साहिर

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
9 Mar 2014 - 1:46 pm

कवि माझा मित्र होता.
मित्राच्या शब्दावर जीव टांगून ठेवायची आपली नेहेमीच तयारी होती.
तो म्हणाला
" मेरी वफ़ा का शौक़ से तू इम्तहान ले "*
मी माझ्या प्रार्थनेत ही ओळ उधार घेतली
आणि विधात्याने पण मान्य केली.
आता झालेल्या परवडीची दाद मागायला मित्र पण हाताशी नाही.
कविची आणि बावीची खोली न मापता जे त्यांना जवळ करतात ,
त्यांना बुडून मरणे ह्या खेरीज शिक्षेचे वेगळे कलम लावण्याची काय गरज आहे. ?

* साहिरच्या कविता आणि गाणी या संबंधी या निमीत्ते काही चर्चा व्हावी .
*संजोपरावांचे आभार.

वाङ्मयविचार

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

9 Mar 2014 - 1:53 pm | यशोधरा

मला वाटले, साहिरवर, त्याच्या काव्यावर रामदासकाकांनी काहीतरी सुरेख लिहिले असावे म्हणून मोठ्या उत्सुकतेने धागा उघडला...

ज्ञानव's picture

9 Mar 2014 - 2:00 pm | ज्ञानव

सुरुवात "कभी कभी" ह्या सिनेमातील गाण्याने व्हावी. कारण साहीर साहेबांची स्वतःचीच कैफियत ह्या सिनेमाद्वारे मांडली गेली असे म्हणतात.

ज्ञानव's picture

9 Mar 2014 - 2:04 pm | ज्ञानव

"मै पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी कहानी है
पल दो पल मेरी हस्ती है, पल दो पल मेरी जवानी है
मुझसे पहले कितने शायर, आए और आकर चले गए,
कुछ आहें भरकर लौट गए, कुछ नग़मे गाकर चले गए
वो भी एक पल का किस्सा थे, मै भी एक पल का किस्सा हूँ
कल तुमसे जुदा हो जाऊँगा, जो आज तुम्हारा हिस्सा हूँ"

साहिर म्हणजे साहिर लुधयानवी का? तसे असेल तर साहिर लुधयानवी हे एक कवी होते इतकंच माहिती आहे.

विजुभाऊ's picture

9 Mar 2014 - 2:20 pm | विजुभाऊ

साहीरची नक्की कोणती गाणी आवडली हे सांगणे अवघड आहे.
प्यासातील "हम आपकी आखों मे इस दिल को बसायेंगे ......" .पासून " जिन्हे नाझ है हिंदपर वो कहां है"
स्वातन्त्र्यानंतर भाबड्या सामान्य माणसाची झालेला अपेक्षाभंग खूप जळजळीतपणे मांडलेला आहे.

विवेक मोडक's picture

9 Mar 2014 - 2:43 pm | विवेक मोडक

विजुभाउंशी सहमत.
मला भावणारं गाणं म्हणजे चित्रलेखा मधलं "संसार से भागे फिरते हो"
भोंदु समाजाला लावलेली जबरदस्त चपराक

कवितानागेश's picture

9 Mar 2014 - 3:12 pm | कवितानागेश

संसारसे भागे फिरते हो, हे साहिर लुधियानवी चे आहे हेच माहित नव्हतं..
... हा फार ताकदीचा कवी आहे, इतकंच माहित होतं.

साहिर थोडे डावे (कम्युनिस्ट विचारसरणीचे) होते असं वाचलंय कुठंतरी.

माझा अतिशय आवडता कवी आणि लिहिणारे रामदास! फार अपेक्षेने धागा उघडला आणि मृगजळ निघाले - आता ह्या मृगजळात समाधी कशी घ्यायची?
असो! :-)

साहिर हा फार मनस्वी आणि प्रतिभावान कवी. 'खोया, खोया चांद' हा खुपसा त्याच्यावर आधारीत होता असे वाचल्याचे आठवते. साहिरची कित्येक गाणी/कविता त्याच्या आहेत हे माहिती नव्ह्त्या तेव्हही आवडायच्या, आणि त्याची अशी गाणी ऐकतांना कित्येक रात्री गेल्या त्याची गिनतीच नाही -

किस लिए जीते हैं हम, किसके लिए जीते हैं ?
बारहा ऐसे सवालात पे रोना आया ॥

कौन रोता है किसी और की ख़ातिर, ऐ दोस्त !
सब को अपनी ही किसी बात पे रोना आया ॥

शेवटच्या दोन ओळी (कौन रोता है...) पहिल्यांदा कॉलेज हॉस्टेलवर मित्राच्या टेप वर ऐकल्या तेंव्हा तोंडातून अभावितपणे निघालेली दाद 'fuck' आणि अंगावर आलेला काटा अजूनही आठवतोय! किंवा हे अजून एक त्या दिवसातले आवडते गाणे...

