परवा एका लग्नाला गेलो होतो त्यानंतर आमच्या मित्राचे सासर शेजारच्या बिल्डींग मध्ये आहे म्हणून त्यांच्या घरी( तिसर्या -पुण्याच्या भाषेत चौथ्या मजल्यावर) गेलो होतो.
मित्राचे सासरे बुवा म्हणाले कि डॉक्टर आजकाल जरा काही खाल्ले कि पोटाला तडस लागते. एकंदर त्यांच्या पोटाचा आकार पाहून ते "जरा काही" खात असतिल असे वाटत नव्हते. म्हणून मी त्यांना विचारले कि साहेब तुम्ही आता धावत जिना चढता का ? त्यावर ते म्हणाले कि अहो मी रिटायर झालो तिसरा मजल धावत चढणे कसे शक्य आहे? मग मी विचारले तुम्ही चष्मा का लावता? ते म्हणाले चाळीशीचा चष्मा आहे. मी परत विचारले कि तुमचे अर्धे केस गेले आणि उरले अर्धे पांढरे का झाले? त्यावर ते म्हणाले कि अहो माझे वय आता पासष्ट वर्षे आहे रिटायर होऊन पाच वर्षे झाली.
यावर मी त्यांना म्हटले कि साहेब तुमच्या हृदयाची, गुढघ्याची पासष्टी झाली डोळ्याची पासष्टी झाली केसांची पासष्टी झाली मग तुमच्या पोटाची पासष्टी नाही का झाली ?
यावर मित्राच्या सासूबाई पटकन म्हणाल्या अहो आत्ता लग्नात त्यांनी पाच गुलाबजाम खाल्ले. डॉक्टर आता तुम्हीच काही तरी सांगा.
मागच्या आठवड्यात माझ्याकडे एक दहावीतील मुलगी पाळी वेळेत येत नाही म्हणून सोनोग्राफी साठी आली होती. वय वर्षे पंधरा आणि वजन शहाण्णव किलो (९६). ती खुर्ची मावत नव्हती. त्यामुळे तिच्या बीजांड कोशाना(ovaries)ना सूज आली होती. तिला वजन कमी करायला पाहिजे असे मी तिच्या वडिलांना सांगितले तर तिचे वडील म्हणाले डॉक्टर तुम्हीच सांगा तिला. मला संतापच आला सरळ विचारावेसे वाटले पंधरा वर्षाच्या मुलीचे शहाण्णव किलो वजन होईपर्यंत तुम्ही काय गोट्या खेळत बसला होतात काय? पण संयम बाळगून मी त्यांना सांगत होतो कि काय करायला पाहिजे तर त्यांचे आपले एकच टुमणे डॉक्टर तुम्हीच सांगा तिला.
अशाच एका लग्नाला शैलजाताई भेटल्या. त्यांचे बोलणे सुरु झाले कि आजकाल पायांची फार जळजळ होते. त्यांना मधुमेह आहे आणि त्या माझ्या बायकोकडे औषधोपचार घेत असतात.मधुमेह काही केल्या "कंट्रोल"च होत नाही अशी तक्रार करू लागल्या. (आई वडिलांपासून ओळख आहे त्यामुळे सुबोधला काय लहानपणापासून पाहीला आहे) हा एक उच्छाद असतो. डॉक्टर भटले कि वरिष्ठ नागरिकांना आपला कुठला तरी आजार आठवतो आणि ते पिच्छा पुरवतात त्यामुळे मी कोणत्याही सार्वजनिक प्रसंगांना वरिष्ठ नागरिकांना टाळू लागलो आहे.
थोड्या वेळाने त्या लग्नातील बुफेचे ताट घेऊन जेवत होत्या.त्यात पाच पुर्या, वाटी भरून श्रीखंड, तीन चार भाज्या, पुलाव, सार पापड इ सर्व जीन्नसानी त्यांचे ताट भरगच्च भरलेले होते. मी विनायकरावाना विचारले कि एवढा त्रास होतो तरी त्या पथ्य करीत नाहीत मग औषधोपचाराचा फायदा कसा होणार? त्यावर त्यांचे म्हणणे हेच डॉक्टर आता तुम्हीच काहीतरी सांगा तिला.
अंकिता पाटील चार वर्षे वय पोट दुखते आणि जळजळ होते म्हणून बालरोग तज्ञांनी तिला सोनोग्राफी साठी पाठविले होते. चार वर्षाच्या मुलीला आम्लपित्त होते हे पाहून मला पण जरा धक्काच बसला म्हणून तिच्या आजोबाना विचारले कि ती काय खाते? आजोबा तक्रार करून सांगत होते कि तिला रोज कुरकुरे लागतातच. त्याशिवाय ती ऐकतच नाही तुम्हीच काहीतरी सांगा तिला. मग मात्र माझा संयम सुटला आणि मी आजोबाना रागात विचारले अहो ती पैसे कमवत नाही कि दुकानात जाऊन कुरकुरे आणण्याची तिला अक्कल नाही मग ती रोज कुरकुरे कसे खाते? तुम्ही तिला कुरकुरे देणे बंद करा. हे सांगायला तुम्हाला डॉक्टर लागतो का ?
आहान वय वर्षे ५ सारखा माझ्या दवाखान्यात या वस्तूला हात लाव त्या वस्तूला हात लाव. कॉम्प्युटरशी चाळे कर. मी आई वडिलांकडे रागाने पहिले तर आई सांगु लागली गप्प बस आता नाहीतर डॉक्टर तुला इंजेक्शन देतील.
मी त्यांना विचारले कि दुसर्या ऑफिसात डॉक्टर नसतील तर काय सांगणार त्याला? त्यावर त्यांचे तोंड गप्प?
मला या सर्व गोष्टीमध्ये एक मूळ सूत्र असे दिसते आहे कि आपण सर्व आपली जबाबदारी टाळू पाहतो आहे. आणि आपल्या जवळच्या माणसाना त्यांच्या हिताच्या पण कटू गोष्टी सडेतोडपणे सांगण्याची वेळ येते तेंव्हा एक सोपा मार्ग (शोर्टकट) शोधतो आहोत.या वृत्तीमुळे आपण आपल्या जवळच्या माणसाचे अपरिमित नुकसान करीत आहोत ह त्यांना कळत नाही का?
बायकोशी/ नवर्याशी भांडण होऊ नये किंवा अप्रिय गोष्टी सांगायला लागू नयेत म्हणून वाईट पणा डॉक्टरच्या गळ्यात टाकतो आहोत. हे म्हणजे पाहूण्याच्या हातून साप मारण्याची कावेबाज वृत्ती आहे असे त्यांना वाटते काय?
नातीला ती हट्ट करते म्हणून रोज कुरकुरे देणारे पालक/ आजोबा किंवा ७० टक्के अधिक वजन होई पर्यंत मुलीला काही न बोलणारे पालक हे याच गटात मोडत आहेत. स्वतःला वाईटपणा नको म्हणून आपल्या नातेवाईकचे नुकसान होऊ द्यायची हि कोणती वृत्ती?
आपल्या लहान मुलाचे फाजील लाड करून आपण त्याचे नुकसान करीत आहोत हे त्यांना कळत नाही का?
प्रतिक्रिया
28 Jul 2013 - 2:53 pm | आशु जोग
अति लाड करणारे पालक. शिकलेले अडाणी म्हटले पाहिजे यांना.
28 Jul 2013 - 3:47 pm | निवेदिता-ताई
अति लाड करुच नयेत.........
अति लाड भिक माग
28 Jul 2013 - 3:59 pm | अजया
खरं आहे डॉक्टर! असाच अनुभव मला माझ्या डेंटल प्रॅक्टीसमध्ये येतो. दोन अडीच वर्षाची सर्व दात कीडलेली मुलं घेउन लोक येतात आणि हा/ही रोज चॉकलेट खातेच, ब्रश करतच नाही वगैरे सांगतात!, तेव्हा मीही त्यांना हेच विचारत असते ही मुलं स्वतः तर हे विकत आणु नाही शकत्,ब्रश करु शकत नाहीत्,आता एव्हढी स्थिती होइपर्यन्त तुम्ही काय करत होतात? आणि हा माझा रोजचा चिड आणणारा अनुभव आहे!!
28 Jul 2013 - 4:04 pm | भटक्य आणि उनाड
अगदी बरोबर...
28 Jul 2013 - 4:35 pm | ज्ञानोबाचे पैजार
डॉक्टर साहेब, तुम्हाला असे वाटणे सहाजिकच आहे. पण जरा पालकांच्या दॄष्टीकोनातुन बघितले तर तुम्हाला असे दिसेल की पालकही कात्रीत सापडलेले असतात.
- मुलांनी ऐकले नाही तर त्यांना न ओरडता न रागावता समजावुन सांगायचे (ते सुध्दा ३० सेकंदापेक्षा जास्त नाही)
(आत्ताच वाचले - बघतो प्रयोग करुन)
- मारायचे तर मुळीच नाही
- बाहेरच्या लोकांसमोर त्यांचा पाणउतारा करायचा नाही
- पाहुणे चॉकलेट किंवा तत्सम खाउ घेउन आले तर त्या वेळी देउ नका असे सांगणे वाईट दिसते म्हणुन तसे म्हणायचे नाही
- अजी अजोबा तर काहि ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. (सून काही बोलली की आई पदर डोळ्यांना लावते)
अशा वेळी बाहेरच्यांचा अधार घेतला म्हणजे पालक प्रयत्नच करत नसतात असे नाही. उलट अशावेळी डॉक्टर काकांनी, शाळेत शिक्षकांनी सपोर्ट केला तर मुले जास्त लवकर ऐकतील असे वाटते म्हणुन पालक तक्रारी सांगतात.
मोठ्या माणसांचे मात्र काहि बोलु नका :- माझे बाबा (वय ७५) तंबाखु खातात.मला समजायला लागल्या पासुन अनेक वेळा अनेक तर्हेने सांगुन रागावुन भांडुन झाले आहे. डॉक्टरांनी सुध्दा बर्याच वेळा तंबाखु सोडायचा सल्ला दिला. सध्या त्यांना मीच दर महिन्याला तंबाखु आणुन देतो. कारण त्यांना आता कमी दिसते व ऐकु येते. त्या मुळे त्यांना रस्त्यावर एकटे सोडायची आम्हालाच भिती वाटते.
त्यांना तुम्ही पण एकदा सांगुन बघा प्लीज......
28 Jul 2013 - 6:01 pm | आशु जोग
अप्रिय गोष्टी सांगायला लागू नयेत म्हणून वाईट पणा डॉक्टरच्या गळ्यात टाकतो आहोत.
तुमचीच जबाबदारी आहे.
बा द वे
मिसळीवर काही महाभाग "आपली दारु रसिकता" धाग्याधाग्यातून प्रकट करीत असतात.
28 Jul 2013 - 10:13 pm | वामन देशमुख
-> अरे कंबख्त... तूने पी ही नही!
बा द वे,
मिसळीवर काही महाभाग -नव्हे, किरकोळ प्राणी- अकारण असंबद्ध पिंका टाकत असतात.
29 Jul 2013 - 12:01 am | बॅटमॅन
तुमचे सदस्यनाम पाहिले अन एकदम भार्गवी वारुणीची आठवण झाली ;)
29 Jul 2013 - 10:46 am | वामन देशमुख
हा हा हा...
28 Jul 2013 - 8:38 pm | गवि
पैजारबुवांशी सहस्रवेळा सहमत. ..
पालकाना सगळीकडून व्हिलनपद बाय डिफोल्ट..
नव्या काळात मोठ्या शहरात दोघे करियर करणारे असतील तर शाळेतल्या शिक्षिकेपासून
पेपरात दिलखुलास सदरे लिहिणारे डोक्टर्स आणि पुरवण्यांतल्या आहारलेखकांपासून मागच्या पिढीतल्या ज्येष्ठांपर्यंत सर्वजण मुक्तकंठाने त्यांचे ताडन करतात.
आईबापांची बाजू अगदी गोट्या खेळण्याइतकी सोपी आणि सरळ नसते..इतकेच.
