वारंवार विचारले जाणारे प्रश्न.

सरपंच's picture
सरपंच in पुस्तक पान
24 Feb 2008 - 10:03 pm

नमस्कार, मिसळपाव वर नव्याने दाखल झालेल्या लोकांना काही गोष्टी
करण्यासाठी जरा अडचण जाणवते तसेच नवीन सुविधा देऊ केल्यास त्याची ओळख
सुद्धा करून देता यावी या हेतूने हे सदर सुरू करीत आहोत. संकेतस्थळावर
कुठलीही गोष्ट कशी करावी या विषयी चर्चा सुरू करण्या आधी कृपया येथे बघूनघ्यावे की तो प्रश्न आधीच कुणी विचारलेला तर नाहीये ना  ?

काही प्रश्नांचे दुवे.

१) सदस्य होण्यापूर्वी वाचलेच पाहिजे असे काही.
२) टंकलेखन साहाय्य
३) मिसळपाव वर फोटो कसा चढवावा?
४) मिपावर मोबाईलवरून फोटो कसा चढवावा
५) आपले संकेताक्षर (पासवर्ड) कसे बदलावे?
६) काही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे
७) वाचनखुणा कशा साठवाव्या?
८) दुवा (लिंक) कसा द्यावा.

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

5 Aug 2012 - 2:09 am | अभ्या..

मिपावर जीव जडला आहे पण माझे मराठी टायपीन्ग inscript or DOE वर लवकर होते. आणि confusion होत नाही. तो काही option आहे का? बर्‍याच साईट्वर (उदा. मटा) option आहे.

काजुकतली's picture

25 Aug 2012 - 1:44 pm | काजुकतली

..

आशु जोग's picture

30 Sep 2012 - 4:27 pm | आशु जोग

सरपंचसाहेब

नव्या मिसळीवर एक गोष्ट ध्यानात आली.
मेसेज पाठवताना मराठी उमटत नाही

काही पाकक्रुति दिसत नाहीत ,पण त्यांच्या खालि लिहीलेले अभीप्राय दिसतात ,तसेच आपले सदस्य नाम कसेबदलावे???

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Oct 2012 - 6:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख दिसत नाही, पाकृ दिसत नाहीत, प्रतिसाद दिसत नाहीत, खरड आल्याचे कळत नाही, व्य.नि, रिकामे दिसतात, नुसतेच नावं दिसतात, प्रतिसादाचे शीर्षकं दिसतात, प्रतिसाद दिसत नाहीत, अक्षररंग काम करत नाहीत. या सर्वांवर कामं चालुच आहे. कामं करणारी मंडळीही आपापल्या व्यापातुन कामं करत असतात. थोडा वेळ लागेल. तेव्हा या सर्व बारिक-सारिक गोष्टी मालकांच्या आणि तांत्रिक काम करणार्‍यांच्या लक्षात आहेतच. पुन्हा स्मरण करुन दिल्याबद्दल आभारी. :)

>>> आपले सदस्य नाम कसेबदलावे ???
नीलकांत किंवा प्रशांत या आयडींना आपणास कोणते नाव हवे आहे, ते कळवावे. आपणास सदस्यनाम बदलुन मिळेल.

-दिलीप बिरुटे
(संपादक )

श्रीहेरम्ब's picture

13 Mar 2015 - 7:51 pm | श्रीहेरम्ब

काय बोम्ब आहे ते कळत नहि. प्लेन तेक्ष्त केल्यवर थोडे शब्द येतहेत. झाल्.

मला माझे लेखन छोट्या मोबाईल वरून प्रतिक्रिया स्वरूपात करताना चटकन जमते . पण मोठा लेख थोडा थोडा लिहून "पूर्वपरिक्षण " करून "प्रकाशित करा" च्याऐवजी "लेखन साठवण" ( = "save as draft" ) असे करून माझ्या खात्यात ठेवता आल्यास मला तो सवडीने पूर्ण करता येईल . मोबाईल मधून टायपिंगला वेळ लागतो . "साठवण" हे बटण वाढवल्यास फार सोय होईल . जमते का बघा . प्रवासात आपल्या हातातला एक चिंटुकला मोबाईल घरच्या दोन कंप्युटरपेक्षा भारी असतो .

