सालाबाद प्रमाणे यंदाही आमच्या घरी (बे एरिया, फ्रिमाँट) येथे रविवारी गौरीपूजन व भोजनाचा कार्यक्रम झाला. गौरीचा सगळा स्वयंपाक मी व आमच्या सौं. नी सकाळी ५:०० वाजता ऊठून सोवळ्यात केला होता. मिपातर्फे आमचे जुने मित्र 'एक' सहकुटुंब हजर होते. त्याची काही छायाचित्रे येथे देत आहे. सध्या फक्त गौरींचीच छायाचित्रे देत आहे. जमल्यास दर्शनाला आलेल्या ईतर मित्रांची सुध्दा टाकीन...
गौरी आणि आरास..
आपले मिपाकर 'एक' आपल्या सुपुत्रासह..
- नाटक्या..
प्रतिक्रिया
10 Sep 2008 - 11:50 am | वैशाली हसमनीस
गौरींचे फोटो पाहून मन प्रसन्न झाले.
10 Sep 2008 - 11:55 am | यशोधरा
खूपच सुंदर गौरी आहेत तुमच्या :) बघून मन प्रसन्न झाले अगदी!
10 Sep 2008 - 12:02 pm | ऋचा
खुपच सुंदर!!
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
10 Sep 2008 - 12:04 pm | स्वाती दिनेश
गौरींचे फोटो पाहून तर मन प्रसन्न झालेच , सजावटही सुरेख आहे.
स्वाती
10 Sep 2008 - 1:50 pm | प्रकाश घाटपांडे
गावी माजघरात महालक्ष्मी बसवल्या जाई. महालक्ष्मीच्या पावलांचा रांगोळीचा ठसा घरभर आल्याच्या खुणा मी उमटवीत जात असे. प्रत्येक खोलीत पुढच्या व मागच्या माडीवर, बळदात,पुढच्या व मागच्या अंगणात, ओसरीवर , पडवीत,रामाच्या देवळात , ओट्यावर सर्वत्र. पावलं. "महालक्ष्मीला सोन्याची पावलं " असे पुटपुटत मग आई व इतर पुजेच्या बायका एक सफर करीत.
(नॉस्ट्ल्जीक)
प्रकाश घाटपांडे
10 Sep 2008 - 2:42 pm | धमाल मुलगा
काका,
शेम हियर पन...
मीही ह्याच कामात गुंतलेलो असायचो.
आता मात्र आम्हीच नोकरीच्या निमित्तानं दिड दिवसाचा गणपती झालोय, हे सगळं करायला वेळच नाही मिळत..धावत्पळत घरी जायचं, रात्रभर कसंतरी डोकं टेकवायचं, की सकाळी पळालोच परत नोकरीच्या गावी. :(
10 Sep 2008 - 3:23 pm | शिवा जमदाडे
आमच्या कडे महालक्ष्म्यांच्या येण्याच्या वेळी पळी-ताम्हण घेवून वाजविण्याचे काम होते.... खुप चांगल्या दिवसांचि आठवण करुन दिलीत....
- शिवा जमदाडे
10 Sep 2008 - 4:15 pm | विकास
फोटो मस्तच आले आहेत. भारतात घरी जशा गौरी (खड्यांच्या गौरी व्यतिरीक्त) बसवायचो त्याची आठवण झाली. फक्त आमच्या गौरीचे मुखवटे शाडूच्या मातीचे असायचे आणि त्याला साडी नेसवली जायची. अमेरिकेत खड्याच्याच गौरी बसवतो पण गेल्या-या वर्षी मुली बरोबर क्ले वापरून तीला हवे तशा लहानशा गौरी करून त्याला भारतीय पोषाख चढवला होता. काम तीचे मदत आमची...
घरात बाहेरून गौर आणायची जी पद्धत वर घाटपांड्यांनी सांगितली त्यात "गौर कशाच्या पायाने आली?" - सोन्यारुप्याच्या पायाने, कपड्यालत्त्याच्या, धनधान्याच्या, दुधदुभत्याच्या वगैरे तीला घरभर फिरवत त्या त्या ठिकाणि नेऊन म्हणले जाते.
10 Sep 2008 - 9:36 pm | नाटक्या
आमच्या कडे पण असायचे, पण भारतातून आणताना फुटतील या भितीने पितळी आणलेत. यंदा पुन्हा डिसेंबरात भारतात येणार आहोत तेव्हा शाडूचे मुखवटे, फुलोरा आणि सजावटीचे आणखी सामान आणण्याचा मानस आहे. दरवर्षी देवी समोर जे पैसे जमतात ते आम्ही याच कामासाठी वापरतो. गेल्या वर्षी चांदीचे ताम्हण आणि निरांजन घेतले या वर्षी बघू...
