आजकाल गॅस लाच लाइटर असतो ते बरे आहे बुआ. काही दिवसांपूर्वी गॅस चा लाइटर सापडला नाही म्हणून शेजारणीने "सुमे जा ग जरा माझा लाइटर घेऊन ये पर्स मधून" असे फर्मावल्याचे आठवते.
त्या पुर्वी, शेजारच्या, निर्मला ताई, त्या एकदा म्हणाल्या होत्या, अरे जरे जरा बाबांचा लाइटर घेऊन म्हणून.
त्याचा आधीच्या सगूणा बाई "शिंदळीची काडेपेटी कुठे गेली काही कळत नाय!. ए पोर्या बापाची काडेपेटी आणा रे" असे म्हणाल्याचे ऐकिवात आहे.
पण त्याचा पूर्वीच्या बायका आग कशी लावत असत बरे? म्हणजे स्वयंपाक करताना हो! (बाकी आग लावायाच्या पद्धती बदलल्या नसाव्यात असे वाटते. तो विषय नंतर कधी तरी हाताळूयात).
तर सांगायचे काय होते, की, काडेपेटी यायच्या आधी आग लावणे हे महा कठीण काम होते. आणि म्हणून घरात आग चालूच ठेवत असत. पालोटे वैगेरे जळत असत म्हणे कायम. (म्हणजे नवर्याचा कामाचा पालोटा बायकांनी स्वयंपाक घरात आग लावायला पळवला अशा कुरबुरी तेव्हाच्या मिपा कट्ट्यावर ऐकू येत असाव्यात). अर्थातच नवरोबा अंधाराचा फायदा घेतात अशा कुरबुरी किचन मध्ये होत असाव्यात. खरे खोटे देव जाणे !!!
तर घरचे पालोटे गेले तर कुठून तरी आग आणावी लागत असे. शेजारणी कडे "थोडेसे विरजण अँड एक पालोटा द्या होत जरा" असे गार्हाणे जात असवेसे वाटते.
पण आग हमखास मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे अग्निहोत्र. असे आग लाबूनच ठेवणारे भट गावात मिळत असत.
तर अशीच आग आम्ही आमच्या घरात गेले काही दिवस लावून ठेवली आहे. म्हणजे आमचा ते संगणक, हां, तर तो रात्रंदिवस चालू असतो. मिपा वर पडिक असतो आम्ही.
बायकोला सांगून ठेवले आहे, की जरा काही बिनसले तर सरळ आत्मवृत्तांत खरडून काढेन. शेजारचा पण त्याच्या बायकोला म्हणाला आहे की आपला संगणक बंद असला तर विवा कडे जाऊन खरडेन.
आता सांगा हे अग्निहोत्र नव्हे तर आणखीन काय?
- विदेशि वचाळ
प्रतिक्रिया
30 Nov 2013 - 11:09 pm | अभ्या..
आयायायायायायाया
जीवन बाबा. लैच प्रेरणादायक ब्वा तुम्ही :-D
30 Nov 2013 - 11:26 pm | संजय क्षीरसागर
अग्निहोत्र!
30 Nov 2013 - 11:34 pm | यसवायजी
जळ्ळं मेलं लक्षण ते.. :P
30 Nov 2013 - 11:35 pm | नीलकांत
छान लिहीले आहे.
- नीलकांत
30 Nov 2013 - 11:37 pm | अभ्या..
नमस्कार मालक :)
अशीच कृपा आसू दया ;-)
30 Nov 2013 - 11:58 pm | राही
शुद्धलेखनाकडे थोडे अधिक लक्ष पुरवले असते तर लेख अधिक छान झाला असता.
1 Dec 2013 - 12:11 am | पैसा
अभ्या, तुझं नशीब भारी म्हणून तुला लेखाचा पूर्वावतार वाचायला मिळाला! पण नीलकांतसाहेबांनी लक्ष घातल्यामुळे काही दुरुस्त्या करून लेख मराठीत आणला आहे.