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Apr 2013 - 10:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

"लेखन साठवण" ही सोय खरंच फार म्हणजे फारच उपयोगी होईल. माझ्यातर्फे या सूचनेला +१००,००० अनुमोदने !

"पूर्वपरिक्षण", "लेखन साठवण" आणि "प्रकाशित करा" अशी तीन बटणे असल्यास एक लेख अनेक सत्रांत (sessions) लिहून मग प्रकाशित करता येइल.

संमं ने जरूर विचार करावा.

बहुगुणी's picture

4 Apr 2013 - 10:35 pm | बहुगुणी

हे प्रश्न आधीही कुणीतरी विचारलेच असणार, पण मला उत्तरं सापडत नाहीयेत.

इथलं मिपावरचं 'शोध'यंत्र गायब झालंय की मलाच दिसत नाहीये? जुने लेख शोधायला ही एक उपयुक्त सोय होती.

तसंच पाककृती वगैरे सदरात (आणि मला वाटतं इतर लेखांच्याही बाबतीत) विषयाशी साधर्म्य असणारे इतर लेख उजवीकडे दर्शवले / सुचवले जायचे, तीही सोय बंद झाली असं दिसतं.

या सोयी कुठे इतरत्र दडून बसल्या असतील तर त्या कशा शोधायच्या याची कुणाला काही माहिती आहे का? त्या तात्पुरत्या बंद केल्या असतील तर नीलकांत आणि संपादक मंडाळी त्या पुन्हा सुरू करून वाचकांचा दुवा घेतील का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Apr 2013 - 10:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपाचं उर्ध्वश्रेणीकरण करतांना आणि त्यानंतर मिपावर बरेच बदल करावे लागले, अजूनही त्यात बदल करणे चालूच आहेत. 'शोध यंत्र' आणि विषयाशी साधर्म्य असलेले इतर लेख उजवीकडे दिसायचे ते काही कारणामुळे बंद केलेले आहेत. आपण म्हणता त्या विषयावर आणि राहीलेल्या प्रलंबित सुविधेवर नीलकांत काम करतोच आहे.

-दिलीप बिरुटे
(संपादक)

बहुगुणी's picture

4 Apr 2013 - 10:50 pm | बहुगुणी

ओके, नीलकांत आणि सहकार्‍यांना वेळ मिळेल तेंव्हा होऊ द्यात सुविधा उपलब्ध, आपण वाट पाहू. दरम्यान तत्परतेने उत्तर दिलंत त्याबद्दल धन्यवाद!

श्रावण मोडक's picture

4 Apr 2013 - 11:08 pm | श्रावण मोडक

अजूनही त्यात बदल करणे चालूच आहेत.

ब्रिदवाक्य की काय म्हणतात ते का हे?

श्रीरंग_जोशी's picture

4 Apr 2013 - 10:48 pm | श्रीरंग_जोशी

या सुविधा मिपावर पुन्हा उपलब्ध होतील तेव्हा आनंदच वाटेल.

पण तोवर जालावर उपलब्ध असलेले शोधइंजिन वापरून परीणामकारकपणे आपण इथल्या साहित्याचा शोध घेऊ शकता.

उदा. मी तुमचे सदस्यनाम केवळ मिपा या संस्थळावर बिंगून पाहिले. तर खालिलप्रमाणे उत्तरे मिळाली.

शोधण्यासाठी वापरलेले शब्द -> बहुगुणी site:misalpav.com

Any time AllPast 24 hoursPast weekPast month

इंचा-इंचाने आपण जम्मू ...
www.misalpav.com/node/13500बहुगुणी - Tue, 03/08/2010 - 01:44 ...

