मिपावर जीव जडला आहे पण माझे मराठी टायपीन्ग inscript or DOE वर लवकर होते. आणि confusion होत नाही. तो काही option आहे का? बर्याच साईट्वर (उदा. मटा) option आहे.
लेख दिसत नाही, पाकृ दिसत नाहीत, प्रतिसाद दिसत नाहीत, खरड आल्याचे कळत नाही, व्य.नि, रिकामे दिसतात, नुसतेच नावं दिसतात, प्रतिसादाचे शीर्षकं दिसतात, प्रतिसाद दिसत नाहीत, अक्षररंग काम करत नाहीत. या सर्वांवर कामं चालुच आहे. कामं करणारी मंडळीही आपापल्या व्यापातुन कामं करत असतात. थोडा वेळ लागेल. तेव्हा या सर्व बारिक-सारिक गोष्टी मालकांच्या आणि तांत्रिक काम करणार्यांच्या लक्षात आहेतच. पुन्हा स्मरण करुन दिल्याबद्दल आभारी. :)
>>> आपले सदस्य नाम कसेबदलावे ???
नीलकांत किंवा प्रशांत या आयडींना आपणास कोणते नाव हवे आहे, ते कळवावे. आपणास सदस्यनाम बदलुन मिळेल.
-दिलीप बिरुटे
(संपादक )
मला माझे लेखन छोट्या मोबाईल वरून प्रतिक्रिया स्वरूपात करताना चटकन जमते . पण मोठा लेख थोडा थोडा लिहून "पूर्वपरिक्षण " करून "प्रकाशित करा" च्याऐवजी "लेखन साठवण" ( = "save as draft" ) असे करून माझ्या खात्यात ठेवता आल्यास मला तो सवडीने पूर्ण करता येईल . मोबाईल मधून टायपिंगला वेळ लागतो . "साठवण" हे बटण वाढवल्यास फार सोय होईल . जमते का बघा . प्रवासात आपल्या हातातला एक चिंटुकला मोबाईल घरच्या दोन कंप्युटरपेक्षा भारी असतो .
"लेखन साठवण" ही सोय खरंच फार म्हणजे फारच उपयोगी होईल. माझ्यातर्फे या सूचनेला +१००,००० अनुमोदने !
"पूर्वपरिक्षण", "लेखन साठवण" आणि "प्रकाशित करा" अशी तीन बटणे असल्यास एक लेख अनेक सत्रांत (sessions) लिहून मग प्रकाशित करता येइल.
संमं ने जरूर विचार करावा.
हे प्रश्न आधीही कुणीतरी विचारलेच असणार, पण मला उत्तरं सापडत नाहीयेत.
इथलं मिपावरचं 'शोध'यंत्र गायब झालंय की मलाच दिसत नाहीये? जुने लेख शोधायला ही एक उपयुक्त सोय होती.
तसंच पाककृती वगैरे सदरात (आणि मला वाटतं इतर लेखांच्याही बाबतीत) विषयाशी साधर्म्य असणारे इतर लेख उजवीकडे दर्शवले / सुचवले जायचे, तीही सोय बंद झाली असं दिसतं.
या सोयी कुठे इतरत्र दडून बसल्या असतील तर त्या कशा शोधायच्या याची कुणाला काही माहिती आहे का? त्या तात्पुरत्या बंद केल्या असतील तर नीलकांत आणि संपादक मंडाळी त्या पुन्हा सुरू करून वाचकांचा दुवा घेतील का?
मिपाचं उर्ध्वश्रेणीकरण करतांना आणि त्यानंतर मिपावर बरेच बदल करावे लागले, अजूनही त्यात बदल करणे चालूच आहेत. 'शोध यंत्र' आणि विषयाशी साधर्म्य असलेले इतर लेख उजवीकडे दिसायचे ते काही कारणामुळे बंद केलेले आहेत. आपण म्हणता त्या विषयावर आणि राहीलेल्या प्रलंबित सुविधेवर नीलकांत काम करतोच आहे.
-दिलीप बिरुटे
(संपादक)
या सुविधा मिपावर पुन्हा उपलब्ध होतील तेव्हा आनंदच वाटेल.