फक्त ते पालोटे म्हणजे काय ते कळलं नाही लेखक महाशय! मिपावर स्वागत! आणि पुढच्या वेळी नीट टाईप करा बरं. लिखाण आवडलं.
1 Dec 2013 - 5:47 pm | अभ्या..
माझं नशीब भारीच आहे म्हणून तर मला बऱ्याच जनाचे अवतार पुर्वावातार पाहायला मिळतात.
पण लै जण जळतेत ह्या नशिबावर. त्याना वाटते कंपू कृपा. ;-)
1 Dec 2013 - 1:38 am | आदूबाळ
पालोटा हा पलित्याचा अवतार असावा.
पण हा लेख नक्की कशाबद्दल आहे हे समजलं नाही. वाचाळसाहेब माझ्या बालबुद्धीस क्षमा करावी...
1 Dec 2013 - 2:38 am | प्यारे१
___/\___
लेख कोणास समजला असल्यास समजावणे.
किर्पा प्राप्त होगी!
1 Dec 2013 - 5:07 am | जेपी
हायला ,हा लेख आला का ईथे . काल वाचाळ साहेबांच्या खव मध्ये होता . बराच दुरुस्त झाल आहे . :-)
1 Dec 2013 - 7:27 am | विदेशी वचाळ
त्याचे काय आहे ना की माझे मराठी तसे सुधा चांगले नव्हते. यत्ता10 वी च्या घटकचाचणी मध्ये मास्टरांनी सांगितले होते की बाकी काही करा पण मराठी सोडून द्या. त्या मुळे ज्यांनी कोणी लेख सुधारला त्यांना धन्यवाद.
आणि मराठी येत नाही म्हणूनच तर मी "विदेशी" वाचाळ आहे ना?
आता लेखाचे कारण असे काही नाही आहे. आले मनाला म्हणून लिहिले. नको म्हणत असाल तर नाही लिहिणार. आपले काय बुवा, एकदम साधे विचार आहेत. जमले तर ठीक नाही तरी ठीक.
आणि हो, मला कृपा करून साहेब म्हणू नका. "वाच्या", "वाचू", "वाचूकका" "वचोबा" काहीही चालेल.
1 Dec 2013 - 9:41 am | पैसा
एका दिवसात छान सुधारणा आहे की! बाकी कोणाच्या पहिल्या लेखाला हसणारी मंडळी एका २ वर्षे जुन्या स्त्री आयडीच्या बोबड्या भाषेतल्या लेखांना ज्या काय चान चान प्रतिक्रिया देते ते पाहून मनुष्यस्वभावाची लैच गंमत वाटली आहे!
1 Dec 2013 - 10:27 am | विदेशी वचाळ
झेपेले नाही बुआ!! ताई मी चांगला धड धाकट माणूस आहे हो!
1 Dec 2013 - 10:30 am | पैसा
तुम्हाला नै हो! आणखी एक जुना स्त्री आयडी आहे. त्याच्या लिखाणाला सगळे छान चान म्हणत असतात.
1 Dec 2013 - 4:31 pm | बॅटमॅन
छान छान किंवा चान चान यांशिवाय "छान चान" हा मध्यममार्ग आणि कधी सुरू केलात म्हणे ;)
1 Dec 2013 - 4:53 pm | पैसा
हम जहॉं पे खडे होते है रस्ता वहीं से शुरू होता है वगैरे वगैरे!!
1 Dec 2013 - 6:25 pm | बॅटमॅन
लाईक केल्या गेले आहे. :)
1 Dec 2013 - 6:40 pm | डॉ सुहास म्हात्रे
यकदम् आवाsssजी बंद ?!
कोन हाय रं तिकडं? जरा काय च्यापानी आननार की नाय? का ते बी सांगायला लागतया?
1 Dec 2013 - 9:54 pm | विजुभाऊ
हम जहांपर खडे होते है वहांपर झेब्रा क्रॉसिंग होता है
1 Dec 2013 - 9:59 pm | विजुभाऊ
हम जहांपर खडे होते है वहांपर झेब्रा क्रॉसिंग होता है
2 Dec 2013 - 7:55 pm | जेनी...
हम जहापे खडे र्हयते ।हय वहापे शिग्नल पडेला होता हय
1 Dec 2013 - 10:30 am | विदेशी वचाळ
बाकी धीर दिलात त्या बद्दल आभारी आहे.