पाककृती | मिसळपाव
www.misalpav.com/recipee.html?page=67

केवळ बहुगुणी असे बिंगून पाहिल्यावर बहुगुणी अंजीर, बहुगुणी आवळा हि पाने मिळाली :-).

बहुगुणी's picture

4 Apr 2013 - 10:55 pm | बहुगुणी

मदतीबद्दल धन्यवाद, जोशी साहेब!

मराठी_माणूस's picture

23 Apr 2013 - 8:41 pm | मराठी_माणूस

अजुनही मराठीत टंकता येत नाही. हे मि दुसऱ्या संस्थाळा वरून टंकले आहे. ही समस्या गेल्या २/३ आठवड्या पासून येत आहे. कृपया कोणी तरी मदत करा

श्रीरंग_जोशी's picture

24 Apr 2013 - 8:32 pm | श्रीरंग_जोशी

मी आय. इ. १० मध्ये मिपावर मराठी टंकू शकलो नव्हतो. पुन्हा प्रयत्नही केला नाही म्हणा.
जुन्या आय. इ. वर काहीच समस्या नाही.
क्रोमवर टंकताना अक्षरे खोडली तर जरा विचित्र अनुभव येतो पण चूकीचे टंकन खोडण्यापेक्षा तसेच ठेवून बरोबर शब्द लिहावा. नंतर पूर्ण लिहून झाल्यावर चुकलेले शब्द उडवल्यास ती समस्या येत नाही.

आदूबाळ's picture

20 May 2013 - 12:08 pm | आदूबाळ

श्रीरंगराव, मला पण क्रोम वापरताना हीच अडचण येते. यावर मला सापडलेला उपायः
१. क्रोम ब्राऊझरची दुसरी खिडकी उघडून ठेवावी
२. आपल्याला पाहिजे तो शब्द खोडावा
३. आल्ट्+टॅब वापरून दुसर्‍या खिडकीत डोकावून यावे (म्हणजे दोनदा आल्ट्+टॅब)
४. मग योग्य शब्द लिहावा

असे केल्यास तो "विचित्र प्रकार" बंद होतो.

(हे म्हणजे डॉक्टरकडे न जाता मांत्रिकाकडे जाण्यासारखं आहे खरं! हा काय जादूटोणा आहे हे मला सांगता येणार नाही, पण उपयोग होतो हे मात्र नक्की...)

श्री गावसेना प्रमुख's picture

20 May 2013 - 4:03 pm | श्री गावसेना प्रमुख

बाळ राव दुसर्‍या टॅब ला उघडण्याची काही आवश्यकता नाहीये, हवा तो शब्द खोडल्या नंतर तिथे माउस ने क्लीक करुन टाईप केल की तो विचीत्र प्रकार होत नाही,

प्रभाकर पेठकर's picture

15 May 2013 - 3:03 pm | प्रभाकर पेठकर

चित्रं आणि शीर्षक, पानाच्या मध्यभागी दिसण्यासाठी काय करावे?? पूर्वीची सुविधा का काढून टाकली?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 May 2013 - 4:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

<p align="Center">चित्र/शीर्षक/</p> हा कोड वापरावा.

चित्र,शीर्षक Left किंवा
right ला हवे असल्यास Center जागी Left किंवा right असे लिहावे.

(आणि प्रतिसादाच्या खाली text format दिसते तिथे FULL HTML करायला विसरु नका. मी कोड टाकून प्लेन टेक्स्ट मधे लिहिले आहे)

-दिलीप बिरुटे

प्रभाकर पेठकर's picture

16 May 2013 - 2:38 am | प्रभाकर पेठकर

जमले हो जमले, बिरुटे सर.

पुन:श्च धन्यवाद.

