दहीहंडी २०१२

मदनबाण's picture
मदनबाण in कलादालन
10 Aug 2012 - 1:55 pm

मंडळी सकाळ पासुन दहीहंडीची मजा अनुभवायला मिळत आहे... :)
पाउस सुद्धा हजेरी लावुन आहे... :)
पटकन गोविंदा पथके आणि त्यांची हंडी फोडण्याची कसरत टिपण्याचा प्रयत्न केला आहे.

कॅमेरा निकॉन डी-५१००

(हौशी फोटुग्राफर)
मदनबाण.....

कलासंस्कृतीछायाचित्रणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

मोहनराव's picture

10 Aug 2012 - 2:05 pm | मोहनराव

वा वा छान! गोविंदा आला रे आला!

मूकवाचक's picture

10 Aug 2012 - 2:14 pm | मूकवाचक

+१

छोटा डॉन's picture

10 Aug 2012 - 2:12 pm | छोटा डॉन

झकास रे बाणा ...
असेच अजुन अपडेट्स येऊ देत.
जमलं तर 'संघर्ष' आणि ठाण्यातली दिघेसाहेबांची दहिहंडी ह्यांना हजरी लाऊन ये आणि इथे फोटो अपलोड कर ;)

- छोटा डॉन

मदनबाण's picture

10 Aug 2012 - 6:32 pm | मदनबाण

जमलं तर 'संघर्ष' आणि ठाण्यातली दिघेसाहेबांची दहिहंडी ह्यांना हजरी लाऊन ये आणि इथे फोटो अपलोड कर
डॉन्या जमलं असतं हे देखील केल असत रे ! वरचे फोटो घाई घाईत काढुन मिपावर चढवुन हापिसात आलो... आमचा "संघर्ष" एकच ! तो म्हणजे काम एके काम. :)

अत्रुप्त आत्मा's picture

10 Aug 2012 - 2:21 pm | अत्रुप्त आत्मा

व्वा....व्वा.... बाणा... और आने दो ........सिलसिला जारी रहे.

वरिल चित्र.... स्पांडूज चे.पु.(न) पोस्ट ...सा-भार ;-)

स्पा's picture

11 Aug 2012 - 12:26 pm | स्पा

जबर्या रे बाणा

मी_आहे_ना's picture

10 Aug 2012 - 2:37 pm | मी_आहे_ना

मस्त.. आता कधी एकदा ऑफिसातून पळतोय हा माहोल बघायला असं झालंय.

उदय के'सागर's picture

10 Aug 2012 - 3:04 pm | उदय के'सागर

गोविंदा आला रे आला जरा मटकी संभाल ब्रिज-बाला :) ही असली गाणी आणि गोपाळकाल्याचा प्रसाद ह्याची जाम आठवण येतेय... धन्स रे मित्रा फोटो डकवल्याबद्दल ... कमीत कमी हे फोटो पाहून तिथे जाऊन आल्या सारखे तरी वाटले :)

हे धंतड-तत्तड..!!!!!!

पुण्याचे वटवाघूळ's picture

10 Aug 2012 - 3:14 pm | पुण्याचे वटवाघूळ

फोटो क्रमांक ७,८ आणि ९ बघून अंगावर शहारा आला. इतक्या उंचावर हे गोविंदा कसे जातात? त्यातील मधला एखाद्या गोविंदाचाही तोल गेला तरी सगळेच वरचे पडणार!! स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल इतके बेफिकिर कसे असतात हे?

चैतन्य दीक्षित's picture

10 Aug 2012 - 4:00 pm | चैतन्य दीक्षित

मस्त आहेत फोटो.
दुसरा आणि शेवटचा जास्त आवडले.

अमोल केळकर's picture

10 Aug 2012 - 4:07 pm | अमोल केळकर

मस्तच :)

अमोल केळकर

आठव्या आणि नवव्या फोटोतले गोविंदा हंडीपासून एवढे लांब का दिसतायत..? हंडीला नुसती सलामी देतात की काय, तसं काही करतायत का?

हंडीला नुसती सलामी देतात की काय, तसं काही करतायत का?
व्हयं जी... तसंच हाय ते... ६ किंवा ७ थर यांची सलामी,त्याच्यावर थर लावणारेच हांडी फोडु शकतात.

इनिगोय's picture

10 Aug 2012 - 6:44 pm | इनिगोय

अस्सं.. ठाण्यात तर परत परत हंड्या लागतात असं ऐकून आहे. म्हणजे एक फुटली तर पुन्हा दुसरी बांधायची.. असं रात्रीपर्यंत चालतं, खरंय काय?

नाना चेंगट's picture

10 Aug 2012 - 6:45 pm | नाना चेंगट

हंड्या रात्रीच फुटत असतात

विनायक प्रभू's picture

10 Aug 2012 - 7:17 pm | विनायक प्रभू

कधी फुटते ते महत्वाचे नाही, फुटते ना बस्स

मग हे गोविंदा सकाळपासून रस्ते आणि चौक भरत का फिरत असतात?
खरंच माहीत नाही हो.. खिक्.. चुकलं हॅहॅहॅ करून सोडू नका हो.

नाना चेंगट's picture

11 Aug 2012 - 12:23 pm | नाना चेंगट

हंडीच्या शोधात.

हि हि हि

सुहास झेले's picture

10 Aug 2012 - 6:34 pm | सुहास झेले

मस्त रे... अजून येऊ देत फोटो :) :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Aug 2012 - 6:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त रे बाणा.

-दिलीप बिरुटे

परिकथेतील राजकुमार's picture

10 Aug 2012 - 6:36 pm | परिकथेतील राजकुमार

इकडे असले काही नसते.

भयानक मिस करतोय भारताला.

नाना चेंगट's picture

10 Aug 2012 - 6:43 pm | नाना चेंगट

सहमत आहे.

इकडे असलं काहीच नसतं :(

कुंदन's picture

10 Aug 2012 - 6:49 pm | कुंदन

>>भयानक मिस करतोय भारताला.

असेच म्हणतो. ;-)

पर्‍या,नान्या आणि कुंद्या ही मला तर हेराफेरीची तिकडी दिसते आहे ! ;)
सध्या मुक्काम पोस्ट युगांडा का ? ;)
बाकी आपणा सर्वांच्या मौलिक प्रतिसादा बद्धल मंडळ आभारी आहे. :)