सवा डॉलर चढाऊंगी (एक आध्यात्मिक दृष्टीकोन)

सूड's picture
सूड in जनातलं, मनातलं
13 Nov 2012 - 2:52 pm

मित्रहो, सहज गाणं ऐकत ऐकत मला अचानक हा दृष्टांत झाला की ही लावणी नव्हेच!! ही तर एका ईश्वराच्या प्रेमात पडलेल्या कन्यकेने त्या ईश्वराला केलेली आळवणीच !! गाण्याची सुरुवात ऐकताच आपल्याला कन्यकेच्या आध्यात्मिक विचारांची जाणिव व्हायला लागते. गाण्याची सुरुवात काहीशी अशी आहे.

हिंदी फिल्मों में देखा जीवन का सारा लेखा।
पेडों के आगे बच्चन पेडों के पिछे रेखा॥

वरच्या ओळींमध्ये क्न्यकेला नव्वदच्या दशकात प्रसारीत होणारी रामायण ही मालिका अभिप्रेत आहे. 'हिंदी सिरीयलों मे देखा' हे मीटर मध्ये बसणार नाही म्हणून फिल्मों मे हा शब्द वापरला आहे. तर कन्यका म्हणते, या हिंदी रामायण मालिकेत जीवनाचं सारं सार आहे. ते कसं सांगायला ती म्हणते झाडाच्या पुढे बच्चन आहे. येथे कन्यकेला लक्ष्मण अभिप्रेत आहे. 'बच्चन' हा शब्द आध्यात्मिक अँगल लावून न बघणार्‍यांची दिशाभूल करु शकतो. कन्यका म्हणते झाडाच्या पुढे लक्ष्मण असून त्याने सीतेसाठी काढलेली लक्ष्मणरेखा ही झाडापलिकडे राह्यलेली आहे. म्हणजे माणूस हा नेहमी दुसर्‍यासाठी बंधने घालत असतो हे चपखलपणे सुचवते.

पुढे कन्यका म्हणते,
मामूली नहीं मैं लडकी खोलें सपनों की खिडकी ॥
अपनी ठंडी दुनिया को मैनें सपनो पे सेंका॥

येथे पुन्हा आध्यात्मिक दृष्टीकोन वापरण्याची गरज पडते. येथे ही कन्यका स्वप्न बघत नाहीये तर ध्यानधारणा करुन तिने कुंडलिनी जागृत होण्याची पायरी गाठली आहे. त्यामुळेच भर थंडीतही ध्यानधारणा करुन ती बाह्य वातावरणाचा आपल्या शरीरावर काही फरक पडू देत नाही. पुढल्या ओळीत भगवंताने आपल्याला बोलवावं यासाठी ती म्हणते,

मेरा शॉट रेडी है देवा ओके जल्दी कर देना झोली मेरी भर देना।
हिरोईन मुझे बना देना सवा डॉलर चढाऊंगी बदले में॥

म्हणजे आता आध्यात्मिक उन्न्तीसाठी तिने समाधी अवस्थेत जाण्याचा निर्णय घेतलाय. ती देवाला विनवते की , "देवा रे, हा माझा प्रयत्न सफल होउ दे, म्हणजे मी बाकीच्यांच्या दृष्टीने हिरोईन ठरेन" आणि तसं झालं तर ती सवा डॉलर म्हणजे आपला पुढला जन्म देवाला अर्पण करेल. येथे ही कन्यका नवस करण्याच्या प्रथेला ही & हि कमेंट देण्यासाठी जणूकाही आपण नवस करतो आहोत असे भासवते.

पुढे असलेला कोरस म्हणजे षडरिपूंनी तिला घातलेली भुरळ आहे.
कोरस:
चल गं रानी गाऊया गानी क्याम्येर्‍याच्या संगं
आनं क्लोजंपंवाली लेन्सं लगी है दिखा दे अपने रंगं.

