कधीही न भेटणार्या, पण जिवलग मित्रांची ही स्टोरी. न भेटता (किंवा भेटण्याची शक्यता नसताना) ते जिवलग कसे झाले? ...असले प्रश्न विचारायचे नाही. तो भेटणारच नाही म्हटल्यावर ‘मी येड्यासारखा चालतोय कशाला’? नाही, नाही ते पण विचारायच नाही.... फक्त वाचायच.
_________________________________
मुक्कामाचं ठिकाण ठाऊक नाही पण चालयच,... वेड्यासारखं चालायच.
आजूबाजूच्या गर्दीला जुमानतय कोण?
उन्हातान्हातून वणवण त्यात सावली कुठली बोंबलायला ?
आपलीच पावलं म्हटल्यावर झक मारत चालणारच आणि पावलं चालतायत म्हटल्यावर रस्ता न सरून सांगतोय कुणाला?
अरे एक सांगायच राहिलं, वाळवंटातनं चालायच....फार मजा येते.
अचानक वाळूत अक्षरं उमटलेली दिसतात. कोण लिहून गेला कसं कळणार?
चालायची ताकद संपली पण बघायची आहे ना? (बघा!) ...पण दिसलं काहीच नाही.
तरी कुणीतरी आहे असं भासलं...(मला भास होतायत वगैरे निष्कर्ष काढू नका वाळूवरची अक्षर दिसली म्हटलयना?)
चला आता वाळूवरच्या अक्षरांशी खेळू . डोळ्यांची वाट लागली तरी हरकत नाही... ‘आत’ शांत वाटायला हवं.
त्या लिहित्या हाताला उत्तर देतो. ‘कसं देणार’ काय विचारताय? मगाशी सांगीतलं ना ‘कुणी रेखाटलीयेत माहिती नाही’ तरी आपल्याकडे आयडीया आहे ना!.... त्याच वाळूत अक्षरं लिहून उत्तरं द्यायची!
आह..! झाला संवाद चालू! (स्वत:चा स्वत:शी का होईना)...‘काही तरी चालू झालं’ हे महत्त्वाच.
सुरुवातीला वेड्यासारखा वाटणारा हा अनोखा संवाद हळूहळू.. पावलागणिक वाढत गेला (तुम्हाला काय वाटलं थांबलो? छे, .....चालता चालता लिहीतोय ).
अक्षरं उमटत राहिली. कधी वरून खाली कधी खालून वर. (मायला वाचणारेय कोण? मीच ना?) मग कशी लिहीली काय विचारताय?
तू. मी. मी. तू. ..... मी काय वाळूतली हुतूतू खेळत नाय, नीट वाचा... तू. मी. मी. तू. ..आय एम रायटींग संवाद फ्रॉम बोथ साइडस. आता पुन्हा ‘कश्याला लिहीतोय’ विचारू नका... न भेटणार्या `जिवलग मित्रांची' स्टोरी आहे ही (एकदा सांगीतलय ना)
आता वाळूतली अक्षरं डोक्यात गेली. सगळीकडे अक्षरं... पानापानांवर, फुलाफुलावर. कधी वार्याच्या झुळकीवरदेखील. कधी तर थेट मोठ्यांदा वाचायलाच लागलो.
अक्षरांच्या सोबतीनं आता जगणं आलं. इतकं इतकं बोलतोय तुझ्याशी. तुझ्याच शब्दात सांगायचं तर स्वतःशी बोलावं इतकं. (पब्लिक माझ्याकडे विचित्र नजरेनं बघतय,... बघू दे)
येड्यावाणी उर्दू-मराठीची भेसळ चाललीये पण अजूनही अक्षरंच. लिहिणारा हात नाही. त्या अक्षरांना तुझा चेहरा नाही.. कधी येशील समोर? या प्रश्नाला उत्तरही अक्षरीच. समोर येऊन नाही.... (अजून सॅंडवरच चाललय सगळं, आलं ना लक्षात?)
माझ्याकडे तुझा फोन नाही, पत्ता नाही, इ-मेल नाही, फेसबुक कश्याला म्हणतात मला माहिती नाही. अगम्य अश्या `संपर्कमाध्यमांतून आपण एकमेकांचे मित्र आहोत. पण आपण एकमेकांना कॉंटॅक्ट करायचा नाही. आपण फक्त बोलायच. वन वे...वाळूत अक्षरं लिहून.
काही क्षणांत.. किंवा कुठेसं म्हटलंय तसं दोन क्षणांच्या गॅपमधे का होईना पण तुझ्याशी जोडलं राहण्याचं अक्षराशिवाय साधन नाही, हे जाणून फार येड्यासारखं होतं. (तरी मी लिहीणार!)
नुसतेच शब्द, त्यांचे कधी तू, कधी मी, आणि कधी आपण मिळून लावलेले अर्थ. कळतयं ना तुला? मीच लावतोय अर्थ पण तुला मधे ओढतोय.... (नायतर पब्लिक ट्यांपोत बसवेल)
आनंद देणार्या इतर कोणत्याच गोष्टी तुझ्यासोबत करता येत नाहीत. (....ते केलं तर पारच कामातून गेला म्हणतील सगळे)
स्वतःला दिवसातून केव्हाही आरशात बघतो तेंव्हा तूच दिसायला लागलायस..नाही नाही... असाही दिवस येईल कधी तरी . ( अजून तरी आरश्यात बघीतल्यावर मीच दिसतोय)
तुझंमाझं नातं ते काय मग? निव्वळ शब्द?... नाही नाही... निदान तू तरी असं म्हणू नकोस.
‘आरशाच्या पलिकडे’ बघतो कसलाच शोध लागत नाही. मग तुला बघण्याचा हा विलक्षण सोस तरी का लावून घ्यायचा जिवाला? तू दिसलास कदाचित, तर काय होईल त्याने? स्वप्नपूर्ती? अपेक्षाभंग?.... छे, छे, तू दिसावास अशी अपेक्षा तरी कशाला? (वाळूतली हुतूतू काय कमी मजा आणतेय?) याच विचारात मग्न असताना कुणीतरी एफेम लावला.....
मेरे फोटोको, मेरे फोटोको सीनेसे यार,
चिपकाले सैंय्या फेविकॉल से!
....अचानक उत्तर मिळूनही गेलं. . तू आहेस अशी पाटीच गळ्यात अडकवून घेतली!
आता एकदम झ्याक झालं.. एकरूप असणे, समरस होणे अनुभवतोच आहे प्रत्येक क्षणी. हे ‘नसलेल्याच असलेल्याशी नातं’.... अशी फेविकॉल सोबत मिळणे हे माझं परमभाग्यच!
तेव्हा तुझंमाझं नातं. निरंतर टिकणारं.... फेविकॉल कशाला हवा? कल्पनेची पकड काही कमी नाही.
निरक्षर म्हणजे अक्षर ओळख नसलेला असा नाही. त्याला लिहीता वाचता येतं, पण अर्थ समजत नाही. आता आपलं नातं निव्वळ शब्दात बांधलेलं नव्हे, तर कधी न मिटणारं.... फेविकॉलपेक्षा मजबूत....निरक्षर भ्रमाच्या लेपाचं.
आता तू असलास काय आणि नसलास काय, दिसलास काय आणि नाही काय, काही फरक पडत नाही... माझ्या बाजूनं नातं पक्कं आहे! त्याला स्थळाकाळाचं बंधन नाही....कल्पना हेच त्याचं लिमिट आणि तीच त्याची पॉवर.
