कितीतरी दिवसात मिपावर आलो नाही. यायला मिळाले तेही ओझरते. आज कुठूनसा एक अर्धा तास हाती लागला. "किती चातक-चोचीने प्यावा वर्षा ऋतु तरी " अशी अवस्था. म्हण्टले मिळालेला वेळ कारणी लावावा. खूप पूर्वी एक कविता नेटावर वाचली होती. तिचे हे भाषांतर. मूळ कवितेच्या कवीचे नाव "शेल्टन" असे आहे. केरळमधला एक माणूस.
कविता मला खूप आवडली होती - अजूनही खूप आवडते. ;-)
In the dimly lit
dusty corner of the office
a slim arrogant cigarette sits
contently smoking John.
Beyond the Alps,
a sleepy village awakens to the
sounds of an aimless football
kicking around a bunch of schoolboys.
On the merciless, mine-studded
streets of Kandahar, a piece of
American bread eats
starving, veiled women.
In distant cities,
books read scholars
bikes ride punks
films watch viewers
groceries buy shoppers
pianos play prodigies
pictures paint artists
bikinis wear babes
fires light arsonists
mountains climb daredevils
love makes couples
islands discover explorers
and the dead speak well of mourners.
While on a crowded train
speeding past coconut groves,
a stupid poem writes me.
ऑफिसच्या मंद उजेडात
एका धुळकट कोपर्यात
एक बारकीशी सिगारेट
पीत बसली आहे जॉनला
निवांतपणे.
तिकडे आल्प्स पर्वतापलिकडे
एक झोपाळलेले खेडे हळुहळू उठते आहे
शाळकरी पोरांना लाथाडणार्या
एका दिशाहीन फुटबॉलच्या आवाजात.
कंदाहारमधल्या क्रूर रस्त्यांवर
अमेरिकन ब्रेडचा तुकडा चघळतो आहे
बुरख्यातल्या एका भुकेल्या बाईला.
दूरदूरच्या नगरांमधे
पुस्तके वाचताहेत विद्वानांना
मोटारबाईक्स चालवताहेत आवारा लोकांना
सिनेमे बघताहेत प्रेक्षकांना
दुकाने खरीदताएत ग्राहकांना
पियानो वाजवताएत वादकांना
चित्रे काढत आहेत कलाकारांना
बिकिनीज घालताएत टंच पोरींना
आगी भडकवताएत घातपाती लोकांना
पर्वत चढताएत साहसवीरांना
प्रणय करतो आहे युगुलांना
बेटे शोधताहेत दर्यावर्दींना
मृतात्मे श्रद्धांजली वाहताएत शोककर्त्यांना.
... जेव्हा नारळीच्या बागांतून पळणार्या
एका गच्च भरलेल्या आगगाडीत
एक वेडी कविता लिहीते आहे मला.
प्रतिक्रिया
16 Sep 2008 - 4:18 am | धनंजय
कविता आणि भाषांतर फार आवडले.
पण इंग्रजीतले अर्धे श्लेष तुम्हाला सोडून द्यावे लागलेत. पैकी एक अर्थ निवडून त्याचे भाषांतर करावे लागले तुम्हाला. (स्मोकिंग चे अर्थ "सिगारेट पीणे"/"धुरी देणे" दोन्ही आहेत, वगैरे, वगैरे - इंग्रजीत एक विचित्र अर्थ आणि एक सरळ अर्थ दोन्ही ध्वनित होतात...)
शब्दखेळ करणार्या कवितांचे भाषांतर करणे म्हणजे छळवादी आनंद असतो. मॅसोकिझमचा सेफ-सेक्स प्रकार आहे हा. :-)
16 Sep 2008 - 5:28 pm | आजानुकर्ण
कविता आणि भाषांतर फार आवडले.
आपला,
(नावडता) आजानुकर्ण
16 Sep 2008 - 9:40 pm | सर्किट (not verified)
शब्दखेळ करणार्या कवितांचे भाषांतर करणे म्हणजे छळवादी आनंद असतो.
अगदी अचूक बोललात. भाषांतर आणि कविता दोन्ही मस्तच.
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
16 Sep 2008 - 7:44 am | सहज
मुसु कविता व भाषांतर दोन्ही आवडले.
धनंजय यांनी देखील अश्या हटके कविता रुपांतरीत कराव्यात.
16 Sep 2008 - 10:56 am | ऋषिकेश
असेच म्हणतो
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
16 Sep 2008 - 4:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कविता व भाषांतर दोन्ही आवडले.
धनंजय यांनी देखील अश्या हटके कविता रुपांतरीत कराव्यात.
16 Sep 2008 - 10:56 am | मेघना भुस्कुटे
फार फार आवडले.
16 Sep 2008 - 11:39 am | नंदन
कविता आहे, आवडली. ओळख करून दिल्याबद्दल अनेक आभार.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
16 Sep 2008 - 1:05 pm | मनिष
मूळ कविता आणि अनुवाद दोन्ही आवडले!
16 Sep 2008 - 2:09 pm | भडकमकर मास्तर
फार छान...
मजा आली...