1 Dec 2013 - 5:40 pm | विद्युत् बालक
+१
ह्यालाच कंपुगिरी तर म्हणत नसतील ?
जाऊ द्या हो पैसा ताई लेखिका व प्रशंसक दोघेही घरगुती मराठी मालिकांचे फ्यान असतील :)
बाकी तुमची सही एकदम सही आहे !
3 Dec 2013 - 5:39 am | निनाद मुक्काम प...
अगदी अगदी
1 Dec 2013 - 11:03 am | जेपी
http://www.misalpav.com/node/6332
1 Dec 2013 - 11:31 am | अनिता ठाकूर
@व/वाचाळ महाशय,'.. मी धडधाकट माणूस आहे...' खटकलं. महिला ह्या माणूस नसतात काय?
1 Dec 2013 - 11:38 am | शैलेन्द्र
पाईंटाचा मुद्दा, पोटात गुद्दा..
बाकी चालुद्या :)
4 Dec 2013 - 7:07 pm | विदेशी वचाळ
च च, तसे नाही हो. आमच्याकडे माणूस आणी बामाणूस असे म्हणतात. मग मला सांगा मी स्वताहाला माणूस म्हणालो तर काय चुकले.
उगाचच का माझया मराठी ला नवे ठेवता.
एकतर मास्टरांनी नापास केल्यापासून हा पहिलाच प्रयत्न आहे.
1 Dec 2013 - 11:41 am | सुहास..
अं ?
कितवा पेग ? ?
1 Dec 2013 - 11:52 am | सोत्रि
वाश्या लेका?
हाच प्रश तुलाच लागू होतोय :) लिहू दे की लेका लोकांना. मालकांनी त्यासाठीच हा अट्टाहास केलाय ना?
- (नुकताच उतारा घेऊन बसलेला) सोकाजी
1 Dec 2013 - 12:11 pm | सुहास..
;)
सोक्याच नाय ऐकायच तर वागळेंच ऐकायचे का ?
लिहा, लिहा विवा भौ , अजुन लिहा , आम्ही आहोतच चान चान म्हणायला !
आ़ज्ञाधारी ;)
वाश्या
1 Dec 2013 - 11:50 am | सोत्रि
विवा,
लेख मस्त जमला आहे आणि मनातल्या भावना पोहोचल्या देखिल. ज्यांना लेख समजला नाही त्यांना स्पष्टीकरण न देत बसता पुढच्या लेखाची तयारी चालू करा. असे केलेत की लगेच अस्सल मिपाकर व्हायला वेळ लागणार नाही, काय ? :)
- (मिपा अग्निहोत्री) सोकाजी
1 Dec 2013 - 5:09 pm | जेपी
+1 सोत्री
आम्हालाही लेख आवडल . आता अग्निहोत्रात खंड पडु देऊ नका . लेखाच्या समीधा टाकत रहा .
( सोत्री च प्रत्येक कॉकटेल ट्राय करुन बघणारा) तथास्तु
1 Dec 2013 - 5:36 pm | अत्रुप्त आत्मा
@आता सांगा हे अग्निहोत्र नव्हे तर आणखीन काय? >>>
@अग्निहोत्र>>> आमच्या'त हा शब्द एक खास कोडवर्ड म्हणूनही आहे!
1 Dec 2013 - 5:52 pm | स्पंदना
लेखन आवडल हो विदेशी वाचाळ.
आम्हाला अशी बोलकी माणसेच जास्त आवडतात भाऊ (साहेब..;) )
हं ! तर काय प्रश्न पडलाय? पूर्वी आग कशी लावत असत किंवा जपून ठेवत असत?