प्रतिक्रिया
20 Jan 2013 - 12:34 pm | धन्या
देव आहे आणि देव नाही याबाबत टोकाची मते असणार्या दोन्ही गटांना भानावर आणणारा प्रतिसाद.
बहोत खुब !!!
18 Jan 2013 - 11:04 pm | भीमाईचा पिपळ्या.
धन्याचे सर्व प्रतिसाद पटले.
संक्षीप्त "काय राव तुम्ही, मरुन रोबच्या धाग्यावर भरपूर कमावले"
पण --------------------------
=))
19 Jan 2013 - 12:13 am | धन्या
काय राव तुम्ही, मरुन रोबच्या धाग्यावर भरपूर कमावले
पण त्या देवाच्या नादानं, सारं निरक्षर विडंबनात गमावले
धनाजी शिंदे आणि पार्टी
19 Jan 2013 - 10:28 am | संजय क्षीरसागर
तसं वाटतय.
इट इज अ प्लेन ज्योक. देव या काल्पनिक गोष्टीशी (किंवा कधीही न भेटणार्या मित्राशी) संवाद साधत गेलं तर काय घडू शकतं याच ते वर्णन आहे. लोक `तो' भेटावा म्हणून कायकाय करतात; परिक्रमा, तिथयात्रा, नामस्मरणाच्या दीर्घ साधना, लांबच्यालांब क्यूमधे तासंतास उभं राहणं.. आणि प्रत्येक भक्ताला वाटतं `तो' आधार आहे. त्याच आणि माझं नातं अक्षर आहे (तो मला अंतर देणार नाही). वन गेटस इंटू मोर अँड मोर इल्यूजन.
इथे ग्लिफ या एकमेव सदस्यानं लेख पूर्वधारणेशिवाय वाचलाय... अँड दॅटस द पॉइंट.
20 Jan 2013 - 12:24 am | अत्रुप्त आत्मा
@धनाजी शिंदे आणि पार्टी>>> =))
19 Jan 2013 - 12:20 am | भीमाईचा पिपळ्या.
हांग्ग्ग्ग्ग्ग आशि......
व्हौन जाऊद्या घुमशान......
=))
19 Jan 2013 - 11:52 pm | बॅटमॅन
स्वतःचे अस्तित्व कबूल करणे किंवा नाकारता न येणे ही माणसांची किंवा सजीवांची नेसेसरी कंडिशन आहे असे फारतर म्हणता येईल, सफिशियंट आहे हे कशावरून????
20 Jan 2013 - 12:19 am | कवितानागेश
मैं कौन हूं?? ;)
20 Jan 2013 - 9:29 am | पैसा
आमच्या एका आभासी मित्रा(?)च्या म्हणण्याप्रमाणे मी जर मीच असेन तर "तुम्ही कोण?" या प्रश्नाचे खरे उत्तर काय?
इथे प्रश्नचिन्ह टाकण्याचे कारण म्हणजे आता सगळ्याबद्दल(च) शंका यायला लागलीय.
19 Jan 2013 - 11:55 pm | निवांत पोपट
ग्लिफ ह्यांचे प्रतिसाद वाचून लेखातील "कधीही न भेटणार्या, पण जिवलग)?) मित्रांची ही स्टोरी." ह्या लेखामधील पहिल्या व्याक्यातील सार्थता जाणवली ;)
..हम दोनो है अनजान मगर पहचान पुरानी लगती है ..
20 Jan 2013 - 7:42 am | अर्धवटराव
अहंकारिता, स्कोर सेटलींग, चर्चेतुन पळकुटेपणा इत्यादी आरोप सहन करत जनसामान्यांना कल्पनेच्या जंजाळातुन बाहेर काढुन सत्याचा प्रकाश दाखवण्याचे लेखकाचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत.
टोप्या ओफ्फ...
अर्धवटराव
20 Jan 2013 - 9:58 am | पैसा
+१ सहमत!
20 Jan 2013 - 9:46 am | शिल्पा ब
देवबिव याबद्दल लिहिणारं दुसरं कुणीतरी आलंय त्यामुळे तुमची तडतड चाललीये का? तुम्ही तर लेख अन प्रतिक्रिया दोन्हीतुन डोस देतच असता त्यामुळे काळजी ती कशाला ! एक आपुलकीचं सांगणं इतकंच.
20 Jan 2013 - 1:06 pm | रणजित चितळे
आत्ता सावरकर असते तर त्यांनी कोणता प्रतिसाद दिला असता ह्याचा विचार करत आहे. छान लिहिला आहे. मला दोन्ही लेख आवडले. लेख वाचताना, वाचणा-याच्या त्यावेळच्या मनस्थितीवर बरेच अवलंबून असते.
लेख नेहमी प्रमाणेच सुरेख
20 Jan 2013 - 1:56 pm | संजय क्षीरसागर
प्रथम ग्लिफनं पूर्वधारणेशिवाय लेख वाचलाय त्यामुळे हे मूलभूत प्रश्न निर्माण झालेत हे कबूल करतो.
दुसरी गोष्ट, अहंकार वगैरे गोष्टी सोडून चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे. लेखनात `मी' हा शब्द येणार आणि `माझे विचार' येणार. कुणी प्रतिवाद करू शकलात तर त्याचं म्हणणं योग्य होईल आणि नाही करू शकला तर हे विचार उपयोगी होतील. त्यात मी माझं खरं करतो किंवा स्वतःला कोण समजतो हा अक्षेप गैर आहे.
नाऊ कमींग टू द फंडामेंटल्स:
आपल्या प्रत्येकाला जो `मी' वाटतो तो एक आहे.
खरं तर `मी' असा कुणी नाही.
`आहे' या निर्वैयक्तिक सत्याची ती प्रत्येकाला असलेली व्यक्तिगत जाणिव आहे.
दुसरी गोष्ट, जगताना काही कल्पना ग्राह्य धराव्या लागतात कारण त्यांची प्रॅक्टीकल युटीलिटी आहे.
ग्लिफचा मुद्दा असाय :
संपूर्ण सहमती आहे..... लग्न ही कल्पना आहे पण त्यावर संपूर्ण कुटुंबव्यवस्था उभी आहे!
सो, कल्पना हा मानवी बुद्धीचा निश्चित उपयोगी पैलू आहे.
त्यानं पुढं अत्यंत बेसिक प्रश्न विचारलाय :
बिफोर वी प्रोसीड, प्रत्येक कल्पनेला काही तरी वास्तविकता सपोर्ट करते. उदाहरणार्थ लग्न ही कल्पना आहे पण वधू आणि वर या व्यक्ती अस्तित्वात आहेत त्यामुळे तिला अर्थ आहे.
नाऊ कमिंग टू द एंड :
आपण वास्तविक आहोत आणि ज्या गोष्टीला वास्तविकता आहे त्याची जगण्याच्या सोयीसाठी कल्पना केली तर तिचा उपयोग आहे.
उदाहरणार्थ, एका प्रिंटेड कागदाला पैसा मानणं ही कल्पना असली तरी ती उपयोगी आहे कारण आपण वास्तविक आहोत आणि नोट ही वास्तविक आहे.
देव या कल्पनेला अशी कोणतिही वास्तविकता नाही. ती केवळ भक्ताच्या कल्पनेचा खेळ आहे. त्यामुळे कल्पना हीच देवाची पॉवर आणि त्याची लिमीट आहे.
