आणि अचानक त्या वेळी..

ह भ प's picture
ह भ प in जे न देखे रवी...
9 Nov 2012 - 1:23 pm

त्या दिवशी अचानक
तुझी पुन्हा भेट झाली,
तुला पाहताच माझ्या मनी
जुन्या आठवणींची कालवाकालव झाली..

आठवले ते मोरपंखी दिवस
तुझ्या सहवासात घालवलेले,
आठवले ते सोनेरी क्षण
तुझ्या परीसस्पर्शाने बहरलेले..

आठवले ते तासन-तास
तुझ्याच प्रतिक्षेत घालवलेले,
आठवली ती प्रेमपत्रे
तुझ्या मैत्रिणींद्वारे तुला धाडलेली..

प्रेमाचा शिडकावा करुन
तु नकळत मला सोडुन गेलीस,
आणि आज इतक्या महिन्यांनी
पुन्हा माझ्या सामोरी आलीस..

आज तुला असं समोर पाहुन
काय बोलावं तेच कळत नाही,
तुझी खुशाली विचारायला
साधा शब्दसुद्धा सुचत नाही..

वाटलं माझ्या मनाला विचारावं तुला
'सोडन का गेलीस मला?'
आणि अचानक त्या वेळी तुच म्हणालीस मला,
खुप विसरायचा प्रयत्न केला.. पण विसरु शकले नाही मी तुला..

(ही कविता १ जून २००५ साली लोकसत्ताच्या चतुरा मासिकात प्रसिद्ध झालेली आहे. विशेष म्हणजे "आणि अचानक त्या वेळी" ही ओळ कवितेत असणं अपरिहार्य होतं. म्हणजे या एका ओळी वरुन स्फुरलेली ही कविता आहे. माझे परम मित्र श्री. अजय धोंडीबा शेरे, पुणे यांनी कवितेचा केलेला हा पहिला वहिला प्रयत्न होता, आणि तिच कविता छापुन देखिल आली.)

कलाकविताप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

रसायन's picture

20 Nov 2012 - 1:57 pm | रसायन

प्रयत्न चांगला आहे