२०१४-निवडणुकांची रणधुमाळी

सचीन's picture
सचीन in जनातलं, मनातलं
18 Dec 2013 - 5:36 pm

२०१४ च्या निवडणुका जवळ येत आहेत ह्या निवडणुकांचा निकाल हा देशाचे भवितव्य ठरवणारा असेल. देश विकासाच्या दिशेने अजून मोठाली क्षेत्रे काबीज करणार कि धर्माचे राजकारण करत पाकच्या, बांगलादेशाच्या रांगेत जाऊन बसणार. देशाने गेल्या ६६ वर्षात शून्यातून सुरवात करून अफाट प्रगती केली. दुसर्या बाजूला अनेक अडचणी आहेत अफाट लोकसंख्या, भ्रष्टाचार,धार्मिक दंगे,जातीय समस्या, दहशतवाद ,भाषिक वाद, प्रांतवाद ,बुवाबाजी, अंधश्रद्धा, निरक्षरता .दुसरा कुठला देश असता तर ह्या साऱ्यांमध्ये हतबल होवून गेला असता नष्ट झाला असता.

ब्रीटीशांनाही भारताला स्वातंत्र्य तर मिळालेय पण ते कुठपर्यंत टिकवता येईल ह्याबाबत शंका होती .पण आपल्या देशाने ती खोटी ठरवली व देशाचा कारभार यशस्वीरीत्या केल्या. स्वातंत्र्यपूर्व काळात जे महान नेते होते त्यांचे आदर्श नवीन पिढी समोर होते. देशाची भक्कम घटना नि त्या घटनेला न्याय देणारे राज्यकर्ते भारताला लाभले हि आपल्या देशासाठी मोठी सुदैवाची बाब आहे. सत्ताधार्यांकडून काही प्रमाणात घटनेला धाब्यावर बसवण्याचेही प्रयत्न झाले पण ते यशस्वी होवू शकले नाही. भारताची घटना हि योग्य असल्यानेच आणि सुजाण राज्यकर्ते लाभल्यानेच भारताचा विकास झाला. अन्यथा आपला देश हा पाकिस्तानच्या वाटेने कधीच गेला असता.आपण आणि पाकिस्तान एकत्रच स्वतंत्र झालो पण आज पाकिस्तानची अवस्था काय आहे हे साऱ्या जगाला दिसतेय धर्मावर आधारित राजकारण केल्याची विषारी फळे आज तिथली जनता भोगतेय.

आज आपण कॉम्पुटर युगात आहोत हेही राज्याकार्त्यांच्याच दूरदृष्टीचे परिणाम. याचा अर्थ देशात सारे आलबेल आहे असे नव्हे प्रश्न समस्या असायच्याच पण त्याच्याशी धैर्याने मुकाबला करण्यात येत आहे. जगात असा एकही देश नाही जेथे सारे आलबेल असेल. भारत स्वातंत्र्य होवून ६६ वर्षे उलटली ६६ वर्षाचा हा कालावधी मानवी जीवनासाठी मोठा कालावधी वाटत असला तरी देशासाठी हा अत्यंत लहान कालावधी आहे. ह्या इतक्या कमी कालावधीत देश सर्वच क्षेत्रात ज्या वेगाने मुसंडी मारत आहे ते पाहून सर्व भारतीयांचा उर अभिमानाने भरून आला पाहिजे.

देशाच्या विकासाचे नियोजन करण्यात सत्ताधारी पक्षांनी (काही अपवाद वगळता) उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. अजूनही सर्व समस्या सुटलेल्या नाहीत पण पेला अर्धा भरलाय, ह्यात आनंद मानायचा कि अर्धा रिकामा आहे ह्याचे दुखः करत बसायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. दुर्दैवाने बरीच जनता पेला अर्धा रिकामा आहे म्हणून दुख करणारी आहे. देशाच्या विकासातही काही महाभाग भकास काय आहे हे शोधत बसतात. तर आदर्श राज्यकर्ते ते असतात जे भकासातून विकास करून दाखवतात.

२०१४ च्या निवडणुकीत देशात पुढील प्रमाणे स्तिथी येवू शकते व त्यानुसार कोण प्रधानमंत्री बनू शकतो ह्याबद्दलचा हा अंदाज
१)कॉंग्रेसला बहुमत- प्रधानमंत्री-राहुल गांधी किंवा सोनिया गांधी

२)तिसरी आघाडी- ह्यांना बहुमत मिळाले नाही तर कॉंग्रेसच्या पाठींब्याने समविचारी पक्षांचे सरकार येवू शकते -प्रधानमंत्री- मुलायम सिंग यादव

३)मायावतींनी जर उत्तर प्रदेशात ४० जागांपर्यंत मजल मारली तर कॉंग्रेसच्या पाठींब्याने त्याही प्रधानमंत्री बनू शकतात.