माझं इतकंच सांगणय की देवाला कोणतिही वास्तविकता नसल्यानं ती कल्पना निरूपयोगी आहे. कारण ती जितकी सघन होत जाते तितकी पुढेपुढे भ्रमाकडे नेते.
फार मोठी रिस्क घेऊन विधान करतो:
देव ही कल्पना मान्य करणं ही भ्रम्राची सुरूवात आहे आणि `देव दिसणं' म्हणजे संपूर्ण भ्रमिष्ट झाल्याच लक्षण आहे. द पर्सन इज टोटली कट ऑफ फ्रॉम रिअॅलिटी. कारण त्याला जे दिसतय ते वास्तविकात नाही.
20 Jan 2013 - 4:51 pm | धन्या
हा केवळ शब्दांचा भुलभुलैया आहे. आणि या शब्दांच्या भुलभुलैयावरच पुढचा तत्वज्ञानाचा डोलारा उभा आहे.
अरे हा जिता जागता उभा देह जो डोळ्यांनी पाहू शकतो, कानांनी ऐकू शकतो, स्पर्शाने अनुभवू शकतो तो भ्रम आहे, शुन्य आहे किंवा मिथ्या आहे असं मानायचं? का तर त्याचा जिवंतपणा आज ना उदया संपणार आहे म्हणून? त्याच्या अस्तित्वाला `आहे' या निर्वैयक्तिक सत्याची ती प्रत्येकाला असलेली व्यक्तिगत जाणिव मानायची?
माणसांचं सोडा, प्राणीसुद्धा आपल्यावर हल्ला होतोय असं ल़क्षात येताच एकतर प्रतिहल्ला करतात किंवा पळून जातात. हा फाईट ऑर फ्लाईट प्रतिसाद कुठेतरी आपल्या अस्तित्वाला धोका आहे या जाणिवेनंच दिला जातो ना? त्या प्राण्याला असलेली आपल्या अस्तित्वाची जाणिव हीसुद्धा त्या प्राण्याला `आहे' या निर्वैयक्तिक सत्याची असलेली व्यक्तिगत जाणिव मानायची का?
बाकी माझे हा कल्पनाशक्तीचा खेळ आहे. त्यामुळे कल्पनाशक्तीबद्दल जे काही लिहिलं आहे त्याच्याशी सहमत.
20 Jan 2013 - 5:24 pm | संजय क्षीरसागर
हा `आहे' (किंवा असि) ही स्थिती आहे. ती निराकार जाणिव आहे .बुद्ध तिला शून्य म्हणतो. ती एक आहे आणि अंतीम आहे. अस्तित्व एक आहे याचा खरा अर्थ त्या स्थितीत सगळं प्रकट होतय आणि विलीन होतय.
आणि अध्यात्माचं अल्टीमेट विधान : आपण (व्यक्ती नसून) ती स्थिती आहोत हे आहे.
आता तुमचे मुद्दे :
नाही, जो जाणतोय तो भ्रम नाही. म्हणून तर अराचा प्रश्न होता :
आणि मी म्हटलय :
पुढे तुम्ही म्हटलय :
येस, प्राण्यात सुद्धा तीच निर्वैयक्तिक जाणिव आहे. इतकच काय पण निर्जीवात देखील ती आहे कारण ती चराचर आणि सर्व अंतर्बाह्य व्यापून आहे. ती स्थलकालरहित आहे आणि अक्षर आहे. पण ती नातं नाही कारण ती एक आहे.
फरक इतकाच आहे की निर्जीवात आणि माणूस सोडता इतर सजीवात, त्या निराकार जाणिवेला जाणण्याची क्षमता नाही.
तुम्ही पुढे म्हटलय :
येस, आणि देव ही माझी कल्पना आहे! तिला वास्तविकता नाही.
20 Jan 2013 - 5:11 pm | अर्धवट
हा दिवस दिसेल असं कधी स्वप्नातदेखील वाटलं नव्हतं.. पण तरीही, मेल्या चांगल्याक चांगला म्हणुक होया..
म्हणून फक्त याच विधानावर चक्क संजयजींशी सहमत..
>>देव ही कल्पना मान्य करणं ही भ्रम्राची सुरूवात आहे आणि `देव दिसणं' म्हणजे संपूर्ण भ्रमिष्ट झाल्याच लक्षण आहे. द पर्सन इज टोटली कट ऑफ फ्रॉम रिअॅलिटी. कारण त्याला जे दिसतय ते वास्तविकात नाही.
20 Jan 2013 - 5:31 pm | संजय क्षीरसागर
तुम्ही देव ही एक कल्पना सोडा. वेळ, पैसा आणि श्रम यांची कमालीची बचत होईल. तुम्ही स्वच्छंद व्हाल. तुमचा सर्व दृष्टीकोन स्वच्छ आणि नितळ होईल.
20 Jan 2013 - 5:41 pm | कवितानागेश
मला उमजलेलं तात्पर्यः "मी" खरा, माझा पैसा खरा, माझी बायको खरी! बाकी सगळा भ्रम.
हे सर्वांना जितके लवकर समजेल, तितका त्यांचाही स्वतःचा पैसा, वेळ (ह्ये काय अस्तं ब्वॉ??), श्रम ( खरे व भासात्मक दोन्ही) हे सगलं काही वाचेल.
जय(?) हिन्द.(?)
जय(?) महाराष्ट्र.(?)
20 Jan 2013 - 5:50 pm | संजय क्षीरसागर
हे सुरूवातीलाच लिहीलय.
20 Jan 2013 - 7:26 pm | लंबूटांग
पण तुमच्या लेखातले तर्क मला नेहमीच बुचकळ्यात टाकतात.
वरील दोन वाक्येच घ्या
आता लग्नाच्या जागी देव टाका, वधू आणि वर ह्या जागी भक्त टाका. मग "देव ही कल्पना आहे पण भक्त अस्तित्वात आहेत त्यामुळे तिला अर्थ आहे." भक्तांना त्या कल्पनेचा उपयोग होत असेल!
तसेच दुसर्या वाक्यात प्रिंटेड कागदाच्या जागी दगडी मूर्ती हा शब्द टाका. पैसा ह्या जागी देव टाका. मग एका दगडी मूर्तीला देव मानणं ही कल्पना असली तरी ती उपयोगी आहे कारण भक्त वास्तविक आहेत आणि दगडी मूर्ती ही वास्तविक आहे.
आता बोला.
एक निरीक्षणः तुम्ही सगळ्या गोष्टी सोप्या करण्याच्या नादात ओढून ताणून काहीही बादरायण संबंध लावता, सरळ साध्या सोप्या असलेल्या गोष्टी अजून क्लिष्ट करता आणि मग आपलेच बरोबर आहे हे दाखवण्याच्या नादात शब्दांचे खेळ करत बसता आणि मग असे काही अतार्किक लिहून मग पुढे स्पष्टीकरण विचारले की ते द्यायचे सोडून परत अजून शब्दांचे खेळ सुरू करता. प्रतिसादातला हा भाग वैयक्तिक वाटत असेल तर संपादकांनी संपूर्ण प्रतिसाद न उडवता हा निरीक्षणाचा भाग संपादित केल्यास आभारी राहीन.
20 Jan 2013 - 8:56 pm | संजय क्षीरसागर
`देवाला रिटायर का करा'? या क्लिंटनच्या पोस्टवर याविषयी सविस्तर चर्चा झालीये ती पहावी.
20 Jan 2013 - 9:38 pm | लंबूटांग
प्रश्न तुमच्या प्रतिसादाला उद्देशून आहे, तुमच्या प्रतिसादातील तर्कशास्त्राला आहे तर मग तिथे जाउन काय हाती लागणार आहे?