मी सांगु? मी खेडगावातली आहे, त्यामुळे जरी रॉकेल उपल्ब्ध झाले होते, तरी ते रेशनवरुन मिळणे अन खेडेगावात कोण
रॉकेलऽऽऽ" करत येणार म्हणुन+ महान पैसा (ताई नव्हे) या सगऴ्याची बचत म्हणजे चुलीच्या राखेत निखारा पुरुन ठेवणे. किंवा रात्री सगळ आवरल अन झोपायची वेळ झाली की चुलीतला जाळ पुरा न विझवता लाकडे काढुन एखादा शेणकुटाचा तुकडा त्यात टाकुन ठेवणे. रहातो धुमसत बराचवेळ. मग दुसर्या दिवशी चुलीतली राख ओढुन काढायची. पुरलेला निखारा वा धुमसणारी शेणकुटाची राख झटकुन जरा फुंकर मारायची. अन एखाद्या घमेल्यात चार बारीक काड्या घालुन घरा बाहेर हवेला ठेवायचे. निवांत पेटते.
तोवर आत चुलीला पोतेरा करुन अगदी लखलखित करुन घ्यायच. हळद कुंकवाची बोटे उमटवायची. कुठे मोदतोद झाली असेल तर लिंपुन घ्यायचं, अन मग तो घमेल्यात पेटलेला वन्ही आणुन पुन्हा चुल पेटवायची. पहिला एक डेचकीभरुन पाणी ठेवुन द्यायच तापायला. मग घरातले जे कोणी धारेला जाणार असतील ते ते जरा गरम झालेले पाणी घेउन दुध काढुन आणतात. आता त्या गरम पाण्यात भर घालत घरातल्या बाकी सार्यांची तोंड धुणी आटपलेली. मग त्याच गरम पाण्यातल पाणी घेउन बाजुला चहाच आधण चढवायच. तोवर दुध आलेलं असत. ते थोड चहात ओतत उरलेले मोजुन डेरीला घालायला किटलीत भरायच. घरात ठेवायच दुध स्वच्छ पातेल्यात ओतुन चुलीवर तापायला ठेवायच. त्या गरम चहाला येणारा तो स्वाद, ती घरात चुलीने येणारी जाग, जरा धुर, जरा ठसका थोड्या ठिणग्या.
___/\___
अपर्णा.
1 Dec 2013 - 7:10 pm | आनंद घारे
माझे लहानपणही आठवले. आमच्याकडे रॉकेलची एवढी पंचाईत नव्हती, पण त्याचा वापर जपूनच केला जात असे. त्यामुळे निदान दिवसभर तरी चुलीतली आग धुमसत ठेवली जात असे. तिला लवकर भडकवण्यासाठी कागद, नारळाची करटी, भुइमुगाच्या शेंगांची फोलपटे अशा ज्वालाग्राही वस्तू ठेवलेल्या असायच्या.
3 Dec 2013 - 5:52 am | खटपट्या
छान अपर्णातै !!
1 Dec 2013 - 10:01 pm | विजुभाऊ
आग धुमसवणे वेगळे. पण आग जर पेटवायचीच असेल तर ती कसे पेटवायचे?
2 Dec 2013 - 6:56 pm | विनटूविन
मी कुठेतरी वाचले होते कि स्टोनएज मध्ये दगडावर दगड घासून आग पेटवायचे [गारोटी?]
लेख छानच आहे.
सर्व प्रकारची अग्निहोत्रं आली इथे आता.
2 Dec 2013 - 7:02 pm | युगन्धरा@मिसलपाव
गारगोटी म्हणायचयं वाटत तुम्हाला........
2 Dec 2013 - 7:52 pm | विनटूविन
गारगोटी, तर्री म्हटले काय चुकले!!
2 Dec 2013 - 10:13 pm | तुमचा अभिषेक
अग्निहोत्र
छान !
4 Dec 2013 - 11:02 am | युगन्धरा@मिसलपाव
जुन्या काळात भटजी लोक संध्याकाळी अग्निहोत्र करायचे असे ऐकिवात आहे बुवा......
बाकि तुमचा लेख आवडला.