धोबीपछाड

स्पंदना's picture
स्पंदना in जनातलं, मनातलं
20 Sep 2012 - 6:28 am

बोधकथा.

तृतीयेला सकाळी सकाळी घरात चौघडा झडला. कारण कन्येन हरतालिकेच व्रत करण्याच . नवं रक्त ते. रगा रगात नुसता बालिशपणा अन आई पप्पा सांगतील त्याला विरोध भरलेला . नुसता आंधळा विरोध !

"अग आत्तापासून करशील तर जरा चांगला नवरा मिळेल" इत्यादी मी.

"but why should I pray to God to get a good one? Can't I search it myself?"

"अरे ! ऐक जरा आईंच. त्यांना बघा कसा छान नवरा मिळाला ?" सांगायला हव का? अर्थात पतीदेव. छाती चांगली दोन इंच फुगलेली (तरीही पोटाच्या घेराला माग न टाकू शकलेली .) नजरेत खट्याळपणा नुसता उतू चाललेला.

"हे बघ असली उदाहरण देऊन तू तीला discourage करतोयस." मी

"काय discourage ? माझ्यासारखा चांगला, गुणवान नको मिळायला?"

"शी ! I definitely don't want anything like Pappa". पोरीन परस्पर पत्ता काटला.

आता मला point मिळाला. म्हंटल " येस्स! There you are. You can request God to avoid few qualities which you despise .Like hey God! I do not want this type, and something like that. "

"Does it really work?" कन्येच्या डोळ्यात थोडा इंटरेस्ट .

"अरे मग? देव सगळ ऐकतो. आणि तसं पण माझ्याबरोबर म्हणून कर. हं? खुप छान असते पूजा हीं . अन फक्त आपण स्त्रियांनी करायची! बघ आवडेल तुला."

"OKey! I will do it. So I should not eat anything and when I come home I have to do puja !!??? "

आणि मग एकदम कुठेतरी वीज चमकावी तसा एक प्रश्न चमकला " Hey? If I have to do this to get a good NAVARA then why are YOU doing this? You are already married?"

आई शप्पथ ! काय point गावला?

"I want to upgrade!" अहाहा ! नवऱ्याच्या नजरेत झर्रकन एक सल उमटून गेला. उहुहू ! मै तो बडी तिरंदाज निकली? क्या तीर बैठा ? सह्ही निशानेपे यार !

मग आता व्रत करायला तयार असलेली कन्या मी अन चिरंजीव असे शाळेला गेलो. इतर वेळी जाणवणार ट्रॅफिक आज अगदी किस झाड की पत्ती! तश्शीच हलकी हलकी तरंगत घरी आले.

सणासुदीला अन अश्या व्रत वगैरे दिवशी त्यानं घरी रहाव असा माझा हट्ट असतो. काय एकटीनच करायचं अन खायचं? कंटाळा येतो . म्हणून साहेब घरातून काम करत होते. घरात शिरले तर जरा जास्तच शांतपणा जाणवला. मला राहवेल होय? मी छेडलच

"काय रे ? गप्प का?"

काही नाही . काम चाललय'

"मग बोलू की नको?"

"नको."

"बर."

अंघोळ झाली. पूजा केली . माझा उपास असल्यान त्यानं नुडल्स करून खाईन म्हणून सांगितलं. म्हंटल बर! एकूण तीर आरपार गेला होता.

मग सुरु झाली हरितालिकेची तयारी . उचलली परडी अन गेले बागेत. पलीकडे शेजीबाई त्यांच्या गार्डनमध्ये खुडबुड करत होत्या. माझी गार्डन अजून तशी तयार व्हायची आहे. मग घुसले तिच्या गार्डनमध्ये. मग मला फुल कमी अन पान कशी जास्त हवीत. त्याच कारण काय . इत्यादी आपसूक येणारे अन न येणारे असे सारे मुद्दे खुद्बुडत आम्ही पत्री गोळा केली. माझ्या बरोबर आता तिलाही जोर चढला! "Oh! Its so interesting ! Can I come to your place?" असं करत आता ती माझ्या घरात शिरली. मग मी साग्रसंगीत पूजा मांडायला सुरुवात केली . धनी आपले तिथच बाजूला कम्प्युटर मध्ये डोक खुपसून.