प्रादेशिक पक्षांच्या कामगिरीचा ह्या निवडणुकीवर प्रभाव राहील. आप सारखी नवीन पार्टी बरीच मते मिळवू शकते. परंतु सत्तेचे सोपान मात्र कॉंग्रेस किंवा तिसर्या आघाडीकडेच राहतील असे देशातील सध्याचे वातावरण आहे.

भाजपा ह्या निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर राहील अशी चिन्न्ह आहेत परंतु आपच्या राजकारणातील प्रवेशामुळे नि प्रादेशिक पार्ट्यांच्या सध्याच्या वर्चस्वामुळे तिसऱ्या स्थानासाठी भाजपा नि आपमध्ये चुरस राहू शकते.

शेवटी लोकशाही जपणारा, देशाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणारा, धर्मनिरपेक्ष, मानवी विकासाची जाण असणारा पक्षच सत्तेवर यावा हीच तमाम भारतीयांची अपेक्षा असेल.

राजकारणलेख

प्रतिक्रिया

*yahoo* *YAHOO* *YAHOO!* :YAHOO: :yahoo:

उद्या निवडणुकीनंतर ह्याच पक्षांनी (समाजवादी, द्रमुक, बसप,()भाजपला पाठींबा दिला तर ते पुण्यवान ठरणार हो कि नाही गुर्जी...

श्रीगुरुजी's picture

21 Dec 2013 - 1:54 pm | श्रीगुरुजी

>>> उद्या निवडणुकीनंतर ह्याच पक्षांनी (समाजवादी, द्रमुक, बसप,()भाजपला पाठींबा दिला तर ते पुण्यवान ठरणार हो कि नाही गुर्जी...

हे पक्ष आपल्या पूर्ण विरूद्ध विचारसरणी असलेल्या भाजपला पाठिंबा देणार नाहीत. त्याऐवजी 'समानशीलेषु व्यसनेषु सख्यम्' या न्यायाने ते आपल्यासारखाच भ्रष्टाचारी, जातीयवादी, देशद्रोही अशा अनेक गुणांची खाण असलेल्या "आदर्श" काँग्रेसलाच पाठिंबा देणार.

उद्या शरद पवारांनी भाजपला पाठींबा दिला तर आता हे जे नेट भैरव त्यांच्यावर टीका करतात तेच त्यांना जाणता राजा म्हणतील हो कि नी गुर्जी .

चौकटराजा's picture

23 Dec 2013 - 5:55 pm | चौकटराजा

शरद पवारांचा पाठिंबा घ्यावा त्यासाठी भाजपाला २०० जागा हव्यात त्या त्याना मिळणार नाहीत. व पाठिंबा देण्या इतक्या
जागा शरद पवारांच्या प्रादेशिक पक्षाला ही मिळणार नाहीत.

अशी पाळी आलीच तर...... सिकंदर बख्त, नकवी, ई नावे घेत भाजपा हा धर्मनिर्पेक्षच पक्ष आहे असा शीध पवाराना लागेल.

ग्रेटथिन्कर's picture

24 Dec 2013 - 11:29 am | ग्रेटथिन्कर

मध्यंतरी भाजपचे एक 'वजनदार' नेते' पवार आमची चार कामे करतात आम्ही त्यांची चार कामे करतो' असे म्हण्टल्याचे वाचले होते .एनडीएच्या काळात पवार सैब डीझास्टरचे मॅनेजमेंटचे हेड होते ,भाजप सुरवातिपासुनच पवारांच्या ताटाखालचे मांजर आहे, विशेषतः महाराष्ट्रात.

विकास's picture

24 Dec 2013 - 11:55 am | विकास

मध्यंतरी भाजपचे एक 'वजनदार' नेते' पवार आमची चार कामे करतात आम्ही त्यांची चार कामे करतो' असे म्हण्टल्याचे वाचले होते
मी ऐकले/वाचलेले नाही. असले तरी आश्चर्य वाटणार नाही. पण आपली आधीची बिनबुडाची वक्तव्ये लक्षात घेता, जर नावानिशी माहिती देऊ शकलात तर बरे होईल.

एनडीएच्या काळात पवार सैब डीझास्टरचे मॅनेजमेंटचे हेड होते ,भाजप सुरवातिपासुनच पवारांच्या ताटाखालचे मांजर आहे, विशेषतः महाराष्ट्रात.