बाकी लेखातल्या मुद्द्यात तथ्य आहेच.
29 Jul 2013 - 5:32 am | राजेश घासकडवी
कोणे एके काळी, इन द गुड ओल्ड डेज, पालकांना इतकी पोरं असायची की पोरांचे लाड करणं वगैरे परवडतच नसे. बहुतेक घरात गरीबी ठासून भरलेली. त्यामुळे मनात इच्छा असूनही अनेक गोष्टी मुलांना घेऊन देता येत नसत. सहा पोरं तुटपुंज्या पगारात वाढवायची तर 'हे मिळणार नाही' असं उत्तर आणि अधिक हट्ट केला तर फटके असं सोप्पं प्रकरण असायचं. एकंदरीतच मुलांना योग्य पद्धतीने वाढवणं याचं मार्केट नव्हतं.
आता पालकांना थोडं परवडायला लागलं आहे. आपल्या मुलासाठी काय केलं तर त्यांचं भलं होईल यासाठी अधिक विचार होतो, आणि भलं करण्यासाठी पैसे आहेत. त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुलांकडे पुरेसं लक्ष पुरवता येत नाही हे गिल्ट फीलिंग आहे. त्यामुळे पालक हे सॉफ्ट टारगेट झालेले आहेत.
6 Aug 2013 - 11:39 am | विश्वनाथ मेहेंदळे
म्हणजे आत्ताचे पालक "योग्य पद्धतीने" वाढवत आहेत तर. मग ठीक आहे. :-)
6 Aug 2013 - 11:53 am | राजेश घासकडवी
मार्केट झालं नव्हतं हा मुख्य मुद्दा होता. योग्य काय याबद्दल विचार करण्याची प्रवृत्ती आत्ताच्या पालकांमध्ये वाढलेली आहे. एका बाजूला विभक्त कुटुंबव्यवस्थेच्या फायद्यांबरोबरच वडीलधारी, अनुभवी, प्रेमळ माणसं घरी नसण्याचे तोटे स्वीकारायचे. दुसऱ्या बाजूला जुनी व्यवस्था मोडताना, संगोपनाविषयीचे जुने विचार बदलून जातानाही पहायचे. आपल्याला आपल्या आईवडिलांनी वाढवलं त्यातलं चांगलं तर घ्यायचंच - तेही सगळं जमेलच असं नाही - आणि शिवाय त्यांना माहित नसलेल्या आधुनिक, कॉस्मोपॉलिटन, टेकसॅव्ही जगात जगायला लायक करायचं. हे सगळं दोघांच्या नोकऱ्या सांभाळून कसं साधायचं याची चिंता असते. त्याचबरोबर ती चिंता सोडवण्यासाठी पैसे मोजण्याचीही त्यांची तयारी आहे. याचा फायदा मार्केट बनवणारे घेत आहेत, इतकंच.
28 Jul 2013 - 10:08 pm | सुबोध खरे
मी येथे केवळ डॉक्टरच नव्हे तर दोन मुलांचा पालक सुद्धा आहे. बक्षीस आणि शिक्षा हे दोन्ही मुद्दे वापरणे अतिशय आवश्यक आहेत . मुलांना चोकलेट देऊ नये अशा मताचा मी मुळीच नाही. उलट मी स्वतः ते विकत आणतो आनंदाने खातो आणि मुलांना पण देतो.
पण सुरुवातीपासून काही नियम बनविले होते. १) चोकलेट खाण्याच्या अगोदर हात स्वच्छ धुतले पाहिजेत २)चोकलेट खाल्ल्यावर चूळ भरलीच पाहिजे ३) रात्री झोपताना दात घास्लेच पाहिजेत आणि हे नियम काटेकोर पाने पाळले गेले पाहिजेत अन्यथा पुढच्या वेळेस कोणी चोकलेट दिले तरीही मिळणार नाही हे लहानपणा पासून मुलांना कळले तर पुढे त्रास होत नाही
मुले पाहुण्यांसमोर नखरे करीत असतील तर पाहुण्यांसमोर त्यांना रागाव्ण्यास मी कमी करत नसे त्यामुळे पोहुने आले तर ती तुमचा गैरफायदा घेण्यास धजावत नाहीत.
सुदैवाने माझ्या आई वडिलांनी आमच्या लहानपणा पासून एक तत्व पाळले होते कि जर आई ओरडत असेल तर बापाने मुलाला पाठीशी घालायचे नाही (किंवा उलट) यामुळे मुलांना आई वडिलांची किंमत राहते. हेच तत्व आम्ही आमच्या घरी पाळतो त्यामुळे बाप रागावला कि आई पाठीशी घालणार नाही हे कळल्यामुळे मुले तुम्हाला गृहीत धरत नाहीत. सुदैवाने आमचे आई आणि वडील आम्ही मुलांना ओरडत असताना मध्ये नाक खुपसत नाहीत. आमची चूक असेल तेंव्हा आम्हाला नंतर समजावून सांगतात. त्यामुळे मुलांसमोर आपला पाणउतारा झाला हि स्थिती आमच्या आयुष्यात कधीच आली नाही. मुलांना सुधारणे किंवा घडवणे हि संपूर्णपणे आई वडिलांची जबाबदारी आहे असे मी मानतो . बाहेरच्या माणसावर हि जबाबदारी ढकलणे हे बरोबर नाही. यासाठी काही वेळा तुम्हाला कठोर व्हावे लागते. मुले जर चोकॉलेत खून झोपली तरी मी त्यांना उठवून दात घासायला लावीत असे. जाऊदे झोपली आहेत म्हणून सैल सोडले कि झालेच.
मोठ्या माणसाना सुधारणे हि जबाबदारी तुमची नाही आणि जर तुम्ही तुमच्या २१ वर्षे झालेल्या मुलाला सुधारू शकणार नाही तर पंचाहत्तर वर्षाच्या आई किंवा वडिलांना सुधारणे शक्य नाही. तरीही त्यांना शक्य तेंव्हा तंबाखू खाण्यापासून परावृत्त करणे याचा प्रयत्न करणे आपणास शक्य आहे. त्यांची इतर कामे तत्परतेने करणे आणि तंबाखू आणण्यस चालढकल करणे त्यांनी मागितल्यावर त्यांना त्यावर एक बौद्धिक देणे यातून आपला विरोध आपण प्रकट करू शकता. याने त्यांचे तंबाखू खाणे संपणार नाही पण थोडे कमी झाले तरी आपले कर्तव्य केल्याचे समाधान आपणास मिळू शकते.
हा अनाहूत आणि दीड शहाणपणाचा सल्ला देणया इतकी माझी लायकी नाही या बद्दल मी आपली अगोदरच क्षमा मागतो
पण मानस शास्त्रीय दृष्ट्या विश्लेषण करून काय करता येईल हा वैद्यकीय सल्ल्याचा भाग म्हणून आपणास सुचवीत आहे
क्षमा असावी.
28 Jul 2013 - 5:08 pm | नगरीनिरंजन
कौतुक कोवळं बेंबीला आवळं.
लेख अगदी मार्मिक आहे. डॉक्टरसाहेबांचे लेख आवडतात नेहमीच.
29 Jul 2013 - 12:56 am | शिल्पा ब
बेंबीला आवळं?
नगरकडे कौतुक कवळं टेरीला आवळं अशी म्हण ऐकलीये बॉ !
लेखा चांगला आहे. फाजील लाड करु नयेत.
28 Jul 2013 - 5:27 pm | प्रभाकर पेठकर
लेखाचा मुळ उद्देश आणि त्यातून द्यायचा संदेश चांगला आहे. त्याची आजकाल गरजही वाढली आहे. खुप जणांना समजत नाही आपलं काय चुकतंय, सांगितलं तरी आपल्या चुकीचा स्विकार करणं त्यांना जड जातं, अशक्य असतं ते त्यांच्या बाबतीत. आणि जेंव्हा आजार बळावतो तेंव्हा आश्चर्य व्यक्त करतात. नशिबाला दोष देतात. ही वृत्ती बहुतेक सर्वामध्ये थोड्याफार प्रमाणात असते. कांही जणं १०० टक्के हट्टी असतात तर कांही जणं १०-२० टक्के. हे कमी टक्केवारीवाले त्यांना सांगितल्यावर प्रामाणिक प्रयत्न तरी करतात कांही जणं यशस्वीही होतात. १०० टक्केवाले बदलत नाहीत, स्वतःच्या कोषातून बाहेर पडत नाहीत आणि भोगत राहतात. घरचे, जवळचे, मित्र-मैत्रीणी वगैरे सांगत असतात पण परिणाम शून्य. अशा वेळी ते डॉक्टरांना, एक अधिकारी व्यक्ती म्हणून, त्याला समजविण्याची गळ घालतात. त्यांनी समजविण्याचे सर्व प्रयत्न करून झालेले असतात पण ते सर्व व्यर्थ गेल्याने ह्यांच्या मनांत एकप्रकारची हतबलता आलेली असते. आणि अगदी शेवटचा उपाय म्हणून ते डॉक्टरांची मदत अपेक्षित असतात.
हे मोठ्यांच्या बाबतीत झाले. मुलांच्या बाबतीत आपण म्हणता ते बरोबरच आहे. मुलांचे अवाजवी लाड होताना दिसतात. इतकंच नाही तर चुकीच्या गोष्टींचं कौतुक होतानाही पाहिलं आहे. इथे आखातात तर असेही पाहिलेले आहे की अचानक आलेली सुबत्ता हाताळता येत नाही आणि स्वत:च्या बालपणीच्या अतॄप्त इच्छा पुर्या करण्याचे एक साधन म्हणून मुलांकडे पाहिलं जातं. ह्याला मी 'सुबत्तेचे बळी' असे मी म्हणतो. मुलांना जे पाहिजे ते, जे मागितले ते आणि जे जे मागितले नाही तेही देण्याची हौस दिसून येते. अशाने मुले हट्टी होतात. पुढे पुढे आई-वडिलांनाही जुमानत नाहीत. एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे. नाही मिळाली की आकांड तांडव. मग आई-वडिलांची अशक्त सहनशक्ती आणि आपापसातील मतभेद ह्यातून 'जाऊदे नं! देऊन टाका त्याला/तिला काय पाहिजे ते पण घरात शांतता असू दे.' अशी सोपी तडजोड करून, मुलं ऐकतच नाहीत अशी दांभिक तक्रार करून मिळणार्या सहानुभूतीने स्वतःच्या मनाला सुखावताना हे पालक(?) दिसतात. आपण मुलांचं काय आणि किती नुकसान करीत आहोत हे लक्षात घेतलं जात नाही. जरी ते लक्षात आलं तरी 'कचरा जाजमाखाली सरकविण्याची' वृत्ती दिसून येते.
बिच्चारे वरिष्ठ! मित्र सहानुभूती दर्शवितात किंवा चेष्टा करतात, घरचे रोजच्या तक्रारींना कंटाळलेले असतात. ते त्यांच्या डोळ्यात आणि वागण्यात दिसून येतं. नवरा, आपल्या बायकोच्या शारीरिक तक्रारी गांभिर्याने घेत नाही, बायको अजून मुलांमधून बाहेर पडायला तयार नसते. तिला वेळच नसतो नवर्याच्या तक्रारी ऐकायला. मुलं त्यांच्या व्यापात. आणि डॉक्टर आणि वकिलापासून कांही लपवून ठेवू नये अशा संस्कारात वाढलेल्या आणि आपला आजार हाताबाहेर जाण्याआधी त्यावर कांही उपाय योजावा असे वाटत असणारे वरिष्ठ 'आजार आणि व्याधी' ह्या विषयातील अधिकारी म्हणून डॉक्टरकडे धाव घेत असतात. अर्थात, सार्वजनिक ठिकाणी, लग्न कार्यात, पार्ट्यांमधून, 'कन्सलटेशन फी' टाळून दिसला डॉक्टर की आपले रडगाणे गा हे अत्यंत चुकीचे आणि शिष्टाचारास सोडून आहे. हे सर्वांनी टाळलेच पाहिजे.