>घरात बाहेरून गौर आणायची जी पद्धत वर घाटपांड्यांनी सांगितली त्यात "गौर कशाच्या पायाने आली?" - सोन्यारुप्याच्या पायाने, कपड्यालत्त्याच्या, धनधान्याच्या, दुधदुभत्याच्या वगैरे तीला घरभर फिरवत त्या त्या ठिकाणि नेऊन म्हणले जाते.
अगदी अशाच पध्दतीने आणल्या गौरी. सौ. ला दरवर्षी हे करताना अगदी गहिवरुन येते. आपल्या कडे गौराई माहेरी येते या नुसत्या कल्पनेनेच तिला अगदी भरून येते. मी तिला नेहमी म्हणत असतो कि आपल्याला दोन मुलगेच आहेत हेच बरे आहे. नाहीतर मुलींच्या लग्नानंतर तू रोजच अशी डोळे टिपत बसली असतीस म्हणून..
सर्वांना प्रतिक्रियांबद्दल मनापासून धन्यवाद. पुढल्यावर्षी साठी सर्वांना आतापासूनच आमंत्रण देवून ठेवतो...नक्की या.
- नाटक्या..
10 Sep 2008 - 8:50 pm | लिखाळ
आमच्याकडे खड्यांच्या गौरी असतात. माझ्याकडे सुद्धा लहान असताना कधीमधी पळी-भांडे वाजवण्याचे काम असे ! आणि आई गौरी आल्या की इथे काय आहे? असे प्रत्येक ठिकाणे विचारी आणि सोबतच्या कुणी उदंड आहे असे म्हणे ते आठवले.
--लिखाळ.
10 Sep 2008 - 6:19 pm | रामदास
काल मलेशीया आज अमेरीका.
देशोदेशीचे गौरी-गणपती दर्शन घरबसल्या.
आपले दोघांच्या चेहेर्यावर गौरींच्या आगमनाचा आनंद दिसतो आहे.
एक+एक पण जाम खुषीत दिसतायंत.
सुंदर फोटो.
http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
10 Sep 2008 - 6:47 pm | अवलिया
खुपच छान
नाना
10 Sep 2008 - 8:14 pm | रेवती
गौरी मस्त आहेत. सजवल्यातही छान. हे सगळं करताना भरपूर वेळ लागतो. आपण ते केलत हे कौतुकास्पद आहे.
मन म्हायेराला गेलं. सगळी तयारी करताना मज्जा यायची. आज्जी असताना त्या ठरलेल्या साड्या गौरींना नेसवल्या जायच्या. नंतर मोठ्या काकूने ठरवले व दर वर्षी दोन नविन साड्या घेतल्या
जायच्या.चौघी जावांना एक वर्षाआड आवडीच्या साड्या मिळायच्या. आता सगळ्यांच्या सूना तसेच करतात.
रेवती
10 Sep 2008 - 8:15 pm | संदीप चित्रे
एकदम प्रसन्न वाटले हे फोटो पाहून.
माझ्या बायकोच्या माहेरी गौरी भोजन म्हणजे एक उत्सवच असतो. तिला हे फोटो पाठवतो आता.
10 Sep 2008 - 10:10 pm | भाग्यश्री
अरेवा... काय प्रसन्न वाटलं.. खूप सुंदर आहेत गौरी आणि सजावट! माझ्या माहेरी महालक्ष्मी नाही बसत, आणि सासरी बसतात.. खूप उत्सुकता होती त्यामुळे कसं असतं सगळं.. पण अमेरीकेमधे असल्याने ते सगळं हुकलं.. आता घरी जाऊन कधी तो सगळा उत्सव याचिदेही-याचिडोळा पाहते असं झालंय! गौरी - गणपती इथे घरी बसतील तेव्हा तर जाम खुष असीन मी! :)
फार मस्त वाटलं फोटोज पाहून!
11 Sep 2008 - 2:08 am | एक
फोटो छानच आलेत..
आणि कार्यक्रमपण झकासच झाला होता.
ज्यु. एक ने चांगली साथ दिली म्हणून आम्ही पण मस्त एंजॉय करू शकलो..
11 Sep 2008 - 8:41 am | शितल
वा सुंदर फोटो :)
गौरीला पाहुन मन प्रसन्न झाले. :)
11 Sep 2008 - 9:12 am | विसोबा खेचर
सुरेख फोटू, सुरेख गौरी!
नाटक्या, जियो....!
तात्या.
11 Sep 2008 - 9:14 am | गणा मास्तर
भारी वाटल बघुन, वाटतच नाहे तुम्ही अमेरीकेत रहाता म्हणुन
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
11 Sep 2008 - 9:21 am | चतुरंग
तुम्ही उभयतांनी सर्व स्वयंपाक सोवळ्यात केलात ह्यात तुमची श्रद्धा दिसते!
गौरींची आरास, सर्व सजावट, पुढे भरलेले नैवेद्याचे ताट सर्वांचे फोटो मनमुराद आनंद देणारे आहेत.