तर हे षडरिपू म्हणतात, ''बाई गं, समाधी घेऊन हिरोईन होण्यापेक्षा या क्यामेर्‍यासमोर तुझे अभिनयाचे रंग उधळ, गाणी गायला आम्ही तुझ्यासोबत आहोतच!!"

पुढील कडवं;
रंगीन पोषटर मेरा गलियों में दिखाई दे।
घर घर के रेडियो मेंभी मेरे गीत सुनाई दे॥
कोरसः
गं बाई हिची गाणी वाजली गं बाई हिची पायरसी झाली
आऽऽणि हिच्या प्रिमीयरला युएसंहूनं माधुरी आली

कन्यका म्हणते, "देवा रे, खरंच तू आहेस का? मी काय म्हणतेय ते ऐकतोयेस का? समाधीनंतर माझी पोस्टर गल्लीगल्लीत लागू देत आणि प्रत्येक घरच्या रेडिओत माझ्या सत्संगांची गाणी ऐकू येऊ देत." षडरिपू कोरसमधून तिला भुरळ पाडायला म्हणतात ," बाई गं, क्यामेर्‍यासमोर तुझं गुणप्रदर्शन केलंस तर तुझी गाणी पायरसी होण्याइतपत फेमस होतील. तुझ्या सिनेमाच्या प्रिमीयरला माधुरी येईल'.

त्यांना न जुमानता ही कन्यका आपला धोशा चालूच ठेवते;

हर कोई फ्यान हो मेरा आणि ऑटोग्राफं माँगे ।
संग फोटो खिंचवाने की सब लोग दुहाई दे।
दुबली सी कमर के ठुमके सिलवर जुबली कर देना झोली मेरी भर देना।
हिरोईन मुझे बना देना सवा डॉलर चढाऊंगी बदले में॥

ती म्हणते की सर्व जण माझे फ्यान होवोत आणि माझी स्वाक्षरी मागोत (पण मी तोवर समाधी घेतलेली असेल.). माझ्या समाधीस्थानी फोटो काढण्यासाठी लोकांची रीघ लागो आणि हे जे षडरिपू मला भुरळ घालतायेत त्यांच्या नखरेल ठुमक्यांची खुश्शाल सिलवर जुबली होऊ दे. पण मी घेतलेला निर्णय सफल होण्याचा आशीर्वाद देऊन माझी झोळी भर जेणेकरुन मी तुझ्या दरबारी हिरोईन होईन.

तूर्तास इतुकेच !! ;)

बालगीतप्रतिशब्दव्युत्पत्तीविनोदप्रकटनशुभेच्छाअभिनंदनभाषांतर

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

13 Nov 2012 - 3:40 pm | अत्रुप्त आत्मा

काय लोकं सूड घेतात नै लगेच! ;-) :-b

प्रचेतस's picture

13 Nov 2012 - 5:09 pm | प्रचेतस

कय लिवलंय, कय लिवलंय.

मी-सौरभ's picture

14 Nov 2012 - 4:21 pm | मी-सौरभ

वाचाल तर वाचाल

पैसा's picture

13 Nov 2012 - 7:43 pm | पैसा

हिरविण व्हायची स्वप्न मस्त जमलीत. "सवा डालर चढाऊंगी" हे तर खासच!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

13 Nov 2012 - 7:54 pm | विश्वनाथ मेहेंदळे

सुप्पर डूप्पर लाईक !!!

मिपावर* होणारी बरीचशी विडंबने ही खरे तर विडंबने नसतात(किंवा असली तरी अत्यंत वाईट दर्जाची असतात) हे माझे मत मी काही जणांना बोलून दाखवले होते. तेव्हा तुला काय अपेक्षित आहे ते उदाहरण देऊन सांग अशी एक रीअक्शन होती. यापुढे उदाहरण म्हणून मी या लेखाकडे बोट दाखवू शकेन.

*बाकीच्या संस्थळांवर फार वावर नसल्याने तिकडे काय होते ते माहित नाही. तिथेही वेगळी परिस्थिती नसेल तर सदर शब्दाच्या जागी "मराठी आंतर्जालावर" असे वाचावे.

