मातेचे गर्भालय
पवित्र देवालय
शांतीचे आलय
कैवल्याच्या
मातेच्या गर्भात
वात्सल्य व्यवस्था
तिथे प्राणप्रतिष्ठा
अस्तित्वाची
मातेचे गर्भस्थान
मंगल तीर्थस्थान
आत्म्याचे आधिष्ठान
मुर्तिरूप
मातेच्या गर्भात
अबोध तो बुद्ध
जन्मा येता सिद्धार्थ
होइ त्याचा..........
प्रतिक्रिया
17 Oct 2008 - 2:31 pm | अरुण मनोहर
मातेच्या गर्भात
अबोध तो बुद्ध
जन्मा येता सिद्धार्थ
होइ त्याचा..........
चांगली कविता. शेवटच्या कडव्याचा अर्थ "जन्माला आल्यावर सगळ्यांनाच जीवनाचा अर्थ सिद्ध होतो" असा तर नसावा? पण मग एक सिद्धार्थ सोडला, तर इतरांसाठी हे कसे लागू होते, ह्यावर कवीचे विश्लेषण कळेल कां?
17 Oct 2008 - 2:31 pm | अरुण मनोहर
मातेच्या गर्भात
अबोध तो बुद्ध
जन्मा येता सिद्धार्थ
होइ त्याचा..........
चांगली कविता. शेवटच्या कडव्याचा अर्थ "जन्माला आल्यावर सगळ्यांनाच जीवनाचा अर्थ सिद्ध होतो" असा तर नसावा? पण मग एक सिद्धार्थ सोडला, तर इतरांसाठी हे कसे लागू होते, ह्यावर कवीचे विश्लेषण कळेल कां?
17 Oct 2008 - 3:48 pm | विसोबा खेचर
या कवितेला दाद देण्याकरता माझे शब्द अपुरे आहेत...!
आपला,
(मातृभक्त) तात्या.
17 Oct 2008 - 6:52 pm | दत्ता काळे
मातेच्या गर्भात
वात्सल्य व्यवस्था
तिथे प्राणप्रतिष्ठा
अस्तित्वाची
हे केवळ अप्रतिम, काय कल्पना आहे? व्वा !
17 Oct 2008 - 11:12 pm | शितल
संपुर्ण कविताचा सुंदर केली आहे.
:)
17 Oct 2008 - 11:43 pm | प्राजु
मातेचे गर्भस्थान
मंगल तीर्थस्थान
आत्म्याचे आधिष्ठान
मुर्तिरूप
अतिशय सुरेख.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
18 Oct 2008 - 12:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
यापुढे काही सुचत नाही.
अदिती
18 Oct 2008 - 12:54 pm | सहज
माता, बालक, वात्सल्य, अधिष्ठान, जन्म हे शब्द/भाव प्रभावी आहेत खरे.
पण ४ वेळा मातेचे गर्भालय, मातेच्या गर्भात, मातेचे गर्भस्थान [गर्भ गर्भ गर्भ गर्भ...] ह्या शब्दांमुळे ही कविता मला तरी तितकी भावली नाही. सॉरी. :-(