जो मिल गया उसी को मुक़द्दर समझ लिया
जो खो गया मैं उसको भुलाता चला गया

ग़म और ख़ुशी में फ़र्क़ न महसूस हो जहाँ
मैं दिल को उस मुक़ाम पर लाता चला गया

हे अतिशय रोमँटीक गाणे रफीच्या स्वर्गीय मखमली आवाजात ऐकतांना मोरपीस फिरवणार्‍या साहिरच्या ओळी -

हाय ! वह रेशमी जुल्फ़ों से बरसता पानी
फूल-से गालों पे रुकने को तरसता पानी
दिल में तूफ़ान उठाए हुए जज़्बात की रात
ज़िन्दगी-भर नहीं भूलेगी वह बरसात की रात

आणि माझे all-time-favourite रोमँटीक हे गाणे -

अभी न जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं
अभी अभी तो आई हो अभी अभी तो
अभी अभी तो आई हो, बहार बनके छाई हो
हवा ज़रा महक तो ले, नज़र ज़रा बहक तो ले
ये शाम ढल तो ले ज़रा ये दिल सम्भल तो ले ज़रा
मैं थोड़ी देर जी तो लूँ, नशे के घूँट पी तो लूँ
नशे के घूँट पी तो लूँ
अभी तो कुछ कहाँअहीं, अभी तो कुछ सुना नहीं
अभी न जाओ छोड़कर के दिल अभी भरा नहीं

खूप, खूप आहेत साहिरची आवडती गाणी/शायरी... रामदासांच्या ह्या वाक्याशी मनापासून सहमत -

कविची आणि बावीची खोली न मापता जे त्यांना जवळ करतात , त्यांना बुडून मरणे ह्या खेरीज शिक्षेचे वेगळे कलम लावण्याची काय गरज आहे. ?

काव्यात वेगळेच तत्वज्ञान, प्रगल्भता दाखवणारा हा 'प्यासा' कवी वैफल्यातच गेला, ह्या गाण्यातली वेदना अक्षरशः अंगावर येते -

बिछड़ गया हर साथी दे कर, पल-दो-पल का साथ
किसको फ़ुरसत है जो थामे, दीवानों का हाथ
हम को अपना साया तक अक्सर बेज़ार मिला

किती आणि कसा, कसा आठवायचा साहिर? रामदास काका, मोठा लेख लिहिणार का प्लीज? आणि तो संजोप रावांचा काय संदर्भ? कोणी लिंक देईल का?

मनिष's picture

9 Mar 2014 - 6:14 pm | मनिष

संजोप रावांचा साहिरवर लिहलेला लेख मिळाला -

http://sanjopraav.wordpress.com/2007/04/21/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%80-%...

रविवार दुपार कारणी लागली! :-)

चिगो's picture

10 Mar 2014 - 10:01 pm | चिगो

जबरदस्त लेख, संजोपजी.. क्या बात..

मनिष, मस्त! :) तूही लिही एखादा बैजवार लेख.

साधनातलं "औरतने जनम दिया..." मधली "ये वो बदकिस्मत माँ है जो.." म्हणजे अगदी अशक्य कोटीतली कमेंट आहे. कानफटात मारणारी अन् कमालीची उत्कट.

स्वतःच्या मनातलं दुसर्‍याला तेवढ्याच ताकदीनं पोचवायची अफाट ताकद या माणसात होती.
प्रदीप, शैलेंद्र, शकील, कैफी आजमी, गुलजार, निराला, बालकवी बैरागी, योगेश, हसरत, मजरूह.. नुसती मांदियाळी होती.. पण साहिरला तोड नाही म्हणजे नाही..

कधी काळी आपणच लिहिलेली एखादी ओळ वाचून आपल्यालाच वाटावं "वाह! काय जमलीये ओळ..", अन् त्यावेळी हटकून साहिरची ओळ आठवून अजून आपण त्या गावच्या रस्त्याला सुद्धा लागलो नाही हे जाणवावं. :-)

संजोपरावांचा लेखही अत्त्युत्तम!
रामदासकाकांनी पण जरा मनावर घेतलं असतं तर बहार आली असती.. नाही?