असं नसतं डॉक्टरसाहेब. घरचे कानीकपाळी ओरडून थकलेले असतात पण 'तुम्हाला काय कळतंय? किंवा मला काय त्रास आहे हे माझं मलाच ठाऊक. तुम्हाला नाही कळणार.' असे म्हणून वाटाण्यच्या अक्षता अगदी सहज लावलेल्या असतात. डॉक्टरच्या बाबतीत तसे म्हणता येत नाही. त्याला ज्ञान आणि अधिकार असल्याने डॉक्टरकडे असा रुग्ण कौन्सिलिंगसाठी सोपविला जातो.
आपल्या जिवलगाचे नुकसान व्हावे असे कोणालाच वाटत नाही. खुप वेळा अज्ञान तर कधी समस्येचे गांभिर्य लक्षात न घेतल्याने असे वागले जाते.
28 Jul 2013 - 5:51 pm | आतिवास
'व्यावसायिक आपत्ती' आहे, बाकी काय?
इतर अनेक व्यावसायिकांनाही असे 'फुकट सल्ले' मागण्याचे अनेक अनुभव येत असतात. पोलिस, वकील, कर सल्लागार, शिक्षक मंडळी, पत्रकार, प्रसारमाध्यमांतले लोक, सरकारी कर्मचारी ... यादी न संपणारी आहे. फरक इतकाच की वरच्या सगळ्यांची 'गरज' नेहमीच असते अशातला भाग नाही - डॉक्टर मात्र नेहमीच 'हवे' असतात!
तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना टाळता - हे वाक्य वाचून मात्र वाईट वाटलं - तुमची भूमिका समजते आहे त्यामुळे आरोप नाही तुमच्यावर. मी तुमच्या जागी असते तर कदाचित हेच केलं असतं - तरीही :-)
28 Jul 2013 - 10:35 pm | सुबोध खरे
केवळ मला लहानपणा पासून ओळखता म्हणून मी कुठेही भेटलो कि आपले प्रश्न विचारून माझा सल्ला( फुकट मिळतो) म्हणून घेणे कितपत बरोबर आहे. शिवाय जाता जाता रस्त्यात सेकंड ओपिनियन विचारणे कितपत बरोबर आहे. माझा कर सल्लागार मला बर्याच वेळेला भेटतो म्हणून मी त्याला माझ्या असलेल्या प्रश्नांची उत्तरे विचारून भंडावून सोडत नहि. शिवाय दुसर्या कर सल्ल्गाराला माझा सल्लागार बरोबर आहे का हे रस्त्यात थांबवून मी कधी विचारत नाही.
हे कितीही मान्य केले कि वरिष्ठ नागरिक हे आपल्या ढासळत्या तब्येतीबद्दल सदा चिंतीत असतात तरी केंव्हा आणि कुठे कुणाला सल्ला विचारावा हे तारतम्य पाळणे आवश्यक आहे. उदा. पंडित शिवकुमार शर्मा यांच्या संतूर वादनाचा कार्यक्रम पाहण्यास गेलो असताना मध्यंतरात आपले मूड असेल का एखाद्या वरिष्ठ नागरिकाला चक्कर का येते याचे विश्लेषण करण्याचा ? वडिलांचे मित्र म्हणून त्यांच्याशी नम्रपणे बोलावे लागते इतपत ठीक आहे. मग पुढच्या वेळेस अशा माणसाने पुराण चालू केले तर मला मोबाइल वर फोन घ्यावाच लागतो( आलेला नसेल तरीही).
त्यातून मी सोनोग्राफी करतो तर कान नाक घसा तज्ञाने कानाला लावायचे मशीन घेण्यास सांगितले त्याची किंमत चोवीस हजार आहे त्यात त्याचे कमिशन किती असेल हा प्रश्न विचारला तर काय उत्तर द्यायचे? मुळात त्यांना कमी ऐकू येत होते हेच मला मुदलात माहित नाही आणि मी त्यांना त्याच्याकडे पाठविले नाही तर हा प्रश्न आपण नात्यगृहाच्या प्रवेशद्वाराशी विचारू नये इतके तारतम्य असू नये काय?
जाऊद्या आमचे रडगाणे कुठे ऐकता?
10 Aug 2013 - 3:42 pm | अप्पा जोगळेकर
केवळ मला लहानपणा पासून ओळखता म्हणून मी कुठेही भेटलो कि आपले प्रश्न विचारून माझा सल्ला( फुकट मिळतो) म्हणून घेणे कितपत बरोबर आहे. शिवाय जाता जाता रस्त्यात सेकंड ओपिनियन विचारणे कितपत बरोबर आहे.
काही पथ्ये डॉक्टरांनीसुद्धा पळावीत अशी सामान्यांची अपेक्षा असते. चार टाळकी एकत्र जमली की लगेचच आरोग्यविषयक सल्ले देणे आणि स्वतःच्या डॉक्टर असल्याची जाहिरात करणे, सामान्यांना कळणार नाही अशी वैद्यकीय परिभाषा वापरणे टाळावे ही किमान अपेक्षादेखील पूर्ण होत नाही.
28 Jul 2013 - 6:01 pm | सर्वसाक्षी
अनेकदा दुसरे टोक पाहायला मिळते. एखाद्या लहान मुलाला कौतुकाने चॉकलेट द्यावे तर त्याचे पालक तातडीने ते हातातुन काढुन घेतात आणि ते परत करतात. त्या मुलाच्या चेहर्याकडे पाहिल्यावर आपल्यालाच अपराधी वाटते. फाजील लाड नकोतच पण इतके कठोर वर्तनही नको.
28 Jul 2013 - 8:04 pm | राजेश घासकडवी
या वाक्याशी सर्वसाधारणपणे सहमत. तरीही मला पूर्वीपासून प्रश्न पडलेला आहे की लोक असं का करतात? त्यातून मला काही अंदाजे उत्तरं सापडली, ती कितपत बरोबर वाटतात हे समजून घ्यायला आवडेल.
१. समोरच्या माणसाशी गप्पाटप्पा करायच्या असतील तर बऱ्याच वेळा त्याच्या क्षेत्राविषयी बोलणं सोयीचं असतं.
२. आध्यात्मिक गुरू, स्टॉक मार्केट ऍडव्हायजर आणि डॉक्टर यांच्याशी बोलताना नकळतच माणूस शिष्याच्या किंवा पेशंटच्या भूमिकेत जातो. डॉक्टर या शब्दालाच तसं वलय आहे. एका अर्थाने अशी चर्चा सुरू होणं हे डॉक्टर असण्याबद्दल मिळालेलं कॉंप्लिमेंटच असावं.
३. डॉक्टर हा व्यावसायिक असतो, त्यामुळे पेशंट मिळवण्यासाठी अशा चर्चांचा थोडाफार फायदा होत असावाच. जर अशा दहा लोकांपैकी एकाला जरी 'हे काहीतरी सीरियस असू शकतं. उद्या क्लिनिकमध्ये या म्हणजे व्यवस्थित तपासून सांगता येईल' असं म्हणता आलं, तर त्यांच्या प्रॅक्टिससाठी ते चांगलंच नाही का?
28 Jul 2013 - 11:30 pm | आशु जोग
हेही खरय
28 Jul 2013 - 8:22 pm | रेवती
लेखन नेहमीप्रमाणेच आवडले हो डॉक्टर. वरील सर्व प्रतिसादही आवडले.
28 Jul 2013 - 8:38 pm | प्रभाकर पेठकर
मान्य. पण वैद्यकिय विज्ञानाबद्दल बोलावं, ह्या क्षेत्राच्या व्याप्ती, प्रगती, समस्या, गैर व्यावसायिकता इ.इ.इ. जनरल बोलावं. आपल्या व्याधींबद्दल बोलणं टाळावं.
नव्याची नवलाई असताना ठिक आहे. त्या व्यक्तीलाही आवडेल. पण एखाद्या वरिष्ठ डॉक्टरला जो ह्या व्यवसायात अनेक वर्षे आहे त्याला 'डॉक्टर' की मिरविण्याची गरज भासत नाही. आणि अशा प्रसंगी अशा व्यक्तीला वैयक्तिक पातळीवर, इतरांपरमाणेच, लग्न, पार्टी आदी सार्वजनिक कार्यक्रमाचा आनंद उपभोगायचा असेल तर त्यात व्यत्यय येतो.
नक्कीच चांगलं पण डॉक्टरसुद्धा माणूस आहे. आणि दिवसभराच्या पेशंटच्या रांगांनी, प्रत्येकाच्या शारीरिक तक्रारी ऐकून, तपासून, औषधयोजना करून तोही बिचारा शरीराने आणि मनाने थकून जातो. अशा वेळी तो ज्या समारंभासाठी आलेला असतो तो समारंभ त्याला उपभोगू द्यावा. दूसर्यादिवशी जा नं त्याच्या दवाखान्यात. तिथे कांही तो वैतागणार नाही. फारातफार, 'डॉक्टर मला तुमच्याशी बोलायचे आहे उद्या येतो तुमच्या दवाखान्यात.' एवढेच म्हणावे. आपण एकटेच असतो. आपली एकच तक्रार असते पण डॉक्टरसाठी आपण शंभरावे आणि तेही त्यांच्या वैयक्तिक आयुष्य जगायच्या वेळेत असू शकतो.
आणिबाणीची परिस्थिती असताना सर्व क्षम्य आहे. डॉक्टर २४ तास उपलब्ध असावा. तिथे डॉक्टरांनी कांकू करू नये.
माझ्या ओळखितले एक डॉक्टर आहेत. रात्री अपरात्री कोणी रुग्ण किंवा रुग्णाचा नातेवाईक आला तरी त्या डॉक्टरची बायको, 'डॉक्टरसाहेब घरात नाहीएत, बाहेर गेले आहेत.' असे सांगून आलेल्या माणसाला पिटाळून लावायची. अशाने एक दोन रुग्ण दगावल्याचे कानावर आहे. ते अत्यंत वाईट.
6 Aug 2013 - 12:02 am | सुबोध खरे
दुर्दैवाने आणीबाणीची परिस्थिती कोण ठरवणार? जोवर तुम्ही रुग्ण पाहत नाही तोवर हे सांगणे कठीण आहे. आणि रुग्णांची रात्री सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात जाण्याची तयारी नसते. पहिले सरकारी रूग्णालया वर अविश्वासामुळे आणि खासगी रुग्णालयाच्या खर्चामुळे.
गरोदर बायका डोहाळे लागले म्हणून बाहेर पाणीपुरी खातात आणि रात्री पोट दुखू लागले कि स्त्रीरोग तज्ञाला फोन करतात. (मला त्यांची खरच दया येते). हे नेहमीचे रडगाणे आहे.
एके दिवशी रात्री माझ्या सौच्या एका रुग्णाने (वय ३०) रात्री दीड वाजता फोन केला तो मी उचलला. त्याचे म्हणणे होते कि सर मला झोप येत नाही मी काय करू? रात्री दीड वाजता त्याच्यावर चिडचिड करणे म्हणजे आपली झोपमोड करणे म्हणून मी त्याला फेनारगन हि गोळी केमिस्ट कडून आणून घेण्यास सांगितली. एक म्हणजे रात्री डॉक्टरला फोन केला तर आपल्याजवळ कागद आणि पेन असावे हे तारतम्य "एकाही" रुग्णात मी पाहिलेले नाही. त्यानंतर दोन वाजता त्याचा मला परत फोन आला कि डॉक्टर तुम्ही मला एलर्जी ची गोळी दिली आहे. यावर मी त्याला शांतपणे सांगितले कि ती एलर्जीचिच गोळी आहे पण तिचा साईड इफेक्ट झोप येणे हा आहे. यावर तो तिथे वाद घालू लागला. त्यावर मी त्याला शांतपणे सांगितले कि इतक्या रात्री कोणता केमिस्ट तुला डॉक्टरच्या चिट्ठी शिवाय झोपेची गोळी देणार आहे? आणि मी फोन बंद केला. रात्री दोन वाजता अशा कारणासाठी आपल्याला उठवले तर आपल्यापैकी किती लोक डोके शांत ठेवू शकतील?