हे म्हणजे "उचलली जीभ लावली टाळ्याला का काय म्हणतात" तसे झाले... मागचा-पुढचा संदर्भ न देता कॉन्फिडंटली दुसर्‍यांना कमी दाखवणारे विधान करायचे... पवारांनी लातूरच्या भूकंपाच्या वेळेस आणि त्याही आधी शेअर मार्केटच्या बाँबस्फोटाच्या वेळेस चांगले नेतृत्व दाखवले होते. आपत्कालीन परीस्थिती कशी हाताळावी हे करून दाखवणार्‍या राजकीय पुढार्‍यांमधे ते अग्रणी होते. वास्तवीक असे गुण त्यांच्यात बरेच आहेत, पण बिघडले झालं... एनीवे, त्यांच्या या अनुभवामुळे त्यांना डिझॅस्टर मॅनेजमेंटचे हेड केले गेले होते. ९३-९४ साली पाकीस्तानने काश्मीर प्रश्न व्हिएन्न्नामधील सभेत उपस्थित करून भारताची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. तेंव्हा भारताबद्दल पॅशनेटली बोलणारा असा जाणता राजकीय वक्ता तेथे हवा होता. तेंव्हा नरसिंहरावांनी तत्कालीन विरोधी पक्ष नेते असलेल्या वाजपेयींच्या नेतृत्वाखाली शिष्ठमंडळ पाठवले. याचा अर्थ काय ते वाजपेयी/भाजपाच्या ताटाखालचे मांजर होते का? चांगला राजकारणी हा गुणग्राहक असतो आणि त्याला माहीत असते की समोरच्याचा (अगदी विरोधक असला तरी) गुणांचा उपयोग केला तर आपला फायदाच आहे... ते या दोघांना चांगले माहीत होते. अशी अजूनही उदाहरणे मिळू शकतील.

सचीन's picture

24 Dec 2013 - 8:57 pm | सचीन

,भाजप सुरवातिपासुनच पवारांच्या ताटाखालचे मांजर आहे, विशेषतः महाराष्ट्रात.>>>>>>>>

सहमत

भाजपा हा खरच महाराष्ट्रात कॉंग्रेस राष्ट्रवादीचा मित्र पक्ष आहे. ते सत्तापक्षावर बेफाम आरोप करतात पण एकही मंत्र्याला किंवा आमदाराला धक्क्याला लावत नाहीत.

सचीन's picture

24 Dec 2013 - 9:19 pm | सचीन

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/Nitin...

"हम शरद पवारजीके चार काम करते हे" असे विधान भाजपचे एक 'वजनदार' नेते' गडकरींनी केले होते असा त्यांच्यावर आरोप करणाऱ्या दमानिया ह्या गडकरी विरुद्ध निवडणूक लढवणार ..

विकास's picture

24 Dec 2013 - 9:41 pm | विकास

खाली दैनिक भास्कर मधील बातमीचा भाग देत आहे... आधी देखील म्हणले असल्याप्रमाणे कोणी एका भाजपा नेत्याने असे म्हणले असते तरी आश्चर्य वाटणार नाही. पण येथे जे काही खोटारडेपणा करत लिहीणे चालले आहे ते योग्य नाही. (मग ते कुणाविरुद्धही असुंदेत).

अंजली या आर टी आय कार्यकर्त्या आहेत. त्यांनी म्हणले की मला असे विरोधी पक्षाच्या एका पार्टी अध्यक्षाने असे म्हणले. आता गडकरी म्हणतात की मी त्यांना भेटलोच नाही. तरी त्यांचा हट्ट चालूच आहे. कोण खरे आणि कोण खोटे हे केवळ पुराव्यानेच ठरू शकते. जसे तेजपालच्या बाबतीत सिद्ध झाले तसे. येथे जर एखाद्या चळवळीतील व्यक्ती विरुद्ध मताच्या व्यक्तीवर "आरोप" करत असली तर त्यात कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असू शकतो. त्यामुळे अंजली यांनी म्हणलेले ग्राह्य धरत अफवा पसरवण्याचे धंदे बंद करा...