पण तोवर जालावर उपलब्ध असलेले शोधइंजिन वापरून परीणामकारकपणे आपण इथल्या साहित्याचा शोध घेऊ शकता.
उदा. मी तुमचे सदस्यनाम केवळ मिपा या संस्थळावर बिंगून पाहिले. तर खालिलप्रमाणे उत्तरे मिळाली.
शोधण्यासाठी वापरलेले शब्द -> बहुगुणी site:misalpav.com
Any time AllPast 24 hoursPast weekPast month
इंचा-इंचाने आपण जम्मू ...
www.misalpav.com/node/13500बहुगुणी - Tue, 03/08/2010 - 01:44 ...
पाककृती | मिसळपाव
www.misalpav.com/recipee.html?page=67
केवळ बहुगुणी असे बिंगून पाहिल्यावर बहुगुणी अंजीर, बहुगुणी आवळा हि पाने मिळाली :-).
मी आय. इ. १० मध्ये मिपावर मराठी टंकू शकलो नव्हतो. पुन्हा प्रयत्नही केला नाही म्हणा.
जुन्या आय. इ. वर काहीच समस्या नाही.
क्रोमवर टंकताना अक्षरे खोडली तर जरा विचित्र अनुभव येतो पण चूकीचे टंकन खोडण्यापेक्षा तसेच ठेवून बरोबर शब्द लिहावा. नंतर पूर्ण लिहून झाल्यावर चुकलेले शब्द उडवल्यास ती समस्या येत नाही.
श्रीरंगराव, मला पण क्रोम वापरताना हीच अडचण येते. यावर मला सापडलेला उपायः
१. क्रोम ब्राऊझरची दुसरी खिडकी उघडून ठेवावी
२. आपल्याला पाहिजे तो शब्द खोडावा
३. आल्ट्+टॅब वापरून दुसर्या खिडकीत डोकावून यावे (म्हणजे दोनदा आल्ट्+टॅब)
४. मग योग्य शब्द लिहावा
असे केल्यास तो "विचित्र प्रकार" बंद होतो.
(हे म्हणजे डॉक्टरकडे न जाता मांत्रिकाकडे जाण्यासारखं आहे खरं! हा काय जादूटोणा आहे हे मला सांगता येणार नाही, पण उपयोग होतो हे मात्र नक्की...)
हा कोड वापरावा.
चित्र,शीर्षक Left किंवा
right ला हवे असल्यास Center जागी Left किंवा right असे लिहावे.
(आणि प्रतिसादाच्या खाली text format दिसते तिथे FULL HTML करायला विसरु नका. मी कोड टाकून प्लेन टेक्स्ट मधे लिहिले आहे)
-दिलीप बिरुटे
1. एखादया लेखक आपला आवडता झाल्यास त्याच्या इतर लेखांचा दुवा त्याच्या नावावर क्लिक केल्यावर मिळावी अशी सोय असावी. अगदी अशीच नाही पण मीमराठी किंवा मनोगत पैकी कोणत्यातरी संस्थळावर अशी सोय मी पाहिली आहे.
2. तसेच खाली एका पानावरुन दुस-या पानावर जाण्यासाठी पानांचा दुवा दिला आहे त्यापेक्षा पान क्रमांक टंकून इच्छित पानावर जाण्याची सोय असावी
पेठकर साहेब, अजून तरी मिपावर अशी काही सुविधा नाही.
आपल्यातल्या आपल्यात : आपणच आपल्याला व्य.नि. करावा आणि लेखन साठवून ठेवावे. लेखन पूर्ण झाले की चोप्य पस्ते करावे. :)
-दिलीप बिरुटे
http://www.misalpav.com/user/०००/authored
वरील दुव्यात '०००'च्या जागी आपल्याला हव्या असलेल्या लेखक/लेखीकेचा सदस्य क्रमांक द्यावा.
लेखक/लेखीकेचा सदस्य क्रमांक शोधण्यासाठी त्याच्या/तिच्या नावावर माऊस नेला असता ब्राउझरच्या खाली डाव्या कोपर्यात एक लिंक दिसेल. त्यात सदस्य क्रमांक दिसेल.
उदा: तुमच्या नावावर माऊस फिरवला असता मला हे दिसलं... wwww.misalpav.com/user/1015
मिसळपाववर एखादा धागा कसा शोधायचा?