माझा फोन अजूनही रात्री बंद नसतो परंतु जे डॉक्टर तो बंद ठेवतात त्यांचे पूर्ण चूक आहे असे मला वाटत नाही.
6 Aug 2013 - 1:00 am | आशु जोग
काही मोठी माणसेही जरा लाडातच येतात. रोग असो वा नसो आपल्याला कुणी गोंजारावे ही मानसिकता असते. लहानपणी आपले पुरेसे लाड झाले नाहीत असा समज मनात पक्का रुतून बसलेला असतो.
6 Aug 2013 - 2:37 am | प्रभाकर पेठकर
खरं आहे. रुग्णाला आपली कुठलीही अवस्था आणिबाणीची वाटू शकते.
पण, छाती, पाठ, डावा हात, जबडा दुखतो आहे आणि दरदरून घाम सुटला आहे तर ती सर्वसामान्य परिस्थिती नाही हे आता अनेकांना ठाऊक असते.
अर्धांग लुळं पडत आहे हे जाणवणं ही सुद्धा सर्वसामान्य परिस्थिती नसावी.
रात्री २ वाजता घरात घुसलेला साप कोणालातरी चावतो आणि त्याच्या तोंडातून फेस येऊ लागतो.
वरील कांही लक्षणे एखाद्या साध्या कारणासाठीही असू शकतील. डॉक्टरांना ते समजेलच. पण रुग्णांना ती घातक वाटली तर त्यात त्यांचे कांही चुकले आहे असे मला वाटत नाही.
बाकी, आपण दिलेली उदाहरणे रुग्णाच्या मूर्खपणाचे प्रदर्शन आणि डॉक्टरसाठी अत्यंत तापादायक आहेत ह्याच्याशी सहमत आहेच. अशा रुग्णांमुळेच चांगल्या वागणार्या आणि खरोखरच्या आणिबाणीच्या परिस्थितीतच दूरध्वनी करणार्या निष्पाप रुग्णांवर अन्याय होतो असे मला वाटते.
28 Jul 2013 - 9:32 pm | आशु जोग
अनेक पालकांना इतकी मिरची का झोंबावी !
28 Jul 2013 - 9:38 pm | पैसा
लिखाण नेहमीप्रमाणेच आवडले. अशा लोकांना गप्प करण्यासाठी डॉक्टर इतर काही उपाय करू शकतात. "अहो, तो/ती तुमचं ऐकत नाही. माझं काय ऐकणार?" असं हसून म्हणा. कटकट खतम!
29 Jul 2013 - 9:43 am | चौकटराजा
आपल्याला आपण स्वत: न छळणे याची जाणीव उपदेशाने येत नाही. त्या बाबतीत मी अगदी पुरता दैववादी आहे. तुम्ही मुले काय कोणालाचा कितीही सांगा, जो झोपेचे सोंग घेतो त्याला जागे करणे अवघड असते. चांगल्या संवयी असतील तर शंभर टक्के जीवन सुखकर होईलच असे नाही. पण मेलडी उत्पन्न करण्यासाठी " राग- रंजकता" नियमाला धरून रहाणे जसे राजमार्ग ठरते तसेच चांगल्या शारिरिक व मानसिक संवयी गरजेच्या आहेत. पण कळते पण वळत नाही असे आपले सर्वांचेच थोडेफार होते. स्खलनशीलता हे प्राणीमात्राचा र्हास व्हावा या साठी आवश्यक आहे व निसर्ग ती माणूसच काय सर्वच प्राणीजीवनात भरून राहील याची पुरेपूर काळजी घेतो.
29 Jul 2013 - 10:29 am | सौंदाळा
लेख पटला आणि आवडला. पैंजार, गवि यांच्याशी सहमत. त्याचवेळी डॉ. खरेंशीसुद्धा सहमत.
डॉक्टरांनी पैंजारबुवांना दिलेला प्रतिसाद आवडला.
29 Jul 2013 - 11:04 am | बाळ सप्रे
लहान मुलांना चांगल्या सवयी लावणे डॉक्टरांवर सोपवु नये हे खरं.. पण मोठ्यांच्या सवयी (अति खाणे, तंबाखू, सिगारेट, दारु) इ वर बोलणे बर्याच वेळा उपदेश केल्यासारखे वाटते, इगो आड येतो तेव्हा सोनाराने कान टोचणे कधीकधी जास्त उपयुक्त असते असे वाटते.. अर्थात तेही घरच्यांच्या अथक प्रयत्नानंतरच..
29 Jul 2013 - 11:24 am | चावटमेला
लेख आवडला आणि पटला. लाडानं येडं अन गुळानं बोबडं झालेली असंख्य उदाहरणं पाहिली आहेत.कधी कधी लहानपणी आमचे आजिबात लाड होत नाहीत म्हणून आई बाबांचा खूप राग यायचा. पण आज मात्र कळून चुकतंय की केवढे मोठे उपकार केले आई बाबांनी आमच्यावर.
5 Aug 2013 - 9:22 am | किचेन
+१००% सहमत, आइ बाबा चोकलेट घेउन देत नाहित.किंवा कपड्यांच्या बाबतित कातेकोर असतत, म्हणुन खुप राग यायचा.आता प्रश्न पड्तो कि मि मझ्या मुलिला दात किडन्यापसुन किंवा वजन वधन्यपसुन किंवा कपडे अंग झाकण्यासाथि असतात हे पटवुन देउ शकेल?
29 Jul 2013 - 11:25 am | विटेकर
डॉक्टर साहेबांचा आणखी एक सुंदर लेख !
मुलांना चांगल्या सवयी लावणे ही पालकांचीच जबाबदारी आहे. सांगून ऐकत नाहीत हे खरच आहे ,मग करुन दाखवणे हाच उपाय आहे . उदा. अति टि व्हि पहात असतील तर आपण पाहणे बंद करणे.
आई - वडिलांना फार काही सांगू नये , त्याने अकारण वाद होतो , फरक पड्त नाही, कुणीही सांगितले तरीही !
आणि they have played their inning आता काय सांगणार ?
डो़क्टर साहेबांचे पुन्हा एकदा अभिनंदन.
29 Jul 2013 - 11:27 am | मदनबाण
लेखन आवडले... :)
जाता जाता :--- आता तर ऑनलाईन डॉक्टर बाबू सापडले आहेत... २ -४ प्रश्न मी सुद्धा विचारुनच घ्यावे म्हणतो. ;)
डॉक्टर हल्ली माझ्या पोटाचा घेर मस्त वाढुन त्याला एकदम तानपुर्याचा आकार आला आहे... चालणे शून्य ! दिवसभर मॉनिटरकडे बघुनच काम करतो तसेच माउसवरचा हात क्वचितच उचलला जातो आणि अधुन-मधुन जमल्यास मिपा मिपा खेळतो.दुचाकी चालवतो पण अतिशय सुंदर आणि स्वच्छ रस्त्यांमुळे अंगाचा खुळखुळा झाला आहे का ? असा विचार हल्ली बर्याच वेळा येतो. काही उपाय ? ;)
अवांतर :--- एक अजुन प्रश्न विचारायचा होता... पण तो इथे उघडपणे विचारता येत नसल्याने तुर्तास थांबतो.
29 Jul 2013 - 11:44 am | विटेकर
माझा पण एक्झाक्टली हाच प्रश्न आहे. व्य नि करतो .. उगा चारचौघात नको...!!!
जोक्स अपार्ट .. पण लोक तुमच्या व्यवसायासंदर्भात अक्षरशः पीडतात.. !
गाडी कोणती घेऊ ? हा मला नेहमी विचारला जाणारा प्रश्न .. वास्तविक मला माझ्याच ब्रांड विषयीच पूर्ण माहीती नस्ते , काय कप्पाळ सांगणार ? पूर्वी मी ईमानदारीत चौकशी / फोनाफोनी करुन माहीती मिळवून द्यायचो.. कधी कधी बरोबर शोरुम्ला ही जायचो..
मग लक्षात आले, कोणती गाडी घ्यायची हे आधीच ठरलेले असते ,माझे मत त्यांना कन्फर्मेशन साठी हवे असते .. !!
एकदा हिम्मत करुन एकाला विचारले , अरे आपले तर ही गाडी नको असे ठरले होते ? उत्तर आले .. नाय रे , आमच्या हिला जरा तोच रंग हवा होता !!!!
ह्ल्ली कुणी विचारले तर .. गोल गोल उत्तरे देतो, शक्य झाल्यास त्याच्याच मनातले उत्तर देतो. पर्फेक्ट विन विन !!!
29 Jul 2013 - 12:14 pm | योगी९००
गाडी कोणती घेऊ ? हा मला नेहमी विचारला जाणारा प्रश्न ..
असाच अनुभव माझाही..कोणता मोबाईल घ्यावा हा मला नेहमी विचारला जाणारा प्रश्न..
आयटीमध्ये मोबाईलवर काम करत असल्याने (App development) कोणाला हे सांगणेही नको असे वाटते. लगेच लोकं आपला मोबाईल काढून त्याचा प्रोब्लेम सांगत बसतात जणूकाही मी मोबाईल रिपेरींगचाच कोर्स केला आहे. (पण बर्याच वेळेला लोकांचे सॉफ्ट्वेअरच्या संदर्भातले प्रोब्लेम्स मी सोडवलेही आहेत). तीच गोष्ट PC\laptop\wifi router setting च्या बाबतीतही..रात्री कधीही बोलावणे येते कधी कधी (म्हणजे फक्त हे प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठीच बोलावणे असते..).
डॉक्टर तुम्हीच सांगा काय करावे आता..!!
3 Aug 2013 - 9:40 am | सुबोध खरे
सर्वात महागडा फोन घ्या म्हणून सांगायचे वर "सस्ती चीज और अच्छी चीज मी फरक होता है" म्हणायचे.
नाहीतरी मोबाईल एका विशिष्ट पातळीच्या वर हा आवश्यक नसून ष्टाईल चा भाग आहे तर खर्च करू द्या कि. त्यातून अशा चा डीलर ओळखीचा असेल तर कमिशन सुद्धा काढा.
हीच गोष्ट मोटार गाडीला पण लागू आहे. दोन्ही बाबतीत १) (NECESSITY) आवश्यकता यात मारुती इंडिका येतात , २) UTILITY( उपयुक्तता ) होंडा सिटी किंवा टोयोटा करोला आणी ३)LUXURY ( भोगविलास/ ऐश आराम) होंडा अकोर्ड, मर्सिडिस किंवा अजून वर या पातळ्य़ा आहेत.
समोरच्याच्या लायकीप्रमाणे त्याला उत्तर द्यायचे. जितका शहाणपणा जास्त तितकी महागाची वस्तू सुचवायची.
हा का ना का.
4 Aug 2013 - 3:12 am | प्रभाकर पेठकर
सुबोध खरे साहेब,
वरील विधानाशी असहमत आहे. गाडी घेताना त्याचा वापर कशासाठी, किती वेळा, कुठल्या रस्त्यावर, किती काळाकरीता तसेच आसन क्षमता, आरामदायी आसनव्यवस्था, सस्पेन्शन, इंजिन कपॅसिटी आणि ऐपत ह्या सर्व बाबींचा विचार करून वाहन प्रकार ठरवला जातो.