आमच्या घरी खड्याची गौर बसवायचे. "गौर आली गौर, कशाच्या पावलानी? सोन्या रुप्याच्या पावलानी" हे मला आजही आठवते. सौ. आई बरोबर मी रांगोळीचे ठसे घरभर उठवून त्यावर हळद-कुंकू घालायचा! पुरणाच्या पोळीचा बेत असल्याने सकाळपासून स्वयंपाकघरात घिरट्या चालू असायच्या. त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आणि आमच्या जुन्या वाड्यातून मला फिरवून आणलं त्यांनी!
धन्यवाद!
चतुरंग
11 Sep 2008 - 12:36 pm | विसोबा खेचर
एकरावांचे चिरंजीव गोड आहेत! त्यांना आमचे अनेकोत्तम शुभीशीर्वाद! :)
11 Sep 2008 - 11:22 pm | एक
तुमचे आशिर्वाद नक्की पोचोवतो.
चिरंजीव नुकतेच मोरया करायला आणि पापा घ्यायला शिकले आहेत. तुम्हाला काय हवं? :)
12 Sep 2008 - 7:41 am | विसोबा खेचर
दोन्ही! :)
11 Sep 2008 - 12:53 pm | llपुण्याचे पेशवेll
नाट्यराव झकास आहेत गौरी तुमच्या कडच्या. शाडूमातीच्या मुखवटयांचे जमले तर खासच पण नाही जमलं तरी हरकत नाही तुमच्याकडचे पितळी मुखवटे छानच आहेत. मध्यंतरी पेपरात १८३० साली बनवलेल्या गौरीच्या पितळी मुखवट्यांचा फोटो पाहीला पेपरात त्यांचीच एकदम आठवण झाली. तुमच्याकडचे मुखवटे पण छान घासून पूसून चकाकत होते. मस्त वाटले बघून.
अवांतरः तुम्ही यापुढेही अमेरीकेत राहणार असाल तर शाडूमातीच्या मुखवट्यापेक्षा पितळी मुखवटेच जास्त चांगले. टीकण्याच्या दृष्टीनेही ते जास्त चांगले. तुमच्या पुढेही तुमच्या मुलांनी तिकडे गौरी गणपतीची परंपरा जागृत ठेवावी आणि तशीच ती पुढे १००० वर्षे चालू रहावी अशी गौरी-गणपती चरणी प्रार्थेना.
अति अवांतरः आणी तसे झाले व १००० वर्षानंतरचे भारतीय संशोधक संस्कृती अभ्यासासाठी अमेरीकेत पोचले आणि तिथे हा गौरींचा सोहळा पाह्यला मिळाला तर त्यांचा निष्कर्ष काहीसा असाही असू शकतो. 'आपल्यासारख्याच गौरींची परंपरा अमेरिकेतही आहे पण तिथे गौरीचे मुखवटे पितळी असतात. याचा अर्थ असा की आर्य अमेरिकेतून भारतात आले आणि त्यानी त्यांची गौरींची परंपरा भारतीयांवर लादली. पण बहुजन भारतीयाना पितळी मुखवटे परवडत नसल्याने त्यानी ते शाडूमातीचे बनवले.' त्यामुळं आपल्या असणार्या गोष्टी ज्या आपल्या नाहीत (संशोधकांच्या मते)त्या यादीत आता गौरींची भर पडली आहे.
(अति ह.घ्या.)
पुण्याचे पेशवे
12 Sep 2008 - 2:46 am | नाटक्या
>अवांतरः तुमच्या पुढेही तुमच्या मुलांनी तिकडे गौरी गणपतीची परंपरा जागृत ठेवावी आणि तशीच ती पुढे १००० वर्षे चालू रहावी अशी गौरी-गणपती चरणी प्रार्थेना.
आमचाही तोच प्रयत्न आहे. मुलाला गणपती आणि हनूमान आवडतो (हनूमान सिनेमा बघुन असेल कदाचित). अजुन तरी लहान असल्याने सांगता येणे अवघड आहे, बघूया काय करतो ते.
11 Sep 2008 - 1:56 pm | मनस्वी
नाटक्या
छान आहेत गौरी. आरास पण मस्त केलीये!
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
11 Sep 2008 - 3:42 pm | वल्लरी
सुंदर फोटो,खुपच छान वाट्ले गौरी बघुन
वा...वा...
.....पुढल्यावर्षी साठी सर्वांना आतापासूनच आमंत्रण देवून ठेवतो...नक्की या....
नक्कि येणार
11 Sep 2008 - 9:28 pm | नाटक्या
सर्वांना प्रतिक्रियांबद्दल मनापासून धन्यवाद. लवकरच आणखी फोटो टाकीन...
- नाटक्या
12 Sep 2008 - 7:13 am | मदनबाण
व्वा !! फोटो पाहुन फार आनंद झाला.
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
12 Sep 2008 - 7:51 am | एकलव्य
धन्यवाद सौ व श्री नाटक्या.