NiluMP's picture

9 Sep 2013 - 12:36 am | NiluMP

1. एखादया लेखक आपला आवडता झाल्यास त्याच्या इतर लेखांचा दुवा त्याच्या नावावर क्लिक केल्यावर मिळावी अशी सोय असावी. अगदी अशीच नाही पण मीमराठी किंवा मनोगत पैकी कोणत्यातरी संस्थळावर अशी सोय मी पाहिली आहे.

2. तसेच खाली एका पानावरुन दुस-या पानावर जाण्यासाठी पानांचा दुवा दिला आहे त्यापेक्षा पान क्रमांक टंकून इच्छित पानावर जाण्याची सोय असावी

प्रभाकर पेठकर's picture

24 Oct 2013 - 2:26 pm | प्रभाकर पेठकर

मिपावर लेखन करुन अप्रकाशित ठेवण्यासाठी काय करावे? कालांतराने प्रकाशित करायचे असेल तर ते लिहून तयार केल्यावर काय करावे?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Oct 2013 - 2:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पेठकर साहेब, अजून तरी मिपावर अशी काही सुविधा नाही.

आपल्यातल्या आपल्यात : आपणच आपल्याला व्य.नि. करावा आणि लेखन साठवून ठेवावे. लेखन पूर्ण झाले की चोप्य पस्ते करावे. :)

-दिलीप बिरुटे

नाखु's picture

29 Nov 2013 - 9:20 am | नाखु

लेखन साहित्य कसे शोधावे?

गणपा's picture

11 Dec 2013 - 1:38 pm | गणपा

http://www.misalpav.com/user/०००/authored
वरील दुव्यात '०००'च्या जागी आपल्याला हव्या असलेल्या लेखक/लेखीकेचा सदस्य क्रमांक द्यावा.
लेखक/लेखीकेचा सदस्य क्रमांक शोधण्यासाठी त्याच्या/तिच्या नावावर माऊस नेला असता ब्राउझरच्या खाली डाव्या कोपर्‍यात एक लिंक दिसेल. त्यात सदस्य क्रमांक दिसेल.
उदा: तुमच्या नावावर माऊस फिरवला असता मला हे दिसलं... wwww.misalpav.com/user/1015

आर्या१२३'s picture

11 Dec 2013 - 1:05 pm | आर्या१२३

मिपावर एखाद्या 'विषया'नुसार मला त्यावरची चर्चा/ लेख वाचायचे असतील तर कसे शोधायचे?
इथे सर्च ऑप्शन दिसत नाही.

मिसळपाववर एखादा धागा कसा शोधायचा?

उदा. समजा मला गोवा प्रवासाविषयी काही माहिती हवी आहे तर ह्या विषयावर मिसळपाववर आधी कुठे चर्चा झाली आहे का? असेल तर तो धागा मला कसा शोधता येईल?

'गोवा प्रवास' हा कीवर्ड टाकुन सर्च करण्याची सोय मिपावर आहे का? असेल तर कुठे आहे?

कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद.

नगरीनिरंजन's picture

4 Jan 2014 - 12:23 pm | नगरीनिरंजन

मिपावरची शोध सेवा चालत नाही. गूगलवर शोधल्यास सगळे धागे मिळतात.
उदा. "site:misalpav.com गोवा" अशी स्ट्रिंग टाकल्यास मिपावरील गोव्यासंबंधी सगळे धागे दिसावेत.

मिसळपाव येथे काही लेख शोधायचे असेल तर गुगलने असे शोधल्यास सापडतात :

१)आपल्याला गोवा याविषयी हवे असल्यास "मिसळपाव : गोवा " असे गुगलच्या सर्च फिल्ड मध्ये लिहावे . करून पाहा .
२)"मिसळपाव :निवडणूक २०१४ " चा गुगल शोध आताचे निवडणुकीचे लेख दाखवेल .
३)"मिसळपाव :नर्मदा परिक्रमा " शोधून परिक्रमेचे लेख मिळतात .

दिपाली पाटिल's picture

6 May 2014 - 1:35 am | दिपाली पाटिल

पुर्णब्रम्हच्या सगळ्या पाककृती कश्या दिसतील?