उदा. मला शहरात वापरायला गाडी कमी लागते. पण मला बाहेरगावी भटकण्याची प्रचंड हौस आहे. माझ्या कुटुंबात ९ माणसे आहेत. त्यात एक लहान मुल असल्याकारणाने निव्वळ गरज ८ आसन व्यवस्थेची. माझी उंची, पोटाचा आकार, गुडघ्यांची व्याधी इ.इ. कारणाने टवेरा, क्वालीस , स्कॉर्पिओ ह्या सारख्याच गाड्या 'शॉर्ट्लिस्ट' झाल्या. पैकी टवेराचे सस्पेन्शन मला पटले नाही, क्वालीसचे स्टिअरींग माझ्यासाठी अडचणीचे ठरले. एक्सलेटरवरून ब्रेकवर पाय नेताना स्टिअरींगला अडकतो. शेवटी स्कॉर्पिओ सर्व बाबतीत उजवी ठरली. दूरच्या प्रवासासाठी आसन व्यवस्था आरामशीर आहे. सस्पेन्शन उत्तम आहे, ड्रायव्हरसकट ८ जणांना आरामात प्रवास करता येतो. (फक्त डिकी जरा लहान उरते. कॅरिअर लावल्यास ती समस्या दूर होऊ शकेल). ड्रायव्हरला थकवा जाणवत नाही. इंजिन ताकद भरपूर आहे. महाराष्ट्रात भरपूर भटकता येते. हा भोगविलास किंवा ऐशाराम नसून माझी 'गरज' आहे.
मारुती, इंडिका, होंडा सिटी किंवा टोयोटा करोला ह्या गाड्या वैयक्तिकदृष्ट्या माझ्यासाठी 'त्रासदायक' आहेत. तर 'प्राडो' सारख्या मोठ्या गाड्या माझ्यासाठी 'अनावश्यक' आहेत.
त्यामुळे आवश्यकता, उपयुक्तता आणि ऐशोआराम वगैरे लेबले व्यक्तिसापेक्ष आहेत. त्याचे सार्वत्रीकरण करता येणार नाही.
4 Aug 2013 - 9:44 am | सुबोध खरे
साहेब आपले म्हणणे मान्य आहे
कि या गोष्टी व्यक्तीसापेक्ष अहेत.जसे मला वाटते कि अमुक या मुलाला हि मुलगी लग्नाला योग्य आहे. तसे त्याला वाटेल असे नाही. हा निर्णय ज्याचा त्याने करायचा असतो
हीच गोष्ट या रस्त्यावर सल्ला मागणाऱ्या लोकांना कळली पाहिजे. पण जाता जाता फुकट सल्ला मागणे याला उपाय हाच ?
4 Aug 2013 - 10:51 am | प्रभाकर पेठकर
धन्यवाद.
पण,
हे उदाहरण ह्या संदर्भात चुकीचे आहे. एखादी कार घेणे आणि लग्न करणे ह्या दोन भिन्न गरजा आहेत. लग्नात व्यवहारा व्यतिरिक्त भावनेलाही महत्त्व आहे. कार प्रमाणे पत्नी किंवा पती सहज बदलता येत नाही. तिथली निवड ही मर्यादीत काळापुरती नसून जन्मभरासाठी असते. तिथे 'आवश्यकता, उपयुक्तता आणि ऐशोआराम' हे निकष नसतात (नसावेत). तिथे दिसणं, शिक्षण, संस्कार, चारित्र्य, नोकरी, प्रेमभावना वगैरे वगैरे सर्वस्वी भिन्न निकष नजरेत असतात. त्यामुळे एकदा मुलगा/मुलगी एखाद्याला/एखादिला लग्नासाठी योग्य आहे असे आपल्याला वाटले तरी वरील एखाद्या निकषानुसार त्याला/तिला, तो/ती अयोग्य वाटू शकेल.
कारच्या बाबतीत जी मॉडेल्स आपण आवश्यकता, उपयुक्तता आणि ऐशोआराम ह्या वर्गवारीत टाकली आहेत ती चुकीची आहे एवढेच म्हणणे. म्हणजे जे मॉडेल एखाद्याला ऐशोआरामाचे साधन असेल तेच मॉडेल एखाद्याचे खरोखरचे 'गरजेचे' असू शकते.
आपला मुद्दा मान्य आहेच. 'दिसला डॉक्टर की आपले रडगाणे गा हे अत्यंत चुकीचे आणि शिष्टाचारास सोडून आहे. हे सर्वांनी टाळलेच पाहिजे.' हा मुद्दा माझ्या पहिल्या प्रतिसादात येऊन गेला आहेच.
29 Jul 2013 - 11:38 am | चित्रगुप्त
डॉक्टर साहेब, अतिशय समर्पक आणि समयोचित लेख आहे. धन्यवाद.
लहान मुलांना लावलेल्या चांगल्या सवयी ती मोठी झाल्यावर, मिळवती झाल्यावर, लग्न झाल्यावर का सुटतात, हे कळत नाही.
मी स्वतः वडिलांचे बघून रोज व्यायाम, आसने, पायी चालणे, इ. इ. करायचो, ते आजतागायत चालू आहे. माझे बघून मुले लहानपणी आसने, व्यायाम, रात्री दात घासणे वगैरे सर्व करत. आता मिळवती झाल्यावर सर्व सुटले, पोटही सुटले, त्यामुळे त्यांना आमची काळजी वाटण्याऐवजी आम्हालाच त्यांची काळजी वाटते. अश्या वेळी त्यांना कोणी आणि कसे समजवायचे, कळून देखिल वळत नाही, याला काय करायचे, असे वाटत रहाते.
29 Jul 2013 - 11:58 am | बाबा पाटील
सर्,माझी सुवातीच्या ५-६ वर्षाच्या प्रॅक्टिस मध्ये अशीच भयानक चिडचिड होत असे,लोकांना कळत असेते की आपल्याल्या या गोष्टींपासुन त्रास होत आहे.पन त्यात बदल करायची त्यांची अजिबात तयारी नसते.लोकांचे एक असते की मी अजिबात पथ्य पाणी पाळणार नाही डॉक्टर तुम्हाला काय करायचे ते करा.
यातुन मी कधीकधी वैतागुन पेशंटवर पथ्याची सक्ती करायला सुरुवात केली तर पेशंट तुटायला लागले परत वरती तो अमुक अमुक डॉक्टर फार खडुस आहे अशी प्रसिध्दी मिळु लागली, त्यानंतर मात्र डोक्यावर बर्फाचा गोळा आणी जिभेवर साखर. आणी न रागावता शालजोडीतले हाणत पथ्य सांगायची.याला दुसरा उपाय नाही...
3 Aug 2013 - 9:53 am | सुबोध खरे
डॉक्टर साहेब,
एके काळी(१५ वर्षापूर्वी) मी लोकांना वजन कमी करण्यासाठी कळकळीने सल्ला देत असे.पण बर्याच वेळा मला असा अनुभव आला कि सगळे आहार व्यायाम वगैरेचा संपूर्ण सल्ला ( तो सुद्धा फुकट) देऊन झाला कि लोक शेवटी विचारत कि पण डॉक्टर याच्यावर काही गोळी नाही का? म्हणजे तुमचा अर्धा तास घसाफोडीची किंमत काय?.
मी तेंव्हापासून एक तर फुकट कोणताही सल्ला देणे बंद केले आणि वजनदार मंडळी जाता जाता (कट्ट्या वर विचारतात तसे)विचारतात कि वजन कमी कसे करायचे. तेंव्हा त्यांना मी सांगतो कि आतापासून पंधरा दिवस तुम्ही काय खाता त्याची एक डायरी( नोंदणी पुस्तक) करा एक पेढा खाल्ला तरी त्यात नोंद लिहायची. असा पंधरा दिवसाचा आहार लिहून आणा म्हणजे तुमच्या साधारण आणि नैमित्तिक आहाराची मला कल्पना येईल आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला सविस्तर सल्ला देईन. गेल्या पंधरा वर्षात एकही माणूस हि डायरी घेऊन आलेला नाही.
रुग्णाला सल्ला देताना कर्मण्ये वाधिकारस्ते हा मंत्र लक्षात ठेवायचा. पथ्य तो करतो कि नाही हा त्याचा प्रश्न आहे सल्ला देणे हे आपले काम आहे.
मात्र मी सल्ला देताना परखडपणे देतो.(लष्करातील माणसे रोख ठोक आणि तिरसट असतात या कीर्तीचा मी पूर्ण उपयोग करून घेतो) वर हेही सांगतो कि या सल्ल्याचा मला पाच पैश्याचा फायदा नाही पण हे तुमच्याच फायद्याचे आहे
माझा मूळ मुद्दा हा होता कि रस्त्यात किंवा प्रदर्शनात किंवा लग्नात डॉक्टर ला गाठून त्याच्याकडे व्यावसायिक सल्ला मागणे अत्यंत गैर आहे. मग ते जवळचे असोत कि लांबचे.
3 Aug 2013 - 11:26 am | शिल्पा ब
मुळ मुद्दा राहुद्या आता ! मी साधारण तीन आठवड्यापासुन रोज जे काही खाते त्याची एक डायरी बनवलीये - व्हर्चुअल अर्थातच.
देउ का पाठवुन? ;)
3 Aug 2013 - 11:30 am | सुबोध खरे
त्याबरोबर आपले वय,उंची वजन आणि कंबर याची मापे पाठवा.
3 Aug 2013 - 11:42 am | शिल्पा ब
बायकांना असले प्रश्न विचारीत नैत !
3 Aug 2013 - 11:52 am | स्पा
खरे काकांवर आता पाशवी शक्तींचा हमला होणार तर =))
5 Aug 2013 - 12:23 am | बॅटमॅन
=)) =))
काही बोलणे धोक्याचे आहे यावर, उगीच पाशवी हल्ला होऊन धागा हायज्याक स्पॅरो करतील आंतरजालीय चाच्यांप्रमाणे =))
नोंदः चाच्या हा शब्द इथे चाचे या शब्दाचे अनेकवचनी स्त्रीलिंगी रूप म्हणून वापरला आहे.
5 Aug 2013 - 11:34 am | विश्वनाथ मेहेंदळे
महत्प्रयासाने गप्प बसलो आहे रे ;-)
29 Jul 2013 - 12:05 pm | रुमानी
नेहमीप्रमाणेच लेख व प्रतिसाद दोन्ही आवडले .
29 Jul 2013 - 12:05 pm | दादा कोंडके
मुलं जशी असतील त्याला सर्वस्वी आई-वडील जबाबदार असतात असं माझं मत आहे. नुसतच हे करू नका, ते करू नका असं सांगून उपयोगाचं नाही. त्यासाठी स्वतः तसं वागायला हवं. त्यासाठी वेळ मुलांसाठी द्यायला हवा. आणि हे योग्य त्या वेळेतच करायला हवं. एकदा वेळ निघून गेली की उपयोग नाही.
परवाच घरी एक मित्र त्याच्या तीन वर्षाच्या (उगाच कानफाडीत मारावं असं वाटणार्या) मुलाला घेउन आला होता. त्याच्या जेवायच्या वेळेला मला काँप्युटर चालू करून त्यावर यु-ट्युबमधून ठरावीक कार्टूनच लावावं लागलं. वरती, 'माझं पोरगं कसलं हुशार आहे. तेच कार्टून आणि तोच भाग बघितल्याशिवाय जेवतच नाही" हे आई-बाबाच्या डोळ्यात कौतुक!
29 Jul 2013 - 12:17 pm | मदनबाण
परवाच घरी एक मित्र त्याच्या तीन वर्षाच्या (उगाच कानफाडीत मारावं असं वाटणार्या) मुलाला घेउन आला होता.
हॅहॅहॅ... असंच एक नमुना माझ्या मामे-भावाच्या मुलाच्या वाढदिवसात पाहिला होता ! घरात आल्या आल्या सर्व पोरांच्या डोक्यावर असणार्या छोट्या कागदी टोप्या फाडुन टाकल्या ! त्या टोपींचे गळ्याभवती बसणारे रबर कसे भराभर तोडायचे त्याचे प्रात्यक्षिक इतर मुलांना दाखवले. शिवाय हातात मिळेल त्या वस्तुंची वाट लावली ! त्या तोडल्या तरी किंवा फाडल्या तरी... शिवाय शोकेस मधे ठेवलेल्या प्रत्येक वस्तुंशी त्यानी खेळ खेळला,वीजेची २-४ बटनांशी खेळ खेळुन पाहिला... काही वेळाने त्या उध्योगी पोराच्या मातोश्रींचे आगमन झाले,त्यांचा एकंदर पेहराव आणि मुलाकडे केलेले पूर्ण दुर्लक्ष्य यातुनच मी काय तो बोध घेतला ! आणि त्या मुलाच्या अविरत मर्कट लिला पाहुन माझे मन क्षुब्ध होउन माझे टाळके सटकु नये म्हणुन माझी नजर मी केकवर स्थीर केली. ;)
3 Aug 2013 - 4:13 pm | अनिरुद्ध प
त्याने केकची नासधुस नाही केलि.