मी देवाला रिटायर करा म्हणत नाहीये त्यामुळे तो लेख वाचून काय हाती लागणार आहे हे मला माहित नाही. तुम्ही देव ह्या संकल्पनेबद्दल लिहीले आहे म्हणून मी लग्न आणि पैसा हे देव ह्या शब्दाने replace (मराठी शब्द सुचत नाहीये) केले इतकेच.
तिथेच पाठवायचे होते तर मग ज्या प्रतिसादातून ती वाक्ये उधृत केली आहेत तो प्रतिसाद तरी का दिला आहे? रादर हा लेखच कशाला लिहीला आहे?
20 Jan 2013 - 11:51 pm | संजय क्षीरसागर
त्यावर तिथे चर्चा झाली आहे.
त्याचा थोडक्यात सारांश असा,
देव ही कल्पना आहे हे ज्या व्यक्तीला मान्य आहे तिला त्याचा उपयोग शून्य आहे.
ज्या व्यक्तीला देव ही रिअॅलिटी वाटते तिला त्याचा उपयोग होण्याची शक्यता आहे. पण ती रिअॅलिटी वाटणं हा भ्रम आहे. म्हणून :
देव ही कल्पना मान्य करणं ही भ्रम्राची सुरूवात आहे आणि `देव दिसणं' म्हणजे संपूर्ण भ्रमिष्ट झाल्याच लक्षण आहे. द पर्सन इज टोटली कट ऑफ फ्रॉम रिअॅलिटी. कारण त्याला जे दिसतय ते वास्तविकात नाही.
या व्यतिरिक्त (या लॉजिकवर) आणखी काही हवं असेल तर तिथे वाचणं योग्य होईल. कारण मग तीच चर्चा पुन्हा इथे करण्यात अर्थ नाही.
21 Jan 2013 - 1:31 am | लंबूटांग
खुद्द लेखकानेच लिहीले आहे की
मी तो लेख प्रकाशित झाल्या झाल्या वाचला होता आणि मला तरी असे कुठेही ठामपणे लिहीलेले दिसले नाही की देवाचा उपयोग शून्य आहे.
तुम्हाला वाटत असेल की त्या संकल्पनेचा उपयोग शून्य आहे पण ते तुमचे वैयक्तिक मत झाले. प्रत्येकाचे तसेच मत कसे असेल? त्याच लेखात काहींनी प्लासिबो इफेक्ट बद्दलही लिहीले आहे. देव= प्लासिबो इफेक्ट असा बराचसा सूर दिसला तिथे तुमचे प्रतिसाद वगळता.
तुम्ही तुमचे म्हणणे पटवून देण्यासाठी जी उदाहरणे दिली आहेत त्यातील तार्किक विसंगती मला पटली नाही म्हणून मी फक्त माझा पहिला प्रतिसाद दिला.
मला तुम्ही किंवा इतर कोणी देव मानते की नाही ह्याच्याशी काही देणे घेणे नाही. अतार्किक/ बादरायण संबंध खटकतात इतकेच.
देव दिसणे वगैरे बद्दल मी काहीच बोललो नाही आहे त्यामुळे तो भाग बाजूला राहूदे.
21 Jan 2013 - 12:08 am | अर्धवटराव
परवा गंमतच झालि. एक आयाताकृती चकाकणारं असं काहिसं डबडं होतं. ते म्हणे सेलफोन आहे आणि त्यातुन म्हणे दूरस्थ संवाद साधता येतो. मी लाख प्रयत्ने केले... कानिकपाळी ओरडलो त्या डबड्याच्या... पण एक वाक्य कोणाशी संवाद साधला जाईल तर शपथ. आता सेलफोन नावाचं ते डबडं व्यवस्थीत चार्ज्ड आहे कि नाहि, त्यात जीएसएम स्टॅक इन्स्टॉल्ड आहे कि नाहि, मी नंबर व्यवस्थीत डायल केलाय का... इत्यादी गोष्टी चेक करायच्या होत्या म्हणे... पण मी एक भन्नाट आयडीया शोधुन काढली... तो फोन एक कल्पना आहे, संवाद वगैरे भ्रम आहे, इतर व्यक्ती ज्यांनी फोन ऑपरेट करायचे इन्स्ट्रक्शन्स दिलेत ते सर्व ठार वेडे आहेत, असं सगळं स्वतःला समजावुन सांगितलं... आणि काय आश्चर्य... मी कमालीचा स्वच्छंदी झालो :)
आहे कि नाहि आमचं सत्य एक्क्क्कदम्म्म सोप्पं :)
अर्धवटराव
21 Jan 2013 - 12:12 am | संजय क्षीरसागर
सगळा भ्रम आहे असं मी कुठेही म्हटलेलं नाही.
देव ही कल्पना भ्रामक आहे इतकाच मुद्दा आहे.
21 Jan 2013 - 12:36 am | अर्धवटराव
अच्छा... फोन सत्य आहे, संवाद सत्य आहे, बोलणारा मी सत्य आहे... पण ज्याच्याशी फोनवर बोलणं सुरु आहे तो कल्पना आहे. गुड.
अर्धवटराव
21 Jan 2013 - 12:43 am | संजय क्षीरसागर
येस! तुम्ही देवाशी बोलत असाल तर!
21 Jan 2013 - 12:59 am | अर्धवटराव
म्हणजे संवाद खरा, पण संवादी खोटे... जीभ खरी आणि कान खोटे.
अर्धवटराव
21 Jan 2013 - 1:04 am | धन्या
कशाला राव शब्दांचा कीस पाडताय.
त्यांचं म्हणणं एव्हढंच आहे की "देव आहे" ही एक संकल्पना आहे किंवा हा भ्रम आहे. गेले दोन दिवस जो काही धुरळा उडत आहे तो त्यांनी मांडलेल्या या मतावरुन उडत नसून ते हे मत ज्या पद्धतीने मांडत आहेत त्यावरुन उडत आहे. एक तर तुम्हाला हे खरंच कळलेलं नाही किंवा मग तुम्ही उगाचंच वेड घेऊन पेडगावला जात आहात.
21 Jan 2013 - 8:46 am | अर्धवटराव
>>कशाला राव शब्दांचा कीस पाडताय.
कीस भारी आवडतो आपल्याला :)
>>त्यांचं म्हणणं एव्हढंच आहे की "देव आहे" ही एक संकल्पना आहे किंवा हा भ्रम आहे.
आणि हे म्हणणं निखालस चुक आहे असा आमचा दावा आहे. त्याबद्दल थोडं इथे टंकलय...
http://www.misalpav.com/node/23278
>>जो काही धुरळा उडत आहे तो त्यांनी मांडलेल्या या मतावरुन उडत नसून ते हे मत ज्या पद्धतीने मांडत आहेत त्यावरुन उडत आहे.
-- नाहि. माझा त्या मतावरच आक्षेप आहे. एस्पेशिअली "देव भेटला असा दावा करणारे ठार भ्रमिष्ट आहेत" हा त्यांचा दावा तर फार गंभीर आहे.
अर्धवटराव
21 Jan 2013 - 1:06 am | संजय क्षीरसागर
तुम्ही देवाशी बोलत असाल तर तुम्ही वास्तविक आहात पण देव कल्पना आहे. एका बाजूनं संवाद खरा आहे पण दुसर्या बाजूला कुणीही नाही.
