डिसक्लेमर : मानसिक वय १८ आणि वरील करितांच, सत्यकथेवर आधारित.
Every boy tends to become a man , few would be heros & at least one would be superhero - श्रावण मोडक
*************************************************************************
समोरच्या दरवाज्याच्या उघड्या फ्रेम मधुन एक-एक करून मुली येत होत्या, सभ्य भाषेत एस्कॉर्ट, असभ्य भाषेत वेश्या, वेश्याच त्या ! मसाज पार्लची मसुर असली म्हणुन काय झाले !! कोणी स्कर्ट घालुन तर कोणी कमालीचा ओपन-नेक टी-शर्ट घालुन आप-आपल्या फिगरचे प्रदर्शन करत होत्या. मधुनच एक सावळी त्याला 'हाय' करून गेली. " गिर्हाईक नसेल भेटले चार पाच दिवस " तो स्वत: शीच म्हणाला. त्याला हे नवीन नव्हत, दर पगाराला एक अशी त्याने स्वतः च्या 'देहभाना' ची सोय लावली होती. ईंजिनियरिंग, आणि आय टी स्ट्रगल ला कंटाळुन डोक्यावरच्या केसांनी तुरळक का असेना पोबारा केला होता. देखणे दिसायच्या वयात रंग गोरा असुनही चेहरा थोराड दिसत होता. पण त्या मागे कंटाळा, त्रास वा शरम नव्हती. आपण जे करतो ते मनासाठी नव्हे तर शरीरा साठी यावर त्याचा ठाम विश्वास होता.
वडिल वारले, आईने कष्टाने ईंजिनियरिंग करून दिली. नंतरचे दिवस आयटी मध्ये स्थिरावण्यास गेले, मध्यंतरात आईचा ही दम्याने मृत्यु झाला. नैराश्य आणि विचार यात वेळ वाया गेला, लग्नाच्या वयातल वय दारू ढोसण्यात चालले होते, म्हणुन किमान शरीरसुखाचा आधार म्हणुन दर महिन्यातुन एकदा तरी तो आलटुन पालटुन मसाज पार्लर्स च्या पायर्या चढत असे.
हा ही दिवस तसाच, दुपारचे साधारण चार वाजले असावे, पेपर ला अॅड बघुन त्याने फोन वर पत्ता घेतला, बँगलोर मध्ये एखाद्या अनोळखी ठिकाणी फ्लॅट असणार हे त्याने केव्हाच ताडले होते .त्या पत्यापर्यंत पोचण्याआधी त्याने चांगली दोन तास बार मध्ये बियर ढोसली होती. पत्यावर पोचला ! एजंट एक-एक करून पोरी दाखवित होता आणी रेट ही सांगत होता. मध्येच त्याच्या लक्षात काहीतरी आले....ती..ती... पिवळसर सलवार कमीज मध्ये ...ती ....ती ईथे कशी काय ?????....
*****************************************************************************
कॉलेज मध्ये तसा तो अबोल होता. स्वभावच अबोला, घरात बोलायला कोणी नाही. अभ्यास एके अभ्यास आणि अभ्यास दुणे अभ्यास , हेच काय ते लाईफ....ती मात्र बोलट होती, ग्रुपमधला चिवचिवाट, मुळातच रसहीन असलेल्या ईंजिनियरिंग अभ्यासु वर्षात तोच एक त्याच्या आवडीचा विषय होता, आवडीचे रूपांतर कधी एकतर्फी प्रेमात झाले त्याचे त्यालाच कळले नाही. तिच्या मात्र ते ध्यानी मनी ही नव्हते. जस्स जस्स त्याच आकर्षण वाढत गेलं तस्स तस्स तिच्याविषयी कॉलेजात अफवा वाढत गेल्या, तिच बाहेर कोणाशी तरी सूत जमलेले आहे. खुप मोठे प्रस्थ आहे, कार घेवुन येतो, फाईव्ह स्टार ला घेवुन जातो, तिला महागडे गिफ्टस आणुन देतो..ई.ई...
एक दिवस मग त्याने स्वतःच पाहिले, कॉलेजच्या गेटवर सकाळी साधारण १० वाजता तिला कार मध्ये शिरताना ! कारकडे पाहुन ती खुप महागडी असावी असे स्पष्ट दिसत होते, ड्रायव्हिंग सीटवर बसलेला मुलगा हॅन्डसम तर होताच शिवाय गळ्यात, हातात सोने असल्याने श्रीमंती ही झळकत होती.ती खुष होवुन कारमध्ये शिरली. त्या दिवसापासुन त्याने तिचा नाद सोडला, पण आठवण मात्र तशीच राहिली. आयुष्यात आलेल्या पहिल्या आणि शेवटच्या प्रेमभावनेवर तो थांबला. अभ्यासाशी नाते जोडले आणि करियरचा पाया भक्कम होत गेला.
शेवटच्या वर्षात ती गायब झाली, थोडीत घाबरत च त्याने चौकशी केली तेव्हा समजले की तीने पळुन जावुन लग्न केले आहे.गोष्ट ईतक्यावरच थांबली. विषय संपला होता पण ......
*****************************************************************************
" वो पिले ड्रेस वाली "
" वो मोहिनी ! , उसका एक घंटे का **** पडेगा "
त्याने पैसै एजंटच्या काढुन हातात ठेवले. रूम मध्ये गेला. रूममधील दोनच मिनीटे तिच्याशिवाय त्याला खायला उठली. ती आली , चेहर्यावर गिर्हाईक भेटल्याचा भाव !!
