
त्या चौकात व परिसरात खुप बदल दिसला, पण त्या चिठ्ठीवाल्या बाबुच्या चेहर्यात काहीच बदल दिसत नव्हता,तो मला ओळखत नसेल पण मी त्याला चांगला ओळखतो.त्यच्या केसात व चेहर्यात बदल झाला आसला तरी त्याच्या कामा वरुन मला जसा मी चौकातून पाहत होतो तसाच वाटत होता.
तो आकडे लावण्यात गुंग होता, शिसपेन्सिलच्या तुकड्याने चिठ्ठ्या आणि आकडे एका कागदावर टिपून घेण्यात तो गर्क होता
शिला नव्या पंटरबरोबर चालू आहे असे मला कळाले पण मला त्याचे दु:ख वाटले नाही चिकणी शिला गयी तो क्या पंटर बदल गये तो क्या हुवा कल्याण शुभ राशी तो वही है .ती मला ओपन क्लोज च्या टीप द्यायची .त्यावेळी दोघेही आम्ही बालक होतो.
पण आज मी ठरविले की त्या चिठ्ठीवाल्या बाबुला चिठ्ठी परत करायची,पण कसे? पंधरा सोळा वर्षापुर्वीची चिठ्ठी. तो शिव्यासुद्धा देणार नाही आपणाला? मग मीच ठरिवले.सध्याची परस्थिती पाहता त्याला दहा रुपये देण्या ऐवजी शभंर रुपये ओपन ला लावायचे. क्लोज ला या वेळेस ढिस व्हायचे.
त्याच्या स्टूलकडे गेलो,मी एकटाच होतो त्यामुळे मी कोणत्या आकडा लावतो ते पाहत होता.
मी त्याची नजर ओळखली व मीच म्हणालो,'काय राव आज फक्त ओपनलाच पैसे ही लावताय की काय? जास्त झालेत की काय,'
तो गोधंळलेल्या नजरेन माझ्याकडे पाहिले,व म्हणाला,' म्हणजे. डिपार्टमेंटच्या उकिडवे सायबाच्या चिठ्ठ्या रोज येतात त्याचे पैशे रोज पोच करतोय. उगाच हिकडं फिरकुन नका. आमाला शांतपणे धंदा करू द्या?,'
'माझे एक मित्राने येथे चिठ्ठी फाडली होती.त्या चिठ्ठीचे त्याना शंभर रुपये मिळाले,तेच त्यानी तुम्हाला परत करायला सांगुन गावी गेलेत,'मी म्हणालो,
'हे कसं काय?,'बाबु म्हणाला, त्या दिवशी तर पंजा आला होता आन क्लोज ला मिंडी. एकदम टायट झालो. दादाने सांभालून घेतलं म्हणूण बरं. नायतर पार पलून जावं लागलं असतं त्या कदम सायबानी तर मला टायरात टाकून धोपाटलंच असतं.
'ते मला माहीत नाही पुन्हा जेव्हा येतील तेव्हा त्याना विचारा,' आसे म्हणुन मी त्यच्या हातात शंभराची नोट ठेवली,
'आहो पण कोण ती व्यक्ती? नाव तर सांगा?,' आन आकडा काल लावायचा ते तरी सांगा
आता मात्र मी सापडलो,काय सांगावे प्रश्न मला पडला,
'तेच तुम्हाला येऊन सांगतील,' आसे म्हणुन तेथुन मी निघालो,
मला जुनी चिठ्ठी काही परत करता आली नाही पण पैसे दिल्याचे मला समाधान वाटु लागले.
दुसर्या सकाळी मी तो चौक सोडुन निघालो, आकडा फुटायला खुप वेळ होता, म्हणुन त्या सकाळी सकाळी बाबु बुक स्टूल कडे लांबुनच पाहीले, आज बहुतेक तो गडबडीत चिठ्ठ्या उलटत होता, त्याची शीलाच्या जागी आलेली नवी पण तिच्यापेक्षाही चिकणी पंटर मुलगी ही चिठ्ठ्या चाळत होती.
एक तासानी मी आकड्याच्या पाटीकडे जाण्यास निघालो,शेवटची एक नजर मी त्या बुकी स्टूलच्या बाबु कडे पाहिले,तर आजुन ही तो चिठ्ठ्या पलटत होता.
आज त्याला क्लोज मधे ओपन आणि ओपनमधे क्लोज चा अर्थ समजला होता.
कानाखाली पंजाचे वळ न उमटू देता हा अर्थ नव्या आलेल्या कदम सायबाला कसा सांगायचा याचाच विचार तो करत होता
*

बालकथामदत

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jul 2014 - 12:48 pm | अत्रुप्त आत्मा

मी पयला :D

एस's picture

7 Jul 2014 - 1:12 pm | एस

पण अनुभव असल्याशिवाय एवढं 'चित्रदर्शी' का काय ते लिहिता येणार नाही. संगम लागली होती का कधी? खरा जुगारी या प्रश्नावर फक्त स्माय्ल्ल्लं देतो ;-)

धमाल मुलगा's picture

7 Jul 2014 - 3:56 pm | धमाल मुलगा

इथं जोडी फुटायची मारामार, अन संगम अन् तिकडमच्या कसल्या गोष्टी करता राव. ;)

इजाभाव - 'सत्त्या' नाय हो, 'लंगडा' म्हणायचं. :)

प्यारे१'s picture

7 Jul 2014 - 3:58 pm | प्यारे१

अणुभव अणुभव तो हाच काय रे?

धमाल मुलगा's picture

7 Jul 2014 - 4:14 pm | धमाल मुलगा

आपण त्याला अभ्यास म्हणूया. ;)

प्रदीप's picture

7 Jul 2014 - 1:25 pm | प्रदीप

विडंबन मस्त जमलंय!

प्यारे१'s picture

7 Jul 2014 - 1:59 pm | प्यारे१

खिक्क्क्क!

विटेकर's picture

7 Jul 2014 - 3:58 pm | विटेकर

यू टू ????