सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात २--पुढे

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
2 Apr 2013 - 8:41 pm

त्या स्त्रीला ३/४ (तीन चतुर्थांश) योनी नव्हतीच. त्यामुळे त्यांचे वैवाहिक आयुष्य कसे चालू होते हे त्या स्त्रीला विचारले तर ती म्हणाली व्यवस्थित चालू आहे. त्या नवर्याला सम्भोगाबद्दल अज्ञान असावे किंवा ती स्त्री खोटे बोलत होती.
त्या स्त्री कडून हे तत्वज्ञान ऐकून घेतले माझा रिपोर्ट लिहिला आणी तिच्या हातात ठेवला. दार उघडले तर तिचा नवरा बाहेर उभा होता आणि त्याने लगेच विचारले कि साहेब मुल होईल ना? त्या गरीब माणसाकडे पाहून मला कसेसेच झाले. त्याची दुहेरी फसवणूक झाली होती आणि त्यातून त्याला तुला मुल होणे फार कठीण आहे हे सांगण्याचा मला तेंव्हा तरी धीर झाला नाही. मी केवळ त्याला रिपोर्ट लिहिला आहे तुमच्या स्त्रीरोग तज्ञांना दाखवा एवढेच बोलून दुसर्या रुग्णास आत घेतले.
तिसरी गोष्ट २०१२ डिसेंबर ची आहे.
एक सासू आपल्या सुनेला( वय २१ वर्षे ) ३ महिन्यापूर्वी लग्न झाले आणि तिची पाळी आली नाही म्हणून माझ्या दवाखान्यात (मुलुंड ला) घेऊन आली होती.तिच्या मुत्र तपासणीमध्ये गर्भारपण नाही असे आले होते म्हणून ते तपासण्यासाठी ती आली होती. सुनेची सोनोग्राफी केली तर असे लक्षात आले कि तिच्या बीजांड कोशात (ovary) मध्ये स्त्री बीज निर्मिती थांबली होती. याचा अर्थ तिला मुदतपूर्व रजोनिवृत्ती(premature menopause) झाली होती.मी तिला विचारले पाळी केंव्हा पासून आलेली नाही. तर ती म्हणाली कि लग्न झाले आणि पाळी बंद झाली.मी तिला म्हटले कि पण तसे वाटत नाही कि तुमची पाळी ३ महिन्यांपासून बंद झाली आहे.
त्यावर ती म्हणाली कि माझी पाळी १ वर्षापूर्वी बंद झाली मी कल्याण ला एका स्त्रीरोग तज्ञाकडे गेले होते त्यांनी माझी रक्त तपासणी केली. ते रिपोर्ट पहिले तर तिला मुदतपूर्व रजोनिवृत्ती(premature menopause) झाल्याचे दिसत होते. त्यानंतर त्यांनी त्यास्त्री रोग तज्ञांकडून पाळी येण्यासाठी औषधे घेणे सुरु केले आणि पाळी येत होती तेवढ्या सहा महिन्यात लग्न उरकून घेतले. लग्न झाल्यावर सासू कडे गोळ्या घेण्याची चोरी असल्याने तिची पाळी आता बंद झाली होती.
तिची मुदतपूर्व रजोनिवृत्ती(premature menopause) झाली होती हा दुर्दैवाचा भाग होता पण ते लपवून त्यांनी लग्न उरकून घेतले होते. तिची तपासणी संपल्यावर मी बाहेर आलो तेंव्हा सासुबाई नी विचारले कि निदान काय आहे. मी फक्त एवढेच बोललो कि ती गरोदर नाही.पुढे ती तिचा नवरा आणि सासू काय करणार या प्रश्नाला मी बगल दिली.
सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात.
हे वचन म्हणून त्रिकालाबाधित सत्य आहे असे वाटते

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

2 Apr 2013 - 9:24 pm | श्रावण मोडक

तर्क आणि विवेक यात अंतर असतेच. आणि विवेक बहुदा तर्कापेक्षा कठीण असावा. :-)

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Apr 2013 - 9:28 pm | बिपिन कार्यकर्ते

हुशार आहात! आता शहाणे व्हा आणि तुमचे हे असले प्रतिसाद बंद करा पाहू! ;)