राही's picture

9 Mar 2014 - 5:34 pm | राही

साहिर मध्ये निवड ती काय करणार? बहुतेक सगळीच गाणी आवडती. अगदी फैली हुई है सपनों की बाहें सारखे रोमँटिक गाणे सुद्धा. हे सुद्धा अशासाठी की साहिर म्हणजे दर्द असे काही जणांच्या मनात समीकरण असते. पण नदी ना रे ना जाओ श्याम, पैयाँ परूं हे नटखट गाणे काय किंवा ठंडी हवाएं काय अप्रतिमच. नदी नारे मध्ये 'नको जाऊस' अशी आळवणी करून झाल्यावर शेवटी 'जायचे तर जा, पण सवतिया ना लाओ श्याम, पैयाँ परू.' हे खासच. 'हम को अपना साया तक अक्सर बेज़ार मिला' ही ओळही आवडते. प्यासाची आणि हम दोनोंची सगळी गाणी. त्यात जिन्हें ना़ज है हिंदपर वो कहाँ है किंवा मैं जिंदगी का साथ निभाता चला गया अतिशय आवडतात. या शिवाय रातभर का है मेहमाँ अंधेरा आणि गुमराह मधले चलो एक बार फिरसे अजनबीं बन जाएं हेही. ये रात ये चाँदनी फिर कहाँ हे गाताना गायकाला बद्धकोष्ठ झाल्यामुळे पोट आवळत कुंथत कुंथत गातोय असे वाटत असले तरी गीत सुंदरच आहे.
जाता जाता : तारों की जुबाँ पर है मुहब्बत की कहानी हे गाणे साहिरचे नसले तरी 'ऐ चाँद, मुबारक हो तुम्हें रात सुहानी' ही कल्पनाचमत्कृती अगदी साहिरची भासावी अशी आहे. सुहान्या रात्रीसाठी खुद्द चंद्राचेच अभिनंदन! पर्वेझ शम्सी साहिर चे भक्त असावे असे वाटून जाते.

चौकटराजा's picture

9 Mar 2014 - 7:25 pm | चौकटराजा

मराठी मधे जे स्थान ग दि माडगूळकरांचे आहे तेच साहिर यांचे हिंदीत. एका मंचावर हे दोघेजण एकत्र आले होते. त्यावेळी साहिर यांचे शब्द संपताच ग दींचे त्याचे मराठी मातीतले शोभावे असे रूपांतर तयार होते. बाकी साहिर हे उर्दू व संस्कृत या दोन्ही प्रकारचे हिंदी लिहिण्यात माहिर ( प्रवीण ) होते. अत्यंत भावगर्भ शायरी असो की हलके फुलके गाणे त्यात गुणवत्तेच्या बाबतीत साहीर " बाप" होते.एखादी थीम पकडून गीत लिहायचे तर ते साहीर यानीच ही उदाहरणे पहा " इस मुल्ककी सरहदको कोई छू नही सकता .जिस मुल्कए सरहदकी निगहबान है आंखे ...ऐलान है आंखो ... तूफान है आंखे " ही आंखे" ला पकडून केलेली रचना .( हे गीत गन्स ओफ नॅवरोन ही सिनेमा हिंदीत निघाला र अचूक बसेल टायटलसाठी ) तर "वक्त से दिन और रात....वक्त से कल और आज " ही वक्त ला पकडून केली रचना.अशीच जिंदगी या कल्पनेभोवती रचलेली आदमी और इन्सान मधील जिंदकी के रंग कई रे .. साथी रे " ही रचना. " रात" या शब्दाला कवेत घेउन केलेली " जिंदगी भर नही भूलेगी " ही रचना.
साहीर हे डाव्या विचारसरणीचे शायर होते हे खरेच आहे. साधारणपणे शायर हे असतातच. संगीतकार , रवि, रोशन एन द्त्ता ई शी त्यांचे खास सख्य जमले. व त्यातून अनेक कव्वाल्या, गजला निर्माण झाल्या.

तिमा's picture

9 Mar 2014 - 8:21 pm | तिमा

आमचा सर्वात आवडता हिंदुस्तानी शायर. त्याची असंख्य गाणी आवडती आहेत.
आत्ता आठवणारी अदालत या सिनेमातली सगळी. चित्रलेखातली सगळी.
आयुष्यातलं सत्य निर्भिडपणे सांगणारा कवी.

सचिन's picture

10 Mar 2014 - 12:01 am | सचिन

जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला
हमने तो जब कलियां मांगीं काटोंका हार मिला .....

हे साहिरचे आहे हे सांगता न आल्यामुळे कॉलेजमधे क्विझ हरलो होतो ...२५ वर्षे झाली ...आजही मनात सलते आहे ...

जुइ's picture

10 Mar 2014 - 11:51 pm | जुइ

मुझे भूलभी जाओ तो ये हक्क हे तुमको.. हेही मला आवडणारे साहिर चे एक गीत.