21 Jan 2013 - 8:51 am | अर्धवटराव
एखादी गोष्ट जर "कल्पना आहे" असं गृहीत धरुन चाललं तर त्याबद्दल तसंही काहि बोलता येत माहि. या न्यायाने "तुम्ही वास्तवीक आहात" हिच एक कल्पना आहे. "तुम्ही" म्हटलं कि "आम्ही", "तो", "ति".. हे सर्व वास्तवीक होतात. आणि ते "आहात" च्या चौकटीत बसत नाहि. "आहात" ला कल्पनेशिवाय निर्दीष्ट करताच येत नाहि.
अर्धवटराव
21 Jan 2013 - 12:59 am | धन्या
जाऊदया हो संक्षी. तुमच्याही वरताण लोक आहेत इथे. :D
21 Jan 2013 - 1:09 am | संजय क्षीरसागर
तुम्ही योग्य मुद्दा मांडलाय की :
21 Jan 2013 - 11:46 am | संजय क्षीरसागर
http://www.misalpav.com/node/23278
त्यामुळे तुमचं आणि माझं म्हणणं एकच आहे.
तुम्ही तिथे म्हटलय :
तेच तर सांगायचा प्रयत्न आहे. ती स्थिती आहे, आकार नाही. आणि त्यामुळे म्हटलय :
आपण दोघं एकच गोष्ट सांगतोय. कुणाचाही उपमर्द करण्याचा काहीही हेतू नाही. अर्थ लक्षात घेतलात तर वाद संपला!
22 Jan 2013 - 12:07 am | अर्धवटराव
नरेंद्रने रामकृष्ण परमहंसांना प्रश्न विचारला "तुम्ही देव बघितला आहे का?" ठाकुरजी उत्तरले "हो!. मी तुल जसं आत्ता बघतोय त्यापेक्षाहि कितीतरी अधीक स्पष्ट". ठाकुरजींना नेमकं काय आणि कसं दिसलं आणि ते त्यांनी नरेन्द्रला कसं दाखवलं याचं विश्लेषण म्हणाजे नरेंद्र-ते-स्वामी विवेकानंद हा प्रवास. प्रचलीत वैद्यकशास्त्र आणि मानसशास्त्राचा आवाका, भ्रमाच्या संज्ञा या प्रवासाच्या पहिल्या पायरीअगोदरच संपतात.
विश्वाचे आर्त मनी प्रकट झालेला ज्ञानदेव आत बाहेर सर्वत्र व्यापुन असलेला मुरारी ओळखुन "हरि पाहिला रे" म्हणतो. रात्रंदीवस युद्धाचा प्रसंग जिंकलेला तुकोबा "विठोबासी शरण जावे, निजनिष्ठे नाम घ्यावे" असं नि:संदिग्ध प्रतिपादन करतो. समर्थांना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी राम दिसतो. आपण अनंत आनंदलहरींचा केंद्रबिंदु आहोत असा अनुभव घेतलेले परमहंस योगानंद आपल्या समाधिस्त गुरुंना प्रत्यक्ष भेटतात.
हे जे "हरि पाहिला रे" आहे ते केवळ वैचारीक नाहि, तर फोनची बॅटरी पूर्ण चार्ज करुन, योग्य प्रोटोकॉल स्टॅक वापरुन, करेक्ट नंबर डायल करुन घेतलेला कायीक-मानसीक-बौद्धीक-चैतन्यात्मक असा अनुभव आहे. "देव दिसणारे भ्रमिष्ट" म्हटल्यावर हि सर्व मंडळी सरळ कचराकुंडीत जातात.
तत्व न उलगडता देव दिसणार्यांची देखील कमी नाहि. ही अंधश्रद्धा कपाळमोक्षच करते. पण हा प्रॉब्लेम सार्वत्रीक आहे. तुमचा पैशावरचा लेख बघा. त्याचा (मला कळालेला) मतितार्थ असा कि पैसा हि जगणं सोपं व्हायला म्हणुन केलेली व्यावहारीक सोय आहे. जीवन प्राथमीक आहे. पण याचा अर्थ "पैसा व्हर्च्युअल आहे.. तो कमवण्यात आयुष्य व्यर्थ का घालवावे" असा काढला तर काय कडबोळं होईल आयुष्याचं. संन्यासाचे मॅच्युअर अलिप्त तत्व म ओळखता जीवनाला पाठ दाखवणारे अर्थ काढल्यामुळे भारताचं किती नुकसान झालं हे तर आपण बघतोच आहोत.
भक्तीवरचे तुमचे विचार वाचुन कोणि असे गैरसमज करुन घेऊ नये व मनुष्यजन्माच्या अलौकीक संधीला मुकु नये म्हणुन मी हा सगळा प्रतिसाद प्रपंच केला. उगाच शब्दाला शब्द भिडवुन वाद घालायचा माझा देखील उद्देश नाहि... मग उपमर्द वगैरे फार लांब राहिलं. असो.
अर्धवटराव
22 Jan 2013 - 12:24 am | धन्या
हे जरा समजावून सांगाल का? विशेषतः "प्रचलीत वैद्यकशास्त्र आणि मानसशास्त्राचा आवाका, भ्रमाच्या संज्ञा या प्रवासाच्या पहिल्या पायरीअगोदरच संपतात." म्हणजे नेमकं काय झालं?
22 Jan 2013 - 1:30 am | अर्धवटराव
व्य.नी. करतो.
अर्धवटराव
22 Jan 2013 - 11:59 am | स्पा
मला पण करा
22 Jan 2013 - 12:02 pm | संजय क्षीरसागर
होईल.
तुमचं निरिक्षण योग्य आहे :
तसा झाला नाहीये का? (त्या पोस्टवरचे प्रतिसाद पाहा)
आयला, मग इतके दिवस मी काय सांगतोय? अध्यात्म जीवनविरोधी नाही हेच ना?
आय एम ओपन फॉर डिस्कशन. तुम्ही `देव हा आकार आहे' आणि तो सत्याप्रत नेऊ शकतो हे दाखवू शकलात तर भक्तीमार्गाच्या दृष्टीकोनात अमूलाग्र बदल घडेल. व्यक्तीश: मी तुमचा आभारी होईन. कारण भक्ती ही आकाराची आराधना आहे (निराकाराची नाही).
या साधनाप्रणालीचा तुम्ही अभ्यास केला आहे का? ती साधकाला सत्याप्रत कशी नेते हे विशद करू शकाल का?
नॉट अॅट ऑल! जर सर्वजण एकाच सत्याची अभिव्यक्ती आहेत तर कुणाचा कचरा कसा होईल?
वाद फक्त साधनामार्गाबद्दल आहे.
टू बी वेरी स्पेसिफिक :
तुमचं हे विधान जबरदस्त आहे :
आणि त्यासाठी तुम्ही मन, भ्रम आणि देह यांचा काय अभ्यास केला आहे हे जाणण्याची कमालीची उत्सुकता आहे
22 Jan 2013 - 12:07 pm | बॅटमॅन
ओ मलापण व्यनि करा.
22 Jan 2013 - 12:08 pm | गणामास्तर
मला सुद्धा व्यनि करावा ही विनंती.
22 Jan 2013 - 12:09 pm | स्पा
तेजायला
मी इथेच टाका कि
22 Jan 2013 - 12:10 pm | संजय क्षीरसागर
सर्वांना उपयोगी होईल.
22 Jan 2013 - 12:32 pm | कवितानागेश
होय होय.... इथेच लिहा!
.....
.....
......