4 Aug 2013 - 11:00 am | सुबोध खरे
दादा साहेब,
काय उत्तम शब्द आहेत. अगदी मनातले बोललात. अशी विधुळवाटी मुले आणि त्यांचे हुशार पालक आपल्याला सर्वत्र दिसतात आणि या मुलांनी केलेला विध्वंस जरी तिसर्याच्या घरात असेल तरी आपल्याला पाहवत नाही. आणि अशा पोराच्या एक सणसणीत कानाखाली मारण्यासाठी हात शिवशिवतात.
4 Aug 2013 - 11:33 am | दादा कोंडके
धन्यवाद खरे साहेब. पण हे शब्द पुलंच्या 'मी आणि माझा शत्रूपक्ष' मधले आहेत. :)
29 Jul 2013 - 12:26 pm | कपिलमुनी
माझ्या डॉक्टर बंधूला एक लग्नात जेवताना शेजारच्या सद्गृहस्थाने मलविसर्जनास त्रास होतो ..याचे यथोचित वर्णन करून "सध्या 'भजीसारखे' होत असून ते 'श्रीखंडासारखे' झाले पायजे बघा "..
असा सल्ला मागितला होता ..अजूनही त्याच्या समोर भजी , श्रीखंड आले की तेच आठवते ..
2 Aug 2013 - 9:19 pm | आशु जोग
प्रकृतीच्या काही तक्रारी दैवानेच दिलेल्या असतात. त्यात आपण कर्माने भर घालू नये. असे डॉक्टरांचे सांगणे असावे.
3 Aug 2013 - 12:04 am | डॉ सुहास म्हात्रे
मानवी स्वभाव बघितला तर या लेखातल्या आणि प्रतिसादांतल्या मुद्द्यांतील उदाहरणे कधीच संपणार नाहीत... पण तरीसुद्धा माझे दोन पैसे...
१. डॉक्टर एक जिवनावश्यक सेवा पुरवणारा व्यावसायिक आहे. पण तो एक माणूसही आहे.
२. व्यावसायिक वेळेत डॉक्टरतर्फे १००% व्यावसायिक वागणूकीची अपेक्षा ठेवण्यात काहीही गैर नाही, किंबहुना तसे वागणे डॉक्टरचे कर्तव्य आहे.
३. त्याबरोबरच डॉक्टरही माणूस असून त्याला त्याचे जीवन, कुटुंब, सगेसोयरे, सुखदु:ख आहेत आणि व्यावसायिक वेळेव्यतिरिक्त इतर वेळेस व्यवसाय बाजूला ठेवून दोन क्षण स्वतःसाठी खर्च करायचा हक्क आहे, याचे भान इतरांनी ठेवले पाहिजे. किंबहुना तसे करणे समाजातील इतर घटकांचे कर्तव्य आहे.
४. डॉक्टर २४ तास उपलब्ध असावा अशीही बर्याच जणांची अपेक्षा असते... मात्र हा हट्ट नसून सापेक्ष मागणी असावी.
जेथे इतर पर्यायच उपलब्ध नसतील तेथे उपलब्ध असलेला एकमेव डॉक्टर २४ तास उपलब्ध असावा, इथपर्यंत ठीक आहे. पण डॉक्टरी पेशा पत्करला म्हणून दरवेळेस आम्हाला गरज आहे/वाटते तेव्हा (किंवा कधी कधी आम्ही म्हणू तेव्हा) डॉक्टरने धावून यावे ही मागणी योग्य नाही... विशेषतः जर त्या डॉक्टरने अगोदरच त्याच्या कामाच्या वेळा प्रसिद्ध केलेल्या असल्या तर.
वेळीअवेळी फोन करूनही नंतर "हे कसले डॉक्टर? आम्ही फोन केला तेव्हा हे खुशाल नाटकाला गेले होते." असे बोलणे म्हणजे "डॉक्टरी पेशा स्विकारला म्हणजे त्याने सर्ववेळ केवळ माझ्या सेवेसाठी सतत तत्परतेने हजर रहायलाच पाहिजे" असे म्हटल्यासारखे होते. ही गोष्ट आपल्या आयुष्यात अथवा आपल्या नवरा/बायकोच्या आयुष्यात अथवा आपल्या मुला/मुलीच्या आयुष्यात असणे किती जणांना योग्य वाटेल?
थोडक्यात, डॉक्टर एक जिवनावश्यक सेवा पुरवणारा व्यावसायिक आहे हे डॉक्टरने विसरू नये आणि तो एक माणूसही आहे हे इतरांनी विसरू नये.
4 Aug 2013 - 10:22 am | सुबोध खरे
एक्का साहेब
आज काल लोकांची वृत्ती अशी झाली आहे कि मी पैसा फेकतो कि मला काहीही उपलब्ध झाले पाहिजे.
एक उदाहरण म्हणून देत आहे.
२००७ साली हिरानंदानी रुग्णालयात काम करीत असताना विभागात एक फोन आला. त्या संगणक व्यावसायिकाला आपल्या बायकोची पाचव्या महिन्यातील सोनोग्राफी करून हवी होती हि चाचणी सोळा ते वीस अशा चार आठवड्याच्या कालावधीत केंव्हाही केली तरी चालते. हि चाचणी मुलात काही जन्मजात व्यंग( anomaly) आहे का यासाठी केली जाते आणि असे व्यंग असेल तर भारतीय कायद्याप्रमाणे वीस आठवड्यापर्यंत गर्भपात करता येतो.
या महाशयांना ती चाचणी रविवारीच करून हवी होती. त्यांना नम्रपणे सांगितले गेले कि आपण सकाळी आठ ते रात्री आठ सोमवार ते शनिवार आपण कधीही येऊ शकता रविवारी फक्त तातडीच्या/ अतिगंभीर रुग्णाची तपासणी इतर डॉक्टरांच्या मागणीवरूनच केली जाते. यावर हे महाशय म्हणाले कि मी हजार दोन हजार अतिरिक्त देण्यास तयार आहे. याला मी स्पष्टपणे नकार दिला. यावर या महाशयांनी आमच्या विरुद्ध व्यवस्थापनाकडे तक्रार केली. त्यावर तेथील प्रमुख कार्यकारी अधिकारी यांनी एक बैठक बोलावली ज्यात माझ्या विभागाचे आम्ही तीन डॉक्टर होतो. त्यावर आम्हाला विचारले काय प्रश्न आहे. मिजेन्व्हा हे सांगितले कि चार आठवडे या महाशयांना वेळ मिळत नाही तर आम्ही त्याच्या तालावर का नाचायचे. रुग्णालयातील कोणताही तज्ञ तातडीने तपासणी करा म्हणून सांगतो तेंव्हा आम्ही दिवस रात्र रविवार हे न बघता ती करतो कारण ती आपत्कालीन परिस्थिती असते. इथे एखादी तपासणी चार आठवड्यात केंव्हाही करता येते तर मुद्दाम रविवारी कश्साठी यायचे? जेंव्हा आम्हाला "सुचवण्यात" आले कि अशी तपासणी रविवारी करायला काय हरकत आहे जर ते अतिरिक्त पैसे देत आहेत? ( इथे व्यवस्थापन त्याला खुश करण्यासाठी कमरेचे सोडून देण्यास तयार झाले होते. मी एकदम आवाज चढवून सांगितले आम्ही हमरस्त्यावरील वेश्या( braodway whore) नाही कि लुन्ग्यासुन्ग्याने चार पैसे फेकावे आणि "सेवा" घ्यावी. मी येणार नाही तुम्हाला काय करायचे ते करा. अर्थात व्यवस्थापनाची मला नोकरीवरून काढून टाकण्याची हिम्मत नव्हतीच त्यामुळे पुढे कधीच असा प्रश्न आला नाही. आजही मी या निर्णयावर ठाम आहे. (मी या रुग्णालयात रविवारी रात्री एका इमारतीमध्ये बिगारी काम करणाऱ्या हमालाच्या बायकोची आपत्कालीन सोनोग्राफी खिशातून पैसे घालून करुन दिली होती हे कुठून तरी व्यवस्थापनाला कळले होते)
पण पैसा फेको तमाशा देखो हि वृत्ती आजकाल बोकाळली आहे
4 Aug 2013 - 6:15 pm | आशु जोग
त्यांना ही चाचणी रविवारीच करून हवी होती. कारण
It's 'SON'DAY.
3 Aug 2013 - 2:18 am | अमित खोजे
अगदी अशीच परिस्थिती घरोघरी आढळते. लेख वाचून डॉक्टरांची बाजू कळली आणि उत्तरे प्रती उत्तरे वाचून रोग्यांची आणि त्यांच्या घरातल्यांची सुद्धा मनस्थिती कळाली.
हा लेख प्रिंट करून आमच्या घरी वाचायला देणार आहे - नक्कीच . (घरात आंतरजाल नसल्या कारणाने )
3 Aug 2013 - 4:42 pm | balasaheb
खुप सुन्दर
4 Aug 2013 - 5:50 am | निनाद मुक्काम प...
भारतीय लोकांना एखाद्या विशिष्ट व्यवसायाबद्दल लोकांना कुतूहल असते किंवा काही जाणून घ्यायची इच्छा असते.
हा स्वभावाचा भाग झाला त्यावर त्रागा करण्यात अर्थ नाही
मला मी हॉटेल व्यवस्थापन केले आहे म्हणजे मी एकत्र कुक किंवा वेटर असावा असा अनेकांचा समज होतो , त्यात पंचतारांकित हॉटेलात काम करतो हे दहा वर्षापूर्वी लोकांना सांगायचो तेव्हा त्या अनुषंगाने त्यांच्या मनातील अनेक शंका , कुशंका माझ्याशी चर्चिल्या जायच्या
खुद मी अनेकदा मुखर्जी सारखी आहार तज्ञ असो किंवा परुळेकर सारखे वैयक्तिक व्यायाम मार्गदर्शक असो त्यांना पंचतारांकित हॉटेलात गाठून चर्चेच्या ओघात अनेक क्षेत्रातील नामांकित सल्ला विचारायचे तेव्हा चेहऱ्यावरील हुकमी हास्य कायम ठेवून ही सर्व मंडळी मोजकी व जुजबी माहिती देऊन
प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीस , आपल्या कार्यालयात येण्याचे आमंत्रण द्यायचे , वर त्याच्या सर्व शंकांचे सविस्तर , निवांतपणे निरसन करण्याची हमी द्यायचे , ह्यावर ही नामांकित मंडळी अनेकदा चर्चेतून तेथून काढता पाय काढायची.
हाच उपाय मी सुद्धा करायचो.
4 Aug 2013 - 6:00 am | रेवती
चर्चेच्या ओघात अनेक क्षेत्रातील नामांकित सल्ला विचारायचे
हैला! हे भारीच हां. शेवटी माणूस नामांकित असो किंवा सर्वसामान्य, मूळ स्वभाव तसाच! समारंभात किंवा इतरवेळी गाठून प्रश्न विचारले व त्रास झाल्यास डॉ. खरे मिपावर लिहू तरी शकतात, या अतिउच्चभ्रु लोकांचे राग लोभ, कनेक्षने, व्यवसायाचे स्वरूप हे मोठे होत जाईल तसे उत्तर देणार्यास जास्त कॉम्प्लीकेटेड होत जात असणार. अशावेळी सगळेच थोडे ट्रिकी असेल.