" तु नीलम आहेस ना ? "
तिने त्याच्या कडे चमकून पाहिले. हळु हळु ओळख पटत गेली. तिच्या डोळ्यांत टचकन पाणी उभे राहिले, पण क्षणभरच...ती त्याच्याकडे त्याच ओलसर डोळ्यांनी निर्धाराने पाहु लागली आणी तिचा एक हात कुर्त्याच्या चेनकडे गेला.......
क्रमश..
प्रतिक्रिया
25 Jun 2013 - 12:54 pm | प्रचेतस
वाश्याचं लेखन म्हणजे जळजळीत वास्तवावरच आधारीत असेल ही अपेक्षा होतीच.
बाकी भाग जरा मोठे टाक रे.
पुभाप्र.
25 Jun 2013 - 1:16 pm | गणपा
वल्लीच्या शब्दा शब्दाशी सहमत.
25 Jun 2013 - 2:59 pm | स्पा
वल्लीशी बाडीस
दमदार सुरुवात झालेली आहे
25 Jun 2013 - 6:38 pm | लॉरी टांगटूंगकर
यैच बोल्तो!
27 Jun 2013 - 3:58 am | इनिगोय
वरील सर्वांशी सहमत!
27 Jun 2013 - 4:34 am | किसन शिंदे
;)
25 Jun 2013 - 1:09 pm | मदनबाण
हम पढिंग...अगला भाग का वाट बघिंग !
(वाचक)
25 Jun 2013 - 1:17 pm | गवि
उत्सुकता वाढली आहे. स्टोरीलाईन इंटरेस्टिंग आहे. पुढील भाग विनाविलंब लिहावेत. पुभाप्र.
25 Jun 2013 - 2:21 pm | स्पंदना
सुहास.....
ही आयडी अजुन आहे? केव्हढा मोठा गॅप तो लिखाणात? असो.
सुरवात झणझणित.
25 Jun 2013 - 2:43 pm | भावना कल्लोळ
पुभाप्र.
25 Jun 2013 - 2:59 pm | तुमचा अभिषेक
मस्तच ..
छोटासाच भाग पण विचारचक्रे सुरू केली आमची..
पण हे जास्त तुकड्यात आले की मजा गेली.. मोठ्या भागात अन लवकर येऊ दे..
25 Jun 2013 - 3:09 pm | अभ्या..
मस्त रे सुहास.
भारी लिहतुयास.
25 Jun 2013 - 3:32 pm | Mrunalini
छान. पुभाप्र.
25 Jun 2013 - 4:26 pm | आदूबाळ
मोट्ठे भाग टाका राव...
25 Jun 2013 - 6:20 pm | सस्नेह
माऊस एकदासुद्धा स्क्रोल करावा लागला नाही !
सुरुवात विंट्रेष्टिंग !
25 Jun 2013 - 7:27 pm | पैसा
वास्तवाचा काही आधार असणारच याची खात्री आहे आणि सत्य हे अनेकदा कल्पनेपेक्षा फारच विचित्र असतं हेही माहिती आहे. पुढचा भाग लवकर येऊ दे!
26 Jun 2013 - 11:11 pm | किसन शिंदे
वाश्या अॅण्ड हिज जळजळीत लिखान ईज बॅक. :)
मेल्या केवढ्या त्या स्टोर्या मला फोनवरून सांगातल्यास, पण त्यातली एकही लिहिली नाहीस...अजुनपर्यंत.
आता पुढचा भाग १० म्हणायच्या आत टाक. :P
26 Jun 2013 - 11:30 pm | घाशीराम कोतवाल १.२
वाश्या अॅण्ड हिज जळजळीत लिखान ईज बॅक.
किसन देवांशी सहमत पण वाश्या हि कथा तरी नक्की पुर्ण कर रे
27 Jun 2013 - 12:29 am | आदूबाळ
पॉट कॉलिंग धी केटल ब्ल्याक??
दहावी क चे पुढचे भाग कुठायेत, देवा?
(ह घ्या!)
27 Jun 2013 - 1:11 am | प्यारे१
वाश्या स्टाईल...
लवकर येऊ देत पुढचे लिखाण!
27 Jun 2013 - 4:32 am | जॅक डनियल्स
बंद दरवाजाच्या मागचे प्रसंग मस्त लिहिले आहे. वास्तवातील सत्य खूप विदारक असते याची जाणीव आपण लोकांना मध्ये मध्ये करून दिली पाहिजे.
येउद्या अजून पूर्ण इस्टोरी...
27 Jun 2013 - 7:43 pm | अग्निकोल्हा
at least one would be superhero.... या वाक्याशी सांगड घालणारि कथा निघाल्यास नक्किच कथेबाबत प्रचंड कुतुहल. अन्यथा वास्तववादाच्या मर्यादा अजुन एकदा अधोरेखित करणारे लेखन. हा भाग फारच लवकर आटोपला.
8 Jul 2013 - 10:10 pm | इन्दुसुता
Every boy tends to become a man , few would be heros & at least one would be superhero - श्रावण मोडक
मोडक आज आपल्यात असते तर त्यांच्याशी या वाक्यासाठी वाद घातला असता.
कथा सत्यकथेवर आधारित आहे म्ह्णून कथेतिल नायक या तिघांपैकी ( man / hero/ superhero ) कोण निघतो या विषयी कुतुहल आहे. पुभाप्र
8 Jul 2013 - 11:22 pm | चिगो
सुरुवात दणक्यात.. आता मासिक हप्त्यांमधे न लिहिता जरा पुढचे भाग लवकर टाक रे बाबा..
9 Jul 2013 - 4:46 pm | जेपी
पुढिल भाग लवकर टाका