अंजलि ने एक प्रेस कांफ्रेंस में कहा, 'जब हम विपक्ष की एक पार्टी के अध्यक्ष के पास गईं तो उन्होंने कहा कि शरद पवार से हमारे बेहतर रिश्ते हैं, उनके चार काम हम करते हैं और वो चार काम हमारे करते हैं इसलिए सीधे हम शरद पवार के खिलाफ नहीं आ सकते।' अंजलि ने प्रेस कांफ्रेंस में यह भी कहा कि वह संबंधित पार्टी अध्यक्ष का नाम इसलिए नहीं ले पाएंगी क्योंकि उनके पास बातचीत का कोई सबूत नहीं है। अंजलि ने अपने परिवार की जान को खतरे का डर भी जताया।

हालांकि अंजलि के इस आरोप के बाद भाजपा अध्यक्ष नितिन गडकरी की ओर से कहा गया कि उन्होंने अंजलि से मुलाकात नहीं की है लेकिन अंजलि ने बाद में मीडिया से यह कहा कि नितिन गडकरी ने ही उनसे कहा था कि वो शरद पवार के खिलाफ मामला नहीं उठा पाएंगे। अंजलि यह साफ कर चुकी हैं उनके पास गडकरी से हुई बातचीत के सबूत नहीं है। वहीं गडकरी ने तो किसी भी तरह की मुलाकात तक से ही इंकार कर दिया है।

कोण बरे असावा तो विरोधी पक्षनेता जो शरद पवारांचे चार काम करायचा.

गडकरी नक्कीच नसावेत भाजपा सारख्या महान पक्षाचे ते नेते आहेत.*fool* :-| :| =| :-|

ग्रेटथिन्कर's picture

22 Dec 2013 - 11:28 pm | ग्रेटथिन्कर

ये बंगारु कोण था रे ..शायद भूल गये

विकास's picture

23 Dec 2013 - 6:17 pm | विकास

बंगारू लक्ष्मण हे मला वाटते स्वतःच्या मुलीच्या वयाच्या सहकारी पत्रकार मुलीवर अत्याचार करणार्‍या तरूण तेजपाल यांच्या कपील सिब्बल यांनी फंडीग केलेल्या तेहलका या वृत्तपत्राच्या पहील्या वहील्या स्टींग ऑपरेशन मधून सापडलेले एक भ्रष्ट व्यक्तीमत्व होते. अशी स्टींग ऑपरेशन्स ही तेहलकाने कधी काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात केली नाहीत आणि गेल्या ४-६ वर्षातील कोट्यावधींचे भ्रष्टाचार झालेल्या एकाही भ्रष्टाचाराचे संशोधन हे तेहेलका करू शकले नाहीत.

बाय द वे, मुरली मनोहर जोशीं संदर्भात धाधांत खोटे लिहीणारे कोण होते हो? का नैतिकता ही फक्त इतरांच्या बाबतीत बघण्यासाठीच असते?

बंगारू लक्ष्मण एक महान नेता महान पक्षाचा

श्रीगुरुजी's picture

22 Dec 2013 - 5:41 pm | श्रीगुरुजी

>>> उद्या शरद पवारांनी भाजपला पाठींबा दिला तर आता हे जे नेट भैरव त्यांच्यावर टीका करतात तेच त्यांना जाणता राजा म्हणतील हो कि नी गुर्जी .

नाही. त्यांना उपरती होऊन प्रायश्चित्त घेत आहेत असं म्हणतील.

गुर्जी गम्मत केली शरद पवार हे खरच महाराष्ट्राचे जाणता राजा आहेत. भाजपला पाठींबा देण्यापेक्षा ते विरोधात बसतील.

विद्युत् बालक's picture

22 Dec 2013 - 10:49 pm | विद्युत् बालक

सचिन रावांचे लेखन व त्या वरील प्रतिक्रिया वाचल्या कि " रोज मेरी मार्लो " ह्या पांचट विनोदाची आठवण येते .

उद्या भाजपचे सरकार आले तर देशाला नि तुम्हाला ह्याच विनोदाची आठवण येईल.

लेखन एकदम सखोल वाचताना लेखकाचा व्यासंग,त्यांची राजकारणाची माहिती,भारतातील जनते विषयीची कळकळ,सेक्युलर पक्षांबद्दल ची तळमळ प्रतिबिंबीत होते.

सचीन सर बहुधा ठाणे,रत्नागिरी किंवा मिरज भागातील मतदार दिसतात.

ठाण्याचं नाव घ्यायचं नाहि हं ऊगाच :-)

गुजराती शामियान्यात, मराठी उन्हात..

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Red-Carpet-for...

हतोळकरांचा प्रसाद's picture

25 Dec 2013 - 11:43 pm | हतोळकरांचा प्रसाद

उचलली जीभ लावली टाळ्याला!!! मुद्दे मांडायला नसले कि अशे "सुपीक" विचार येतात. शामियान्याच्या दरवाज्यात "कोणता" दरवान उभा होता मोजणी करायला. मोदीविरोध कुठल्याही थराला जाऊ शकतो याचे लक्षण! वैचारिक विरोध करा मोदींचा!

