स्वार्थामधेच सारा आनंद मानतो मी!
निस्वार्थ म्हणविणारा नसत्या भ्रमात आहे!
ऐसे अनेक आले.. आले तसेच गेले..
माझी इथेच सत्ता तरीही भरात आहे..
संतांस काय जाते नीती जपा म्हणाया..
नाही सुखास म्हणणे अवसानघात आहे
धर्म-अधर्म सारे कोळून प्यायलो मी..
आता मिजास माझी.. तुमची वरात आहे..
--
चघळून रक्त अपुले, कुत्रा सुखावतो ना?
आमीष हाडकाचे.. अन् मी सुखात आहे!
राघव
प्रतिक्रिया
8 Nov 2012 - 4:37 pm | कवितानागेश
:)
8 Nov 2012 - 6:00 pm | निश
राघव साहेब, कविता लय भारि आहे.
8 Nov 2012 - 6:22 pm | नावातकायआहे
+१
8 Nov 2012 - 9:54 pm | जेनी...
:)
9 Nov 2012 - 4:25 am | स्पंदना
पहिल कडव थोड वेगळ होत का पहा, कारण नंतरची गझल नकळत सुरात जाते, पण पहिल्या दोन ओळी मुक्त कवितेचा भास आणताहेत. टु बी ट्रु, पहिल कडव सोडुन बाकिची कविता अत्त्युत्तम. सुरेख! सुंदर!!
9 Nov 2012 - 5:41 am | अत्रुप्त आत्मा
ह्हे ह्हे ह्हे.... :-)
9 Nov 2012 - 8:55 am | मूकवाचक
धर्म-अधर्म सारे कोळून प्यायलो मी..
आता मिजास माझी.. तुमची वरात आहे..
हे मस्तच!
9 Nov 2012 - 9:10 am | सहज
कविता कविता आहे समजुन तेवढ्यापूरती समजुन घ्यायची की काथ्याकूट करायचा हा एक फार सनातन प्रश्न आहे...