स्वगतः च्यायला.... मरतय आता ह्ये! ;)
22 Jan 2013 - 8:33 pm | अर्धवटराव
प्रवचन देण्याचा बिझनेस सुरु करायचा माझा विचार होताच... मिपावर इतक्या लवकर संधी मिळेल असं वाटलं नव्हतं =))
धनाजीरावांना जो व्यनी केला तो खाली डकवत आहे.
=============================================================================
प्रचलीत वैद्यकशास्त्रानुसार जीवन हे एक विशिष्ट प्रकारचं केमीकल कंपाऊण्ड आहे. ते नेमकं काय आहे आणि ते कसं डेव्हलप झालं याचा अभ्यास अजुनही सुरु आहे. त्यांच्यानुसार मन देखील ठायरॉईड व इतर ग्रंथी जे काहि स्त्रवतात त्याचा परिपाक आहे. त्यामुळे वैद्यकशास्त्र आणि मानसशास्त्र अल्टीमेटली शरीरातील केमीकल लोचे दुरुस्त करण्याचं शास्त्र आहे.
आध्यात्मानुसार जीवन हे स्थळ-कालाबाधीत चिरंतन तत्व आहे. या घटकेला ते एका विशिष्ट शरीर रुपाने वावरतय. भविष्यात हे शरीर टिकुन राहणार नाहि, किंबहुना हे विश्व आता दिसतय तश्या फॉर्ममधे देखील राहणार नाहि, पण जीवन त्यापासुन अबाधीत असेल. जीवन इतर दुसरा कुठला शरीर फॉर्म डेव्हलप करेल. आध्यात्मात मन देखील एक एक इंद्रीय मानण्यात आलय. एक शरीर नष्ट झाल्यावर त्याशरीरामार्फत केलेल्या कर्मांचे संस्कार दुसर्या शरीरात वाहुन नेण्याचं काम मन करतं. मनाचे भ्रम केवळ केमीकल लेचे नाहित तर कर्मसंस्कार आहेत व ते धुतल्या जाऊ शकतात.
भक्तीबद्दल मी जे काहि थोदंफार टंकलय त्याची लींक मी धाग्यावर दिलीच आहे. ठाकुरजी भक्त तर होतेच पण त्यांचं योगशास्त्रातलं ज्ञान देखील जबरदस्त होतं. नॉर्मली आपलं शरीर साखर जाळुन उर्जा निर्मीती करते. पण याच शरीरात उर्जेचे इतर सूप्त प्रकार धारण करण्याची क्षमता आहे. ते "झीप फॉर्मॅट" मधे ऑलरेडी असतात... त्याला अन्झीप करता येतं. असं करत करत आपली चेतना शरीराच्या लिमेट्सच्या बाहेर नेऊन चैतन्याच्या अगदी मूळ स्वरुपापार्यंत भिडवता येते. अशावेळी एकच चेतना शरीर-मन-बुद्धी-जाणीव हे सर्व काम करते. नरेन्द्रने ठाकुरजींच्या मार्गदर्शनाखाली ध्यान, योग, भक्ती वगैरे मार्गांचा अभ्यास करुन आपल्या आत्म्याची मूळ चैतन्याशी एकतानता साधली.
याचा वैज्ञानीक पुरावा देणं सध्यातरी शक्य नाहि. इट्स अ नॅक. ज्याला त्यात तथ्य वाटतं तो त्या मार्गांचा अभ्यास करतो.
====================================================================
आता संजयजींच्या प्रश्नाची उत्तरे-
>>`देव हा आकार आहे' आणि तो सत्याप्रत नेऊ शकतो हे दाखवू शकलात तर भक्तीमार्गाच्या दृष्टीकोनात अमूलाग्र बदल घडेल. व्यक्तीश: मी तुमचा आभारी होईन. कारण भक्ती ही आकाराची आराधना आहे (निराकाराची नाही).
-- देव, भक्ती हि आकाराची साधना नाहि, ति व्यक्तीची साधना आहे. हा मूळपुरुष (किंवा मूळ तत्व) चिरंतर आनंदी स्वभावाचा आहे. इथे "पुरुष" हे लिंगवाचक नाम नाहि, त्याची काहितरी संस्कृत व्युत्पत्ती आहे जी आता मला लगेच आठवत नाहि आहे. या पुरुषाचं बॉडी कण्टेण्ट "चैतन्य" आहे. त्याला स्वतःचं पूर्ण ज्ञान आहे. तो आपल्यातुनच स्वतःचा विस्तार करतो, आकुंचन-प्रसरण करतो, निर्माण-प्रलय करतो, पण तरिही त्याच्यात काहि फरक पडत नाहि कारण सर्व परिवर्तनीय रूपे आपल्या काल नामक शक्तीने त्यानेच धारण केली असतात. या सर्व कर्मांच्या फळापासुन तो मुक्त आहे, कारण फळ हे कर्माचच एक रूप आहे हे तो स्वच्छ जाणातो... त्याच्याकरता कर्म आणि फळ हा भेदच नाहि मुळी.
जीवंतपणाच्या जाणिवेत स्वभावतः आनंद असतो. त्या आनंदाला आपण जीवंत आहोत हे भानच फक्त एक कारण असतं. हा आनंद निरपेक्ष असतो त्यामुळे तो आपला-परका असा भेद मानत नाहि. या अभेद अवस्थेला प्रेम (किंवा भक्ती) म्हणतात. मनुष्य या भक्तीत जसं जसं रममाण होत तसं तसं अभेदाची जाणिव व्याप़क होते, तीव्र होते... आणि एका क्षणी आपण त्याच सच्चिदानंदाचा अभेद अंश आहोत हा उलगडा होतो.
>>या साधनाप्रणालीचा तुम्ही अभ्यास केला आहे का? ती साधकाला सत्याप्रत कशी नेते हे विशद करू शकाल का?
-- ऑब्जेक्टीव्ह उत्तर "हो, मी अभ्यास केलाय". मी माऊण्ट एव्हरेस्ट बघितला, चढायला सुरुवात केली. पण शेवटापर्यंत चढायचं म्हणजे फार मोठ्या शक्तीचं काम आहे हे उमगलं... गाडी ६०/तास चालवली असता एका तासात ति ६० कि.मी. जाईल हे मी गणित मांडुन जाणलं, तसा प्रवास पूर्ण केलेल्यांकडुन कन्फर्मेशनही घेतलं, स्वतः गाडी त्याच वेगाने ५ मिनीटे चालवुन गणीताप्रमाणे ५ किमी पोचतो कि नाहि हे देखील ताडुन बघितलं... आता एक तासभर पुरेल एव्हढं पेट्रोल साठवण्याची क्षमता असलेली गाडी डेव्हलप करायची आहे, कारण माझ्या गाडीची कॅपेसीटी फार कमी आहे.
या मार्गाने गेलं असता आपलं ध्यान जीवंतपणावर अखंड बांधल्या जातं, स्थीर होतं. पण त्याकरता ध्यानशक्ती प्रचंड मजबूत करायला लागते कि जेणेकरुन शरीराच्या, मनाच्या, बुद्धीच्या इतर कार्यांना अडथळा येऊ नये. शरीर, मन, बुद्धी देखील इम्प्लीसीटली ध्यानशक्ती वापरत असते.
>>आकाराची अराधना करून निराकराशी आपलं (मुळात असलेलं) एकसंधत्व कसं उलगडेल?