उदा. समजा मला गोवा प्रवासाविषयी काही माहिती हवी आहे तर ह्या विषयावर मिसळपाववर आधी कुठे चर्चा झाली आहे का? असेल तर तो धागा मला कसा शोधता येईल?
'गोवा प्रवास' हा कीवर्ड टाकुन सर्च करण्याची सोय मिपावर आहे का? असेल तर कुठे आहे?
कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद.
मिपावरची शोध सेवा चालत नाही. गूगलवर शोधल्यास सगळे धागे मिळतात.
उदा. "site:misalpav.com गोवा" अशी स्ट्रिंग टाकल्यास मिपावरील गोव्यासंबंधी सगळे धागे दिसावेत.
मिसळपाव येथे काही लेख शोधायचे असेल तर गुगलने असे शोधल्यास सापडतात :
१)आपल्याला गोवा याविषयी हवे असल्यास "मिसळपाव : गोवा " असे गुगलच्या सर्च फिल्ड मध्ये लिहावे . करून पाहा .
२)"मिसळपाव :निवडणूक २०१४ " चा गुगल शोध आताचे निवडणुकीचे लेख दाखवेल .
३)"मिसळपाव :नर्मदा परिक्रमा " शोधून परिक्रमेचे लेख मिळतात .
नमस्कार,
मला माझे काही फोटो कलादालनात अपलोड करायचे आहेत. परंतु काही अडचण येत आहे. "पूर्वपरीक्षण" येथे क्लिक केल्यावर "unexpected error" असा संदेश येतो. काय करावे?
प्रतिक्रिया किंवा खरड करताना शब्द रंगवण्याची सुविधा काढुन टाकली का? की मलाच हा त्रास होतोय?
Text Color बटनावर क्लिक करुन अथवा Alt+C दाबून सुद्धा एक छोटासा पांढरा चौकोन दिसतोय.
मदत हवी आहे.
http://www.misalpav.com/track
सरपंचसाहेब
काही पाकक्रुति दिसत नाहीत
काम चालु आहे.
काय बोम्ब आहे ते कळत नहि.
मला माझे लेखन छोट्या मोबाईल
+१००,०००
'शोध' आणि 'सुचवणूक'
शोध यंत्र सध्या मिपावर उपलब्ध नाही.
धन्यवाद, प्रा डॉ साहेब!
ब्रिदवाक्य
सहमत व सुचवणी
धन्यवाद!
अजुनही मराठीत टंकता येत नाही.
ब्राउझर कोणते वापरता?
श्रीरंगराव, मला पण क्रोम
बाळ राव दुसर्या टॅब ला
काय करावे??
सुविधा मिळे पर्यंत....
चित्र/शीर्षक/
हा कोड वापरावा. चित्र,शीर्षक Left किंवा right ला हवे असल्यास Center जागी Left किंवा right असे लिहावे. (आणि प्रतिसादाच्या खाली text format दिसते तिथे FULL HTML करायला विसरु नका. मी कोड टाकून प्लेन टेक्स्ट मधे लिहिले आहे) -दिलीप बिरुटेजमले.
नम्र सूचना
अप्रकाशित लेखन.
अंहं.
एकाच लेखकाचे
http://www.misalpav.com/user
सर्च ऑप्शन
मिसळपाववर एखादा धागा कसा शोधायचा?
मिपावरची शोध सेवा चालत नाही.
मिसळपाव येथे काही लेख शोधायचे
पुर्णब्रम्हच्या सगळ्या पाककृती
लिंक
एका विशिष्ट सदस्याचं सगळं
authored
हाबार्स!
माझा युझर आय्डी??
सुर्यकन्त
मदत पाहिजे
"पूर्वपरीक्षण" येथे क्लिक
आताच एक लेख लिहिला node 27972
मिपा अँड्रॉईड अॅप
अँड्राॅइड अॅपवर वेगळे
नाही
सदस्यांच्या स्वाक्षर्या गायब झाल्यात...!
+१
नमस्कार संपादक मंडळ,
टेंपरवारी असावे
धन्यवाद. अक्षरं रंगवण्याची
संपादन सोय लेखाच्या
शोध