मग शेजारणीला पार्वतीची कथा सांगून झाली. तिने स्वत:चा पार्टनर स्वत:निवडायचा हक्क कसा झगडून मिळवला. मग शिव कसा प्रसन्न झाला. वगैरे सांगून झालं.

लागोपाठ शंकराची पिंड वाळूत रेखून झाली. इथे मात्र जरा प्रॉब्लेम आला. हे नक्की काय हे कस सांगायचं? अन मग माझ्या मनान एक नवाच दृष्टीकोण समोर आणला.

" This is the way we repect the mutual unity of man and woman. For us sex is not casual . We respect it as one of the important aspect of life and so this sign of unity is worshipped." नवऱ्याच्या चेहऱ्यावर नक्की काय भाव उमटत होते सांगता नाही येणार.

मग पूजेला सुरुवात केली . आपला स्कर्ट सावरत शेजीनबाई पण सामील झाल्या . माझी मुलगीपण करते आहे ऐकून तर तीला आणखी जोर चढला. मग अचानक तिचीही ट्यूब पेटली का काय कुणास ठाऊक पण नेमका माझ्या मुलीन विचारलेला प्रश्न तिच्या तोंडातून बाहेर पडला. माझ्याकडे अर्थातच उत्तर तयार होत. सकाळी ते जोरकस लागूही पडलं होत.

मी पुन्हा , " I want to upgrade."

आता हे उत्तर ऐकून शेजीनबाईन मुकाट बसावं की नाही? नाही ! हीं वळली नवऱ्याकडे .

"You don't object?"

"whya should I?' नवरा .

' No ! means....बाईसाहेब जरा गोंधळल्या .

" See ! If she is praying to get a new better version I will definitely get new one by default!"

"How?" ही मेली शेजारीण गप्प बसेल तर शप्पथ ! उगा लोकांच्या घरात शिरायचं!

"How? If she gets new person I too will get a new one without doing all this fuss and fasting!"

नाकात घातलेली नथ अशी सळ्ळकन सलली की विचारू नका.

सोचना पडेंगा ! मी सारा उपद्व्याप करायचा अन फळ मात्र याला विनासायास?

पूजा झाली होतीच. सारी फुलपत्री कधीची गंगा गौरीवर चढली होती. माझ्या बरोबरीन शेजीनबाईच्या डोळ्यातही काजळ शोभत होत.

उठले. डोईवर पदर घेतला अन नवऱ्यापुढे नमस्कारासाठी गेले. मागोमाग शेजीनबाई ! आता मात्र हद्द झाली.
तीला सरळ सांगून टाकलं "Now you need to go to your husband for this namaskar . This one solely belongs to me atleast for this life.'

'Oh! but my husband is not there."

"Then wait for him."

नमस्कार केला अन नवऱ्यान खांद्याला स्पर्शत आशीर्वाद दिला " सुखी भव !"

उभी राहिले तेंव्हा सकाळचा त्याच्या डोळ्यातला सल माझ्या नजरेत उतरला होता अन त्याच्या डोळ्यात माझ्या नजरेतला तीर!

__/\__
अपर्णा

हे ठिकाणधोरणअनुभव

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

20 Sep 2012 - 6:38 am | किसन शिंदे

हाहाहा..

सौ बात कि एक बात म्हणत नवरोबांनी मस्तपैकी काटा काढला.

मिसळपाव's picture

20 Sep 2012 - 7:20 am | मिसळपाव

खुसखुशीत लेखन. वाचनखूण साठवली आहे.

सहज's picture

20 Sep 2012 - 8:21 am | सहज

जबरी लिव्हलय!