स्पा's picture

14 Nov 2012 - 4:28 pm | स्पा

टोटल शमत

भारि जमलय

=))
=))

इष्टुर फाकडा's picture

13 Nov 2012 - 8:58 pm | इष्टुर फाकडा

'खरे' विडंबन वगैरे ची जास्त माहिती नाही. पण हे लयी आवडलंय. अपेक्षित होतं हे विडंबन येणं :)

जेनी...'s picture

13 Nov 2012 - 9:51 pm | जेनी...

बरय.

श्री गावसेना प्रमुख's picture

14 Nov 2012 - 11:24 am | श्री गावसेना प्रमुख

1
झिंगालाला हु हु.

बॅटमॅन's picture

14 Nov 2012 - 2:53 pm | बॅटमॅन

कं लिवलंय , कं लिवलंय!!!!! पोर्गी अस्तास तं मग इचार्लं आस्तं मझ्यशि मय्तर्रि कर्नर कं म्हून ;)

अत्रुप्त आत्मा's picture

14 Nov 2012 - 7:04 pm | अत्रुप्त आत्मा

@पोर्गी अस्तास तं मग इचार्लं आस्तं मझ्यशि मय्तर्रि कर्नर कंम्हून>>> :-O क्काय?... :-O

अरे हो! हा खराखुर्रा पुरुष आय-डी आहे नै का? =))
==============================================================
सो नाक्षी डुआयडीमेकर :-b

मोदक's picture

15 Nov 2012 - 12:19 pm | मोदक

"काय लोकं सूड घेतात नै लगेच!" असे वर कुणीतरी म्हणून गेलंय... ;-)

==============================================================
हरिणाक्षी टारगेटवर :-p

मूकवाचक's picture

14 Nov 2012 - 3:03 pm | मूकवाचक

=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Nov 2012 - 7:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, या लेखनाला कै इतिहास भूगोल आहे का ? लेख इंजॉय करता येईना.
कोणीतरी माहितीपूर्ण खरड करा रे !

-दिलीप बिरुटे

विश्वनाथ मेहेंदळे's picture

15 Nov 2012 - 10:12 am | विश्वनाथ मेहेंदळे
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Nov 2012 - 10:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दुव्याबद्दल धन्स. तो प्रयत्नही चांगला होता आणि हाही प्रयत्न चांगला आहे. :)

-दिलीप बिरुटे
[तटस्थ]

पाषाणभेद's picture

14 Nov 2012 - 10:40 pm | पाषाणभेद

सही मजा आली.
मुळ गाणे कोणत्या चित्रपटातील आहे?

जेनी...'s picture

14 Nov 2012 - 10:41 pm | जेनी...

मुळ गाणे कोणते आहे ?

सूड's picture

14 Nov 2012 - 10:45 pm | सूड
जेनी...'s picture

14 Nov 2012 - 10:48 pm | जेनी...

अय्या ....??

अय्या ...!

अय्या .

=))

स्पंदना's picture

15 Nov 2012 - 5:32 am | स्पंदना

प्रसिद्धी म्हणजे मनाच्या गाभार्‍यातुन उमटणार अस काही तरी, जे नेमक डॉलरात सापडत, आणि अंतर्बाह्य बदलुन टाकत.
भक्तीसुद्धा अशीच! त्यामुळे सुड तुमच इंटरप्रिशन अगदीच वावग नाही म्हणता येणार. छान लिहिल आहे.

कवितानागेश's picture

16 Nov 2012 - 12:47 pm | कवितानागेश

च्यायला!! :D

तिमा's picture

16 Nov 2012 - 8:53 pm | तिमा

शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते की 'रेखा जिसको सबने देखा". ते ऐकून देवयानी चौबळांनी ते छापून टाकलं.
आता तर सर्वच हिरविणींबद्दल हे वाक्य लागू होईल.