श्रावण मोडक's picture

2 Apr 2013 - 9:30 pm | श्रावण मोडक

हाहाहा... असू द्या हो, लोक इतकं म्हणताहेत लिहा, तर लिहावं बापडं थोडं. ;-)

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Apr 2013 - 9:29 pm | बिपिन कार्यकर्ते

डॉक्टर, तुमचे सगळे लेख आवर्जून वाचतो. मागच्या धाग्यात गणपाने म्हणलं आहे तसंच म्हणतो... प्रत्येक वेळेस प्रतिसाद देता येतोच असं नाही.! :)

पिवळा डांबिस's picture

2 Apr 2013 - 10:48 pm | पिवळा डांबिस

तुमचे लेख नक्कीच वाचनीय असतात. कधी त्यातला आशय पटतो तर कधी पटत नाही, तर कधी प्रतिसाद देण्याइतपत माहिती नसल्याने प्रतिसाद दिला जात नाही. आता या वरच्याच लिखाणाला काय प्रतिसाद द्यायचा ते समजत नाहिये (आणि मोडकांसारखे तर्क/विवेक वगैरे हाय-फंडा प्रतिसाद आम्हाला डांबिसाला कुठले सुचायला? श्रामो, ह. घ्या!!) :)
पण तुमचं लिखाण आवडतं!! तुमच्या अनुभवविश्वाशी ओळख करून घ्यायला आवडतं!!

श्रावण मोडक's picture

2 Apr 2013 - 11:01 pm | श्रावण मोडक

हलके घेतले आहे. रादर, तुमचा प्रतिसाद नसल्याने मी काही लिहित नाही, असं आधी ठरवलं होतं. अगदीच राहवेना म्हणून लिहिलं हो.
ते तर्क-विवेक वगैरे तुमच्या-आमच्यासाठी थोडंच आहे. ;-)

पैसा's picture

2 Apr 2013 - 11:46 pm | पैसा

पहिल्या केससारखी केस माहित आहे. पण त्यअा बाईला ब्यांकेत कायम नोकरी होती आणि नवर्याला नीट माहिती होती. त्यानी लगेच एक मुलगी दत्तक घेतली. गेली १५ वर्षे त्यांचा संसार सुरू आहे.

दुसरी केस आहे त्यावद्दल कालच पेपरला वाचले होते. बंगलोरला अशा खूप केसेस सापडत आहेत अन डोक्टर्स रिसर्च करत आहेत. बदलत्या लाईफ स्टाईलमुळे रजोनिवृत्तीचे सरासरी वय ३५ इतके खाली आले आहे.

प्रभाकर पेठकर's picture

3 Apr 2013 - 2:30 am | प्रभाकर पेठकर

अशा समस्या ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात येतात त्यांचे भावविश्व पार ढवळून जात असणार. अशा पतीपत्नीला भावनिक समतोल राखण्यासाठी भयंकर कसरत करावी लागत असणार. इतरांपेक्षा अत्यंत वेगळ्या वाटेवरून वाटचाल करताना एखादे बाळ दत्तक घेऊन त्यातच आपला जीव रमविणे हेच योग्य वाटते.

रेवती's picture

3 Apr 2013 - 5:22 am | रेवती

हम्म...

ऋषिकेश's picture

3 Apr 2013 - 10:01 am | ऋषिकेश

रोचक अनुभव!
पेशंट शुद्धीत असताना नातेवाईकांना सत्य सांगण्याची जबाबदारी डॉक्टरची नाहिच. (मात्र सत्य रुग्णाला सांगितलंच पाहिजे.) त्यामुळे तुम्ही इतरांना पेशंटची खाजगी माहिती दिली नाहित हे योग्यच वाटते.

असे निर्णय अनेकदा घ्यावे लागत असल्याने तुमच्या सदसदविवेकाची कसोटी लागत असणार या पकाकाकाच्यां मताशी सहमती आहेच!

डॉक्टर, तुम्हाला आलेले अनुभव वाचण्यासारखे असतात. संवेदनशील प्रसंग हाताळण्याचे तुमचे कसब वाखाणण्याजोगे आहे.

अनन्न्या's picture

3 Apr 2013 - 6:57 pm | अनन्न्या

वाचतेय.

मन१'s picture

8 Apr 2013 - 12:36 pm | मन१

परिस्थिती विचित्र दिसते/.