-- साधना आकाराची नसुन व्यक्तीची आहे हे वर सांगितलच आहे. शरीर, मन, बुद्धी, चेतना... ही सर्व एकाच चैतन्याची रूपे आहेत. त्यामुळे भक्तीच्या अभेद अवस्थेत यासर्वांना त्यांचा वाटा मिळतो. शरीराला, सर्व गात्रांना आनंद स्पर्ष होतो (डोळ्यांना दिसतं, कानांना ऐकु येतं वगैरे). मनाचे सर्व विखार संपून प्रेम अनुभुती दाटते. बुद्धी- चिकित्सेच्या सर्व पातळ्या समाधान पावुन ति शरणागत झाली असते व जाणिव आनंदमय विरघळुन गेली असते.
>>तुम्ही मन, भ्रम आणि देह यांचा काय अभ्यास केला आहे हे जाणण्याची कमालीची उत्सुकता आहे
-- देह, मन काय आहे हे वर थोडक्यात दिलं आहे. भ्रम म्हणजे एकवाक्यतेचा अभाव. भक्तीच्या पूर्ण मॅचुअर्ड अवस्थेत देह, मन, बुद्धी, जाणीव यांची एकवाक्यता झाली असते. निरपेक्ष आनंदाचा वाटा सर्वांना मिळाला असतो. कोणि कोणाला चॅलेंज करत नाहि (जे एरवी मन आणि बुद्धी आपसात भांडत असतात) कि कुणी कुणाला आपल्या सुखाकरता वापरुन घेत नाहि (जे एरवी मन शरीराला आपली वखवख पूर्ण करायला वापरून घेतं असतं)
अर्धवटराव
22 Jan 2013 - 8:43 pm | बॅटमॅन
अर्धवटरावांचा "पूर्णवट" प्रतिसाद _/\_
माझ्या दोन कवड्या: पुरुष या शब्दाची व्युत्पत्ती "पुरि शेते इति पुरुषः " अशी आहे. शरीररूपी पुरात/पुरीत झोपणारा तो पुरुष. म्हंजे आत्माच या ठिकाणी म्हटले तर वावगे नसावे.
इतके बोलून मी आध्यात्मिकातून भौतिकात येतो.
तूर्तास तरी जय भोगेच्छा!
22 Jan 2013 - 9:46 pm | धन्या
अध्यात्म काय म्हणतं आणि विज्ञान काय म्हणतं या दोन्ही बाजू अतिशय संयतपणे आणि चांगल्या रितीने मांडल्या आहेत.
माझ्या मनात अगदी हेच विचार होते. म्हणूनच तुम्ही जेव्हा मानसशास्त्र आणि वैद्यकशास्त्राचा उल्लेख केलात तेव्हा मी ते समजावून सांगण्याची विनंती केली.
वैद्यकशास्त्राच्या मते पेशी हा सजीवांचा मुलभूत घटक आहे. जोपर्यंत पेशी जिवंत आहेत तोपर्यंत त्या सजिवाच्या जीवात जीव असतो. तो सजीव जेव्हा मृत होतो तेव्हा खरं तर त्या सजिवाच्या शरीरातील एकुण एक पेशी मृत पावतात. तोच त्या सजिवाचा "दी एन्ड" असतो. तिथून पुढे त्या सजिवाला दृश्य वा अदृश्य स्वरुपात अस्तित्व नसतं.
विज्ञानाच्या दृष्टीने मनाचे भ्रम हा पुर्णपणे केमिकल लोचा असतो. कुठलं केमिकल कधी कसा लोचा करतं हे त्या व्यक्तीचा पिंड आणि त्या व्यक्तीवर लहानपणापासून झालेले संस्कार यावर ठरत असतं.
तुमचं मत पुनर्जन्म या संकल्पनेवर (माझ्या दृष्टीने :) ) आधारीत आहे. पुनर्जन्म या संकल्पनेबाबत भारतीय साहीत्यात अगदी योगवासिष्टापासून ते परमहंस योगानंदांच्या आत्मचरीत्रापर्यंत आश्चर्य वाटावं इतकी एकवाक्यता आहे. चौर्याऐंशी लक्ष योनींचा फेरा झाल्यानंतर एकदा मानव जन्म मिळतो. हे ते मत. आणि या जन्मात येणारी सु:ख-दु:खं ही आधीच्या जन्मात केलेल्या पाप पुण्यांवर आधारीत असतात, ज्याला तुम्ही कर्मांचे संस्कार म्हटलं आहे. आणि तुमच्या मते ही पाप पुण्याची माहिती एका जन्मातून दुसर्या जन्मात नेण्याचं काम मन करतं. जर पुनर्जन्म आहे असं मानलं तर तुमचं म्हणणं योग्य आहे. :)
(अवांतरः पाश्चात्यांनी मात्र आपली चौर्याऐंशी लक्ष योनींच्या कल्पनेला पद्धतशीर बगल दिली आहे. त्यांच्या मते आत्म्याचे एका पाठोपाठ एक असे कितीही मानवजन्म होऊ शकतात. आणि या जन्मांमध्ये लिंगबदलही होऊ शकतो. संदर्भः लाईफ बिफोर लाईफ आणि मेनी लाईव्ज मेनी मास्टर्स)
देवाविषयीच्या मतांबद्दल मी काहीच बोलत नाही. ती ज्याची त्याची वैयक्तिक श्रद्धा असते. :)
जाता जाता, पातंजल योगशास्त्र भारतीय मानसशास्त्र आहे असं कुठेतरी वाचलं. कुठे वाचलं ते आठवत नाही, पण असं लिहिणार्याला मानसशास्त्र म्हणजे काय हे कळलंच नसावं. पातंजल योगशास्त्राचा भर "मनोनिग्रहा"वर आहे. पण मनाचा निग्रह करण्यासाठी आधी मनाला काय होतंय हे तर कळायला हवं ना. :)
22 Jan 2013 - 11:22 pm | कवितानागेश
परीसस्पर्श! :)
23 Jan 2013 - 12:05 am | संजय क्षीरसागर
तुम्ही म्हटलय :
आणि तो निराकार आहे.
आपण मुळात निराकार असल्यानं अभेद्य आहोत (म्हणून गीतेच्या सांख्ययोगात `नैनं च्छिंदती शस्राणि' असा उल्लेख आहे)
तुमच्या माहितीसाठी सांगतो, अष्टावक्राचा देह आठ ठिकाणी वक्र होता. त्याला पद्मासन काय साधं सुखासनात बसणं मुष्किल होत. ही कुडंट इवन स्टँड स्ट्रेट. त्याची एनर्जी वर्टिकल होणं असंभव होतं. पण अष्टावक्र संहिता आजमितीला सांख्ययोगातला सर्वोच्च ग्रंथ मानला गेलाय.
असा ज्ञानयोगाचा दिग्गज अष्टावक्र म्हणतो `अनुष्ठान हेच बंधन आहे' .... कोणत्याही साधनेची काहीएक आवश्यकता नाही. कारण मुळात तुम्ही सत्यापासनं विलग झालेला नाहीत. आणि कितीही प्रयत्न केला तरी होऊ शकत नाही. कारण निराकार अविभाज्य आहे.
येस! आपण निराकराशी एकरूप आहोतच या अनुभूतीक्षणी तुम्ही भाररहित होता, आनंदी होता, निश्चिंत होता.
हे सायकलॉजिकली बरोबर आहे. पण प्रॅक्टीकली भ्रम म्हणजे जे नाही त्याचा आभास.
अध्यात्मात भ्रमाची व्याख्या वेगळी आहे. भ्रम म्हणजे आपण त्या निराकारापासून वेगळे आहोत असा समज आणि त्याच्याशी एकरूप होण्यासाठी केलेली साधना.