निनादराव, आम्ही मात्र तुम्हाला अजून पंचतारांकित संस्कृतीबद्दल एकही प्रश्न विचारून त्रास दिलेला नाहीये. ;)
4 Aug 2013 - 9:55 am | सुबोध खरे
साहेब व्यवसायाबद्दल कुतूहल आणि फुकट सल्ला या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मला लोक जेंव्हा लष्करी अनुभवाबद्दल विचारतात किंवा आमच्या मुलाला लष्करात अधिकारी बनायचे आहे त्यासाठी काय करावे लागेल असे विचारतात तेंव्हा मी सरळ उत्तर देतो मग कुठेही असो. पण हेच जेंव्हा एखाद्या गाण्याच्या मैफिलीत अपचनाबद्दल विचारतात आणि अमुक तमुक डॉक्टर ने हे औषध दिले आहे ते बरोबर आहे का तेंव्हा काय अपेक्षा करायची. मी कोर्पोरेट रुग्णालयात लोकांना स्वच्छ शब्दात तोंडावर सांगत असे कि हि जागा आपले प्रश्न विचारण्याची नाही. पण आपल्या वडिलांच्या वयाच्या माणसाने( त्यांच्या मित्राने) आपल्याला हा शब्द कालिदास सभागृहाच्या प्रवेशद्वारात विचारला तर?
केवळ वयाचा विचार करून असे सांगता येत नाही.( अजून तरी वरिष्ठांना मान देणे हे आपले संस्कार आणि लष्करातील शिकवण मी विसरू शकत नाही). मग पुढचा प्रश्न विचारला तर मला मोबाइल वर हुकुमी फोन येतो. म्हणून मी तो शब्द वापरला कि "मी त्यांना टाळतो".
5 Aug 2013 - 11:59 am | नक्शत्त्रा
शेवटचा उपाय म्हणून ते डॉक्टरांची मदत अपेक्षित असतात.
मला हि पेठकर काका चे मत बरोबर वाटते . बर्याच वेळेला आपण किवा आपले फमिली मेम्बेर्स स्वतःवर नियंत्रण नाही ठेवू शकत. जसे प्रत्येक धुम्रपान करण्यारा वक्तीला त्यःचे दु;ष परीणाम पण माहित असतात पण …. अशा वेळी डॉक्टर एके देवदूताचे काम करतात. ते सर्वसामान्यांचे आदर्श पण असतात आणि त्यामा प्रतेच्क गोष्ट माहित आहे असे आपण सर्वजण मान्तो. सोनारानेच कान तोच्वावेत मग भलेही सर्बांकडे सर्व साहित्य असले तरि….
पण त्मची हि परीशिती मी समजू शकते कारण माज्या घरात अर्धे लोक डॉक्टर आहेत आणि सामन्य जीवन जगणे कधी कधी फार अवधड होते. सर्वांचे अनुभव कमीअधिक प्रमाणत तुमच्या सारखेच आहेत.
5 Aug 2013 - 2:38 pm | गवि
उपरोक्त परिच्छेद आणि शेवटी केलेला हा उल्लेखः
या दोन वाक्यांवरुन किंवा त्यांच्या रचनेवरुन काही गोष्टी जाणवल्याने एरवी दिला नसता, पण न राहवून प्रतिसाद देतो आहे:
मी स्वतः लठठपणाचा बळी आहे. लहानपणापासून कमीजास्त प्रमाणात वजन वाढणे आणि त्यावर आईवडिलांनी असंख्यवेळा मला मागे लागून व्यायाम करायला लावणे, आहारनियंत्रण इत्यादि गोष्टी केल्या. त्याचा त्या त्या वेळी फायदा झाला हे खरं, पण मूळ प्रवृत्ती तशीच असल्याने नोकरीला लागल्यावर महाप्रचंड प्रमाणात वजन वाढलं. डाएट, व्यायाम हे उपचार वरचेवर चालू असतात. सस्टेनेबल डाएट, हलका व्यायाम, मग वाढवत नेणे हे नेटाने केलं जातं, पुन्हा सोडलं जातं. जिम, डॉक्टर्स, दहा किलो कमी झाल्याचा आनंद आणि पंधरा किलो परत वाढल्याचं दु:ख अशी अनेक आवर्तनं करुन झाल्यावर एक नक्की लक्षात येतं की लठठपणा हा एक आजार आहे. जितका शारिरीक, तितकाच मानसिक.
पालकांनी "बोलून" आटोक्यात राहणारा हा आजार नव्हे. पूर्ण नियंत्रणात आणल्यावरही धूम्रपान किंवा मद्यपानाप्रमाणे, ड्रग अॅडिक्शनप्रमाणे एका वीक मोमेंटला, एका निराशेच्या प्रसंगी पुन्हा मनुष्य अफाट कार्बोहायड्रेड्स खाऊन त्यात दिलासा शोधतो.
पन्नास पन्नास किलो वजन कमी केल्याच्या सक्सेस स्टोरीज असतात. पंधरावीस किलो कमी केल्याच्या तर माझ्या खुद्द स्वतःच्या स्टोरीज आहेत.
पण यातले ९९ टक्के लोक पुन्हा मूळपदावर किंवा आणखी वर वजनकाटा पोचवून रिलॅप्स होतात. अत्यंत खडतर असा क्रॅश कोर्स किंवा दररोज कॅलरीज / फायबर / रिफाईन्ड शुगर्सचे प्रमाण पाहून योग्य आहार योग्य प्रमाणात घेणं यापैकी कोणत्याही प्रकारचे उपाय अत्यंत योग्य असले तरी ते मॉडेल आन्सरप्रमाणे असतात. ते कायमचे उपयोगी ठरत नाहीत. शस्त्रक्रिया हा उपाय अत्यंत खर्चिक आणि हाय रिस्क आहे.
हे सर्व लिहीण्याचं कारण काय? तर "आहेस ना जाड, मग आता उपाय केलाच पाहिजे" हे अत्यंत लॉजिकल विधान आहे. पण हा मार्ग सामान्य वजन असलेल्या व्यक्तीला वाटतो त्यापेक्षा प्रचंड खडतर आहे हे यानिमित्ताने अधोरेखित करु इच्छितो. सुदैवाने आतापर्यंत मला भेटलेल्या मॉडर्न मेडिसिनच्या कोणत्याही डॉक्टरने या वजनदारपणाला "रोग" / "आजार" हा दर्जा देऊन त्यानुसारच चर्चा केली आहे.
उपरोक्त धाग्यातल्या हायलाईट केलेल्या प्रकटनात एक मुलगी लहानपणापासूनच लठठपणाची शिकार झाली आहे. मान्य आहे की तिला वजन कमी केलंच पाहिजे.
पण ज्या पद्धतीने विचार मांडले आहेत त्यानुसार काही गृहीतकं दिसली:
- आईवडिलांनी तिला काहीच "म्हटलं" नसेल. (ते काय गोट्या खेळत होते का? -- मला तर इथे एक अगतिक पालक दिसतात..)
- त्या मुलीला एखाद्या शारिरीक / मानसिक / मनोशारीर आजाराला असते तशी मदतीची गरज आहे. वैद्यकीय मदतीची. अशा वेळी आईवडील हे अ-तज्ञ लोक फार काही करु शकत नाहीत. त्यांनी उशीरा का होईना, पण तिला वैद्यकीय मदतीसाठी आणलं आहे. वजन कमी करणं हा या वैद्यकीय समस्येवरचा वैद्यकीय उपाय आहे. अशा वेळी ते कसं करावं याविषयी संपूर्ण शास्त्रशुद्ध मार्गदर्शन.. आणि ते आपल्या स्पेशलायझेशनच्या स्कोपमधे बसत नसेल तर तत्सम प्रोफेशनल ओबेसिटी स्पेशालिस्ट / डाएटिशियनकडे रेफरल. त्या मुलीला सकारात्मकरित्या वजन कमी करण्याविषयी गायडन्स हे देणं अत्यंत आवश्यक आहे.
इथे मात्र "डॉक्टरसाहेब तुम्हीच तिला सांगा" या विनंतीनेही डॉक्टरांची तळपायाची आग मस्तकात गेलेली दिसते.
हा भाग मला काहीसा असंवेदनशील वाटला. तुम्हीच तिला सांगा हे "टुमणे"? पालकांनी तिला इतक्या वर्षात एकाही शब्दाने काहीच बोललं नसेल याची तुम्हाला नक्की खात्री आहे? त्या आईची झोप उडाली असेल.. मी गॅरंटी देतो डॉक्टरसाहेब. आपल्या जवळचे लोक प्रत्येक बाबतीत चांगले काउन्सेलर्स नसतात. उलट भावनेच्या अपरिहार्य भरात आईबाबांनी केलेली बोलणी आणि सूचना या बर्याचदा उलट टोकाला जातात आणि दुरित दिशेचे बंडखोर परिणाम मुलांच्या मनावर करतात. तिथे खरोखर न्यूट्रल त्रयस्थ काउन्सेलर हवा असतो.
पण त्यासाठी लठठपणा हा एक आजार आहे हे मान्य केलं पाहिजे.
पोरांचा लठठपणा म्हणजे ऐदीपणे आणि वेळेवर पोरांना चांगले पळायबिळायला न लावल्याने अन पालकांच्या दुर्लक्षामुळे झालेला एक फाजील फुगवटा अशी समजूत सामान्यजनांत दिसतेच.. पण डॉक्टरांनी तशा आशयाचं निदर्शक काही लिहावं हे अनपेक्षित होतं इतकंच.
5 Aug 2013 - 3:32 pm | गवि
आणि.. विशेष म्हणजे अत्यंत परिणामकारक ठरलेला आवश्यक, योग्य असा प्रोटोकॉल तुम्ही एका मद्यपि व्यसनी माणसाबाबत पूर्वी वापरला आहे.. इथे उल्लेख आहे:
http://www.misalpav.com/node/25044
शमीम तुमच्याकडे पोटदुखीसाठी आला. सोनोग्राफीत फॅटी लिव्हर निघाली. तुम्ही या फारशा पुढे न गेलेल्या साईनचा उपयोग करुन त्याला सुरुवातीला दारुच्या दुष्परिणामाची धास्ती उत्पन्न केलीत. पण तुम्हाला निश्चित माहीत होतं की अशा वन टाईम स्कोल्डिंगने कायमचे सुटणार नाही कोणतेच व्यसन किंवा आजार. उलट दारुमुळे तू घरच्यांची कशी वाट लावतो आहेस याच्या जाणिवेने येणारी गिल्ट ही व्यसनाधीनतेला आणखी वेगाने खड्ड्यात घेऊन जाते याची तुम्हाला जाणीव होती. म्हणून तुम्ही हे पूर्ण कौन्सेलिंग हातात घेतले नाहीत तर फक्त सुरुवातीचा एक पुश देऊन त्याला योग्य जागी पाठवले.
म्हणजेच तुम्ही त्याला तुमच्या कलीग्जपैकी असलेल्या मनोविकार तज्ञाकडे "डी-अॅडिक्शन"ला पाठवला. त्या मित्राला आधीच कल्पना दिलीत की :
म्हणजेच खुद्द शमीमला किंवा त्याच्या घरच्यांना (ते सोबत नसल्याने?? )दारु पिण्यावरुन बोलण्याच्याही पुढे जाऊन तुम्ही त्याला सोडण्याची गरज आणि मार्ग समजावून सांगितलेत..
"याची दारु कमी केली पाहिजे" असे घरच्यांना सांगून.. "आता तुम्ही काय ते बघा.." असं त्याच्यावर किंवा नातेवाईकांवर सोडून नाही बसलात. एका घोटाचे इतके क्वार्टर्स होईपर्यंत काय करत होता असं म्हणून सोडून नाही दिलं. हे अत्यंत योग्य होतं आणि त्याची दारु सुटली हे सिद्ध झालं.
लठठपणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा अजूनही त्या प्रकारचा नाही हे एक निरीक्षण या निमित्ताने समोर आणायचं होतं. बाकी वेळीअवेळी पार्टीत, रस्त्यात गाठून सल्ले विचारणारे आणि अन्य प्रकारच्या लोकांविषयीची तुमची मतं योग्यच आहेत. त्यामुळे संपूर्ण लेखातल्या फक्त काही मर्यादित भागाशीच असहमती..