स्पा's picture

20 Sep 2012 - 8:23 am | स्पा

खपलो :D

इरसाल's picture

20 Sep 2012 - 9:21 am | इरसाल

लै भारी.

प्रभाकर पेठकर's picture

20 Sep 2012 - 9:21 am | प्रभाकर पेठकर

नुकतेच मिपाचे 'उर्ध्वश्रेणीकरण' झाल्याचं वाचलं होतं. हे, नवर्‍याचेही करता येते वाचून मन जरा अंतर्मुख की काय म्हणतात तसे झाले. पण मग, पिंपळाच्या झाडाला दोरा बांधून 'जन्मो जन्मी हाच नवरा मिळू दे' वगैरे आरक्षणाचे काय झाले? आयला, तो बिचारा देवही कोड्यात पडत असेल.

लेख मस्त खुसखुशीत झाला आहे. मजा आली वाचताना.

तिमा's picture

21 Sep 2012 - 3:33 pm | तिमा

पेठकरसाहेब,

"मग, पिंपळाच्या झाडाला दोरा बांधून 'जन्मो जन्मी हाच नवरा मिळू दे' वगैरे आरक्षणाचे काय झाले?"

अहो, ते फक्त जन्मभर वडापाव खायला मिळावा म्हणून असतं बरं!

स्पंदना's picture

24 Sep 2012 - 6:40 am | स्पंदना

पेठकरकाका? अहो चक्क वडाचा धागा पिंपळाला?

प्रभाकर पेठकर's picture

24 Sep 2012 - 9:55 am | प्रभाकर पेठकर

आमच्या दहिसरात देवळासमोर मोठ्ठा पिंपळ आहे. त्यालाच दोरे गुंढाळल्याचे बालपणापासून पाहात आलो आहे. जवळपास कुठेही वड नसल्याकारणाने पिंपळालाच प्रमोशन मिळाले असावे.

प्रचेतस's picture

20 Sep 2012 - 9:26 am | प्रचेतस

लै भारी.
आवडले.

५० फक्त's picture

20 Sep 2012 - 10:38 am | ५० फक्त

हे सगळं देवांनी हल्ली आउटसोर्स केलं आहे असं ऐकुन आहे...
बाकी, अगदी धोबीपछाड नाही वाटलं.... थोडंसं सेव्हन इयर्स इच च्या मार्गानं जाणारं, असो. तो एक वेगळा विषय आहे, लिहाच तुम्ही त्यावर अपर्णातै.

मी_आहे_ना's picture

20 Sep 2012 - 12:58 pm | मी_आहे_ना

सही...मस्त खुसखुशीत, आवडलं.

नगरीनिरंजन's picture

20 Sep 2012 - 1:02 pm | नगरीनिरंजन

खुमासदार आणि रंगतदार!

मूकवाचक's picture

20 Sep 2012 - 1:31 pm | मूकवाचक

+१

नाना चेंगट's picture

20 Sep 2012 - 1:04 pm | नाना चेंगट

मस्त !!

फारा दिवसांनी निखळ हसलो. :)

श्रावण मोडक's picture

20 Sep 2012 - 2:02 pm | श्रावण मोडक

खुसखुशीत.

इरसाल's picture

20 Sep 2012 - 2:39 pm | इरसाल

एक डाव...........

सुहास..'s picture

20 Sep 2012 - 3:12 pm | सुहास..

=)) =)) =))

न्युटन चा तिसरा नियम आठवला का मग ;)

खुसखुशीत लिखाण. आतापर्यंतचे अपर्णाचे सर्वच लिखाण आवडले आहे. हे देखील सुरेखच.

रेवती's picture

20 Sep 2012 - 7:03 pm | रेवती

लेखन आवडले.

सस्नेह's picture

20 Sep 2012 - 8:48 pm | सस्नेह

बाकी अलिकडची पिढी संस्कारसुद्धा जोखून्-पारखून घेते बरं !
आपण निमूटपणे स्विकारत होतो.

पैसा's picture

20 Sep 2012 - 10:52 pm | पैसा

मस्तच! एकदम खुसखुशीत!