धनंजयांचे शब्दखेळ करणार्या कवितांचे भाषांतर करणे म्हणजे छळवादी आनंद असतो. हे वाक्यही मस्त
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
16 Sep 2008 - 4:58 pm | अनिल हटेला
सहीच !!!!!!!!!!!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
16 Sep 2008 - 4:59 pm | विसोबा खेचर
क्षमस्व, परंतु कविता फारशी समजली नाही!
"शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा
रानफुले लेवून सजल्या या हिरव्या वाटा
या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे,
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे.."
(असल्या साध्या सोप्या परंतु सुंदर कविता आवडणारा!) तात्या.
17 Sep 2008 - 12:32 am | भडकमकर मास्तर
वाटा व्हाव्या ऐशा लाटा
माझे मीपण यात्रा आहे
गीत तुझे गे इतुके अनवट
सूरच मजला लावत आहे...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
17 Sep 2008 - 12:48 am | विसोबा खेचर
प्रयत्न ठीक...
आपला,
('श्रावणात घननिळा बरसला' सारख्या साध्या सोप्या आणि मुख्य म्हणजे सरळ कविता आवडणारा!) तात्या.
17 Sep 2008 - 1:07 am | धनंजय
"श्रावणात घननिळा बरसला" ही दोन अर्थ असलेली, क्लिष्ट शब्द असलेली ("घननिळा" हा प्राचीन संस्कृत-मराठी शब्द साध्या मराठी बोलण्यात कधी वापरला आहे?) गूढ ओळ "सरळ"चे उदाहरण म्हणून मिसळ-कवींची जळवायला दिली आहे का, तात्या? म्हणजे "आम्हाला कठिण कविता आवडतात, साध्या-सोप्या-सरळ वाटतात, तुमच्या मात्र नाही आवडत" असे काही म्हणायचे आहे का?
बाळ : आई, बघ आकाशात किती घन आलेत.
आई : बाळा, श्रावणात घन येणारच.
बाळ : किती निळे (!!!) आहेत ना घन!
आई : चल लवकर आत ये! ते बघ बरसले घन!
ही सरळ-सोपी मराठी कुठल्या गावात बोलतात?
हलकेच घ्या :-)
17 Sep 2008 - 1:10 am | विसोबा खेचर
तुमच्या मात्र नाही आवडत" असे काही म्हणायचे आहे का?
अरे तसं काही मुळीच नाही रे! अरे एकतर मला काव्यातलं फार काही कळत नाही, तरीही हौशीहौशीने प्रतिसाद टाकायची हौस काही जात नाही, तेव्हा माझे प्रतिसाद फारसे मनावर घेऊ नकोस... :)
बरं,
जीवनात ही घडी अशीच राहू दे...
या कवितेबद्दल तुझं काय मत आहे ते साध्यासोप्या(!) शब्दात सांग पाहू! आहे की नाही ही कविता साधीसरळ अन् समजायला सोपी?! :)
डिस्क्लेमर : याचा अर्थ मला ज्या कविता समजत नाहीत किंवा साध्यासोप्या न वाटता भलत्याच बोजड आणि अगम्य वाटतात त्या चांगल्या नसतात असा कुणीही घेऊ नये! :)
असो...
आपला,
(रात्रीच्या वेळी स्वयंपाकघरात उंदीर जशी भांड्यांची खुडबूड करतात तशीच काहीशी काव्यांच्या प्रांतात खुडबुड करणारा!) तात्या.
:)
16 Sep 2008 - 5:27 pm | अजिंक्य
आत्तापर्यंत माझा असा समज होता की, अनुवादित गाणी, कविता यांत 'ती' मजा येत नाही.
पण या लेखनाने माझा समज खोटा ठरवला.
हा मी पाहिलेल्या (म्हणजे वाचलेल्या!) अनुवादांपैकी मला आवडलेला पहिला अनुवाद.
.. जेव्हा नारळीच्या बागांतून पळणार्या
एका गच्च भरलेल्या आगगाडीत
एक वेडी कविता लिहीते आहे मला.
हे झकास!
-अजिंक्य
www.ajinkyagole1986.blogspot.com.
16 Sep 2008 - 7:13 pm | मानस
अजिंक्य यांच्याशी सहमत. मलाही अनुवाद फारसे आवडत नाहीत पण ही कविता नक्कीच अपवाद आहे.
सुंदर अनुवाद ............... अजुन काही वेगळ्या व आवडलेल्या कवितांचे अनुवाद येऊ देत.
16 Sep 2008 - 11:29 pm | चतुरंग
एकदम वेगळाच आणि टवटवीत विचार!
मूळ कविता आणि भाषांतर आवडले! :)
चतुरंग
16 Sep 2008 - 11:41 pm | चकली
भाषांतर आणि कविता आवडले!
चकली
http://chakali.blogspot.com
16 Sep 2008 - 11:44 pm | स्वाती दिनेश
मूळ कविता आणि अनुवाद दोन्ही आवडले,धनंजयने म्हटल्याप्रमाणे अनुवादताना एखादा अर्थ सोडून द्यावा लागलेला दिसतो पण तरीही अनुवाद सुंदर जमला आहे,
स्वाती