वर्तुळ

ह भ प's picture
ह भ प in जे न देखे रवी...
16 Nov 2012 - 10:20 am

सहजपणे तुझे
माझ्या जीवनात येणे,
घेउन आले माझ्या साठी
आनंदाचे लेणे..

वरचेवर आपल्या भेटी
आता नित्य होउ लागल्या,
तुझ्याच आठवणीत
हरएक रात्री जागू लागल्या..

समजुनही उमजत नव्हतं
ह्या नात्याला काय म्हणावं,
सहजचं तू म्हणाली
"ते मैत्रीसारखं असावं.."

तितक्याच सहजपणे मी
ते नातं स्विकारणं
जमणारं नव्हतं मला
तुझ्याशी नातं नाकारणं..

गुलमोहोरासवे आपली
मैत्रीही बहरली,
नकळतपणे तुलाही
माझ्या अंतरीची ओढ लागली..

तुही माझ्या सारखीच
हरएक रात्र जागू लागली,
माझ्याच आठवणीत तू
आता कूस बदलू लागली..

आपले नाते ना 'ते' राहिले
माझी जीवनसाथी बनुन,
"तू एक वर्तुळ पुर्ण केले.."

कवीमित्र: अजय शेरे, पुणे (९८६००००७५४)

(ही कविता नाते ना 'ते' राहिले) या ओळीवरुन स्फुरलेली आहे)

कलाकविताप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

सर्वज्ञ's picture

16 Nov 2012 - 10:53 am | सर्वज्ञ

तोड्लस मित्रा....तोड्लस

जेनी...'s picture

16 Nov 2012 - 11:11 am | जेनी...

जोड्लस मित्रा....जोड्लस

ह भ प's picture

16 Nov 2012 - 11:13 am | ह भ प

:-)

श्रीरंग_जोशी's picture

16 Nov 2012 - 11:45 am | श्रीरंग_जोशी

खोड्लस मित्रा....खोड्लस

कविता आवडली!!

अभ्या..'s picture

16 Nov 2012 - 11:58 am | अभ्या..

मोड्लस मित्रा....मोड्लस

ह भ प's picture

16 Nov 2012 - 12:03 pm | ह भ प

ओढलंस.. सोडलंस.. फोडलंस..

अत्रुप्त आत्मा's picture

17 Nov 2012 - 9:29 am | अत्रुप्त आत्मा

सोडलस मित्रा,(भसाभस) सोडलस =)) :-p

श्री गावसेना प्रमुख's picture

17 Nov 2012 - 9:53 am | श्री गावसेना प्रमुख

हान तेच्यायला1
तोडा रे

रसायन's picture

19 Nov 2012 - 1:24 pm | रसायन

मस्तच...

सुधीर's picture

19 Nov 2012 - 1:39 pm | सुधीर

छान जमली आहे. आवडली.

आपले नाते ना 'ते' राहिले

"पाहिले न मी तुला,
तू मला न पाहिले.."
;-)