अत्रुप्त आत्मा's picture

20 Sep 2012 - 11:19 pm | अत्रुप्त आत्मा

लै भारी...लै भारी...लै भारी...! :-)

अन्या दातार's picture

21 Sep 2012 - 3:02 pm | अन्या दातार

मस्त किस्सा. :-D

बहुगुणी's picture

21 Sep 2012 - 3:16 pm | बहुगुणी

('५० फक्त' यांचे इतरत्र आलेले शब्द उधार घेउन म्हणेन) संपादकीय कार्यभार वाढला तरीही लेखनबहार कमी झालेली नाही हे उत्तम!

LOL! लेकीचे काय मत झालेय ह्या व्रताबद्दल?

स्पंदना's picture

24 Sep 2012 - 6:38 am | स्पंदना

लेकीच मत?

संध्याकाळपर्यंत जाम भुकेल झाल होत लेकरु त्यामुळे बाकि सारे प्रश्न गौण् ! ध्यास एकच पुजा करुन काहीतरी खायला मिळाव. ती जेंव्हा पुजेला बसली तेंव्हा दस्तुरखुद्द पिताश्री किचनमध्ये अवतरले. मग पंचामृताऐवजी अ‍ॅपलमिल्कशेक विथ हनी. फ्राइज, अन साबुदाणावडा असा प्रसाद स्वतःच्या हातान लेकीला करुन खायला दिला. बाईसाहेबांच सार लक्ष आता नविन काय मिळणार खायला इकडेच होत.

मी-सौरभ's picture

21 Sep 2012 - 6:36 pm | मी-सौरभ

किस्सा मस्त जमलायं :)
पु.ले.प्र.

निशदे's picture

21 Sep 2012 - 7:54 pm | निशदे

झक्कास किस्सा एकदम........... :)

पर अपर्णाक्का कोन्ह्या कितीयबी अपग्रेडेशन मागातलं तरीबी
सम्द्या उजावलिल्या बबं आन बायांकरता..
"हाडळीला नाय नवरा न खईसाला नाय बायकु"
ह्येच 'धि युनिव्हर्सल ट्रुथ' आस्तंय पघा.
आसं मला

माघल्या तेरा हारताळका न वडसाईत्रिच्या पुनवा न नागरनपनचिम्या न पौतीपुनवा न कारतिकी पाडवा न रुशीपनचिम्या यायनि सांगातल्येलं ह्ये.

तस्मात फिकर नॉट.

प्रास's picture

23 Sep 2012 - 10:01 pm | प्रास

हॅ हॅ हॅ!
आवडलं ब्वॉ!
वटसावित्री व्रतामुळे हरतालिकेमधलं अपग्रेडेशन नवर्‍याचंच होत असावं बहुतेक, काय? ;-)

स्पंदना's picture

24 Sep 2012 - 6:34 am | स्पंदना

लेखाचा विषय हा नव्या पिढीला शिकवताना आपला होणारा (उडणारा) गोंधळ असाच होता. 'अस का?' हे जेंव्हा आपण विचारायचो तेंव्हा उत्तर ठरलेली असायची, जी आपल्याला कधिच संतुष्ट नाही करु शकली. अन तेच कारण आहे आपल्या नव्या पिढीला नवी उत्तर देण्याच. अर्थात माझ्यासारख्या थोड्या (मी थोड्या म्हंटलय) विनोदी अंगान जाणार्‍या पालकाची मग अशी पावनखिंड व्हायची वेळ येते कधीकधी.

हा हा हा लै जबरा मारलाय ब्वॉ ;)

समीरसूर's picture

25 Sep 2012 - 12:10 pm | समीरसूर

खूपच मस्त! पंच एकदम भारी आहे. आवडेश! :-)

भडकमकर मास्तर's picture

25 Sep 2012 - 5:19 pm | भडकमकर मास्तर

"How? If she gets new person I too will get a new one without doing all this fuss and fasting!">>>>>>

ळॉळ