विकास's picture

23 Dec 2013 - 10:03 pm | विकास

माध्यमांचे दुवे काय कोणिही किती आणि कुठल्याही बाजूने देऊ शकते. नक्की तुम्हाला काय म्हणायचे आहे?

सचीन's picture

24 Dec 2013 - 8:51 pm | सचीन

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/--/articleshow...

गुजरातपेक्षा महाराष्ट्रातील चेकपोस्टवर जास्त महसूल

मोदीची फेकुगिरी कोणत्या थराला जावू शकते ह्याचे उदाहरण म्हणजे बीकेसी मधले त्यांचे भाषण. त्यांनी वोट फोर इंडिया मागितलेय पण इंडिया विरुद्ध भारत हि लढाई भारतच जिंकणार. तुम्ही थापा मारून ३ राज्यात विजय मिळवू शकता पूर्ण भारतात नाही

हतोळकरांचा प्रसाद's picture

25 Dec 2013 - 11:48 pm | हतोळकरांचा प्रसाद

<<<<त्यांनी वोट फोर इंडिया मागितलेय पण इंडिया विरुद्ध भारत हि लढाई भारतच जिंकणार>>>> बघा कशी एकदम तंतोतंत जुळतेय प्रतिक्रिया!! नवाब मालिकांनीहि हीच प्रतिक्रिया दिली आहे. मोदींची नेमकी काय फेकुगिरी आहे ते कळेल काय?

मटा च्या बातमीचा दुवा देताय . =))
जरा खफ वर जाऊन बघा क्लिंटन यांनी मटाच्या बातमीची चांगलीच खबर घेतलीय .

पैसा's picture

25 Dec 2013 - 9:11 pm | पैसा

१०८ पैकी ३८ प्रतिसाद स्वतः लेखक सचीन यांचे. त्यांचा ब्लॉग वाचत आहे असं वाटलं. पुढच्या वेळी सर्व मिपाकरांना एक प्रेमळ धमकीवजा सूचना किंवा सूचनावजा धमकी (काय हवं ते समजा) लेखावरचे सर्व प्रतिसाद स्वत: सचीनभाऊंना देऊ द्या. म्हणजे एक नवीन नवीन रेकॉर्ड तयार होईल!

हतोळकरांचा प्रसाद's picture

25 Dec 2013 - 11:30 pm | हतोळकरांचा प्रसाद

राखी सावंतने रामदेवबाबांशी लग्न करायचे आहे म्हणण्याचे कारण आणि वरील लेख लिहिण्याचे कारण एकच… फुकटची (कु)प्रसिध्दी! बघा मिळाल्याना १०० पेक्षा जास्त प्रतिक्रिया! त्यांना खरंच मत प्रदर्शन करायचे असते तर कदाचित वस्तुस्थितीशी निगडीत लिखाण केले असते. आअप व भाजपची तिसऱ्या स्थानासाठी चुरस हे वस्तुस्थितीला धरून नाही (उलटपक्षी हास्यास्पद आहे, आणि यावरून मी आअपविरोधी आहे असे सिद्ध होत नाही) आणि फक्त सचिन यांचा राजकीय 'कल' दर्शविते.

राखी सावंतचे तिला माहित. पण माझ्या लेखाबद्दल मात्र मी सांगू इच्छितो कि कॉंग्रेस आणि तिसरी आघाडी ह्यात सत्ता मिळवण्याबाबत लढत होईल. भाजपा मात्र तिसर्या स्थानावर किंवा आप मुळे चौथ्या स्थानावर राहील.

मंदार दिलीप जोशी's picture

27 Dec 2013 - 10:34 am | मंदार दिलीप जोशी

गुजरात दंगलप्रकरणी मोदींना क्‍लीन चीट

अहमदाबाद - गुजरात राज्यात 2002 मध्ये झालेल्या दंगलप्रकरणी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्‍लीन चीट देण्याच्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) निर्णयाला आव्हान देणारी याचिका महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांनी आज फेटाळली. कॉंग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी जाकिया यांनी ही याचिका दाखल केली होती.

Smiley Smiley Smiley Smiley

श्रीगुरुजी's picture

27 Dec 2013 - 12:01 pm | श्रीगुरुजी

हे सर्वजण नक्कीच संघाचे असणार. एसआयटी म्हणजे संघाची इन्व्हेस्टिगेशन टीम ?

न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडले तरी आम्ही त्यांना दोषीच मानणार.

मंदार दिलीप जोशी's picture

27 Dec 2013 - 12:34 pm | मंदार दिलीप जोशी

:D