5 Aug 2013 - 5:06 pm | प्रभाकर पेठकर
दोन्ही प्रतिसाद अप्रतिम आहेत.
नुसते डॉ़क्टरांच्या दृष्टीकोनातून न पाहता एका रुग्णाच्या दृष्टीकोनातूनही पाहण्याची गरज असते. 'इतके दिवस काय नुसते गोट्या खेळत बसला होता काय?' हा प्रश्न मलाही खुपला होता पण माझे विचार तुमच्या इतके प्रभावीपणे मला मांडता आले नाहीत. असो.
कांही वेळा डॉक्टरांच्या वैयक्तिक आयुष्य उपभोगण्याचा मुद्दा महत्त्वाचा असतो तर कांही ठिकाणी रुग्णाची आणि त्याच्या नातेवाईकांची हतबलता विचारात घेतली गेली पाहीजे. दोघांनीही एकमेकांना समजून घेऊन वर्तन ठेवावे म्हणजे संबंधात कटूता येणार नाही.
5 Aug 2013 - 8:44 pm | प्रकाश घाटपांडे
दोन्ही प्रतिसाद उत्तम. गवि तुमची निरिक्षणशक्ती दांडगी दिसते. तसेच मांडण्याची हातोटीही. डॉक्टर ही माणुसच असल्याने सर्वसामान्य माणसांमधल्या भावभावना या त्याच्यातही असतात. तो सदा सर्वदा विवेकी राहू शकत नाही. त्याचाही एक पिंड असतो.त्याच्याही काही मर्यादा असतात. त्याचीही चिडचिड होते. पण डॉक्टर हा विशेष माणुस असल्याने सर्वसामान्यांच्या त्याच्याकडून वेगळ्या अपेक्षा असतात. त्याचे ओझेही त्यावर येत असते.
6 Aug 2013 - 12:18 pm | राजेश घासकडवी
गवि, तुमचे प्रतिसाद अतिशय वाचनीय असतात. आधी कधी सांगायचं राहून गेलं असेल कदाचित... मी बऱ्याच वेळा विचार केलेला आहे की नक्की असं वेगळं काय असतं? पण या प्रतिसादांमधून एकदम ते जाणवलं.
एखादी गोष्ट तुम्हाला खटकली हेदेखील तुम्ही अत्यंत हळुवारपणे सांगितलेलं आहे. आपल्या कुठल्याही शब्दाने समोरचा माणूस दुखावला जाणार नाही याची काळजी त्यातून दिसून येते. नुसतं तेवढंच नाही, तर दुसऱ्याबाबतचा तुमचा आदर व दुसऱ्याचा तुमच्याबाबतचा आदर याला धक्का पोचू न देता त्यात जवळीक साधून ते नाजूकपणे सांगता. त्यामुळे अर्थातच तुमचं म्हणणं बहुतेकांना पटतं. पूर्णपणे पटलं नाही तरी गवि या माणसाची ही अशी मतं का आहेत याबद्दल वाचणाराच्या मनात निश्चित सहानुभूती निर्माण होते.
तुम्ही जेव्हा कोणाशी असहमती दाखवता तेव्हा मला राहून राहून वडिलांनी जवळ घेऊन आपल्या लहान मुलीच्या पायात गेलेला काटा काळजीपूर्वक अल्लदपणे काढून द्यावा तसं चित्र डोळ्यासमोर येतं. तो काटा काढायचा तर असतोच, आणि त्याने किंचित दुखणार असतंच, पण दुखवण्याचा हेतू नाही हे तुम्ही ज्या प्रामाणिकपणाने दाखवता त्यामुळे त्या जखमेवर अपमानाचं ओझं चढत नाही.
आंतरजालावर, जिथे आपले शब्द लोकं हत्यारासारखे चालवत असतात (श्रेयअव्हेर पुल - 'पुण्यातले लोक आपली स्कूटर म्हणजे तलवार, दांडपट्टा चालवल्यासारखे चालवतात') तिथे तुम्ही ते सराईत शिल्पकाराच्या छिन्नी हातोड्यासारखे वापरता. त्यामुळे लोकांना तुमचं वाचल्यानंतर 'मला हेच म्हणायचं होतं, पण इतक्या चांगल्या शब्दात मला म्हणता आलं नसतं' असं राहून राहून वाटतं.
6 Aug 2013 - 12:51 pm | स्पा
येप्प
6 Aug 2013 - 1:00 pm | नंदन
सहमत आहे. त्यामुळे बर्याचदा मूळ लेखातल्या आख्यानापेक्षा, हे 'नचिकेताचे उपाख्यान' अधिक वाचनीय आणि चिंतनीय ठरतं :)
6 Aug 2013 - 1:16 pm | सहज
नचिकेताचे उपाख्यान'
5 Aug 2013 - 9:56 pm | सुबोध खरे
गवि आणि पेठकर साहेब
जे रुग्ण जाडी वाढताना सुरुवातीला येतात त्यांना मी फुकट बराच सल्ला देतो आणी योग्य आहार तज्ञाकडे नेहेमी पाठवतो. कारण लठ्ठ पणा हा मुलाचा आत्मविश्वास डळमळीत करतो आणी त्यामुळे मुलाच्या व्यक्तिमत्त्वावर खोल परिणाम करतो हे मला चांगले माहित आहे (यावर कधीतरी वेगळा लेख लिहिण्याचा विचार आहे).
लठ्ठ पणा चे दोन प्रकार आहेत एक म्हणजे पैथोलोजीकल ओबेसिटी आणि दुसरा म्हणजे अति खाण्यामुळे ( अति लाडाचा परिणाम सुद्धा) पहिल्या प्रकारातील लठ्ठ पणाची टोकाची उदाहरणे मी बरीच पहिलेली आहेत. लठ्ठपणावर शल्यक्रिया करणाऱ्या गटाचा मी एक भाग होतो तेंव्हा. ज्यात सर्वात जास्त वजन २३७ (दोनशे सदतीस फक्त)सुद्धा पाहिलेले आहे. हा प्रकार आणि दुसरा यात फरक आहे हे मला व्यवस्थित पणे माहित आहे.BARIATRIC SURGERY याचे किती इतर दुष्परिणाम आहेत हे मला चांगले माहित आहे आणी लठ्ठपणा आणी त्याचे मानसिक परिणाम हेही मला माहित आहेत. पण आठवीतील मुलगी हट्ट करते म्हणून रोज वेफर विकत घेऊन देणारे पालक किंवा चार वर्षाची मुलगी रडते म्हणून रोज कुरकुरे देणारे आजोबा मला आजही समजता येत नाहीत. एवढेच कि मी त्यांना तोंडावर बोलत नाही.
वरील उदाहरणात त्या मुलीचे आई आणि वडील दोघेही माझ्या दवाखान्यात आलेले होते आणि दोघेही लठ्ठ नव्हते त्यामुळे तिला अनुवांशिक लठ्ठ पणा नक्कीच नव्हता.
आईचे म्हणणे होते कि लहानपणी ती बारीक होती आताच (तीन वर्षात) ती जाडी झाली आहे. आपल्या मुलीची उंची जेमतेम पाच फुट आहे आणी तिचे वजन पंधराव्या वर्षी जास्तीत जास्त पन्नास किलो असायला पाहिजे पण ते शहाण्णव किलो आहे म्हणजे ब्याण्णव टकके जास्त आहे हे त्यांना इतके महिने जाणवले नाही? हे मान्य करणे जरा कठीण आहे. तिथे सुद्धा तिचे वडील सांगत होते कि तिला रोज एक लेज चं पाकीट लागतच. आता अशा लाड करणाऱ्या पालकांचे मी काय करणार? तीन वर्षे तिचे वजन वाढत होते तोवर काहीच केले नाही आणी आता जेंव्हा pcos मुळे पाळी उशिरा आली तेंव्हा ते जागे झाले. दुर्दैवाने आजही चांगल्या आहार तज्ञाकडे जायची त्यांची मनोवृत्ती दिसत नव्हती. शेवटी हे लोक लग्नाचे वय झाले कि जागे होतात. कारण लग्नाच्या "बाजारात" किंमत अतिशय पडून येते. (हीच परिस्थिती दातांच्या बाबतीत दिसते जोवर वाढीचे वय असते तोवर दात जास्त सहज सरळ होतात (१ ८ ते २०) . पण एकदा २२ -२४ वय झाले कि ते तितके सोपे राहत नाही आणी मग लोक दाताच्या डॉक्टर कडे घाई करतात)
पोरांचा लठठपणा म्हणजे ऐदीपणे आणि वेळेवर पोरांना चांगले पळायबिळायला न लावल्याने अन पालकांच्या दुर्लक्षामुळे झालेला एक फाजील फुगवटा अशी समजूत सामान्यजनांत दिसतेच.
यासाठी खालील दुवा पाहावा(असे अनेक दुवे गुगल वर सापडतील)
http://fitbandits.com/laziness-is-the-top-cause-of-obesity-in-india/
6 Aug 2013 - 1:01 pm | प्रभाकर पेठकर
१०० टक्के पालकांची चुक आहे. पोषणमुल्य, उष्मांकांची गरज आणि सेवन ह्या विषयी पराकोटीचे अज्ञान. आणि मी म्हणतो तसे 'सुबत्तेचे बळी' ही त्यांची चुक आहे. पण सर्व पालकांचे असे नसते. ते कानीकपाळी ओरडत असतात पण मुलं कान बंद करून बसली असतात. जेंव्हा एखादी, अवास्तव वजनसंबंधी, व्याधी डोके वर काढते तेंव्हा लोकं डॉक्टरांकडे धावतात. पण आधी त्यांनी कांहीच प्रयत्न केलेले नसतात असे नाही. अशा समस्यांमध्ये, सरसकट सर्व पालक, 'गोट्या खेळत बसलेले नसतात' एवढेच मला म्हणायचे आहे. जेंव्हा माणसाकडे ज्ञान असते पण उपाययोजना करायला माणूस टाळाटाळ करीत असतो त्याला 'हलगर्जीपणा' म्हणता येईल.
हे सर्वसामान्यांमध्ये किती टक्के लोकांना माहित असते? शेवटी अज्ञान हेच ह्या समस्येचे मुळ आहे. मलाही हे ज्ञान आज प्राप्त झाले. माझ्या मित्राची मुलगी ६वीत आहे. अतिशय सुंदर आहे. तिचे दात पुढे (थोडेसेच) आहेत. त्यांनी तिला दंतवैद्यास दाखवावे असे मी त्यांना अनेकदा सांगितले आहे. त्यांना ते पटते पण ते तेवढे गंभीर वाटत नाहीत. आता ही नवीन माहीती मला तुमच्याकडून मिळाली आहे ती वापरून मी त्यांच्यावर दबाव आणू शकेन. मुलगी तर अजून लहान आहे. डॉक्टरच्या नांवनेच घाबरते आहे.
Stitch in time saves Nine. ही उक्ती रोजच्या आयुष्यात अंगी बाणविली तर खुपशा समस्या टळतील.
5 Aug 2013 - 9:58 pm | अप्पा जोगळेकर
खूप प्रयत्न करुनसुद्धा तुम्हाला लठ्ठपणाचा त्रास होतो हे वाचून वाईट वाटले. तो एक आजार आहे किंवा अनुवांशिक आजार आहे हे विधान तुमच्या केसपुरते मान्य करु शकतो.
पण चुकीच्या जीवनशैलीमुळे लठ्ठ झालेले बहुसंख्य लोक लठ्ठपणा हा आनुवंशिक आहे किंवा तो आजार आहे अशी कारणे पुढे करतात हेदेखील तितकेच खरे आहे. त्यामुळे डॉक्टरांचे मत तितकेसे चुकीचे वाटले नाही.
6 Aug 2013 - 10:13 am | स्पा
अप्पा आणि डॉक्टरांशी लई वेळा सहमत
5 Aug 2013 - 10:01 pm | सस्नेह
समजत असते सगळ्यांना सगळे !
पण सांगायचे मात्र डॉक्टरांनी !