पैसा's picture

15 May 2014 - 3:33 pm | पैसा
मेघना भुस्कुटे's picture

15 May 2014 - 3:25 pm | मेघना भुस्कुटे

एका विशिष्ट सदस्याचं सगळं लेखन शोधायची सोय पूर्वी मिपावर होती. आता ते कसं शोधतात म्हणे?

पैसा's picture

15 May 2014 - 3:29 pm | पैसा
मेघना भुस्कुटे's picture

15 May 2014 - 4:22 pm | मेघना भुस्कुटे

हाबार्स!

तुषार काळभोर's picture

17 Jun 2014 - 9:25 am | तुषार काळभोर

दुसर्‍या सदस्याच्या नावावर क्लिक केल्यावर त्याचा नंबर कळतो. माझा कसा कळू शकेल?

सुर्यकन्त's picture

16 May 2014 - 6:30 pm | सुर्यकन्त

hello pl help me account pl open hot nahi aani maal kahuch sanjete bagi pl hepl me

मिलिंद बोडस's picture

21 May 2014 - 3:38 pm | मिलिंद बोडस

नमस्कार,

मला माझे काही फोटो कलादालनात अपलोड करायचे आहेत. परंतु काही अडचण येत आहे. "पूर्वपरीक्षण" येथे क्लिक केल्यावर "unexpected error" असा संदेश येतो. काय करावे?

अनुप ढेरे's picture

21 May 2014 - 4:50 pm | अनुप ढेरे

"पूर्वपरीक्षण" येथे क्लिक केल्यावर "unexpected error" असा संदेश येतो. काय करावे?

क्लिक करू नका.

कंजूस's picture

27 May 2014 - 9:29 pm | कंजूस

आताच एक लेख लिहिला node 27972 ,बावीस जणांनी वाचला परंतु नवीन लेखन अथवा माझे लेखन मध्ये दिसत नाही .तंत्रज्ञान मध्ये आहे सामान्य माणसासाठी साधा फोन .

शेखस्पिअर's picture

8 Jun 2014 - 8:31 pm | शेखस्पिअर

सध्याचा लाॅगीन पासवर्ड लागू पडत नाही.
कृपया दखल घेण्यात यावी.

शेखस्पिअर's picture

10 Jun 2014 - 7:34 pm | शेखस्पिअर

अँड्राॅइड अॅपवर वेगळे सदस्यनाम आणि संकेताक्षर लागते का ?

पैसा's picture

21 Jun 2014 - 2:28 pm | पैसा

नेहमीचेच युजरनेम आणि पासवर्ड. मात्र टाईप करताना भाषा मराठी येते का इंग्रजी ते बघून करा.

कोणी मदत करेल काय ?

सुहास झेले's picture

21 Jun 2014 - 1:28 pm | सुहास झेले

ह्येच बोलतो....

शिद's picture

16 Jun 2014 - 3:58 pm | शिद

प्रतिक्रिया किंवा खरड करताना शब्द रंगवण्याची सुविधा काढुन टाकली का? की मलाच हा त्रास होतोय?

Text Color बटनावर क्लिक करुन अथवा Alt+C दाबून सुद्धा एक छोटासा पांढरा चौकोन दिसतोय.

पैसा's picture

21 Jun 2014 - 2:30 pm | पैसा

पुढच्या वेळी नीलकांत काही काम करील तेव्हा बघेल.

धन्यवाद. अक्षरं रंगवण्याची सुविधा पुन्हा चालू केल्याबद्दल.

कंजूस's picture

21 Jun 2014 - 5:28 pm | कंजूस

संपादन सोय लेखाच्या प्रतिक्रियांनाही मिळाली तर उत्तम .

नितिन काळदेवकर's picture

26 Jun 2014 - 9:49 am | नितिन काळदेवकर

एखादा विषय निवडून त्याचा दुवा देवून एखादा लेख शोधू शकतो का व कसा