_______________________________________
मित्रत्वाच्या नात्यानं सांगतो. तुम्ही जो प्रयत्न करताय तो तंत्रमार्गातला आहे. आणि अत्यंत दुष्पुर आहे. (गविची माफी मागून लिहीतो) इथल्या एका सदस्यान तो केलाला आहे. त्यानं काहीही साध्य होत नाही.
भक्तीमार्ग नक्की काय आहे. तो आकरातून निराकाराकडे कसा नेतो ती वेगळी मेथडॉलॉजी आहे. प्रचलित भक्तीमार्गाच्या ती काहीशी विपरित आहे. आणि परमहंस त्यातनं (रामपुरी या औलियामुळे) कसे मुक्त झाले ती वेगळी हकिकत आहे.
23 Jan 2013 - 1:19 am | संजय क्षीरसागर
कसे मुक्त झाले ती वेगळी हकिकत आहे.
23 Jan 2013 - 1:55 am | धन्या
माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये. काय वाचतोय मी हे?
23 Jan 2013 - 2:29 am | अर्धवटराव
भक्ती हि अवस्था आहे, मार्ग नाहि. ज्यामार्गे ति अवस्था उमलते त्याला भक्तीमार्ग म्हणतात एव्हढच.
>>आणि तो निराकार आहे.
-- भक्ती मार्गात मुळात आकारालाच काहि महत्व नाहि. भक्तीचा सगळा एम्फसीस सच्चिदानंदाच्या चैतन्यत्वावर आहे. अक्षुण्ण आनंदतत्वाचा उलगडा झाला कि मग अॅब्सोल्युट आणि मोडीफायेबल अशा दोन्हीरुपात भक्ती अक्षुण्ण राहाते. भक्तीला आकार म्हणजे काय हेच माहित नाहि (किंवा भक्तीला आकाराचं तसंही काहि महत्व नाहि)... सो डज निराकार.
>>आपण मुळात निराकार असल्यानं अभेद्य आहोत (म्हणून गीतेच्या सांख्ययोगात `नैनं च्छिंदती शस्राणि' असा उल्लेख आहे)
-- अभेद्यता आणि अभेदता या भिन्न बाबी आहेत. चैतन्य उत्पत्ती-स्थिती-आणि लयीची सायकल चालवत राहुन देखील आपली अखंडता सोडत नाहि. त्याअर्थी ते अभेद्य आहे. मूळ प्रेमानंदी स्वभावामुळे चैतन्याला मी-तु हा भेद उरत नाहि याअर्थी ते अभेद आहे.
>>तुमच्या माहितीसाठी सांगतो, ...असा ज्ञानयोगाचा दिग्गज अष्टावक्र म्हणतो `अनुष्ठान हेच बंधन आहे' .... कोणत्याही साधनेची काहीएक आवश्यकता नाही. कारण मुळात तुम्ही सत्यापासनं विलग झालेला नाहीत. आणि कितीही प्रयत्न केला तरी होऊ शकत नाही. कारण निराकार अविभाज्य आहे.
-- पिवळाधम्म रसभरीत हापुस आंबा बघा. कुणाला त्याचं ते सोनपिवळं रूप आकर्षीत करेल, कुणाला त्याची गोड चव आवडेल, कुणी त्याच्या कॅलरीज आणि इतर पोषक घटकांवर फिदा असेल तर कुणी एका आंब्यात शेकडो आंबे देणारं झाड बीजरूपाने कसं काय नांदतय या चिकित्सेत असेल... इट्स अ मॅटर ऑफ व्हॉट अपील्स यु. सांख्यांनी योगमार्गाची खोडी काढु नये किंवा योग्यांनी भक्तांना नावं ठेऊ नये किंवा भक्तांनी या दोघांच्या नावे नाकं मुरडु नये. जो मार्ग आपल्याला भावतो तो चालावा, शक्य असल्यास माहितीचं आदान-प्रदान करावं. कुणाच्याही मनात इतरांबद्दल कुठल्याही कारणाने किंतु-परंतु आले कि त्याचा मार्ग हमखास भरकटला म्हणुन समजा.
सांख्यांचच म्हणावं तर श्रद्धेशिवाय सांख्ययोग जमणं अशक्य आहे. अश्रद्धाचा सांख्ययोग म्हणजे फक्त पढतमूर्खता. (श्रद्धा म्हणजे "टेण्डंसी ऑफ एक्सेप्टींग द ट्रुथ... सत्य स्विकारायची क्षमता). "श्रद्धावान लभते ज्ञानम्" हे गीतावचन त्याच अर्थाचं आहे.
>> पण प्रॅक्टीकली भ्रम म्हणजे जे नाही त्याचा आभास.
-- येस. शरीर-मन-बुद्धी-चेतना यापैकी कुणालाही निरपेक्ष आनंदतत्वाशिवाय इतर कुठल्या गोष्टीत रस वाटला तर तो भ्रम आहे. सत्य गवसलं तर ते सर्व पातळ्यांवर गवसेल.
>>मित्रत्वाच्या नात्यानं सांगतो. तुम्ही जो प्रयत्न करताय तो तंत्रमार्गातला आहे. आणि अत्यंत दुष्पुर आहे. (गविची माफी मागून लिहीतो) इथल्या एका सदस्यान तो केलाला आहे. त्यानं काहीही साध्य होत नाही.
-- धन्यवाद संजयजी. मला या दुष्पुरतेची कल्पना मागेच आलि होती. म्हणुनच आमचा योगाभ्यास सुदृढ शरीर या एकाच उद्देशाने सुरु राहिला. तंत्रमार्गाच्या वाटेला आपण कधी जाणार नाहि.
>>भक्तीमार्ग नक्की काय आहे. तो आकरातून निराकाराकडे कसा नेतो ती वेगळी मेथडॉलॉजी आहे. प्रचलित भक्तीमार्गाच्या ती काहीशी विपरित आहे. आणि परमहंस त्यातनं (रामपुरी या औलियामुळे) कसे मुक्त झाले ती वेगळी हकिकत आहे.
-- तुम्हाला जे काहि माहित आहे, कुठली मेथडॉलॉजी, परमहंसांचं नक्की काय झालं... वाचायला आवडेल.
अर्धवटराव
23 Jan 2013 - 11:30 am | संजय क्षीरसागर
आकाराची आराधना निराकाराकडे नेणं शक्य नाही.
ते तुम्ही ऑलरेडी आहतच! कारण ते अस्तित्वाचं (आणि पर्यायानं तुमच) मुळ रूप आहे.
नाही, तो फक्त पाहण्याचा अँगल आहे :
`नैनं च्छिंदती शस्राणि' ही अभेद्यता आहे, आणि
`पूर्णम् इदम् पूर्णम् अद:' ही अभेदता (किंवा एकरूपता आहे)
लेखनाचा उद्देश तोच आहे.
आपण निराकारापासून वेगळे होऊ शकत नाही ही नि:संशय खूणगाठ म्हणजे श्रद्धा. आणि तो स्वतःचा अनुभव होणं हे ज्ञान!
माझ्याविषयी कुणीही काहीही लिहू दे... तुमच्या या एका उत्तरानं मला सर्व मिळालं!
अत्यंतिक राळ उडवली गेलीये लेखनाबद्दल, हेतूबद्दल आणि शैलीविषयी. त्यामुळे त्या विषयी पुन्हा केंव्हा तरी.